परगावी राहणाऱ्या प्रियजनांची काळजी

Submitted by सिम्बा on 27 September, 2016 - 09:15

मायबोलीच्या जुन्या धाग्यांचे उत्खनन करताना मधुरिमा यांचा हा धागा सापडला

आई वडिलांची काळजी http://www.maayboli.com/node/2577?page=1

योगयोगाने मी सुद्धा नोकरी साठी आई वडिलांपासून दूर राहतो आहे, माझ्या एकदोन कलीग्स न आलेले अनुभव, अडचणी यांनी एकटे असणारे सिनिअर सिटीझन्स हे समस्या प्रकर्षाने समोर आली.
एकटे आणणाऱ्या सिनिअर सिटीझन्स (सध्या तरी फक्त पुणे शहर) साठी एक service चालू करण्याचा विचार मनात मूळ धरतो आहे.

१) व.ना चा एक वर्ग आहे जो उठून अथश्री सारख्या सोसायटी मध्ये जाऊ शकतो,
२) व ना चा एक वर्ग असा आहे जो आता खुटखुटीत आहे, बर्या पैकी टेक savy आहे, बर्याच गोष्टी आपल्या आपण करू शकतो,
हे दोन्ही वर्ग आता तरी मी कन्सिडर केले नाही आहे.अर्थात दुसर्या वर्गातील लोकांना काही गोष्टीत मदत लागू शकते
३) बराच मोठा वर्ग असा आहे, जो आपले घर/ परिसर सोडू इच्छित नाही, त्यांना अथश्री सारख्या सोयी त्यांच्याच घरी मिळाल्या तर त्यांची मोठी सोय होऊ शकते.

एकट्या राहणाऱ्या वरिष्ठ नागरिकांना/ आणी दूरदेशी राहणाऱ्या त्यांच्या मुलांना/ प्रियजनांना काय कन्सर्न असतील याची कल्पना येण्यासाठी हा धागा काढला आहे. आणि अर्थातच या सेवे साठी काय pricing reasonable वाटते याची देखील कल्पना हवी आहे.
मला सुचलेल्या गोष्टी खालील प्रमाणे,
१) परदेशी( परशहरी आणी सेम शहराच्या दुसर्या टोकाला राहणारे हे पण याच गटामध्ये येतात ) राहणाऱ्या,एकट्या राहणाऱ्या व. ना ची सुरक्षिततेच्या दृष्टीने काळजी वाटते. जर कोणी ऐजेन्सी रोज/ एकदिवसाआड जाउन घरी भेट देऊन त्यांची खुशाली विचारत/ रिपोर्ट करत असेल, तर ते दिलासा दायक ठरू शकेल.
२) या १०-१५ मिनिटाच्या visit मध्ये त्यांची चौकशी, घरातील काही किरकोळ कामे (फ्युज बदलणे,मोबाईल PC छोटे मोठे प्रोब्लेम, लौंड्री पिक अप इ कामे)
३) मेडीकल इमेर्जेन्सी/ इतर काही इमेर्जेन्सी साठी हाच मनुष्य/ एजेन्सि first पोइंट ऑफ contct असेल.
४) घरात निघणारी छोटी छोटी कामे (प्लमिंग, काही प्रमाणात हाउसकीपिंग, मोबाईल, PC यांच्या समस्या etc) या साठी मदत अर्रेंज करणे
५) सोशलायसींग व्हीसिट साठी सोबत (शॉपिंग, स्पा, सलोन, मूवी, एखादे फंक्शन)
६) डॉक्टर कडे जाण्यासाठी attendent (फुलटाइम आया किंवा नर्स म्हणून नाही) घरातून पिक करून दवाखाना, हॉस्पिटल ,treatement साठी घेऊन जाने, डॉक्टरशी गरज पडल्यास बोलणे, घरी feedback देणे/ परत सोडणे.
७) काही आजार ज्यात सतत हॉस्पिटल भेटी होतात, (डायलेसिस, फिसिओ थेरपी, रेडीअशन etc) ज्यात प्रत्येक व्हीसिट ला घरच्यांना जाणे शक्य नसते/ कठीण असते तेथे सोबत.
८) काही कामासाठी बाहेरगावी जावे लागणार असेल तर सोबत ( शक्यतो १ दिवसाचे काम जसे विसा, फमिली फंक्शन,कोर्टाचे काम इ)
९) भाजी, किराणा, औषधे,छोट्या मोठ्या किरकोळ गोष्टी आणणे.
१०) पुस्तके,मूवी, लायब्ररी.
११) घरगुती उपकरणे दुरुस्ती
१२) गरजे प्रमाणे वकील,महापालिकेचे ऑफिस येथे खेटे घालणे, कागदपत्रे फोटोकॉपी, नोटरी इत्यादी कामे करणे
१३) एकाच विभागात राहणारे क्लायंट असतील तर त्यांच्या विविध activities साठी pick up van सुद्धा चालवता येईल
१४) होम व्हीसिट करणारा डॉक्टर अरेंज करणे
१५) घरी काही छोटेसे फंक्शन करायचे असेल, (कोणाचे डोहाळ जेवण, दुसर्या व.ना. चा वाढदिवस, भिशी,) तर लागणारी अतिरिक्त मदत
१५) ...
१६). ....

या गोष्टी मी फक्त नोंदवल्या आहेत, प्रत्यक्षात या सर्विसेस चे वेग वेगळे ग्रुप करून प्याकेजेस ऑफर करता येतील
जर कोणाला अजून सर्विस चा अजून एरिया आणि/किंवा वनानां फेस करावी लागणारी सिच्युएशन सुचली तर जरूर सांगा
परदेशातील मायबोलीकर, जर अशी सर्विस देशात कोणी सुरु केली असेल तर तुम्हाला यात काय काय सेवा दिलेल्या आवडतील/ किंवा आवश्यक वाटतात,हे जरूर सांगा
सर्वात महत्वाचे या सेवांचे तुमच्या दृष्टीने रिझनेबल मूल्य किती असेल हे सुद्धा जरूर सांगा, माझी बिसनेस केस बनवण्यासाठी त्याची मदत होईल.
१) Daily visit package. (daily / once in two days visit and small sundry works)
२) Adhoc call medical/ socializing visit for 3-4 hrs
३) Multiple visit package (something like 15 days daily visit to a facility/ 2-3 a week visit to certain facility)
४) Make your own package.
वरच्या राईटअप मध्ये सेवा- मूल्य- प्याकेज असे शब्द जरी वापरले असले तरी या सर्व इंटरएक्श्न मध्ये जेष्ठ नागरिकांबरोबर भावनिक बंध तयार होतील आणि ते इमोशनली सेक्युअर फील करतील याची पुरेपूर काळजी घेतली जाईल

मी स्वत: या प्रोजेक्ट बद्दल खूप पोझीटीव्ह आहे, मला जर १५-२० क्लायंट मिळाले तर रिस्क घेऊन मी हे full time वेंचर सुरु करायचा विचार करतो आहे.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरच कल्पना खूपच छान आहे . किती विचार केला आहे तुम्ही यावर ! चोवीस तास सपोर्ट ची गरज नाहीये पण अशा प्रकारच्या सपोर्ट ची आहे असे बरेच जण असतील त्यांना याचा नक्कीच फायदा होईल .

तुम्हाला आणि तुमच्या प्रोजेक्ट ला खूप खप शुभेच्छा !

चांगली कल्पना आहे.

सर्विस इंडस्ट्री म्हणजे सोबत काम करणारी माणसे प्रोफेशनल हवीत शिवाय काळजीवाहू वगैरे.

यात फुल टाइमर केअर टेकरची मागणी सुद्धा येईल.

हे पाळणाघराची कन्सेप्ट असल्यासारखेच फक्त कमी वेळासाठी.

यासंदर्भात एका मैत्रिणीशी बरेच बोलणे झाले आहे. पुण्यात यातील काही सुविधा पुरवणाऱ्या प्रोफेशनल संस्था आहेत. त्यांचाही अभ्यास जरूर कराच. त्यांचे दर जरा सर्वसामान्य माणसासाठी महाग आहेत, परंतु गरज असेल तर लोक नाईलाजाने का होईना, पैसे खर्च करत असतात.
व्यक्ती तितक्या प्रकृती यानुसार ग्राहकांचेही तऱ्हेतऱ्हेचे अनुभव येतातच. आपले अनुभव जरूर शेअर करा.
तुम्हांला शुभेच्छा!

सर्वाना मनापासून धन्यवाद,
अरुंधती, तुमचे बोलणे इकडे मायबोलीवर झाले होते काय? असल्यास लिंक देऊ शकाल का?

.

Looks like you are trying to outsource job of traditional Indian son.

Its difficult.

Think again, Simba.

Infact yes , thats what i want to do exactly Happy

The tradiational son sitting far away should not get a guilty feeling that he has hired "just some one" to look after his parents,
I know its impossible to replace son/daughter पण अगदी दूरच्या भाचा पुतण्या इतके जरी रेलेशन डेव्हलप करू शकलो तरी i am almost there.

मित्रा,

इतकी इन्व्हॉल्व्हमेंट विकत घेता येत नाही. त्या दर्जाचे डिव्होशन/सर्व्हिसेस देणारे भारतीय तरूण पैसे फेकून सापडणे अशक्य आहे. त्या लेव्हलच्या इन्व्हॉल्व्हमेंटसाठी (भारतीयांत) श्रावणबाळ स्टाईलचे इमोशनल ब्लॅकमेलच कराव लागते.

पुन्हा,

थिंक अगेन, थिंक इंडियन. थिंक पर्स्पेक्टिव्ह.

यू नो व्हॉट?

>> The traditional son sitting far away should not get a guilty feeling<<

यू कान्ट सेल ऑफ्फ़ गिल्ट.

वाल्मिकीची स्टोरी आठवतेय ना? माझ्या पापात कुणी वाटेकरी होतंय का?....

ज्यांना हायर कराल त्यांचा नीट बॅकग्राऊंड चेक, पोलिस वेरीफिकेशन वगैरे करून घ्यावे लागेल नाहीतर नंतर नस्ता डोक्याला ताप व्हायचा.

वरच्या राईटअप मध्ये सेवा- मूल्य- प्याकेज असे शब्द जरी वापरले असले तरी या सर्व इंटरएक्श्न मध्ये जेष्ठ नागरिकांबरोबर भावनिक बंध तयार होतील आणि ते इमोशनली सेक्युअर फील करतील याची पुरेपूर काळजी घेतली जाईल >>
भावनिक बंधा पेक्षा कामाकरता कमिटमेंट असणारी, केपेबल असणारी, विश्वासू माणसं मिळवणे. त्यांच्या कामावर देख रेख ठेवणे हे पहा.

ज्येष्ठ नागरिकांना मैत्री, माणसांचा सहवास,जिब्व्हाळा , आपुलकी इ जरी हवं वाटत असेल तरी या सर्व अपेक्षा सेवादात्यांकडून असतीलच असं नाही.

हॉस्पिटल / कोर्ट / शॉपिंग या करता ने आण करणे, प्रिस्क्रिपशन तपासून आठवड्याच्या गोळ्या डब्यात भरणे, प्रिस्क्रपशन प्रमाणे औषधे वेळेवर आणून देणे, घरच्या घरी डायलिसिस होत असेल ते मशिन ऑपरेट करणे, फिजिकल थेरपीचे व्यायाम करवून घेणे या सर्व मेझरेबल सेवा आहेत. उत्तम दर्जाची सर्विस द्याल तर त्याला तसेच मोल पण मिळेल.

भावनिक बंध व गैरे वाचायला कितीही जरी भारी वाटले तरी एकटे रहाणारे ज्ये ना, +सेवेसाठी पैसे पुरवणारी मुलं मुली, आणी तुमचे एम्प्लोयीस या मधे ही सेड, शी सेड टाइप वाद विवाद आणि तिन्ही पार्टीजचे इतरांना अनरिझनेबल वाटणारे एक्स्पेक्टेशन्स याला पूर्ण वाव आहे.

शिवाय कोर्टाची कामे वा तब्येतीच्या तक्रारी यात अल्टिमेट अकाउंटेबिलिटी शेवटी फॅमिली मेम्बर्सचीच राहील. त्यात तुम्ही भावनिक बंध व ज्येनांशी ( त्यांच्या मुलां पेक्षा जास्त ) जवळीक वगैरे करायच्या भानगडीत पडू नका.

ईट्स अ बिझनेस, यू सी अ नीड फॉर सर्व्हिस ., ती तुम्ही द्या. मुलांची जागा घ्यायला जाउ नका.

नुकतच एका मित्राकडून अशा सेवेबद्दल ऐकलं. दक्षिण मुंबईतील सुखवस्तू वयोवृद्धांसाठी अशी सेवा(?) त्याच्या माहितीत कोणीतरी देतं. मुलं परदेशी वास्तव्य करणारी व परत कधीच न येणारी. स्वतःची बरीच संपत्ती असणारी त्यामुळे पालकांचे घर नाही मिळाले / नाही विकता आले तरीही वाईट न वाटणारी. असे पालक किंवा परदेशी मुले या सेवेसाठी करार करतात. मरेपर्यंत त्या वृद्धांना २४/७ सांभाळायचे. खाणेपीणे, सामान आणणे, फिरायला नेणे, सगळच. महिन्याला एक ठराविक रक्कम व मृत्यूनंतर राहत्या घराचे बक्षिसपत्र हा मोबदला. मला टू मच वाटलं होतं म्हणून मी जास्त काही विचारलं नाही. गैरफायदा घेण्याची शक्यता तर खूपच. विचारून बघते माहिती.

चांगलं वेंचर. शुभेच्छा.
सध्या मिळतंय त्यापेक्षा जास्ती चांगला सेवा पुरावा, आणि हळूहळू फीडबॅक घेत वाढवा/ सुधारणा करा. पहिल्या पासून आयडीअल करण्यापेक्षा ते ध्येय ठेवून इतर सेवांपासून डिफरनशिएट करता येईल इतका फरक ठेवून चालू करा. नाहीतर खर्च अवाच्यासवा वाढून स्केल होणं कठीण होईल असं मला वाटतं.

Medha,
तुमचे म्हणणे बरोबर आहे,
He said, she said या स्वरूपाचे वाद होतील,
ते वाद कमी कसे करता येतील (आणि परदेशी असणाऱ्या मुलांना मी actual काय सेवा देतो आहे हे कसे कळेल या बद्दल विचार चालू आहे )

अमितव,
Scaling बद्दल सहमत, सुरवातीला हा एक खांबी तंबू असणार आहे,
माणूस 10-12 कलायन्ट cater करू शकेल असे calculation आहे, जर मी actually 6-7 क्लाइण्ट निशी सुरुवात केली तर वर्ष भरात मनुष्यबळ वाढवायला लागेल (cliantele 12 chi fig cross karel)

जो पर्यंत मी स्वतः: involved तो पर्यंत तरी वाद- होऊ नयेत अशी माझीच माझ्या कडून अपेक्षा.

अजून एक - मेडिकल लिगल / आर्थिक बाबतीत डॉक्टर / वकीलस/ सी ए काय म्हणाले याचं इंटर प्रिटेशन आणि त्यावरुन घेतले जाणारे निर्णय या मुळे सख्खया भावंडांमधे वितुष्ट येऊ शकतं. तर तुम्ही आणि तुमचे एम्प्लोयीज या बाबतीत सुरुवाती पासून जागरूक रहायला हवं

छान कल्पना.

-ve points

फक्त एक लक्षात घ्या की ही योजना मध्यम वर्गीय लोकासाठी जरा खर्चिक असु शकते. तुम्हाला महिना १५००० तरी पगार द्यावा लागेल. रोज २५ दिवस आणि ६ तास जरी काम केले ( २ तास रिपोर्टींग, रिकामा वेळ ) तरी तासाला १०० रुपये होतात. आणी त्यात तुमचे overhead (billing, office, electricity, phone, profit) जरी ५०% पकडले तरी तासाला १५० रुपये होतात.

जर एखाद्या वरिष्ठ नागरिकाला २ तासाची सेवा द्यायची असेल तरी ३०० रुपये होतात. भारतातील वरिष्ठ नागरिकाची एवढे पैसे देउन सेवा घ्यायची हे न पटण्यासारखे आहे.

+ve points

पण हेच जर मुल परदेशी किंवा भारतात चांगल्या हुद्यावर असल्यास त्याचासाठी अवघड नाही.

अमेरिकेत मी ज्या apartment मध्ये राहतो ती आधी फक्त ५५+ च्या लोकासाठी होती. काही वर्षापुर्वी शहराच्या नवीन कायद्यामुळे हा नियम काढुन टाकला. आणि आमच्या सारखे लोक राहायला आले. आजुनही ५०%पेक्षा जास्त वयस्कर लोक आहेत आणि ते एकटे राहतात . माझे तीन शेजारी ८०+ आहेत आणि एकटे राहतात . घरातील plumbing, electricity ची कामे apartment ओनर करतो. बाकीच्या कामासाठी तासाला $१५ घेउन सेवा पुरवाणारे माणसे आहेत. तिन्ही शेजारी त्याचा गरजेप्रमाणे सेवेचा लाभ घेतात. भारतात पण अश्या सेवेची गरज असण्यार्या लोकाची संख्या वाढत जाणार आहे. त्यामुळे there is business opportunity

सुरवातीला हा एक खांबी तंबू असणार आहे > कमी भांडवल , risk नाही

अशी कामे करणारी माणसे मूळातच या कामाची आवड असणारी हवीत नाहीतर नाईलाजाने काम स्वीकारले तर वृद्ध माणसांना टोमणे मारणे, मारहाण करणेही होताना बघितलेय.
घरातच एखादी मदतनीस असेल तर तिला अशी कामे कशी निपटायची याचे शिक्षणही देता येईल.
मुंबईत, प्रियदर्शिनी नावाची फक्त स्त्रियांनी चालवलेली टॅक्सी सेवा होती ( अजून असेल ) त्यांनाही सहभागी करून घेता येईल.

In bangalore, urban clap, house joy, helpr, stayglad etc. Apps based services providers are there. I am sure these app has services in other cities also.

थँक्स राजसी,
मी शोधतो हि ऍप्स,
दिनेशदा,
खरी गोष्ट आहे, जसे मी मागे म्हंटले, arguments आणि डीस अग्रीमेंट टाळण्यासाठी काय करता येईल या बद्ददल विचार चालू आहे,
Probably रेकॉर्डिंग the interaction etc

नाशीकमधे वरीलप्रकारची सेवा पुरवणारी संस्था आहे. 2 तासांकरिता नाममात्र मोबदला घेते . वेळ आणि नेमकी काय मदत हवी हे तुम्ही ठरवा. मदतनीसाला थोडेफार वैद्यकीय ज्ञान पण असते. अर्थात ही सेवा संस्था पुरवत असल्याने मदतनीसाचे पोलीस व्हेरीफीकेशन पण झाले असते. संस्थाचालक स्वताःहून दिलेल्या सेवेविषयी विचारपूस करतात.

सिम्बा, मायबोलीवर नव्हते झाले बोलणे. माझी एक मैत्रिण हाच व्यवसाय सुरू करण्यास इच्छुक होती. तिला रिअल इस्टेट व संबंधित क्षेत्रातला चांगला अनुभव असल्यामुळे प्रॉपर्टी केअर, मेन्टेनन्स, आवश्यक सेवासुविधा व विश्वासू लोक उपलब्ध करून देणे हे तिला शक्य आहे. किराणा, औषधे पुरवठा, भाजी वगैरेसाठीही तिची तयारी होती. परंतु स्थानिक पातळीवर जर जवळपास सुपरमार्केट टाईप दुकाने, केमिस्ट असतीलतर ते माफक दर लावून किंवा विनामूल्य घरपोच सेवाही देतात. बाकी मेडिकल सुविधा पुरवण्यास तिचा पुरेसा अभ्यास व अनुभव नाही. मनुष्यबळही नाही. पुढेमागे कदाचित ती हा व्यवसाय सुरू करेल.

अरुंधती, मी मेडिकल क्षेत्राशी निगडीत आहे,(पण नर्सिंग/सेवा नाही)
जर त्यांना अजूनही इंटरेस्ट असेल आणि त्या पुण्यात असतील तर त्यांच्याशी बोलायला आवडेल,
प्लीज एकदा त्यांनाबरोबर बोलून मला इकडे सांगाल का?
माझे कॉन्टॅक्ट डिटेल्स पाठवतो.

परवाच तिचा फोन आला होता तेव्हा तूर्तास तरी तिने या व्यवसायाचा विचार बाजूला ठेवला आहे असे म्हणाली. तरी तिला विचारून बघते. तिला रस असेल तर तसे तुम्हांला कळवते.