आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा -१

Submitted by मानव पृथ्वीकर on 5 March, 2016 - 09:41

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. गाण्याच्या पहिल्या दोन ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

नविन नियम ८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वतःच स्वतःला कोडे घालुन घेतले नी काय!>>>

काय करणार लवकर कुणी माझे कोडे उलगडलेच नाही त्यामुळे ते गाणे काय ह्याचे माझे मलाच कोडे पडले! Happy

येस आठवले! Happy

हे द्वंद्व गीत आहे ह्या पहिल्या दोन ओळी मुखड्याच्या. थोड्याफार फरकाने अश्याच दुसर्‍या दोन ओळी आहेत!
Happy

६०-७० च्या दरम्यानचा चित्रपट!

७-८ गाणी असलेला ह्यातील बरीच गाणी गाजलीत!

ह्या सिनेमाच्या नांवात असून काळ, काम, वेळ, पाणी आणि एक नटीची नांव एवढे सगळे सामावलयं!!!

आता मात्र क्ल्यु न देता गाणेच लिहावे लागेल! Happy

@ कृष्णा, अगदी बरोबर.

३४७

सुन्यासुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे,
अजुनही वाटते मला की अजुनही चांदरात आहे

आणि बहुतेक माझे ही बरोबरच आहे.

३४८.

क ह क स क श अ अ
त ज त य ज म म न

कितीक हळवे कितीक सुंदर किती शहाणे अपुले अंतर
त्याच जागी त्या येऊन जाशी माझ्यासाठी माझ्या नंतर

हे देखिल बरोबर असावे! Happy

३४९. हिन्दी

अ ह ग अ क
अ न क ख म य क
य ह ह य ब व न
फ व क ह अ क

इंतेहा हो गई, इंतज़ार की
आई ना कुछ खबर, मेरे यार की
ये हमें है यकीं, बेवफ़ा वो नही
फिर वजह क्या हुई, इंतज़ार की

Pages