भारतात व्हेगन जीवन पद्धती कशी सुरू करावी?

Submitted by अश्विनीमामी on 28 September, 2016 - 05:14

मला व्हेगन जीवन पद्धती बद्दल माहिती हवी आहे. भारतीय जीवन शैली तसेच आहार पद्धतीत हे कसे जमवावे ते अवगत करून घ्यायचे आहे. आपल्यापैकी कोणी आधीच ही जीवन पद्धती आचारत असल्यास आपले अनुभव लिहा. बरे वाइट काथ्याकूट करावा.

सर्व प्राणिजन्य उत्पादनांना आहारतून काढून टाकणे इतकीच मला माहिती आहे. तसेच चामड्याच्या वस्तू न वापरणे वगैरे. घरातले शेवटचे अंडे, तूप, चीज अमूल बटर दूधपावडर संपवून टाकत आहे. पण पुढे काय व कसे अंगिकारावे?

अधिक महत्वाचे म्हणजे आवश्यक ती पोषण मूल्ये कशी मिळवावीत? काही आजार असल्यास ही जीवन पद्धती सूटेबल नसते का इत्यादी आपले अनुभव मते लिहा.

युट्यूब वर व्हेगन रेसीपीज चे बरेच व्हिडीओ आहेत.

खालील लिंका उपयुक्त आहेत.

http://www.nhs.uk/Livewell/Vegetarianhealth/Pages/Vegandiets.aspx

http://www.vrg.org/nutshell/vegan.htm

http://www.maayboli.com/node/13623
https://www.vegalyfe.com

http://qz.com/749443/being-vegan-isnt-as-environmentally-friendly-as-you...

https://m.facebook.com/Vegan-72085494764/

https://m.facebook.com/therealgreencafe/

http://www.forksoverknives.com/

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्हीगन जरूर बना पण टिपिकल व्हीगन बनून लोकांना इरिटेट करू नका.

काही आय आय टी त शिकलेले लोक "राखी सावंत जास्त सुंदर की मल्लिका शेरावत" या चर्चेतही "मी आय आय टी त होतो तेव्हा.. " असे वाक्य टाकून लक्ष वेधून घेतात व कौतुक करून घेतात. तसेच काही व्हीगन्स करतात व अमूक तमूक व्हीगन का नाही यबद्दल बोअर करतात.

विकु Lol

अमा - शुभेच्छा. जमेल तेवढा प्रयत्न करा. खूप impractical झाले तर तेवढ्यापुरती अ‍ॅडजस्टमेण्ट करण्यात काहीही गिल्ट मानू नका. मिश्राहारी-शाकाहारी-व्हीगन हे तिन्ही टोकाचे आहेत आणि यातील कोणताही पर्याय स्वीकारणार्‍या कोणालाही "मग तुम्हाला हे कसे चालते" हे पोक कशाला करायचे? या तिन्हीच्या अधेमधेही अनेक जण फिरत असतील Happy त्यांची स्वतःची सब्जेक्टिव्ह व्याख्या असेल.

"vegan when good/edible/tasty vegan option is available" असे असले तरी काय झाले? माझे हेच लॉजिक व्हेज च्या बाबतीत आहे. चिकन स्टर फ्राय बरोबर व्हेज स्टर फ्राय असेल तेच घेइन पण बार्बेक्यू ला व्हेज म्हणून कोणी आख्खे वांगे, मशरूम किंवा टोफूचा ठोकळा दिला, तर त्यापेक्षा चिकन खाइन Happy

जेवणातील बदल काय कोणीही करेल पण सिल्कच्या साड्या देऊन टाकणार यावरुन अमा विगन जीवनशैली अंगीकारण्याविषयी किती सिरियस आहेत हे कळून येतेय. 'एक बार मैने कमिट्मेंट कर दी..' हा डायलॉक आठवला. अमा, तुम्हाला शुभेच्छा !!

अमा,

रेशमी साड्या देऊन टाकण्या आधी मुलीला विचारा - काही विशेष प्रसंगात घेतलेली , आता हयात नसलेल्या नातेवाईंनी दिलेली असल्या साड्या तिला हव्या असतील तर ती ठेवून घेईल.

या पुढे नवीन काहि रेशमी, हस्तीदंती , पोवळी, मोती असे खरेदी करु नका, पण जे काही आहे ते कोणा तिर्‍हाहिताला देऊन टाकण्यापेक्षा लेकीसाठी ठेवा

antibiotics घ्यायचे बंद करणार का? बॅक्टेरीयासुद्धा विज्ञानानुसार एकपेशीय सजिवच आहेत.antibiotics ने ते मरतात.
(हाय दैय्या अब मै क्या करु)

अमा शुभेच्छा! व्हिगन डाएट अवघड असते, पण नक्कीचे फायदेशीर असेल. वाईट तर काहीच नाही. जमल्यास 'फोर्क ओव्हर नाईव्ह्ज' ही डॉक्युमेंटरी बघा. अ‍ॅनिमल प्रॉडक्ट्स कसे धोकादायक असतात हे चांगले सांगितले आहे त्यात.

मला ह्या धाग्यावरचे प्रतिसाद वाचून खेद वाटला. इतके बुलिईंग का होतेय इकडे? एखाद्याला काही करून पाहावेसे वाटत असेल तर करूद्या ना. तुम्हाला माहिती असेल तर द्या. नसेल माहिती / ती पद्धती पटत नसेल तर एका प्रतिसादात ते व्यक्त करता येते. (त्याचीही जरूरी नसतेच खरंतर) इतके सतत टोकेरी प्रतिसादांचे प्रयोजन कळले नाही.

बस्केच्या दुसर्‍या पॅराला सहमत! खरच इतक सगळे क्रिटीसाइझ का करतायत ? त्याना एखादा निर्णय घेवुन मनापासुन ते करावेसे वाटतेय, करु देत की त्याना प्र्यत्न, कदाचित त्याना ती जिवनशैली आवडेल ही , तस म्हणालाया गेल तर जगात अनेक अ‍ॅडव्हेन्चर लोक करतात काय गरज असते त्याची ? हे सगळ म्हणजे स्वतःला चॅलेन्ज करणच ना? त्याना कदाचित हे चॅलेन्ज घ्यावस वाटल असेल, नाही पटल्,जमल तर देतिल सोडुन , अमा तुम्हाला शुभेच्छा !
( आठ्वणीचा साठा लेकिला सौपुर्द करावा असा माझा सल्ला आहे, आग्रह नाही)

व्हेगन जिवन पध्दती पहिल्यांदाच माहित झाली .आवडली.
जुन्याकाळी यालाच श्रामणेर पध्द्ती म्हणत असावेत.
हे जर प्राणिमात्रा वर दयाभाव दाखवण्यासाठी असेल तर हा भाव अंर्तरमनातुन निर्मान व्हायला हवा तर कायमस्वरुपी टिकेल ओढुन तानुन केले तर दमन होईल जास्त दिवस टिकनार नाही.

माझी भाची व्हेगन आहे. लॅक्टोज इन्टॉलरन्स साठी डॉक्टरांनी व्हेगन व्हायला सांगितलं. ती अमेरिकेत आहे. सॉय मिल्क, आमंड मिल्क वगैरे वापरते. कोणाकडे जेवायला वा बाहेरगावी जाणार असेल तर प्रॉब्लेम होतो..मग ती तिचं व्हेगन फूड कॅरी करते म्हणजे होस्टना त्रास देत नाही तिच्या डाएटचा. घरी ती सोडून बाकी सगळे फूडी आहेत..सारखे बाहेर जेवायला जात असतात. मग फॅमिलीसोबत बाहेर जेवायला ती जातच नाही. अशा मर्यादा येतात.
बाकी मला आपली टिपीकल भारतीय काळजी की लग्नाच्यावेळी पूर्वी पत्रिका पोटजात वगैरे बघायचे तसं आता हे व्हेगन ग्लूटेन बघायचं का कसं..

शुभ प्रभात.

आज फुल टँक पेट्रोल भरले ३१० रु. झाले. ते किती दिवस जाते नोट करेन. पेट्रोल युसेज साठी एक आर्थिक लिमिट ठेवणे शक्य आहे. ती लिमिट ओलांडली की चालत जायचे.

सिल्क साडी पैकी एक नवर्‍याने घेतलेली शेवटची व एक त्याला मी घेतलेला शर्ट ( दिवाळी लक्ष्मीपूजन ) हा ठेवला आहे.

पार्टी समारंभात होस्टना त्रास देउ नये हा मुद्दा खूप आला आहे. मजबद्दल बोलायचे झाले तर तसे सोशल सर्कलच नाही.( इंडिअन विडो सर्कमस्टन्सेस. Happy )
माझे टाइम पास अ‍ॅक्टिवीटीज आर्ट गॅलरी , म्युजीअम ला जाणे, बागेत फिरायला जाणे,
पिक्चर, नाटकाला जाणे, पुस्तक घेउन जेवायला जाणे असेच असतात मोस्टली. मी फार लहान पणापासून दुसृया घरी राहिल्याने फ्लेक्सिबिलिटी इज इन्ग्रेंन्ड. पण मला असे वाट्ते जर एखादा इव्हेंट जास्त महत्वाचा आहे कि तुमचे फूड चॉइस. इट इस अ ट्रेड ऑफ. जर ते लोक व इवेंट महत्वाचा असेल इमोशनली तर फूड चॉइस बाजूला ठेवला पाहिजे तेव्ढ्या पुरता. किंवा मग जर फूड चॉइस महत्वाचा असेल व ते लोक तुमच्या चॉइसला समजून तुम्हाल तेव्ढी स्पेस देत नसतील मे बी यू शुड री थिंग द रिलेशन शिप. दोनीचे महत्व आपापल्या जागी आहे.

दही, चीज बटर इस आउट अ‍ॅस ऑफ डेट. Happy

मला ह्या धाग्यावरचे प्रतिसाद वाचून खेद वाटला. इतके बुलिईंग का होतेय इकडे? एखाद्याला काही करून पाहावेसे वाटत असेल तर करूद्या ना. तुम्हाला माहिती असेल तर द्या. नसेल माहिती / ती पद्धती पटत नसेल तर एका प्रतिसादात ते व्यक्त करता येते. (त्याचीही जरूरी नसतेच खरंतर) इतके सतत टोकेरी प्रतिसादांचे प्रयोजन कळले नाही. >>> बस्कू, हे अगदीच पटलं.

जीवाश्म वगैरे पर्यंत जाणे म्हण्जे स्वतः चा मुद्दा पट्वून देण्यासाठी फार ओढून ताणून केलेला युक्तीवाद वाटतो.
डेअरी आणि पोल्ट्री/मीट इंडस्ट्री ज्या पद्धतीने चालते आहे, ते ऐकून खरंच मन द्रवतं. देवाने जीव दिला आहे, तर जगणे क्रमप्राप्त आहे. आणि माझ्या अस्तित्वाचा ह्या सृष्टी वर भार पडणार आहेच, परंतु माझ्या परीने मी ह्या धरती वरचा भार शक्य तितका कमी करायचा प्रयत्न करत असेन तर त्याची खिल्ली उडवायचा कुणालाही अधिकार नाही.

शरी, हेच तर म्हणणं आहे व्हेगन लोकांचं. ते अदरवाईज घेतल्या जातं. देवाने जीव दिला आहे, तर जगणे क्रमप्राप्त आहे--- हे सगळ्यांनाच लागू होतं, नाही का? अत्यंत क्रूर पद्धतीने, त्यांच्यावर बाळंतपणं लादत, हॉर्मोन्स ची इंजेक्षने देऊन शेवटी गाईंना खाण्या साठी मारुन टाकणे हे क्रौर्य आहे.

व्हेगन फेगन जे काय आहे त्याचा नेमका हेतु काय ? दया भाव आहे का? की आम्ही कोणि तरी वेगळे आहोत हे दाखवने आहे दया भाव असेल तर त्याची व्याप्ती एवढी पाहिजे की जी लोक अशी काम करतात (प्राण्यांना मारण्याची) त्या पासुन ते परावृत झाली पाहिजेत.
कुठल्याही सजिवाला जेवढी जास्त इंद्रिय तेवढ्या जास्त वेदना व जानिवा झाड पाल्या ला इंद्रिय कमी असल्या मुळे वेदना कमी असतात पण प्राण्यांना वेदना जास्त असतात.
कुठलिही अती चांगली नसते हमेशा मध्यम मार्ग आपनाना चाहिये.

पहिली शेती करायला सुरूवात केली तेव्हा त्यांना मागच्या पिढीने कशा शिव्या दिल्या
>>>
साती, अमा माबोवरच्या पहिल्या वेगन बनत आहेत तर तू का मागच्या पिढीची बनत्येस Wink

मी वेगन व्हायचं म्हणतोय कारण मला दुधाचा नॉशिया आला आहे.... पुरुष बाईला प्रेग्नंट करतात , स्वतः नोकर्‍या करतात व बायका माद्या व आया होउन बसतात , हे ऐकून ऐकून ऐकून ऐकून माझे कान किटलेत की मला म्हशीच्या दुधाचाही नॉशिया निर्माण झालाय.

तेवढेच एका म्हशीवर उपकार होतील !

Proud

चार वाजले. काळ्या चहाची वेळ झाली.

या अगोदर एक बाई होत्या वेगन.
जुन्या होत्या.
पण इथल्या काही लोकांमुळे सगळ्या रेसिप्या पुसून टाकून दिसेनाश्या झाल्या.
>>> ओह हे माहित नव्हते.

जाऊ दे हेच खरं.
देतोच जाऊ कसा Happy
पण तरी तुझ्या 'अन्यत्र प्रकाशित पोस्ट' ची वाट बघतोय.

वेगन म्हणजे मला वेजीटेरीयन वाटायचे. हे फ़ारच वेगळे आहे.
बादामचे दुध अथवा सोया चे दुध हे भारतीय आहे का? भारतीय अश्या अर्थाने की, भारतीय पोटाला याची सवय असेल का? नसेल तर एकदम असे सेवन केल्याने काही त्रास होवु शकतो का? जसे की चिज व लोणी.
हा प्रश्न मनात आला कारण- आपला आयुर्वेद जिथे जेवण, आचरण याचे उत्तम विवेचन आहे तो भारतीय माणसाला जितका लागु होतो तितका परदेशी माणसाला लागु होत नसावा (असेल का?) असे वाटले. कारण परदेशात जे पिकते आणि तेथील माणसांचे सवयी आरोग्य इत्यादी.
असाच इतर पर्यायी पदार्थांच्या पचनाचा ही विचार नक्की करावा.
सतत वस्तु, पदार्थ वेगन आहेत का हा विचार करत तपासत बसणे त्रासदायक नाही का वाटत?
अमा...तुम्हाला मनापासुन शुभेच्छा!

Pages