बलुचिस्तानचा स्वातन्त्र्यलढा अन पाकिस्तानचे भविष्य

Submitted by उडन खटोला on 21 August, 2016 - 10:11

पाकिस्तान विषयी चर्चा करताना काही मूलभूत मुद्द्यांकडे दुर्लक्ष करता येणार नाही.

१. पूर्वीच्या हिन्दुस्थानातील (ब्रिटिश इन्डिया) वायव्य सरहद्द प्रान्त आणि पूर्व बंगाल हे प्रान्त मागण्याचा मुस्लिम लीग ला तसा काहीच अधिकार नव्हता . वस्तुतः हे बहुतांश मुस्लिम आक्रमकांच्या छळबळाने कन्व्हर्ट झालेले मूळचे हिन्दूच होते. परंतु हिन्दु धर्ममार्तंडांच्या कपाळकरंटे पणामुळे या हिन्दु धर्मपासून विलग झालेल्या मोठ्या जनसंख्येचे पुन्हा हिन्दु धर्मान्तर करून घेण्याची सुवर्णसन्धी आपण गमावली अन्यथा काश्मिर, पाकिस्तान , अतिरेकी इत्यादि विसाव्या आणि एकविसाव्या शतकात भेडसावणार्या डोकेदुखीचा समूळ नाश कित्येक शतके आधीच झाला असता. त्यातच ब्रिटिशान्च्या "फोडा झोडा आणि गुलाम बनवून राज्य करा" या कुटिल नीतीमुळे मुस्लिम समाजातील फुटीर अणि मूलतत्त्वावादी संघटना वाढत गेल्या ... त्यातूनच पुढे दार-उल-इस्लाम "पाक"स्तान ची मागणी पुढे आली.

२. आज कोणीही कितीही शान्ती आणि मैत्रीच्या गप्पा मारल्या तरी पाकिस्तान हा विषारी साप आहे. आणि त्याला कितीही दूध पाजले तरी तो आपला विषारी डन्ख मारणे सोडणार नाही हे भाजपच्या पहिल्या राजवटीत वाजपेयीना आणि दुसर्या राजवटीत मोदीजीना पहिल्या दोन वर्‍षात चांगलेच समजून चुकले आहे. यास्तव चर्चा /शान्तिप्रक्रिया हे पारम्पारिक गुर्हाळ बन्द करून डिफेन्सिव्ह च्या ऐवजी ऑफेन्सिव्ह अ‍ॅक्शन वर भर देण्याच्या मनस्थितीत सध्या मोदी सरकार दिसत आहे. सुरक्षा सल्लागार अजित डोभल आणि खुद्द प्रधानमन्त्री नरेन्द्रजी मोदींच्या अलिकडच्या भाषणे/ वक्तव्यावरुन तसे प्रतिबिम्बित होत आहे.

३. नजिकच्या भविष्यकाळात भारत आर्थिक दॄष्ट्या सुपरपॉवर बनण्याकडे वाटचाल करीत असताना अन्तरराष्ट्रीय समुदायात पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर आणून पाकिस्तानला एकटे पाडणे आणि त्याबरोबरच बलुचिस्तान/ गिलगिट -बाल्टिस्तान आणि पाक-अधिकॄत काश्मिर मधल्या पाक सैन्याच्या अत्याचाराना हायलाइट करणे तसेच बलुचिस्तानच्या स्वातन्त्र्यलढ्यास नैतिक आर्थिक/ लष्करी मदत पुरवून पाकिस्तानचे तुकडे पाडून सम्पवणे हाच पाकिस्तानच्या समस्येवरचा जालिम अन रामबाण इलाज आहे ,असे माझे स्पष्ट अन प्रामाणिक मत आहे . येणार्या काळात पाकिस्तानात निर्नायकी माजून जगाच्या नकाशावरून पाकिस्तान नाहीसा झाला,तर मला मुळीच आश्चर्य वाटणार नाही!

जय हिन्द ! जय भारत!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मानव, धन्यवाद. एखाद्या घटने बद्दल (पक्षीय राजकारणविरहीत) स्वतंत्र मत कोणाला असते का नाही माहीत नाही, पण ते इथे लिहीले जात नाही सध्या हे नक्की.

२००९ मधे मनमोहन सिंगांनी पाकचे वाक्य स्टेटमेण्ट मधे आणू देण्यात चूक केली असे धरले तरी पुढे सात वर्षे पाक ने त्याचे भांडवल केलेले व आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला त्याचा तोटा झाल्याचे दिसले नाही. म्हणजे तेव्हा जेवढी भीती वाटली होती तेवढे त्यात काही नव्हते असेच दिसते. यात भांडवल न करण्यात पाकचा चांगुलपणा ई. असणे शक्यच नाही. म्हणजे त्याचे आंतरराष्ट्रीय इंटरप्रिटेशन भारताला प्रतिकूल नव्हते व पाकला त्याचा फायदा मिळाला नाही.

पण तितकेच हे ही दिसत आहे, की मोदींच्या वाक्याचे जे दुष्परिणाम होतील असे वाटले, ते ही निदान पहिल्या आठवड्यात झालेले नाहीत - भारताच्या इमेजच्या दृष्टीने, आंतरराष्ट्रीय समुदायात.

ही एक अमेरिकन थिन्क टॅन्क मधली प्रतिक्रिया:

“If there is one thing that the Modi government has telegraphed over its two years in power, it is that it will not sit quietly amid provocations from Pakistan, and that it will not hold back from taking a harder line when the need arises,” Michael Kugelman, a senior associate for south and southeast Asia at the Washington DC-based Woodrow Wilson International Centre for Scholars, said.

तसेच, अमेरिकन लिबरल्स - जे सहसा मोदींविरूद्ध लिहीतात त्यांच्यापैकी एकीची प्रतिक्रिया.

“Pakistan has been unusually assertive about India’s current Kashmir crises,” said Christine Fair, an associate professor at Georgetown University. “I think reminding Pakistan to mind its own business is refreshing. I think Modi has been overly accommodating of Pakistani hijinks. Such a move is well overdue, in my view.”

आणि खुद्द मनमोहन सिंगांचे पहिले मीडिया सल्लागार (व 'द अ‍ॅक्सिडेण्टल प्राइम मिनिस्टर' चे लेखक) संजया बारु, यांचे गेल्या महिन्यात भारताच्या तीव्र प्रतिक्रियेबद्दल चे मत:
“The government must have good reasons to think Pakistan had stepped up its activity in Jammu and Kashmir,”

एकूण किमान अमेरिकन मीडिया मधे ते भारताचे टॅक्टिकल उत्तर होते अशीच प्रतिक्रिया दिसते.

"आम्ही ना कोणाच्या अध्यात ना मध्यात" चा अ‍ॅप्रोच अनेक दशके असताना असे विधान करायला खूप आंतरराष्ट्रीय फिल्डिंग लावायची गरज असते - कोणत्याही चर्चेत ते आपल्याविरूद्ध जाउ नये म्हणून. सरकारने तसे केले आहे का ते येत्या काही दिवसांत दिसेल. एरव्ही जगाला शहाणपणा/लोकशाही ई. शिकवणारे अनेक देश भरपूर काड्या करत असतात. युनोच्या एखाद्या मानवाधिकार वाल्या चर्चेत अमेरिकेला "मग तुम्ही सौदीला कसे सपोर्ट करता" असे विचारले जात नाही, कारण जे ते विचारू शकतील त्यांना इतर "गिव्ह अ‍ॅण्ड टेक" मधून मॅनेज केलेले असते. भारताने तसे करायची गरज पडेल असा आक्रमक पवित्राच पुढे ठेवायचा असेल तर.

>>>> साती | 22 August, 2016 - 21:32 नवीन

मानव, फारएंड छान प्रतिसाद!
<<<<

Lol

ह्याला म्हणतात (असमर्थ सिद्ध झाल्यामुळे) 'समर्थनीय प्रतिसाद' देणे!

मानव आणि फारेण्ड ह्यांचे प्रतिसाद कितीजणांना 'एकसारखे' वाटत आहेत?

१८० डिग्रीज!

अहो तज्ज्ञ,
दोन व्यक्ती परस्परांपेक्षा अगदी वेगळे तरिही छान लिहू शकत नाहीत का?

आणि इथे मानवनी जे लिहिलेय त्याला फारेंडनी 'मानव धन्यवाद' म्हणून अ‍ॅक्सेप्ट केलेले वाक्य दिसले नसेलच.

(आज काय उगाच डोकं न वापरता आणि कुणी काही लिहिलंय ते न वाचता फक्त पोष्टींसाठी पोष्टी लिहित रहायचा विक्रम करणार आहात का बेफी? तसं असेल तर चालू द्या. आय वोंट डिस्टर्ब यू!)

>>>> साती | 22 August, 2016 - 21:52 नवीन

अहो तज्ज्ञ,
दोन व्यक्ती परस्परांपेक्षा अगदी वेगळे तरिही छान लिहू शकत नाहीत का?

आणि इथे मानवनी जे लिहिलेय त्याला फारेंडनी 'मानव धन्यवाद' म्हणून अ‍ॅक्सेप्ट केलेले वाक्य दिसले नसेलच.

(आज काय उगाच डोकं न वापरता आणि कुणी काही लिहिलंय ते न वाचता फक्त पोष्टींसाठी पोष्टी लिहित रहायचा विक्रम करणार आहात का बेफी? तसं असेल तर चालू द्या. आय वोंट डिस्टर्ब यू!)
<<<<

साधारण अर्ध्या तासापूर्वीपर्यंत मुद्देसूद बोलण्याचा यथाशक्ती प्रयत्न करणार्‍या आपण, आता अचानक शाब्दिक मुद्यांवर आला आहात हे पाहून समजायचे ते समजत आहेच. मुद्दे फसले की वैयक्तीक होण्याची सवय तमाम आंतरजालाला तशीही आहेच.

तुम्हाला हे कळले का की फारेण्ड ह्यांनी मानव ह्यांना धन्यवाद दिले, त्यांचे एक दोन मुद्दे मान्यही केले आणि नंतर काही रेफरन्सेस दिले? ते रेफरन्सेस कंप्लीटली वेगळ्या'च' अर्थाचे आहेत हे लक्षात आले का?

असो. तुमच्याकडे काहीतरी मुद्दा आला की आपण नक्की बोलूयात. सध्या हा धागा नीट सुरू आहे. Happy

बेफी अति झाले अन हासू आले असे तुमचे चालू आहे
अजून हास्यास्पद होऊ नका इतका समज तुम्हाला नक्की आहे ही आशा अजुनही आहे Wink

उदय८२ यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. इतरही जे मुद्दे सोडुन वैयक्तिक चिखलाफेक करत आहेत त्यांनी ही ताकीद समजावी आणि आपली भाषा सुधारावी.

अजून एक निरर्थक पोस्ट का बेफी?
चालू द्या.
विक्रमाच्या दिशेने वाटचाल.

बाकीच्यांनो, बलुचिस्तानबद्दल जरा मते मांडा.
इतर माबो आयडी काय आणि कोणत्या हेतूने लिहितायत त्याबद्दल नको.
Happy

फारएण्ड,

दुसऱ्या देशात काही तरी कारवाई करायची तर बाकी देशांना मॅनेज करून ती कशी करता येईल या दृष्टीने तुमची पोस्ट छान आहे.
पण मुळात प्रश्न असा आहे की भारताने बलुचिस्तान मध्ये हस्तक्षेप करावा कि नाही ?

अतरंगी,
करावा की नाही हा प्रश्नच मूळात नाही आहे.
वर राही आणि एक दोघांच्या पोस्टमध्ये आलंय तसं भारत फार आधीपासून हस्तक्षेप करतच आहे.
आता ते उघड मान्य करावे किंवा नाही हा प्रश्न आहे.

माझ्यामते बलुचिस्तानला स्वातंत्र्य मिळालं तरी त्यांच्यातल्या टोळ्यांमधली असंख्य भांडणे पाहता 'अनिर्बंध वाढलेले अतिरेकी ' यापेक्षा फार काही साध्य होईल असे वाटत नाही.
आणि त्यांचा भारतालाही भविष्यात त्रास होऊ शकतो.

पाकिस्तानला खिळखिळे करायला इतर आर्थिक आणि राजकीय मार्ग मोकळे असताना भारताच्या तत्त्वाविरुद्ध जाऊन तिथे अशांती माजविण्याचा प्रयत्न भारताने करावा असे मला तरी वाटत नाही.
(माझ्या वाटण्याने कुणालाही काहिही फरक पडत नसला तरी!)

मी मानव यांच्या

इथे मनमोहनसिंग विरुद्ध मोदी अथवा कॉन्ग्रेस विरुद्ध भाजपा हे मुद्दे दूर ठेवुन या विषयावर चर्चा / मते आली तर चांगले होईल. >> याला धन्यवाद दिले आहेत. म्हणजे येथे विषयावर चर्चा व्हावी या आवाहनाबद्दल.

बाकी कोणतेही मुद्दे मान्य किंवा अमान्य केलेले नव्हते. काही बाबतीत साम्य आणि काही बाबतीत दुसरेच काही मत माझ्या पोस्ट मधे असू शकते. कारण त्यांच्या बाकी/पूर्ण पोस्टशी सहमती/असहमती दाखवणे हा हेतू नव्हता.

टेडी रुझवेल्टचं एक कोट आहे - इफ यु गेट देम बाय द बाॅल्स, देयर हार्ट्स ॲंड माइंड्स विल फाॅलो...

बट, टेडि वाज दि मोस्ट पावरफुल मॅन ॲंड लिडर आॅफ दि फ्रि वर्ल्ड. हा फरक आहे...

बाकी मूळ लेखाबद्दल - सीरिया, इराक मधे जे चालले आहे त्यावरून तरी पाक आत्ता फुटले तर भारताला प्रचंड डोकेदुखी होउ शकते असेच वाटते. शेजारी देशांमधली इतकी लांब सीमा पूर्ण कंट्रोल करणे फार अवघड असते.

राजिव गांधिंनी श्रिलंकेबाबत हस्तक्षेेप केल्यावर त्यांच्यावर टिका करणारे मोदींबाबत निराळीच भुमिका घेत आहेत. लंकेच्या प्रश्नाची आपल्याला झळ तरी बसत होती. बलुचिस्तानबाबत तसे नाही. आता बलुचिस्तानबाबत घडणार्या कुठल्याही घटनेबाबत पाकिस्तान भारताकडे बोट दाखवु शकतो. कारण नसताना बोट दाखवायला जागा करुन मोदींनी घोडचुक केली आहे. ती पुढच्या सरकारांना निस्तारत बसावी लागणार आंतरराष्ट्रिय समुदायांच्या नजरेत भारताचे जे स्थान होते ते जावुन
आपण आता पाकिस्तानच्या पंगतिला जावुन बसलो
आहोत.

सहमती नसलेल्या दोन पोस्ट व्यवस्थित मांडणी असेल तर एकाच वेळी आवडू शकत नाहीत का , हा मुद्दा आहे फारेंड!

भाचा, तुमच्या काड्या राहूच द्या!
Wink

अतरंगी, धन्यवाद.

कुठलीही दोन सेन्सिबल माणसे या मुद्द्यावर बोलली तर लसावि हा इतका तर निघणारच.
Happy

आंतरराष्ट्रीय समुदायाच्या नजरेत भारताचे स्थान एक दुसर्‍यांच्या भानगडींत न पडणारा देश असे "सिन्सियरली" विचार केला तर असू शकेल. पण ते जाहीर मान्य केले जात नव्हते फारसे. अगदी "अलिप्त चळवळ" काळात सुद्धा भारत हा रशियाच्या बाजूला आहे असेच समजले जायचे.

दुसरे म्हणजे भारताला या सज्जनपणाचा फार काही फायदा मिळत नव्हता. कारण जागतिक पातळीवर कोणतेही निगोशिएशन्स दुसरा देश किती चांगला आहे यापेक्षा आपल्या देशाच्या हितसंबंधात कोणती भूमिका योग्य आहे या विचाराने केले जातात. जोपर्यंत अमेरिकेला पाक सोयीचा होता तोपर्यंत भारताच्या चांगुलपणाला काही भाव नव्हता. आता उलट झाल्याने भारताने काड्या केल्या तरी दुर्लक्ष केले जाईल.

त्यामुळे भारताने हे करू नये ते भारताचीच डोकेदुखी वाढेल म्हणून. आंतरराष्ट्रीय समुदाय वगैरेंमुळे नाही.

फारेण्ड, धन्यवाद, माझा तोच मुद्दा होता की मते वेगळी असु शकतात, त्याला ’हा पक्ष विरुद्ध तो’ हे वळण देण्यापेक्षा स्वतंत्र मते मांडावीत.

हा एक मुद्दा मान्य करुन आपण वेगवेगळी मते खचितच मांडु शकतो.

पाक आत्ता फुटले तर भारताला प्रचंड डोकेदुखी होउ शकते असेच वाटते.>>>>

भारताने हे करू नये ते भारताचीच डोकेदुखी वाढेल म्हणून. >>>
+१

हमार मत भी ऐसाईच हय

भारताची डोकेदुखी नक्कीच वाढेल पण पुर्वि जसा भारत पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय समुदायापुढेुं उघडा पाडुन बॅकफुटवर ढकलायचा ते शक्य होणार नाही.पाकिस्तान मोदींच्या राजकिय अपरिपक्वपणाचा फायदा घेणार.या पुर्वि भारतातल्या दलित अत्याचारांबाबत पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय समुदायापुढे विधाने केली होती. आतातर मोदींनी त्यांच्या हातात कोलित दिलेय.

पाक आत्ता फुटले तर भारताला प्रचंड डोकेदुखी होउ शकते असेच वाटते

ज्या देशात टीव्हीवर हाफिझ साईद, सलाउद्दिन सारखे कुप्रसिद्द आतंकवादी जाहीर पणे येऊन सांगतात की आता पाकिस्तानने भारतावर अणु हल्ल चढवला पाहीजे, ज्या देशात झाईद हामिद सारखे कट्टरपंथी भारतावर पाकिस्तानची विजय यात्रा टँकवर बसुन निघेल अशी दिवा स्वप्न बघत असतात, जे पाकिस्तान जनतेला सदा च चिथवत असतात. त्यांचा सर्व रोष फक्त आणी फक्त भारत हाच असतो.

भारताने हाफिझ साईद, सलाउद्दिन सारखे कुप्रसिद्द आतंकवाद्यां बददल अनेक पुरावे देऊन सुद्दा ते पाकिस्तानात मोकळे फिरत आहेत. मुंबई , भारतीय पार्लमेंट सारखे हल्ले करवत आहेत. अजुन ही प्लान करत आहेत. त्याच बरोबर ज्या देशाच सैन्य अधिकारीच देशाच्या सरकारच्या प्रमुखाला अंधारात ठेऊन कारगील सारखे स्टंट्स करु शकतात, त्या देशाच तुकडे झाल्यास यापेक्षा आणखी काय वाईट होणार आहे ?

आता पर्यंत फक्त अमेरीकेने ओसामासाठी पाकिस्तानात आत घुसुन कारवाई केली होती, अशी कारवाई भारताने
बरेच बळकट पुरावे असतानाही कधी करण्याची हिंम्मत केलीच नाही.

त्या पाकिस्तान देशाचे तुकडे झाले तर मग अस काय बदलणार आहे. ऊलट अश्या लोकांना चिरडण सोप्प जाईल.

मिलिंद - पाक फुटला तर तेथे असंख्य छोटे मोठे अतिरेकी ग्रूप्स होतील - कोणाचाही अंकुश नसलेले. त्यांच्या त्रासातून वाचण्याकरता अनेक लोक सीमापार येतील - आणि मग त्यातले अतिरेकी कोणते आणि त्यांच्यापासून वाचायला आलेले कोणते हे कळणार नाही. युरोप मधे जे चालले आहे साधारण तसेच पण जास्त अनिर्बंध, आपली सीमा पाहता. परत या संघटनांची एक जागा नसल्याने त्यांना शोधून काढून नष्ट करणे हे ही अवघड होईल, आणि इतर देशांना त्यात काहीच इंटरेस्ट नसेल भारताला मदत करायला.

आणि मुख्य म्हणजे त्यातून भारताच्या फायद्याचे फारसे काही निष्पन्न होणार नाही.

पाक फुटण्याची चर्चा नंतर करता येइल पण निदान आज तरी काश्मीर मध्ये उद्भवलेल्या अभूतपूर्व परिस्थीतीवर नियंत्रण मिळवणे गरजेचे आहे. सलग ४० दिवस कर्फ्यू असण्याचा भारतातला हा पहिलाच प्रसंग. मेनस्ट्रीम मिडियाने अजूनही याचे गांभीर्य नीटपणे लोकांपुढे आणलेले दिसत नाही . दिल्ली लाईन पकडलेली दिसते. आता बी एस एफ ला पाचारण करावे लागले. गेले ४० दिवस मोबाईल इंटरनेट बंद आहे व मोबाईल फोनही अधून मधून बंद आहेत. १५ ऑगस्ट सजरा करण्यासाठी प्रचंड बंदोबस्त करवा लागला. उलाट १४ ऑगस्ट लोकांनी उत्स्फूर्त पणे साजरा केला. बळींची व जखमींची संख्या वाढतच आहे. यावर उपाय करायचे सोडून बलुचीस्तान ची स्वप्ने कशाला?

या अह्संततेचे सर्व खापर पाकिस्तान वर फोडणे चुकिचे आहे. आगीत तेल ओतायला तो नेहेमीच तयार असतो पण आग असावी लागते. गेले चाळीस दिवसाच्या कोंडीचे खापर पाकवर फोडून काश्मीर मधल्या लोकांवर डी फॅक्टो पाकचे नियंत्रण आहे हे कबूल केल्यासारखे नाही का?

Christine Fair नेहेमीह पाक विरोधी लिहितात त्यात नवीन नाही.

पाक फुटला तर तेथे असंख्य छोटे मोठे अतिरेकी ग्रूप्स होतील - कोणाचाही अंकुश नसलेले. त्यांच्या त्रासातून वाचण्याकरता अनेक लोक सीमापार येतील - आणि मग त्यातले अतिरेकी कोणते आणि त्यांच्यापासून वाचायला आलेले कोणते हे कळणार नाही. युरोप मधे जे चालले आहे साधारण तसेच पण जास्त अनिर्बंध, आपली सीमा पाहता. परत या संघटनांची एक जागा नसल्याने त्यांना शोधून काढून नष्ट करणे हे ही अवघड होईल, आणि इतर देशांना त्यात काहीच इंटरेस्ट नसेल भारताला मदत करायला.

आणि मुख्य म्हणजे त्यातून भारताच्या फायद्याचे फारसे काही निष्पन्न होणार नाही.>>>>>+१११११११११११११११११११११११ हे मात्र १०० टक्के खरे आहे फा.:अरेरे: आता सिरीयामुळे जे काही झाले आहे, त्याने, शरणार्थी बरोबर इसिसचे पण घुसलेत.

Farend - mast posts.
And I too feel - it won't do good to us if things go to that level.
On humanity level what I feel - no one will care esp. While people are discussing 'international politics' supporting things without looking at what happens to people living on land when such things happen.
For us they are terrorist.they may just be sufferers in the first place.

Pages