बलुचिस्तानचा स्वातन्त्र्यलढा अन पाकिस्तानचे भविष्य

Submitted by उडन खटोला on 21 August, 2016 - 10:11

पाकिस्तान विषयी चर्चा करताना काही मूलभूत मुद्द्यांकडे दुर्लक्ष करता येणार नाही.

१. पूर्वीच्या हिन्दुस्थानातील (ब्रिटिश इन्डिया) वायव्य सरहद्द प्रान्त आणि पूर्व बंगाल हे प्रान्त मागण्याचा मुस्लिम लीग ला तसा काहीच अधिकार नव्हता . वस्तुतः हे बहुतांश मुस्लिम आक्रमकांच्या छळबळाने कन्व्हर्ट झालेले मूळचे हिन्दूच होते. परंतु हिन्दु धर्ममार्तंडांच्या कपाळकरंटे पणामुळे या हिन्दु धर्मपासून विलग झालेल्या मोठ्या जनसंख्येचे पुन्हा हिन्दु धर्मान्तर करून घेण्याची सुवर्णसन्धी आपण गमावली अन्यथा काश्मिर, पाकिस्तान , अतिरेकी इत्यादि विसाव्या आणि एकविसाव्या शतकात भेडसावणार्या डोकेदुखीचा समूळ नाश कित्येक शतके आधीच झाला असता. त्यातच ब्रिटिशान्च्या "फोडा झोडा आणि गुलाम बनवून राज्य करा" या कुटिल नीतीमुळे मुस्लिम समाजातील फुटीर अणि मूलतत्त्वावादी संघटना वाढत गेल्या ... त्यातूनच पुढे दार-उल-इस्लाम "पाक"स्तान ची मागणी पुढे आली.

२. आज कोणीही कितीही शान्ती आणि मैत्रीच्या गप्पा मारल्या तरी पाकिस्तान हा विषारी साप आहे. आणि त्याला कितीही दूध पाजले तरी तो आपला विषारी डन्ख मारणे सोडणार नाही हे भाजपच्या पहिल्या राजवटीत वाजपेयीना आणि दुसर्या राजवटीत मोदीजीना पहिल्या दोन वर्‍षात चांगलेच समजून चुकले आहे. यास्तव चर्चा /शान्तिप्रक्रिया हे पारम्पारिक गुर्हाळ बन्द करून डिफेन्सिव्ह च्या ऐवजी ऑफेन्सिव्ह अ‍ॅक्शन वर भर देण्याच्या मनस्थितीत सध्या मोदी सरकार दिसत आहे. सुरक्षा सल्लागार अजित डोभल आणि खुद्द प्रधानमन्त्री नरेन्द्रजी मोदींच्या अलिकडच्या भाषणे/ वक्तव्यावरुन तसे प्रतिबिम्बित होत आहे.

३. नजिकच्या भविष्यकाळात भारत आर्थिक दॄष्ट्या सुपरपॉवर बनण्याकडे वाटचाल करीत असताना अन्तरराष्ट्रीय समुदायात पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर आणून पाकिस्तानला एकटे पाडणे आणि त्याबरोबरच बलुचिस्तान/ गिलगिट -बाल्टिस्तान आणि पाक-अधिकॄत काश्मिर मधल्या पाक सैन्याच्या अत्याचाराना हायलाइट करणे तसेच बलुचिस्तानच्या स्वातन्त्र्यलढ्यास नैतिक आर्थिक/ लष्करी मदत पुरवून पाकिस्तानचे तुकडे पाडून सम्पवणे हाच पाकिस्तानच्या समस्येवरचा जालिम अन रामबाण इलाज आहे ,असे माझे स्पष्ट अन प्रामाणिक मत आहे . येणार्या काळात पाकिस्तानात निर्नायकी माजून जगाच्या नकाशावरून पाकिस्तान नाहीसा झाला,तर मला मुळीच आश्चर्य वाटणार नाही!

जय हिन्द ! जय भारत!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बलुचिस्तानबाबत एक धागा निर्माण व्हावा असे वाटत होतेच.

१. http://www.maayboli.com/node/59744?page=3#comment-3920012 येथे आपल्या मुद्दा क्रमांक दोन व तीनला सहमती दर्शवलेली आहेच.

२. भारत सुपर पॉवर बनण्याकडे वाटचाल करत आहे हे विधान मात्र आजमितीला स्वप्नच वाटत आहे.

३. बलुचिस्तानमध्ये भारत ढवळाढवळ करतो अश्या अर्थाच्या पत्रावर डॉ. मनमोहन सिंग स्वाक्षरी करून आलेले होते असा संदर्भ नुकताच वाचनात आला. त्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींनी घेतलेला पवित्रा पूर्णच उलटा व पाकिस्तानच्या खूपच जिव्हारी लागेल असा आहे, जे होणे आवश्यक आहेच. सातत्याने आपल्या जखमेवरची खपली काढणार्‍या माणसाला त्याच्याही अंगावर एक जुने गळू आहे हे त्याच गळवावर टोचून दाखवले की काय होते हे आता पाकिस्तानला समजले असेल. जगभरात पाकिस्तानची अचानक नाचक्की झाल्याची वृत्ते काही वृत्तपत्रांमधून आल्याचे आज वाचले. किंबहुना, गेल्या दोन वर्षांत मोदींनी पाकिस्तानबाबत घेतलेला पवित्रा ज्या चपळाईने बदलला आणि हा शाब्दिक दंश केला त्याची बहुतांशी तज्ञांनी (संरक्षण खाते व आंतरराष्ट्रीय राजकारण ह्या विषयातील तज्ञ) स्तुतीच केलेली आढळत आहे. काही तज्ञांच्यामते मात्र हा पवित्रा बोलून दाखवायलाच नको होता कारण त्यातून भारत बलुचिस्तानबाबत छुप्या मार्गाने काहीतरी करू इच्छितो असा एक धोकादायक संदेश इन्टरनॅशनल कम्युनिटीला जाईल. अर्थात, मोदींच्या त्या वक्तव्याने खळबळ माजलेली आहे आणि पाकिस्तानला तोंडावर पडल्यासारखे वाटत आहे ह्याबाबत बहुतेक वृत्तपत्रे व तज्ञांचे एकमत दिसत आहे.

हे म्हणजे काश्मीर प्रश्नाच्या जखमेवर मलम लावत बसण्यापेक्षा दुसर्‍याचीही एक जोरदार खपली काढण्यासारखे आहे.

अर्थात, गेल्या चार दिवसांत जे वाचायला मिळाले त्यावर आधारीत मते आहेत ही, ह्यापेक्षा अधिक विशेष, खास असे माहीत नाही.

-'बेफिकीर'!

सातत्याने आपल्या जखमेवरची खपली काढणार्‍या माणसाला त्याच्याही अंगावर एक जुने गळू आहे हे त्याच गळवावर टोचून दाखवले की काय होते हे आता पाकिस्तानला समजले असेल. +१००

धन्यवाद बेफी जी

वस्तुतः हे बहुतांश मुस्लिम आक्रमकांच्या छळबळाने कन्व्हर्ट झालेले मूळचे हिन्दूच होते. परंतु हिन्दु धर्ममार्तंडांच्या कपाळकरंटे पणामुळे या हिन्दु धर्मपासून विलग झालेल्या मोठ्या जनसंख्येचे पुन्हा हिन्दु धर्मान्तर करून घेण्याची सुवर्णसन्धी आपण गमावली

<<

हे विधान तुम्ही कोणत्या आधारावर केले आहे? कारण स्वतंत्र पाकिस्तानची निर्मिती व्हावी म्हणून त्यावेळच्या बाटग्यांनी बिहार आणि पश्चिम बंगाल मध्ये जे दंगे घडवून हिसांचार केला त्यावरुन त्यांना हिंदू धर्मातच काय पण भारतात तरी राहायचे होते का? हा प्रश्न पडतो. आणि ह्या बाटलेल्याना पुन्हा हिंदू धर्मात घ्यायचा प्रयत्न तेंव्हा कुणी केला असता तर त्या प्रयत्नांना ह्या बाटलेल्यांनी कितपत साथ दिली असती?

एकविसाव्या शतकात भेडसावणार्या डोकेदुखीचा समूळ नाश कित्येक शतके आधीच झाला असता>>>

मला वाटते लेखकाला म्हणायचे आहे की वेळीच: ज्यावेळी शक्य होते, धर्मांतरीतांची इछापण होती तेव्हाच: धर्मांतर केले असते तर फाळणीचा प्रश्नच उद्भवला नसता.

>>तसेच बलुचिस्तानच्या स्वातन्त्र्यलढ्यास नैतिक आर्थिक/ लष्करी मदत पुरवून पाकिस्तानचे तुकडे पाडून सम्पवणे हाच पाकिस्तानच्या समस्येवरचा जालिम अन रामबाण इलाज आहे ,<<

रिस्कि प्रपोजल आहे. असं केल्याने काश्मिर खदखदत राहिलंच शिवाय पाकिस्तान भोकांड पसरुन जगाची सहानुभुती मिळवायचा प्रयत्न करत राहिल. परक्या देशातल्या राजकारणात ढवळाढवळ करुन अमेरिकेने आपले हात पोळुन घेतलेले आहेत, भारताने तो कित्ता गिरवु नये...

>>>>रिस्कि प्रपोजल आहे. असं केल्याने काश्मिर खदखदत राहिलंच शिवाय पाकिस्तान भोकांड पसरुन जगाची सहानुभुती मिळवायचा प्रयत्न करत राहिल. परक्या देशातल्या राजकारणात ढवळाढवळ करुन अमेरिकेने आपले हात पोळुन घेतलेले आहेत, भारताने तो कित्ता गिरवु नये...<<<<

ह्या क्षणी झी न्यूज बघा, मिशन बलूचिस्तानची संपूर्ण कहाणी दाखवत आहेत. कदाचित तुमचे मत थोडे वेगळे होईल ते पाहून. Happy

पाकिस्तानचे तुकडे करणे हा जास्त रिस्की पर्याय आहे. तुकडे झाले तर आयसिस, अल कायदा यांना अजून भुसभुशीत जमीन मिळेल. आत्ताच इतके अराजक आहे त्यात जर पाकिस्तान हा देश म्हणून संपला तर भारताला अजून जास्त दहशतवादी समस्यांना तोंड द्यावे लागेल.

पाकिस्तानमध्ये लोकशाही रुजणे, त्यांनी आर्थिक प्रगतीकडे वाटचाल करणे आणि मूलतत्त्ववादी विचारसरणी पासून लांब जाणे हे महत्वाचे होते.

पण पाकिस्तानची आता पर्यंतची प्रगती आणि विचारसरणी पाहता हे खूप अवघड आहे. आता अलमोस्ट वेळ निघून गेली आहे.

पाकिस्तान आणि बांग्लादेश मध्ये ज्या प्रकारे मूलतत्ववादी हातपाय पसरत आहेत ते पाहता भारताने स्वतःची सीमा आणि अंतर्गत सुरक्षा वाढवणे हे महत्वाचे आहे. त्याच बरोबर सर्वधर्मीय भारतीयांनी पण धार्मिक मूलतत्त्ववाद बाजूला सारत शिक्षण, तंत्रज्ञान आणि प्रगती यावर लक्ष केंद्रित करायला हवे.

भारताच्या पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून स्वातंत्र्य दिनाचे भाषण करताना बलुचिस्तान, गिलगिट बाल्टिस्तान व पाक व्याप्त काश्मीर हे विषय काढायला नको होते असे मला वाटते. फार तर एखाद्या मंत्र्याकरवी वा नोकरशहा करवी हे करता आले असते.

इतके दिवस जगासमोर भारत व पाकिस्तान हे तुल्यबळ व समान परिपक्वतेचे चे देश नसून भारत हा पोक्त शांतताप्रीय व ढवळाढवळ न करणारा व महासत्तांच्या पंगतीत बसू इच्छीणारा देश व पाकिस्तान एक किरकोळ कुरापतखोर देश हे चित्र उभे करणे हे भारतीय परराष्ट्रनीतीचे इप्सित होते. त्यांना भारत-पाकिस्तान हा जोडशब्दही नकोसा वाटे. या विधानांमुळे त्यावर थोडेसे पाणी पडले. पाक व्यप्त काश्मीर व गिल्गिट या दोह्नी ठिकाणी मोदी विरोधी मोर्चे निघाले.

पाक व्याप्त कश्मीर मध्ये पाकिस्तान बद्दल नाराजी आहेच, पण त्यांना भारताबद्दल प्रेमही नाही. याउलट काश्मीर मध्ये पाक स्वातंत्र्यदिन जोरात साजरा होतो. ज्यावेळी भारत काश्मीर मध्ये यू एन एच आर सी ला जाऊ देत नाही त्यावेळी नवाझ शरीफ यांनी तिला पाक व्याप्त काश्मीर मध्ये यायचे आमंत्रण देऊन एक प्रकारे मोदींना खोटे पाडले आहे. शिवाय पाक व्याप्त काश्मीर मध्ये भारताचे अतिशय लिव्हरेज मर्यादित आहे.

बलुचीस्तान शी भारताशी सीमा नाही त्यामुळे तिथे काही करावे तर इराण वा अफगाण मार्गे करावे लागेल. बलुचीस्तान चा विषय काढून इराण व चीन या दोन्ही देशांना उगाच चुचकारणे कशाला? मुळत बलुचीस्तान हा भारत व पाक चा बायलॅटरल विषयही नाही. हेच पुढे चालू राहिले तर पाक नागा बंडखोरांना वा मध्य भारतातील नक्शल्यांना पाठिंबा देतील.

भारतासमोर पहिला प्राधान्यक्रम काश्मीर मध्ये शांतता आणणे हा असावा. काश्मीर चे खरे चित्र पहाण्यासाठी रायजिंग काश्मिर सारखी स्थनीक वृत्तपत्रे वाचणे उद्बोधक ठरेल.

मोदींनी (भारताने नव्हे) पाकिस्तान बरोबर युध्द करावे आणि तुकडे पाडावे. आणि इतिहासात प्रसिद्ध व्हावे.

भाजपाला सत्तेवर आले की इंदीरा गांधी बनण्याची मुंगेरीलाल स्वप्ने पाडतात. आधी वाजपेयींना पडलेली आता मोदीचा नंबर आहे
पण यावेळी सैनिकांऐवजी गौरक्षक, स्वयंसेवक यांना लढाईला पाठवा. त्यांची हौस पण फिटेल आणि ते पण फिटेल Wink

विजय कुलकर्णी,

तुमच्या संयत प्रतिसादावर काही म्हणावेसे वाटले तरी तुमच्या आजूबाजूला असलेले ज्या पारंपारीक भाषेत आणि शैलीत धाग्यावर चेकाळतात ते पाहून असे वाटते की प्रत्येक धागा हा माबोने जणू ह्यांना स्वतःची भडास काढण्यासाठीच दिलेला आहे असे ह्यांचा समज असावा.

बलुचिस्तानचा विषय काढणे हे 'फक्त काही' तज्ञांना पटले नाही हे ठीकच पण भारताने स्वतःच्या पारंपारीक भूमिकेतून कधीच बाहेर पडू नये, कधीचा अरे ला कारे करू नये ही अपेक्षा दशकानुदशके ठेवून काश्मीरचे काय झाले हे सगळे पाहत आहेत. प्रतिमा सांभाळण्यासाठी काश्मीरसारखा प्रश्न चिघळवत ठेवणे, अतिरेकी सहन करत बसणे वगैरे साठ, सत्तर वर्षे केले हे खूप झाले. जगभरात पाकिस्तानची पुरेशी नाचक्की झाल्यानंतर 'आता आम्ही सहन करणार नाही, आमच्यातही काही दम आहे' हेसुद्धा जगासमोर यायला हवेच. गांधी आणि नेहरू आणि नेहरूंच्या पुढच्या पिढ्यांनी जे बुळचट राजकारण केले त्यानुसारच येथील जनमानसामध्ये 'योग्य काय आणि अयोग्य काय' ह्याबाबत धारणा निर्माण झाल्या. त्यापेक्षा वेगळी भूमिका घेणे म्हणजे अचानक खूप खलनायकी वागणे असे ठरू लागले. पण जर्मनी, इस्राईल व इतर कित्येक देश असे आहेत की जे असले प्रश्न चुटकीसरशी सोडवतील आणि जग काही म्हणू शकणार नाही. आज भारत ही एक प्रचंड आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आहे. परदेशी कंपन्यांना येथे येण्याचे आकर्षण आहे. ह्या परिस्थितीत भारताने एक काठी उगारणे म्हणजे काही अगदी लगेच जगभरातून वाळीत टाकले जाण्याचा धोका नव्हे.

आगे आगे देखिये होता है क्या - असे म्हणावेसे वाटत आहे. अपबीट वाटत आहे. जे काँग्रेसच्या स्वार्थी, घराणेशाहीने बुरसटलेल्या आणि अंहिसा ह्या शब्दाचा संपूर्णपणे उलट अर्थ लावणार्‍या नेत्यांना जमले नाही ते एका भाषणाने झालेले आहे. मनमोहन सिंगांनी तर कहरच केला होता. तुम्ही म्हणता ती भारताची इमेज व्हावी ह्या प्रयत्नांत भारत असताना हे तिकडे जाऊन 'होय आम्ही बलुचिस्तानात ढवळाढवळ करतो' असे लेखी देऊन स्वाक्षरी करून आले. म्हणजे खरे तर ही भारतविरोधीच कारवाई झाली आणि भारताची प्रतिमा मलीन करणारीच कारवाई झाली. पण त्या उलट मोदींनी जो प्रतिहल्ला चढवलेला आहे त्याचे संरक्षण खाते, परराष्ट्र खाते आणि आंतरराष्ट्रीय राजकारण ह्या विषयातील जगभरातील तज्ञ व जगभरातील वृत्तपत्रे स्तुती करत आहेत. राहिले येथील काही कूपमंडूक प्रवृत्तीचे निराधार, तडफडणारे नेते आणि अनुयायी, 'विचारतो कोण त्यांना' अशी अवस्था आहे त्यांची! मोदींचा हा प्रतिहल्ला बघता सध्या भारतीय राजकारणात त्यांच्याइतका सामर्थ्यवान नेता दुसरा नाही हे पुन्हा सिद्ध होत आहे.

-'बेफिकीर'!

जाऊन 'होय आम्ही बलुचिस्तानात ढवळाढवळ करतो' असे लेखी देऊन स्वाक्षरी करून आले. म्हणजे खरे तर ही भारतविरोधीच कारवाई झाली आणि भारताची प्रतिमा मलीन करणारीच कारवाई झाली

साफ चुक हा अभद्र खालच्या पातळी वरचा प्रचार खाजप्ये करतात कारण अक्कल गहाण ठेवतात
त्याचे उत्तर मनमोहन साहेबांनी भर संसदेत खाजप्यांना दिलेले आणि वटवटणारी खाजप्यांची थोबाड बंद केली होती. ( मोदीने अजून संसदेत कुठलीही उत्तरे दिली नाही)
ज्या बांग्लादेश सीमा व्यवहारावर बेअक्कल खाजप्यांनी रान माजवले होते तोच व्यवहार सत्तेवर आल्यावर करावा लागला या वरून परराष्ट्रीय व्यवहार समजण्याची लायकी भाजपाला नाही हे जगासमोर उघड झाले. काँग्रेसचे व्यवहार पुढे चालवण्यात शहाणपणा आहे हे भाजपाचा मोदीला कळले आहे

नुसते बोलण्यावरून भक्तांची अवस्था जग जिकल्याची झाली

फक्त इथल्या काही अतिशहाण्या शुक्राचार्यांना कळला नाही Wink

मागे पुण्याला जितकी लोक जमलेली तितकी लोक प्रत्यक्ष युध्द सुरू झाल्यावर सीमेवर जमतील का?
Wink

फक्त माहीती करीता कारण 62-65-71-99 साली सीमेवर जमलेली बघितली नाही

इतक्या महत्त्वाच्या विषयावर जेव्हा लोक "मी सपोर्ट करतो तो राजकिय पक्ष त्याचे नेते त्याची विचारसरणी कशी बरोबर आणि बाकी सगळे कसे चूक" हे अभ्यास न करता तावातावाने मांडतात तेव्हा अशा "बौद्धिक गांधारी" असणार्‍या आपल्या देशाचं भवितव्य भीषण आहे ह्याची जाणीव होते.

डोळ्यावरची पट्टी काढावा अभ्यास करावा मग बोलावं हे आपल्या देशातल्या घराणेशाही जपणार्यांना कधी कळणार देव जाणे..

मनमोहनसिंगांनी नेमकी कुठे आणि कशावर स्वाक्षरी केली आणि त्यामुळे भारताला कसा त्रास झाला हे कुणी स्पष्ट करेल काय?
कारण काल माबोवरच पहिल्यांदा वाचल्यावर मी २००९ ची पाकिस्तानी आणि भारतीय वर्तमानपत्रेही वाचली (आणि माझं इंग्रजी तसं ऋपेक्षा बरं आहे!) तर मला एकाही ठिकाणी असं काही लिहिल्याचं आढळलं नाही.

भारताच्या पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून स्वातंत्र्य दिनाचे भाषण करताना बलुचिस्तान, गिलगिट बाल्टिस्तान व पाक व्याप्त काश्मीर हे विषय काढायला नको होते असे मला वाटते.>>> सहमत. पाकीस्तानी राज्यकर्ते आपला नाकर्तेपणा लपविण्यसाठी काश्मीरचा बागुलबुवा उभा करतात तसेच काहीसे आदरणिय मोदींनी केल्यासारखे वाटले. आणि त्या भाषणात बलुची लोकांनी 'माझे' आभार मानले हा उल्लेख नसता तर बरे झाले असते.

मागे वाकडी वाट करुन आदरणिय मोदी पाकिस्तानात नवाजभाईंना वादिहाशु द्यायला गेले होते, तेव्हा 'मास्टर स्ट्रोक' म्हणुन भलामण करणारे आता १८० अंशात वळलेल्या मोदीनीतीचे स्वागत करत आहेत हे वाचुन केवळ गंम्मतच वाटली.

बुळचट? त्या बुळचट धोरणानेच बांग्लादेशची निर्मिती झाली
जे खाजप्ये स्वप्नात सुध्दा धाडस करणार नाही Wink
मोदींनी करून दाखवावे बोलायला तर नाक्यावरचा पानपट्टीवाला पण बोलतो यांव करू न त्यांव करू Rofl

The Prime Minister of India, Manmohan Singh, and the Prime Minister of Pakistan, Syed Yusuf Raza Gilani, met in Sharm-el-Sheikh on July 16, 2009.

The two Prime Ministers had a cordial and constructive meeting. They considered the entire gamut of bilateral relations with a view to charting the way forward in India-Pakistan relations. Both leaders agreed that terrorism is the main threat to both countries. Both leaders affirmed their resolve to fight terrorism and to cooperate with each other to this end.

Prime Minister Singh reiterated the need to bring the perpetrators of the Mumbai attack to justice. Prime Minister Gilani assured that Pakistan will do everything in its power in this regard. He said that Pakistan had provided an updated status dossier on the investigations of the Mumbai attacks and had sought additional information/evidence. Prime Minister Singh said that the dossier is being reviewed.

Both leaders agreed that the two countries will share real time, credible and actionable information on any future terrorist threats.

Prime Minister Gilani mentioned that Pakistan has some information on threats in Baluchistan and other areas.

Both Prime Ministers recognised that dialogue is the only way forward. Action on terrorism should not be linked to the composite dialogue process and these should not be bracketed. Prime Minister Singh said that India was ready to discuss all issues with Pakistan, including all outstanding issues.>>

हे मिनटस ऑफ द मिटींग आणि प्रोसिडींग आहेत.

यात कुठेही बलुचिस्तानात आम्ही ढवळाढवळ करतो असे मनमोहनसिंगांनी मान्य केलेले दिसत नाही.

<<दहशतवाद निर्मूलनाकरिता एकमेकांना सर्वतोपरी सहकार्य करू या , असे ठरवल्यावर नंतर गिलानी म्हणाले की बलुचिस्तानातल्या दहशतवादासंबंधी काही महत्त्वाची माहिती आमच्याकडे आहे.

तर मनमोहनजी म्हणाले की (तशी शंका असेल तर) चर्चा करूया. चर्चेने सगळे प्रश्न सुटायला दिशा मिळते. या प्रश्नांपायी सौजन्यपूर्ण मैत्रीच्या प्रयत्नाना खीळ बसू नये. आम्ही तुमच्याशी सगळ्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करायला तयार आहोत.'>>

या वरच्या मजकुरावरून आम्ही बलुचिस्तानात हस्तक्षेप करतो असे मनमोहनजींनी मान्य केलेय असे मला कुठेच दिसलेले नाही.
या उलट चर्चेला सुरूवात करून आमचा बलुचिस्तानात काहीच प्रत्यक्ष हस्तक्षेप नाही हे स्पष्ट करायचा त्यांचा प्रयत्न होता असे वाटते.

नव्या राजवटीत अनेक शब्दांचे अर्थ बदलले आहेत."क्लीन चिट" , "मास्टर स्ट्रोक" ई. तेवढे चालायचेच.

बलुचीस्तानावर बॉम्ब हल्ल्याचा उल्लेख करताना मिझोरम वर भारतानेही बॉम्ब हल्ला केला होता हा तपशील सोयिस्कर रित्या विसरला.

साती हे भाजपाने पसरवलेले आहे. ज्याचे सडतोड उत्तर संसदेत माननिय मनमोहनसाहेबांनी दिले होते ज्यामुळे जेटली अडवाणीसकट संपुर्ण भाजपाची दातखिळी बसल्याचे सार्‍या देशाने पाहिले होते.
हे इथले काही अतिहुशार भक्त विसरले आहे.

बलुचिस्तानात भारत हस्तक्षेप करत नाही हे स्पष्ट केले. कारण अंतर्गत मामल्यामधे भारत कधीही हस्तक्षेप करत नाही उलट पाकिस्तान आमच्या काश्मिरमधे वारंवार हस्तक्षेप करतो हे माननिय मनमोहन सिंग साहेबांनी जगाला दाखवून दिले होते त्यामुळेच त्या मिटिंग नंतर अमेरिका, चीन आणि इतर देशांनी पाकिस्तांनाला चांगले खडसावले होते. आणि बलुचिस्तानावरून भारतावर आरोप करायचे थांबवा असा सज्जड दम पाकिस्तानला युनो सकट सर्व देशांनी दिला होता. हे सर्वात मोठी उपलब्धी अत्यंत शांततेत मनमोहन साहेबांनी मिळवली होती. ज्याचा त्यांनी कधीच "उदोउदो" केला नव्हता.
त्यामुळे जगाच्या पटलावर पाकिस्तान हा भारताच्या कुरापती काढणारा देश आहे हे स्पष्ट झाले आंणि तो या कुरापती का काढतोय ? याचे उत्तर पाकिस्तानाला देता आले नाही. बलुचिस्तान हे पाकिस्तान कडे उत्तर होते. परंतू भारताने कधीच मान्य केले नव्हते आणि कुठला ही पुरावा पाकिस्तानाला सादर करता आला नव्हता. त्यामुळे या प्रश्नावर पाकिस्तान नेहमी एकाकी पडला होता.

पण आता त्याला उत्तर देता येईल असे वाटते कारण अतिउत्त्साही परिधानसेवकांनी खुद्द कबूली दिली आहे. कि आम्ही बलुचिस्थानात हस्तक्षेप करतो आनि पुढे करु.


जिथे हस्तक्षेप करतोय असे मान्य करण्याचा आरोप भाजपा आजवर लावत आली होती त्याच भाजपाच्या मोदींनी खुद्द कबूल केले आहे. यापेक्षा मोठे विडंबन अजुन काय असु शकते.
आता भक्त कुठे जातील. ?

मनमोहन सिंग साहेबांवर मान्य केले हा आरोप करणारे भक्त मोदींवर पण तोच आरोप करणार आहे का? Wink

कट्ट्यावरचे शुक्राचार्‍याचे "ठेवणीतील" डुआयडी मालकांच्या मदतीला आले वाटते,. Wink

भक्तांना मुद्द्यावरून प्रतिवाद करता आला नाही की लगेच इतरांना डुआय्डी ट्रोल म्हणायचे आणि पळून जायचे चांगले जमते.

मुद्द्यावरुन प्रतिवाद करून दाखवा. जिथे काँग्रेसला कबुली दिली म्हणून आरोप वर बेफींनी केला आहे तिथे खुद्द भाजपाच्याच मोदींनी लाल किल्यावरुन हस्तक्षेपची जाहीर कबुली दिली आहे.. Biggrin
यापेक्षा अजुन कोंडीत कोणी सापडलेले नसेल Wink

जनतेने मुद्देसुद प्रतिवाद केला की भाजपाचे नेते आणि त्यांचे भक्त भर इंटरव्ह्यु मधून पळ काढतात. Wink इतिहास साक्षी आहे

@अतरंगी | 21 August, 2016 - 23:59>>>>> यांच्या पोस्टला १००% अनुमोदन.

1. 72 नृंतर पाकीस्तानची सैन्य शक्ती खरोखरीच दुय्यम दर्जाचीच राहीलेली आहे का!

2. भारताला खरोखरच दिर्घ युद्ध परवडणार आहे का?

बलाढ्य अमेरीकेची झालेली नाचक्की आपण पाहतच आहोत.

आपण सैन्य आणि शस्त्रास्त्र या बाबतीत पाकिस्तानला वरचढ असलो तरी युद्ध आपल्याला पण परवडणार नाहीच. शिवाय भारताविरुद्ध पाकिस्तानला मदत करायला चीन आहेच.

भारताची अर्थव्यवस्था आता कुठे बाळसं धरायला लागली आहे. कोणत्याही प्रकारचे युद्ध हे आपल्या प्रगतीला अतिशय हानिकारक असेल. आपल्यावर युद्ध लादले गेले तर त्याचे तिखट प्रत्युत्तर द्यावेच. पण भारताने सद्य परिस्थितीत उगाच आपल्या देशाबाहेरील समस्यांमध्ये हस्तक्षेप करू नये.
राजनैतिक पातळी वर पाकिस्तानची कोंडी करणे, बलुचिस्तान मध्ये पाकिस्तान करत असलेले अन्याय जगासमोर आणणे हे ठीक आहे. पण उघडपणे शस्त्रास्त्र पुरवठा, लष्करी मदत करू नये.

काश्मीर आपला प्रांत आहे. तिथे फुटीरवाद्यांविरुद्ध दाम, दंड, भेद यातले काहीही वापरून बंड मोडून काढले गेले पाहिजे.

सद्यस्थितीस पाकिस्तानच्या बाबींकडे लक्ष्य देणे, हेच मुळात भारतासाठी अनावश्यक आहे. काश्मीर विषय तसाही आंतराष्ट्रीय स्तरावर जवळपास बाजूला पडल्यासारखा आहे. एक पाकिस्तान बोंबलत असला म्हणून त्याला एवढे महत्व द्यायचे काहीच कारण नाही.
काश्मीर तेथे कदाचित त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न असेल, तसा आपल्यासाठी बलुचिस्तान नाही, अन काश्मीर तर नाहीच नाही.

काश्मीर खोऱ्यात मूळच्या असंतोषाला खतपाणी घालण्याचा दोष जितका पाकिस्तानला जातो, तितकाच तो आपल्यालाही लागतो. एकाच वेळी प्रभावी प्रशासन आणि काश्मीरमधील विरोधी गटांविरोधात कडक कारवाई, या दोन्ही बाबतीत आपण कमी पडलो. आता परिस्थिती अशी झालीय की दोन्ही देशांसाठी हा फक्त एक प्रतिष्ठेचा प्रश्न झालाय. सध्यातरी "ठंडा करके खाओ" याशिवाय दुसरा मार्ग दिसत नाही.

बाकी मोदींच्या भाषणातील बलोचिस्तानबद्दल मर्यादित उल्लेख ठीक आहे, पण अप्रत्यक्षपणे आपण तिथे ढवळाढवळ करतो, असे कबूल करणे म्हणजे पाकिस्तानच्या फुटकळ आरोपांना हवा देण्यासारखे आहे.
शेजारच्या घराला आग लावताना आपल्या घरालाही त्याची झळ बसते, तेव्हा तितकी गरज नसताना भारताने दुसऱ्या देशांच्या अंतर्गत बाबीत लक्ष घालू नये. असे केल्यास काय परिणाम होतात, याचे पाकिस्तानपेक्षा दुसरे चांगले उदाहरण कुठले असेल?

इंदिरा गांधींच्या काळापासून बलुचिस्तानात भारताच्या कारवाया सुरू आहेत हे सर्व संबंधितांना 'गुप्तपणे' माहीत आहे. आतापर्यंतच्या कोणत्याही भारतीय पंतप्रधानाने याबाबत जाहीर कबुली दिली नव्हती, ती मोदींनी दिली. जिथे देवदूत पाय टाकत नाहीत, तिथे मूर्ख लोक हमखास जातात अशी काहीतरी इंग्रजी म्हण आहे. गेली तीस वर्षे सातत्याने या कारवाया चालू आहेत. पण ना कधी भारत सरकार आणि पंप्र पहिल्या पानावर झळकले, ना रॉ अथवा रॉचे मुख्य अधिकारी. रामेश्वर नाथ काव यांसारखे जागतिक दर्जाचे गुप्तहेरशिरोमणी कधीही प्रिन्ट मीडियात आले नाहीत. त्या सगळ्याचे फळ आता मिळत आहे. भाजपची आतापर्यंतची वागणूक अतिउत्साही, अननुभवी, नवशिक्या पहिलटकरणीसारखी आहे. (तरी बरे, सत्ता मिळण्याची ही दुसरी खेप आहे.) उगीच आरडाओरडा. खरे तर बोंबाबोंब.
वास्तवात भाजपला परराष्ट्रसंबंधांच्या बाबतीत काँग्रेसचे धोरण पुढे नेण्याखेरीज फारसे काही वेगळे करण्यास वावच नाही. कारण काँग्रेसची परराष्ट्र धोरणे ही उपलब्ध पर्यायांतला सर्वोत्तम पर्याय होती.(best available option)
सद्यस्थितीत म्हणजे आयसिसचा धोका वाढत असताना कोणत्याही सुजाण भारतीय सरकारचे ध्येय पाकिस्तान फोडणे हे असूच शकत नाही. कारण तिथली अप्रगत आणि अनुदार समाजव्यवस्था. जोपर्यंत इथल्या 'विचारजंती सिकुलर' लोकांप्रमाणे धर्मसत्तेची इह कार्याशी फारकत असावी या मताच्या लोकांचा एक मोठा-खूप मोठा वर्ग तिथे निर्माण होत नाही तोपर्यंत ही आयती नवस्वतंत्र इटुकली राष्ट्रे अलगद कडव्या अतिरेक्यांच्या हातात पडण्याचा खूप मोठा धोका आहे.
गुप्तपणे कारवाया सुरू ठेवून पाकिस्तानला सळो की पळो करावे आणि त्याच बरोबर आंतरराष्ट्रीय सहानुभूतीचे ब्राउनी पॉइन्ट्स मिळव राहावे हेच योग्य ठरेल.

मुळात लाल किल्ल्यावरून बलुचिस्तानचा उल्लेख करणे चुकिचे आहे.
उल्लेख केला चांगले आहे पाकिस्तानला जशास तसे धोरण ठिक पण तो उल्लेख सार्क मिटींग अथवा अजुन मोठ्या स्तरावरच्या मिटींग मधे करायला हवे होते. ते जास्त परिणामकारक ठरले असते. आणि अचूक ठरले असते.
आता झाले काय पाकिस्तानाला आयते कोलित दिले आहे. आणि तिकडे बलूचिस्तानवाले बिचारे मोदीच्या भरोश्यावर आंदोलन करत आहे. उद्या तिकडे काही झाले तर भारता तर्फे मदत देता येणार नाही. त्यामुळे नंतर ते सुध्दा भारताचा रोष करू लागतील. इतकी वर्ष भारत जे छुप्या पध्दतीने मदत करतोय ती पण ते लोक घ्यायचे बंद करतील. थोडक्यात बलुचिस्तानवाले लोक नेपाळसारखे वागायला सुरुवात करतील.

म्हणजे तेल गेले तूप गेले हाती राहिले धुपाटने अशी अवस्था होणार. जी अजिबात होऊ नये अशी इच्छा आहे.

Pages