रात्रीस खेळ चाले- २

Submitted by रश्मी. on 12 June, 2016 - 08:08

Pandu.jpgआधीचे २००० प्रतीसाद झाल्याने हा तिसरा धागा उघडण्यात आलाय. आता हयसर येवां अन धुमशान घाला.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे, पण त्या माई शुध्दीवर येईतो पोलिसांनी तिथे थांबायला नको का? त्या सांगतील ना की अंगारा कोणी दिला ते. नक्की अंगारा खाल्लाय का त्यांनी? नाहीतर विष असायचं जेवणातून आणि अंगारा नुस्ता भाळी टिळा म्हणून लावलेला.

काल त्या पूर्वाला विश्वासरावने हे नाही विचारलं की बाई ग तू अंगारा कुठे ठेवला होतास.

सरिता जेव्हा विश्वासरावला म्हणते की पूर्वा कशाला आईंना मारेल तेव्हा त्याने म्हणायला पाहिजे होतं की मग माझ्याकडे काय कारण आहे त्यांना मारायचं म्हणून तुम्ही माझ्यावर आळ घेताय?

माझ्या आवशीक असं वाटता की काल यमुना 'माका दागिने नको. मी काय नाही केला' म्हणते त्यातच गोम आहे. कारण मागे सुध्दा दत्ताने तिला दागिन्यांचं आमिष दाखवून सुषल्याक विष द्यायला भाग पाडलं होतं.

निलिमा आणि सुषल्या गुन्हेगार असतील तर जतिनशेठ आणि गुरव खुनी असतील. सुषल्या अभिरामच्या लग्नाच्या वेळी घरीच होती. तिने नेनेंना मारलेलं असू शकतं. पण मला स्वतःला तरी निलिमा आणि सुषल्या खुनी असणं किंवा त्यांना खुनाबद्दल माहिती असणं म्हणजे कैच्या कै वाटतंय.

माझा संशय दत्ता, सरिता, पूर्वा, पांडू ह्यापलिकडे जात नाहिये.

विश्वासरावने तो अंगारा माईंच्या उशाशी ठेवलेला बघितला त्यावरुन तो 'गुन्हेगाराने एक चूक केलीय' म्हणाला असावा असं मला वाटतंय.

मला तरी मुद्दाम w a वर production house वाल्यांनी viral केलंय, सर्वाना उल्लू बनवायला असं वाटतं. त्यांना पकडून नेतील पण त्या गुन्हेगार नसतील.

बेरीनानांनी केलं सर्व असं दाखवायला हवं.
>>:हहगलो: थयंच थाम्ब नि कित्याक हसतंस येवढंच करु शकतात ते Biggrin

Yo @भाऊ नमसकर U rightly said it (srry 4 rlying late as I read ur msg now)
U know majority of ppl R watching this show just bcoz of the acting element. The Cast Acting is so real that many ppl actually believe that they R like this in real , despite they being completely opposite .

WITH DUE RESPECT TO ALL
mangesh salvi is very isolated person in real , he's quite short tempered (that doesn't mean he yell @ ppl every now n then ) but he's shown has a डरपोक जो सगळ्याच सगळं ऐकून घेतो
14089319_10210694460743450_7788503063004784299_n.jpg

दत्तारामचा character पण देवावर खुप विश्वास तेवणारा दाखवला आहै पण खर्या आयुषयात He's not that religious but bcoz of he's excellent acting ppl think its all real
14232548_1216228565085668_5458331186101166497_n.jpg

Sushma real and reel life थोडी फार same आहै ,she's a flirt n bubbly kinda person with good acting skills पण मला वाईट फक्त एवढ्या गोष्टीच वाट कि लॉग तिचा seductiveness कडे बगतात ना कि तिचा acting कडे N i think she also knows it n enjoy it जर मी तिचा जागी असते तर मला अशी popularity कधी आवडली नसती असो ज्याचा त्याचा प्रश्न
14517553_341376542864381_7164776980488800921_n.jpg

I Don't know whether I should be saying this or not But as I feel a certain kind of bonding with U guys so M sharing my personal experiences....

there was a person who told me that Nilima has very much attitude problem & is very arrogant kinda of a person N I also assume that she must be like that.....But जेव्हा ती मला as a person कळली Mann that GAL M telling you she's such a "SWEETHEART" a very soft spoken with a Killer smile on her face, No sign of attitude/arrogance मला आसा जरा पण वाटला नाही कि मी एक्का celebशी बोलत आहै .She's a kid at heart
In real she's opposite to her reel life/character I guess the only similarity is western cloths which She prefers to wear
154786_459842240746362_310743101_n.jpg

जर तिच्या acting बदल बोला तर झी मराठी वरील Current faces पेक्षा Nilima's acting skills R 10 times Better M saying this on bases of her acting in RKC eg. that Shevanta Scene and the time when she's got scared by the happening in the house
The director/writer failed to explorer her character , her character got restrict to रागीट, कमी हसणारी, Unemotional person

I always wonder how difficult it must be 4 a person who always have a smile on face to act like this...

अगो सुसल्या कित्यांक असे कपडे घालतय? तुका समजूक नाय, तुका लोक कडक बोलत्यात ते? दत्ताक मियां काय बोलुचा नाय, जेवा मियां त्येंका असा बगतयं, माका तो मराठी रजनीकांत वाटतलां. आणी यो ठोकळ्यो माधव कित्यांक असे चांगल चुंगले फोटु काढुक लोकांक दाखवतयं? जेव्हा बगाव तेवा हो, हो, हो, हो असा सगळ्यावांगडा बोलुक त्येंका गपगार करतावं? अन पांडु खयं असां? आणी नाईकांच्या घरात कोंबड्यो नाय असे शिरा ताणुक ताणुक कोन वरडत होतं?Chicken Run

Honest भारी फोटोज आणि ओळख. मला acting दत्ता आणि पांडूची जास्त आवडते ते अगदी natural acting करतात. अर्थात मी हातावर मोजण्याइतके एपिसोड्स बघितले आहेत. माईपण छान करतात.

माझे लाडके दत्ता आणि पांडू मात्र.

@ Honest ...........

mangesh salvi is very isolated person in real , he's quite short tempered>>>>>>>>>>>>>

ते एकंदरीतच लक्षात आलं होतं जेव्हा ह्या मालिकेच्या फेसबुक पेज
वरती प्रेक्षकांच्या प्रतिक्रियेवर त्याची CounterPost आली होती तेव्हा .................:) Happy Happy

माकां वाटता, खरो खूनी कोण, ह्यां अजून त्या सिरीयलवाल्यांकच ठरवूंक जमणांहा नाय ; आतां ते नक्की असली काय तरी आयडीया करतले -

सिरीयलीतल्या अगदीं सगळ्या नांवांच्ये चिठ्ये ठेवलास ना मडक्यात ?
आतां सांगू नातवाक खूनी कोण त्येची चिठ्ठी काढूंक ?
apoison.JPG

छान ओळख करून दिलीत हॉनेस्ट . नीलिमा , माधव यांची प्रसन्न मुद्रा आवडली .
अजय जिवंत दाखवायला हवे शेवटी .
जर तिच्या acting बदल बोला तर झी मराठी वरील Current faces पेक्षा Nilima's acting skills R 10 times Better M saying this on bases of her acting in RKC eg. that Shevanta Scene and the time when she's got scared by the happening in the house>> +१०००

>>बेरीनाना दिसलेच नाहीत बरेच दिवस.

का? का? का लिहिलीत ही कमेन्ट Proud काल आले पुन्हा बेरीनाना. डोळ्यांच्या कोपर्‍यातून माधवकडे बघत होते. माधवचं मिस्टर बिन टाईप्स बघणं नो झेपिंग आता

>>मला आसा जरा पण वाटला नाही कि मी एक्का celebशी बोलत आहै

आं? निलिमा सेलेब कधी झाली बुवा

पोटची ४ पोरं असून माईच्या खोलीत काल देविका थांबली होती आणि नंतर ती पण निघून गेली. काय हे!

छायाची अवस्था तर माझी आजी म्हणायची तसं 'खल्या गावात काय चाललंय, नवरा बघा सटवाईला'. आई इथे आजारी आणि हिचं आपलं अजयनामस्मरण चालू. काय ती घाई संसाराचा गाडा ओढायची. देवा रे!

काल माई शुध्दीवर आल्या आणि एकदम त्यांनी नाकाच्या शेंड्यावर ध्यान लावलं. म्हटलं ह्या अश्याच बघत राहिल्या तर त्यांना एकाऐवजी दोन अण्णा दिसतील Happy

अरे त्या सुषल्याला एकदा सांगा रे की तुझी आई अण्णाची लग्नाची बायको नव्हती म्हणून. सारखं आपलं 'तिका ह्या घरात येऊ दिलंय नाय' चा धोशा लावलाय. त्रास आहे!

मला वाटतं सुषल्या आणि निलिमाला 'भूलभुलैय्या' मध्ये कसं अमिषा पटेलला अक्षयने समजावून गुन्हेगार ठरवलेलं असतं तसं विश्वासरावने तयार केलं असणार. प्रोमोजप्रमाणे दत्ताला चौकशीसाटी नेणार आहेत. म्हणजे त्याच्या कुटूंबातल्या कोणीतरी गुन्हा कबूल करावा म्हणून असणार. दत्ताचं बाहेर लफडं आहे का पाहू. म्हणजे सरिताचं थोबाड तरी बंद होईल.

अण्णा तर दिसतीलच पण चूकुन माकुन शेवंता दिसली तर ह्यो ठणाणा करतील.:खोखो:

बेरीनाना नक्की जिवंत आहेत का याची काल मला सारखी शंका येत होती. आणी ते पूर्ण शुद्धीत होते तेव्हा कुणीच काही त्यांना विचारले नाही, पण जेव्हा भुयाराचा शोध लागला तेव्हा त्यांना आर्ची सारखा भाव मिळायला लागलाय.:फिदी:

अरे त्या सुषल्याला एकदा सांगा रे की तुझी आई अण्णाची लग्नाची बायको नव्हती म्हणून. सारखं आपलं 'तिका ह्या घरात येऊ दिलंय नाय' चा धोशा लावलाय. त्रास आहे!>>>>.हो की, आणी सारखे दागिने कसले मागतीय? जर तिला अण्णांनीच लोकांकडुन लुटलेले दागिने दिले असतील तर काय हपापाचा माल गपापा करायचाय काय?

प्रोमोजप्रमाणे दत्ताला चौकशीसाटी नेणार आहेत. म्हणजे त्याच्या कुटूंबातल्या कोणीतरी गुन्हा कबूल करावा म्हणून असणार. दत्ताचं बाहेर लफडं आहे का पाहू. म्हणजे सरिताचं थोबाड तरी बंद होईल.>>.> सरीता नसेल ना खरी गुन्हेगार? Uhoh

'आचार्य, आचार्य, घात झालो.'
'काय झाला? कित्याक ओरडताहास?'
'आपलो अश्वत्थामा...'
'आता तेचो काय?'
'आपलो अश्वत्थामा गेलो'
'आता खय गेलो हा झील लढायचा सोडून? थयसर बघितलास काय? त्या धृष्टद्युम्नावांगडा लढत असेल'
'नाय हो, आता कसा सांगायचा तुमका.....आपलो अश्वत्थामा मयत झालो.....वीरगतीक प्राप्त झालो....पडलो रणांगणात....'

तरी द्रोणाचार्य लढत राहिलो, कोणाक आवरेना तसा कृष्णान युधिष्ठिराक भरीला घालून त्याच्याकडे पाठवलान.

'आचार्य, आचार्य....'
'माका माहित आसा तुका काय सांगुचा ते'
'तुमका माहीत आसा? कित्या?'
'तुझ्याआधी दहा लोक सांगून गेल्यानी घसा फोडून'
'मगे?'
'मगे काय? तू पाहिलीस त्याची डेड बॉडी?'

युधिष्ठिरान मान हलवली. लढायचं थांबवूनशान द्रोणाचार्य उपहासाने बोललो 'अरे, डेड बॉडी बघितल्याशिवाय विश्वास ठेवू़क तू काय माका नाईक समजलोस?'

Pages