आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा -१

Submitted by मानव पृथ्वीकर on 5 March, 2016 - 09:41

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. गाण्याच्या पहिल्या दोन ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

नविन नियम ८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

खास गुपित -(ख, फ, छ वगैरे अक्षरांवरुन सुरु होणारे खुप कमी शब्द असतात, त्यातला एखादा ही गाण्यात असेल, तर गाणे ओळखणे सोपे जाते) >>>>>> अगदी अगदी.

३६७
बंदा परवर थाम लो जिगर, बनके प्यार फिर आया हूं
खिदमत में आपके हुजूर, फिर वही दिल लाया हूं

Yesssssss

फ व द ल ह मुळे लिंक लागली, नाहीतर हेही नसतं आलं. तुमचं गाण्यांचं नॉलेज अफाट आहे आणि शिवाय ओळखायची टॅक्टही जमलेली आहे.
रेणू, धन्यवाद Happy
पुढचं कोडं
३६८ हिंदी
च क भ त स उ ब
स ज अ ल उ क ब
हे आधी झालं असेल तर सॉरी

"जगह मिलने पर साईड दी जाएगी"
त्याच प्रमाणे
पृच्छा करने पर टिप्स दी जाएगी
न करने पर भी, यथावकाश दी जाएगी.

कृपया सगळ्या कोडे देणार्‍यांनी याचे पालन करावे ही विनंती.

ढ ग द ह ग श ज द ज ह >>>

ढल गया दिन, हो गयी शाम, जाने दो जाना है...
{पुढची ओळ नीट आठवत नाही पण अशी काहीशी आहे} अभी अभी तो आयी हो, अभी अभी जाना है

टिप्स ;-
१) हे द्वन्द्वगीत आहे.
२) टायटल साँग आहे.
३) ६० ते ७० चे सुमधुर दशक आणि २ नेहमीची गायक गायिकेची जोडी

आता पुरे हं.

३७०
बिजली गिरा के आप ख़ुद बिजली से डर गए
हम सादग़ी पे आपकी लिल्लाह मर गए
दिल तेरा दीवाना है सनम
जानते हो तुम कुछ ना कहेंगे हम
मुहब्बत की क़सम
दिल तेरा दीवाना .

बिंगो!

३७१
इतना तो याद है मुझे
इतना तो याद है मुझे
इतना तो याद है मुझे कि उनसे मुलाकात हुई
बाद मे जाने क्या हुआ ना जाने क्या बात हुई

Pages