बलुचिस्तानचा स्वातन्त्र्यलढा अन पाकिस्तानचे भविष्य

Submitted by उडन खटोला on 21 August, 2016 - 10:11

पाकिस्तान विषयी चर्चा करताना काही मूलभूत मुद्द्यांकडे दुर्लक्ष करता येणार नाही.

१. पूर्वीच्या हिन्दुस्थानातील (ब्रिटिश इन्डिया) वायव्य सरहद्द प्रान्त आणि पूर्व बंगाल हे प्रान्त मागण्याचा मुस्लिम लीग ला तसा काहीच अधिकार नव्हता . वस्तुतः हे बहुतांश मुस्लिम आक्रमकांच्या छळबळाने कन्व्हर्ट झालेले मूळचे हिन्दूच होते. परंतु हिन्दु धर्ममार्तंडांच्या कपाळकरंटे पणामुळे या हिन्दु धर्मपासून विलग झालेल्या मोठ्या जनसंख्येचे पुन्हा हिन्दु धर्मान्तर करून घेण्याची सुवर्णसन्धी आपण गमावली अन्यथा काश्मिर, पाकिस्तान , अतिरेकी इत्यादि विसाव्या आणि एकविसाव्या शतकात भेडसावणार्या डोकेदुखीचा समूळ नाश कित्येक शतके आधीच झाला असता. त्यातच ब्रिटिशान्च्या "फोडा झोडा आणि गुलाम बनवून राज्य करा" या कुटिल नीतीमुळे मुस्लिम समाजातील फुटीर अणि मूलतत्त्वावादी संघटना वाढत गेल्या ... त्यातूनच पुढे दार-उल-इस्लाम "पाक"स्तान ची मागणी पुढे आली.

२. आज कोणीही कितीही शान्ती आणि मैत्रीच्या गप्पा मारल्या तरी पाकिस्तान हा विषारी साप आहे. आणि त्याला कितीही दूध पाजले तरी तो आपला विषारी डन्ख मारणे सोडणार नाही हे भाजपच्या पहिल्या राजवटीत वाजपेयीना आणि दुसर्या राजवटीत मोदीजीना पहिल्या दोन वर्‍षात चांगलेच समजून चुकले आहे. यास्तव चर्चा /शान्तिप्रक्रिया हे पारम्पारिक गुर्हाळ बन्द करून डिफेन्सिव्ह च्या ऐवजी ऑफेन्सिव्ह अ‍ॅक्शन वर भर देण्याच्या मनस्थितीत सध्या मोदी सरकार दिसत आहे. सुरक्षा सल्लागार अजित डोभल आणि खुद्द प्रधानमन्त्री नरेन्द्रजी मोदींच्या अलिकडच्या भाषणे/ वक्तव्यावरुन तसे प्रतिबिम्बित होत आहे.

३. नजिकच्या भविष्यकाळात भारत आर्थिक दॄष्ट्या सुपरपॉवर बनण्याकडे वाटचाल करीत असताना अन्तरराष्ट्रीय समुदायात पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर आणून पाकिस्तानला एकटे पाडणे आणि त्याबरोबरच बलुचिस्तान/ गिलगिट -बाल्टिस्तान आणि पाक-अधिकॄत काश्मिर मधल्या पाक सैन्याच्या अत्याचाराना हायलाइट करणे तसेच बलुचिस्तानच्या स्वातन्त्र्यलढ्यास नैतिक आर्थिक/ लष्करी मदत पुरवून पाकिस्तानचे तुकडे पाडून सम्पवणे हाच पाकिस्तानच्या समस्येवरचा जालिम अन रामबाण इलाज आहे ,असे माझे स्पष्ट अन प्रामाणिक मत आहे . येणार्या काळात पाकिस्तानात निर्नायकी माजून जगाच्या नकाशावरून पाकिस्तान नाहीसा झाला,तर मला मुळीच आश्चर्य वाटणार नाही!

जय हिन्द ! जय भारत!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नंदिनी | 22 August, 2016 - 19:08 नवीन

मी कुठल्याही पक्षाची नाही, मला धाग्याच्या विषयाबद्दल काहीही लिहायचे नाही पण जवळपास प्रत्येक बीबीवर हा असाच प्रकार चालू आहे.

उदय८२ या आणि इतरही काही आयडीच्या पोस्ट्स वाचून मायबोलीचाच कंटाळा आलेला आहे. अतिशय घाणेरड्या वैयक्तिक आणि काहीही विचार नसलेल्या केवळ शिवीबाजीच्या या पोस्ट्सचा माझ्यातर्फे निषेध!

<<

वर ठळक केलेल्या वाक्यांशी सहमत आहे.

राजकारणात काही बाबतित गुप्तता पाळाव्याच लागतात. देश परराष्ट्रांच्या बाबतीत काय भुमिका घेणार ही लाल किल्ल्यावरुन सांगायची गोष्ट नाही. मोदी हे खरेच बालिश राजकारणात करत आहेत. त्यांनी पाकच्या हाती आयते कोलित दिले आहे. पाक ह्याचा आंतरराष्ट्रिय स्तरावर फायदा घेणार. स्वातंत्र्यापासुन आंतरराष्ट्रिय स्तरावर राखलेला आब सवंग लोकप्रियता गाठण्यासाठी मोदींकडुन धुळीस मिळालाय.
आंतरराष्ट्रिय पातळीवर भारताची किंमत कमी होण्यात ह्या विधानाचा हातभार लागेल.

प्रतिमा स्वच्छ ठेवुन या पुढे काय गवसणार आहे जे अगोदर साधलेल आहे ?>>>>>

प्रतिमा खराब करून काय साधणार आहे ?

भारताने बलुचिस्तान मध्ये हस्तक्षेप करून काय फायदा होणार आहे? बलुचिस्तान उद्या बांग्लादेश प्रमाणे वेगळा झाला तरी भारताचा काय फायदा आहे? आपण बलुचिस्तानचा विषय वाढवत नेला म्हणून पाकिस्तान काय सीमेपालिकडून दहशतवाद आणि फुटीरता याला देणारे प्रोत्साहन थांबवणार आहे का ?

पाकिस्तानला त्याच्या कर्माची फळे भोगू देत. आपण कशाला दुसऱ्याच्या फाटक्यात पाय अडकवायचा?

त्याने गाय मारली ना मग आपण वासरू मारू ही स्वाभाविक सुडबुद्धी आहे. पण त्याने फायदा काहीच नाही.

भारताने बलुचिस्तानच्या भानगडीत उघडपणे पडु नये असे आमचे म्हणणे आहे डोळा मारा>>>>>+१ तेच म्हणतोय आम्ही की काट्यानेच काटा काढावा.

पगारे,

खेदपूर्वक असे म्हणतो की तुम्ही मनापासून सगळे वाचलेले नसावेत किंवा वाचून डोळेझाक करत असावात. Happy

===========

अंतर्गत कलहांवरून देश पेटवण्यास तमाम विरोधक हातात हात घालून उभे राहिलेले असताना (आणि त्यांच्यातही धड एकी नसताना) मोदींनी केलेला बलुचिस्तानचा उल्लेख दूरगामी शुभपरिणाम दाखवेल असे आंतरराष्ट्रीय तज्ञ म्हणत आहेत.

अर्थात, मायबोलीवर त्याहीपेक्षा अधिक व्यासंगी आहेत हे जग विसरते ते सोडा! Happy

मोदी हे खरेच बालिश राजकारणात करत आहेत.

<<

खरय पगारेजी,
मणीशंकर अय्यर व सलमान खुर्शीद यांना पुन्हा एकदा पाकिस्तानची मदत घ्यायला लावून श्री नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदावरुन हटवा व राहुल गांधी यांना पंतप्रधान करुन टाका सर्व समस्या झटक्यात सुटतील.

>>>>प्रतिमा खराब करून काय साधणार आहे ?<<<<

प्रथमतः, हे प्रतिमा खराब करणे नव्हे तर बदलणे आहे. 'कोणीही या आणि काश्मीर, पंजाबमध्ये अशांतता पसरवा' ह्या भूमिकेपासून घेतलेली फारकत आहे. 'आम्हाला तुमच्याच '४४ टक्के' भूभागाचा पाठिंबा आहे' हे सांगणे म्हणजे पायाखालची वाळू सरकवणे आहे.

>>>>भारताने बलुचिस्तान मध्ये हस्तक्षेप करून काय फायदा होणार आहे? <<<<

आपल्या घरात सुंदोपसुंदी माजली की माणूस आधी स्वतःच्या घरात बघायला लागतो.

>>>>बलुचिस्तान उद्या बांग्लादेश प्रमाणे वेगळा झाला तरी भारताचा काय फायदा आहे? <<<<

वरचेच उत्तर!

>>>>आपण बलुचिस्तानचा विषय वाढवत नेला म्हणून पाकिस्तान काय सीमेपालिकडून दहशतवाद आणि फुटीरता याला देणारे प्रोत्साहन थांबवणार आहे का ?<<<<

उत्तरे द्यावी लागतील आंतरराष्ट्रीय समुदायापुढे! हा विषय इतक्या थेटपणे आलेलाच नव्हता सरफेसवर! हा विषय सरफेसवर आल्यामुळे आधी स्वतः चांगले वागतो हे सिद्ध करावे लागेल आणि त्यासाठी सध्या सुरू असलेली भंकस थांबवावी लागेल.

>>>>पाकिस्तानला त्याच्या कर्माची फळे भोगू देत. आपण कशाला दुसऱ्याच्या फाटक्यात पाय अडकवायचा?<<<<

पाकिस्तानला त्याच्या कर्माची फळे कधीच मिळालेली नाहीत. 'ती ह्यापुढे मिळूही शकतील' असे म्हणणे म्हणजे गुन्हा तर नव्हेच, उलट मनमोहनसिंगांनी जे केले ते रिव्हर्स करणे आहे. किती दुर्दैवी बाब आहे मनमोहन सिंगांनी केलेली!

>>>>त्याने गाय मारली ना मग आपण वासरू मारू ही स्वाभाविक सुडबुद्धी आहे. पण त्याने फायदा काहीच नाही.<<<<

कन्क्ल्युडिंग विधानावर आवश्यक ते सर्व प्रतिसाद वर दिलेले आहेत.

आपल्या घरात सुंदोपसुंदी माजली की माणूस आधी स्वतःच्या घरात बघायला लागतो. ?? Biggrin

स्वतःचे घर सोडून इतरांकडे सुदोपसुंदी करत आहे त्याचे काय ते चालते वाटते Rofl

बेफी, तुम्ही लिंक दिलेला लेख हा एका लेखकाची वैयक्तिक मते असलेला लेख आहे आणि तुम्ही जितका मजकूर छापलाय त्यात
While explaining the joint statement, Manmohan Singh claimed that India was doing nothing in Balochistan " indeed nor should it be doing anything there. He claimed that India"s conduct was an "open book" and that he was "not afraid of discussing anything".

हे लिहिलेलं आहे.
मराठीत 'मनमोहनसिंग म्हणाले की भारत बलुचिस्तानात काही हस्तक्षेप करित नाही आहे आणि भारताने तो करूही नये.
त्यांनी म्हटलं की भारताची भूमिका एखाद्या खुया पुस्तकाप्रमाणे आहे आणि कोणतीही चर्चा करण्यास आम्ही घाबरत नाही'

आता याच्या पुढे ज्या काही ओळी आहेत त्याम्हणजे त्या लेखकाचे वैयक्तिक मत आहे.
लेखक म्हणतो की अश्या अर्थाचं काही डायरेक्ट त्या जॉईंट स्टेटमेंटमध्ये घालायला हवं होतं.

जॉईंट स्टेटमेंटम्ध्ये भारताचा बलुचिस्तानसह इतरही ठिकाणी हस्तक्षेप होत असल्याची पाकिस्तानला बातमी असल्याचे म्हटले आहे.

इथून पुढे माझे म्हणणे-
<<जॉईंट स्टेटमेंट म्हणजे एकंदर चर्चेत काय झाले याचे लिखित स्वरूप.
पाकिस्तानने म्हटले की बलुचिस्तानात तुमचा हस्तक्षेप होतोय असे आम्हाला माहित्येय आणि मन्मोहनजी म्हणाले की बोला , चर्चा करू, चर्चेने प्रश्न सुटतात.
अर्थात पाकिस्तान्यांची शंका आहे तिचे निरसन आम्ही करू असे मनमोहन म्हणाले. शंका रास्त आहे किंवा नाही याबाबत काही नाही.>>

थोडक्यात तुमच्या लिंकमध्ये व्यवस्थित वाचल्यास रास्त बोलणारे आणि स्पष्टीकरण देणारे मनमोहनसिंग आणि उगाच त्यावरून काहिच्या बाही निष्कर्ष काढणारा इंटू चा लेखक हेच चित्र दिसत आहे.

आतापर्यंत जगाच्या व्यासपीठावर लाखो वेळा पाकड्यांची कुरापत आपण सिद्ध केलेली आहे. मग क्लिंटन येवो नाहीतर ओबामा, सगळे नुसते बोलाची कढी असल्यासारखे पाकड्यांन्ना फटकारतात. पाकडे, मग तू मारल्यासारखे कर भाऊ आम्ही रडल्यासारखे करु असे धोरण राबवतात. अमेरीकेला भारताची एवढीच बाजू पटतेय मग पाकड्यांची मदत का रोखत नाहीत ते? का त्याला दहशतवादी राष्ट्र घोषीत करत नाहीत ते? ( मुर्खासारखा प्रश्न वाटेल हा, पण मनातले बोलावेच लागते ना?) काय झाले आत्तापर्यंत?

मग भारताशी प्रत्यक्ष युद्ध शक्य नाही म्हणून हे अतीरेकी घुसवतायत ना, मग आपण पण तेच करावे. एवढासा इझ्रायल एवढ्या मोठ्या अरब देशांना टक्कर देतो, तेव्हा काय करते अमेरीका? चीनला रोखायचे तर भारताला मदत ( आर्थिक नव्हे) द्यायची की पाकड्यांन्ना? उत्तर सांगेल मला कोणी अमेरीकेच्या या विक्षीप्तपणाचे?

पाकिस्तान इतका सरळ विचार करू शकत असता तर ही वेळ आली असती का ? तुम्ही जे लिहिलंय ते एखादा सरळ विचार करणारा समजूतदार देश करेल. तुम्ही पाकिस्तान कडून फारच अपेक्षा दाखवत आहात. ☺

ते दोन चार ठिकाणी मूर्खपणा करत आहेत त्यातली एक गोष्ट गेली तर ते दुसऱ्या ठिकाणी (काश्मीर...) अजून जास्त मूर्खपणा करतील.
आणि पाकिस्तानला काही उत्तरं द्यावी लागत नाहीत आंतरराष्ट्रीय समूहापुढे. सगळ्यांना सगळं माहित आहे. ते चांगलं वागत नाहीत हे सगळ्या जगाला माहित आहे.
आपण पण त्यांचा कित्ता गिरवत त्यांच्या रांगेत जाऊन बसायचे का ?

>>>>थोडक्यात तुमच्या लिंकमध्ये व्यवस्थित वाचल्यास रास्त बोलणारे आणि स्पष्टीकरण देणारे मनमोहनसिंग आणि उगाच त्यावरून काहिच्या बाही निष्कर्ष काढणारा इंटू चा लेखक हेच चित्र दिसत आहे.<<<<

अच्छा तुम्हाला उंदिर काढायचा होता होय डोंगर पोखरून? मग आधीच तसे म्हणायचेत की? परवाच 'आमचा अड्डा' ह्या गुप्त पानावर तुम्ही म्हणाला होतात की 'आपण सगळे आपापली वैयक्तीक मते लिहायलाच येथे येतो'! मग त्या लेखकाने नेमके काय चुकीचे केले? त्या लेखकापेक्षा (समर्थनीय अर्थाने) अधिक तज्ञ असलेल्या एखाद्या लेखकाचा प्रतिवाद दाखवा. मी तर म्हणतो मिळेलही तुम्हाला असा प्रतिवाद! आंतरजाल काय, आपल्याला हवे ते देते.

पण तुम्हाला मूळ संदेशच पचनी पडलेला दिसत नाही आणि ते अगदी समजण्यासारखे आहे.

मी इकडे दिल्लीत बसून साठ वर्षे बोंबलतोय की पाकिस्तान दहशतवादी कारवाया करतो म्हणून आम्हाला प्रॉब्लेम आहे. नंतर मी पाकिस्तानात जातो, मग पाकिस्तान म्हणतो की दहशतवादी कारवाया हा दोन्ही देशांना असलेला मुख्य प्रश्न आहे. मी म्हणतो, अलबत, आहेच, चला मी सही करतो ह्या वाक्यावर!

हे काय सांगते?

'आपल्यात दम नाही' इतकेच सांगते.

'तो दम' परवा दिसून आला.

रश्मी.. तै,

अमेरिका फक्त शस्त्र हत्यार विकुन आपला देश चालवते, त्यांना कोणत्याही देशात शांतता असणे परवडणार नाहीय, म्हणुनच त्यांच्या कडुन काहीही अपेक्षा ठेवणे चुक आहे.

भारत आणी चीनचा व्यवहार ईतका मोठा झालेला आहे की आता त्या चीन ने सुद्दा पाकिस्तानला नरमाईने
घेण्याबद्दल सुचवलेल आहे.
भारताकडे प्रगत मिसाईल आणी शस्त्रा शिवाय मोठी बाजार पेठ हे एक नविन शस्त्र आहे.

मला तर मनमोहनसिंगांनी चाणाक्षपणे 'नरो वा कुंजरो वा' करून योग्य परराष्ट्र्नीती दाखवलीय असेच वाटतेय.

कारण त्यानंतर आंतरराष्ट्रीय राजकारणात भारतावर बलुचिस्तानमधील हस्तक्षेपावरून काही धूळफेक किं आ आरोप झाले नाहीत.
केवळ भारतातच विरुद्ध पार्टीच्या लोकांनी असमंजसपणे गदारिळ घातला तेवढाच.

उलट पाकिस्तानातही मनमोहनसिंगांनी बलुचिस्तानमधल्या घटनांत भारताचा हात असल्याचं अमान्य केल आणि हे पाकिस्तानी नेत्यांचं अपयश आहे असेच्पडसाद त्यावेळच्यावर्तमानपत्रात पडलेले दिसतात.

बरोबर आहे साती तुमचे, कारण तुम्ही भूमिका आधी ठरवली आहेत आणि मग बातम्या वाचत आहात.

आम्ही बातम्या आधी वाचतो, जेवढ्या कळतात तेवढ्या कळून घेतो आणि मग मत बनवतो.

मग भारताशी प्रत्यक्ष युद्ध शक्य नाही म्हणून हे अतीरेकी घुसवतायत ना, मग आपण पण तेच करावे. एवढासा इझ्रायल एवढ्या मोठ्या अरब देशांना टक्कर देतो, तेव्हा काय करते अमेरीका?

<<

त्याचे काय आहे, इझ्रायल मध्ये, भारतासारखी सोकॉल्ड पुरोगाम्यांची संख्या, एकतर जास्त नसावी किंव्हा देशहितासाठी ते त्यांना फाट्यावर मारत असावेत. इथे भारतात कॉंग्रेज सारख्या एका राष्ट्रीय पक्षाचे नेते, वर्तमान पंतप्रधानांना सत्तेवरुन हटवायला पाकिस्तान सारख्या देशाकडे मदत मागायला जातात.

सत्ता परत मिळवायला शत्रु राष्ट्राकडे मदत मागाणारे निर्लज्ज नेते ह्या देशात असल्यावर कश्याला इतर देश भारताकडे लक्ष देतील.

जसे वाजपेयींनी अतिरेकी सोडलेले ते अजून भारत भोगत आहे
तसेच भविष्यात मोदीचे बाळबोध विधानाचे भोग भोगावे लागणार हे स्पष्ट आहे

बेफ़िकीर | 22 August, 2016 - 20:36 नवीन
बरोबर आहे साती तुमचे, कारण तुम्ही भूमिका आधी ठरवली आहेत आणि मग बातम्या वाचत आहात.

आम्ही बातम्या आधी वाचतो, जेवढ्या कळतात तेवढ्या कळून घेतो आणि मग मत बनवतो.>>

छान!
धन्यवाद आणि अभिनंदन!
अतिशय योग्य विचार आहेत तुमचे.

सातींचे स्पष्टीकरण वाचून प्रचंड भ्रमनिरास झाला. मला वाटत होते की त्यांना काहीतरी 'आतली' फार महत्वाची गोम कळली आहे. असो. चर्चा पुढे सुरू ठेवता येईलच. सातींकडेही काही उल्लेखनीय मुद्दा असलाच तर मस्तच!

बलुचीस्तान आताच का ?

बलुचीस्तान हा एक मौक्याच्या जागी वसलेला प्रदेश आहे, हा १९४७ पुर्वी एक कलात नावाचा देशच होता. पाकिस्तान आर्मीने तो गिळंकृत केला !!

बलुचीस्तान जितका पाकिस्तानात आहे त्याच्या तिप्पट तो ईराण मध्ये आहे. बलुच लोक आजुबाजुच्या देशात शतकांपुर्वी स्थलांतरीत झालेले आहेत. ओमान, युएई, ईराण, भारत व पाकिस्तान या देशात बलुच लोक स्थानिक लोकात आरामात मिसळुन गेलेत. अमजद खान व कादर खान हे बलोच आहे.

अरबी समुद्रातुन थेट मध्य आशियात नंतर युरोपात खुश्कीच्या मार्गाने जाता येईल असा हा भुभाग आहे, ह्या रस्त्यावर पाकिस्तान, अफगाणीस्तान, कझागस्तान, किर्गिस्तान, ताझिकिस्तान, उझबेकिस्तान व तुर्कमेनिस्तान असे प्रदेश येतात. हे सर्व प्रदेश आता कुठे प्रगतीच्या रस्त्यावर आले आहेत.

बलुचिस्तानात दोन मोठे नॅचुरल बंदर आहेत, एक गवादर तर दुसर चाबहार !

चीन ह्या गवादर बंदर विकास आणी गवादर ते चीनच्या पश्चिम भागा पर्यंत रस्त्यासाठी ४७ बिलियन डॉ खर्च करत आहे. हे केल्यावर त्या पश्चिम चीन ला गवादर मार्गे आखाती देशात यायला व क्रुड ऑईल चीन मध्ये न्यायला एक चांगला सोप्पा रस्ता मिळणार आहे.

ह्या गवादर बंदराला पर्याय म्हणुन चाबहार बंदर विकासाच काम भारताने २००० सालाच्या आसपास ठरवल होत. पण ते काम पैश्या आभावी बंद केल गेल, आता ते काम ईराण व अफगाणीस्तानच्या मदतीने परत सुरु केल आहे.

अश्या बलोचीस्तानला पाकिस्तानातुन हिसकावुन वेगळ केल तर त्याचे दुरागामी परीणाम पाकिस्तान व चीन वर दिसतील.

इथे मनमोहनसिंग विरुद्ध मोदी अथवा कॉन्ग्रेस विरुद्ध भाजपा हे मुद्दे दूर ठेवुन या विषयावर चर्चा / मते आली तर चांगले होईल. मनमोहन सिंग जर साफ चुकले होते, तर आपण पाकीस्तानात ढवळाढवळ करतो हे तेव्हाच कागदोपत्रीच सिद्ध झाले असते आणि त्याचा पुरेपुर फायदा पाकीस्तानने केव्हाच उचलला असता, तशी संधी हुकवण्याएवढे पाकीस्तान मूर्ख नाहीच.

तसेच मोदींचे बलुचिस्तान वरिल भाष्य हे स्लिप ऑफ टंग, अथवा केवळ फुशारकी असावी असे वाटत नाही. हे ठरवून केले असावे. जी काही रणनीती त्यामागे आहे, ती नक्की काय? आणि ती योग्य की अयोग्य अशी चर्चा होऊ शकते.

दुसरे असे की धागाकर्त्याचा तिसरा मुद्धा बघता पाकिस्तानचे तुकडे पाडून त्याला संपवणे हाच रामबाण इलाज आहे असे त्याचे मत आहे असे म्हणतो. हे सुद्धा या रणनीतीचा भाग आहे का किंवा असू शकतो का? असावा का?

>>>>त्याचा पुरेपुर फायदा पाकीस्तानने केव्हाच उचलला असता, तशी संधी हुकवण्याएवढे पाकीस्तान मूर्ख नाहीच.<<<<

मानव,

तोच फायदा ते काश्मीरमध्ये उचलत आहेत.

आधी तसेही उचलत होतेच, आता तर काय, हातात कागद आहे.

तात्कालीन भारतीय पंतप्रधानांनी सही केलेला!

की दोन्ही राष्ट्रांना 'आतंकवाद' सतावतो. दोन्ही राष्ट्रांना तो पाकिस्तानमुळे सतावतो हे कोण सांगणार?

ते मोदींनी सांगितले.

"तुम्ही केवळ आमच्याच घरात दहशतवाद निर्माण करत नाही आहात तर तुमच्या स्वतःच्याही घरात करत आहात आणि तो नियंत्रणात यावा ह्यासाठी तुमचेच नागरीक माझ्या देशाकडे अपेक्षेने बघत आहेत"

तोच फायदा ते काश्मीरमध्ये उचलत आहेत.
आधी तसेही उचलत होतेच, आता तर काय, हातात कागद आहे.

नक्की कसे ते सांगाल का?

Pages