Submitted by मिरिंडा on 12 October, 2016 - 04:36
माझ्या लहानपणी एका फोटो स्टुडिओची मजेशीर जाहिरात केली होती . साधारणपणे
१९६०/६१ साल असेल. ती खालील प्रमाणे होती.
दोन बहिरे एकमेकांना विचारतात :
------------------------------------
पहिला बहिरा: काय ? महेंद्र फोटो स्टुडिओत फोटो काढायला चाललात वाटत ?
दुसरा बहिरा: छे, छे. महेंद्र फोटो स्टुडिओत फोटो काढायला चाललोय.
पहिला बहिरा: असं असं . मला वाटलं , महेंद्र फोटो स्टुडिओत फोटा काढायला चाललात की काय !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हो ना शाळेतली मुलंच वाटतात ना
हो ना शाळेतली मुलंच वाटतात ना..काहीही आहे ती जाहिरात एक.
किस करायला वयाचे बंधन असते का
किस करायला वयाचे बंधन असते का ??
लहान आहेत तर काय प्रॉब्लेम?
क्रेड ची जॅकी श्रॉफची "इट पेज
क्रेड ची जॅकी श्रॉफची "इट पेज टू बी गुड" जाहिरात आवडली.
किस करायला वयाचे बंधन असते का
किस करायला वयाचे बंधन असते का ??
लहान आहेत तर काय प्रॉब्लेम? >>>> हो मला वाटला प्रॉब्लेम. उद्या आपल्या घरातली लहान मुलं हे बघून तसेच वागायला लागली तर कसं वाटेल ? असो. तुम्हाला ते बरोबर वाटत असेल तर तो माबुदो समजा. हॅपी?
ती एक प्रिटी झिंटा आणि यमराज
ती एक प्रिटी झिंटा आणि यमराज वाली जाहिरात होती ती चांगली होती. कोणत्यातरी चॉकलेट ची. ती आगे होल है म्हणून उडी मारुन जाते आणि यमराज पडतो अशी काहीतरी.
भाग्यश्री >>सहमत
भाग्यश्री >>सहमत
आणि चुकीचे नसेल तर वडिलांसमोर करावे ते गेल्यावर का करायचे किस? माझी ही मुलं लहानच आहे.कार्टून्स बघत असताना नेमकी ती जाहिरात येते वारंवार.
तीच जाहिरात चॉकलेट ऐवजी
तीच जाहिरात चॉकलेट ऐवजी संतूरची असती तर गोष्ट वेगळी. शाळेच्या वयाचे दिसणारे प्रत्यक्षात लग्नाच्या वयाचे आहेत, फक्त दिसत लहान वयाचे आहेत हे पोरासोरांनाही कळले असते.
माबुदो म्हणजे काय
माबुदो म्हणजे काय
माझा बुद्धी दोष
माझा बुद्धी दोष
धन्यवाद लोकहो... किती
धन्यवाद लोकहो... किती जाहिरातींना आणि आठवणी ना उजाळा मिळाला... बर्याच जाहिराती तर मी त्याच ताला सुरात वाचल्या
अय्या टारझन तो पण बाळाराम
अय्या टारझन तो पण बाळाराम मार्केट मध्ये?
असका मस्का लास्का कुडुंगा
म्हणजे???
अहो तो म्हणतोय पूर्वी निर्वस्त्र राहायचो जंगलात, आता कपडे घालावे लागतात
पण म्हणून बाळाराम मार्केट?
सर्तकांना, सुर्तकांना, सफारीतागा
म्हणजे, शर्ट, सूट आणि सफारी च कापड अजून कुठे मिळणार
इसकणाया बुकणालाला
म्हणजे बाळाराम मार्केट इतकी गिर्हाईकांची काळजी अजून कोण घेणार
ओ ओ ओ
अय्या गेला पण>> धन्यवाद आशूच्यँप .. पुणे आकाशवाणी वर लागायची ही जाहिरात 2015 16 ला ऐकायचे.. 8.10 च्या दरम्यान..आता माहीत नाही. कित्येक दा रिकॉर्ड करायला घेई पर्यंत संपूनपण जायची .. मध्ये एकदा बाळाराम मध्ये गेले होते तिथल्या मालकाला पण सांगितल...
मस्त मजेशीर आहे ऐकायला ती..
पुणे रेडीयो केन्द्रावरून
पुणे रेडीयो केन्द्रावरून रंगोली साडी ची जाहिरात लागयची. आठवते का कुणाला? तसेच स्वामिनी साडीची पण.
रेडियो सिलोनवर एक ' हिटाची'
रेडियो सिलोनवर एक ' हिटाची' ची जाहिरात लागायची.. एयर कंडीशनर, पंखे और ज्युसर मिक्सर हिटाची....
असे काहीतरी शब्द होते.. सगळे शब्द आठवत नाहीत पण शेवटच्या ओळी होत्या..
'देख के सजनी खूष हो जाये, काम करे घर को चमकाये...'
त्याकाळी म्हणून चालून गेली , आज जाहिरात लिहिणार्याला जेलमधे टाकलं जाईल..
पुणे रेडीयो केन्द्रावरून
पुणे रेडीयो केन्द्रावरून रंगोली साडी ची जाहिरात लागयची. आठवते का कुणाला? तसेच स्वामिनी साडीची पण.>>>> हो आठ्वली ...
किस करायला वयाचे बंधन असते का
किस करायला वयाचे बंधन असते का ??
लहान आहेत तर काय प्रॉब्लेम?
>>>
मध्येच नाक गळलं तर हि भिती असते
म्हणजे लहानपणी मला तरी वाटायची
धागा मस्तंय..
त्या आयपीएलच्या जाहीराती सुरू झाल्या का?
आमचा टीव्ही टाटास्कायसकट फुटल्याने कल्पना नाही..
तरी मध्यंतरी एक पाहिलेली.. कोहली को गुस्सा आता है तो वो सामनेवाले की पिटाई करता है.. अगर ऐसा हे तो गुस्सा अच्च्छा है वगैरे काहीतरी बकवास प्रकार होता.
अवांतर - फर्स्ट पेजवर मजेशीर
अवांतर - फर्स्ट पेजवर मजेशीर जाहीरात आणि पुढे मिरिंडा बघून ते धागाकर्त्याचा आयडी आहे हे लक्षात न येता मिरिंडा शीतपेयाच्या मजेशीर जाहीरातीचा धागा वाटला
पुणे आकाशवाणी वर लागायची ही
पुणे आकाशवाणी वर लागायची ही जाहिरात 2015 16 ला ऐकायचे.. 8.10 च्या दरम्यान..आता माहीत नाही.>>> मी वीस वर्षांपुर्वी ऐकली होती
ग्राईप वॉटरची जाहीरात आठवते
ग्राईप वॉटरची जाहीरात आठवते का कुणाला -"काय झालं, बाळ रडत होतं' वाली ? दूरदर्शनला ही कायम यायची. पाचवी-सहावीत असतानाची एक गमतीशीर आठवण आहे. मला ग्राईप वाटरच्या पारदर्शक बाटलीबद्दल कायम कुतुहूल वाटायचे की यात काय असेल? चव कशी असेल? बाळ खरच रडायचे थांबते का ? वगैरे. लहानपणी मिळाले असेल पण चव लक्षात राहायला मी बाळबृहस्पती थोडीच आहे. आमच्या शेजारी त्यावेळी एक छोटे बाळ होते आणि काही कामासाठी मला आईने शेजारी पाठवले. तिथे बाळाची आई बाळाला ग्राईप वॉटर देत होती. माझ्या रोखठोक स्वभावाने थेट मागणार होतो पण आधी बाळाची जुजबी चौकशी केली आणि ह्याचा काय उपयोग असतो वगैरे प्रश्न विचारले. मग म्हणालो मलाही याची चव पाहायची इच्छा आहे तर काकु हसल्या आणि म्हणाल्या हात पुढे कर. मग त्यांनी दोन चमचे तीर्थासारखे टाकले आणि ते घेऊन मी समाधानाने घरी आलो. इतक्या वर्षांनी पुन्हा ती चव मी विसरलोय पण जेव्हा घरी आल्यावर आईला म्हणालो मी आत्ता ग्राईपवॉटर टेस्ट करून आलोय तेव्हा ते ऐकून तिचा WDF वाला चेहरा अजून लक्षात आहे.
ग्राईपवॉटर मजा येते प्यायला.
ग्राईपवॉटर मजा येते प्यायला. मी सुद्धा पोरांना पाजल्यावर तो चमचा चाटायचो
बाकी त्या बाळ रडतेय जाहीरातीचे आमच्या लहानपणी विडंबन व्हायचे.
काय झाले?
बाळ रडतेय...
दोन थोबाडीत दे त्याच्या.. तू लहान असताना मी सुद्धा हेच करायचे
आता जे पोरांचे आईबाबा झालेत त्यांना हा फार क्रूर विनोद वाटेल, पण आम्हाला तेव्हा मजा वाटायची
बेटा स्वाटार पेहेनो, नही
बेटा स्वाटार पेहेनो, नही
ही जाहिरात आम्ही त्या विचित्र टोन मध्ये म्हणायचो. अजूनही म्हणते rather
लाडा सबमर्सिबल पंपाची जाहिरात
लाडा सबमर्सिबल पंपाची जाहिरात
लाडा लाडा सबमर्सिबल पम्प
पाणी मिळे मुबलक
हिरवी होई शेती
राहुल पाणी चला जायेगा.......
राहुल पाणी चला जायेगा.......
सांगली रेडीओ वरील
सांगली रेडीओ वरील
जथ्यासाठी कोल्हापुरात फक्त वालावलकर
आजच रात्री घ्या आणि सकाळी
आजच रात्री घ्या आणि सकाळी ओकेए एए ए ए ए ए ........
ओनिडा - नेबर्स एन्व्ही, ओनर्स
ओनिडा - नेबर्स एन्व्ही, ओनर्स प्राईड

>>>>दोन थोबाडीत दे त्याच्या.. तू लहान असताना मी सुद्धा हेच करायचे>>> खतरनाक!!!
अय्यो बाळाराम मार्केट ची
अय्यो बाळाराम मार्केट ची जाहिरात ... खरंच की दोन तीन वर्षांपूर्वी सारखी ऐकली जायची आता वाचली सुध्दा
अजून एक रुद्राणी साडी सेंटरची पण होती काहीतरी ' मज्जा आहे बाई रूद्राणी मध्ये' .
दोन थोबाडीत दे त्याच्या.. तू लहान असताना मी सुद्धा हेच करायचे>>> हो हे आमच्याकडे पण होतं
बेटा, स्वोटर पहनो ... पण भारी होती.
दोन थोबाडीत दे त्याच्या.. तू
दोन थोबाडीत दे त्याच्या.. तू लहान असताना मी सुद्धा हेच करायचे>>> हो हे आमच्याकडे पण होतं>>+१
दोन थोबाडीत दे त्याच्या.. तू
दोन थोबाडीत दे त्याच्या.. तू लहान असताना मी सुद्धा हेच करायचे>>> हो हे आमच्याकडे पण होतं>>+१
फेव्हीक्विक च्या सगळ्याच
फेव्हीक्विक च्या सगळ्याच जाहिराती
चुटकी वाजवणारा बॉस
लाकडी पट्टीला फेव्हीक्विक लावून मासे पकडणारा
आणि ती रुपसंगम ची जाहिरात
आणि ती रुपसंगम ची जाहिरात
त्यात सगळ्या साडी प्रकारांची नावं टाकलेली होती
वहिनी असावी जशी परी दिसावी
चंदेरी तनछोई साडी नेसावी
माझ्या जिवाची राणी अशी ही स्वप्नातली सुंदरी
असा सासर माहेराचा रुपसंगम दोन जीवांचा
रुपसंगम दादर टिटी
आमची कुठेही शाखा नाही
Pages