बलुचिस्तानचा स्वातन्त्र्यलढा अन पाकिस्तानचे भविष्य

Submitted by उडन खटोला on 21 August, 2016 - 10:11

पाकिस्तान विषयी चर्चा करताना काही मूलभूत मुद्द्यांकडे दुर्लक्ष करता येणार नाही.

१. पूर्वीच्या हिन्दुस्थानातील (ब्रिटिश इन्डिया) वायव्य सरहद्द प्रान्त आणि पूर्व बंगाल हे प्रान्त मागण्याचा मुस्लिम लीग ला तसा काहीच अधिकार नव्हता . वस्तुतः हे बहुतांश मुस्लिम आक्रमकांच्या छळबळाने कन्व्हर्ट झालेले मूळचे हिन्दूच होते. परंतु हिन्दु धर्ममार्तंडांच्या कपाळकरंटे पणामुळे या हिन्दु धर्मपासून विलग झालेल्या मोठ्या जनसंख्येचे पुन्हा हिन्दु धर्मान्तर करून घेण्याची सुवर्णसन्धी आपण गमावली अन्यथा काश्मिर, पाकिस्तान , अतिरेकी इत्यादि विसाव्या आणि एकविसाव्या शतकात भेडसावणार्या डोकेदुखीचा समूळ नाश कित्येक शतके आधीच झाला असता. त्यातच ब्रिटिशान्च्या "फोडा झोडा आणि गुलाम बनवून राज्य करा" या कुटिल नीतीमुळे मुस्लिम समाजातील फुटीर अणि मूलतत्त्वावादी संघटना वाढत गेल्या ... त्यातूनच पुढे दार-उल-इस्लाम "पाक"स्तान ची मागणी पुढे आली.

२. आज कोणीही कितीही शान्ती आणि मैत्रीच्या गप्पा मारल्या तरी पाकिस्तान हा विषारी साप आहे. आणि त्याला कितीही दूध पाजले तरी तो आपला विषारी डन्ख मारणे सोडणार नाही हे भाजपच्या पहिल्या राजवटीत वाजपेयीना आणि दुसर्या राजवटीत मोदीजीना पहिल्या दोन वर्‍षात चांगलेच समजून चुकले आहे. यास्तव चर्चा /शान्तिप्रक्रिया हे पारम्पारिक गुर्हाळ बन्द करून डिफेन्सिव्ह च्या ऐवजी ऑफेन्सिव्ह अ‍ॅक्शन वर भर देण्याच्या मनस्थितीत सध्या मोदी सरकार दिसत आहे. सुरक्षा सल्लागार अजित डोभल आणि खुद्द प्रधानमन्त्री नरेन्द्रजी मोदींच्या अलिकडच्या भाषणे/ वक्तव्यावरुन तसे प्रतिबिम्बित होत आहे.

३. नजिकच्या भविष्यकाळात भारत आर्थिक दॄष्ट्या सुपरपॉवर बनण्याकडे वाटचाल करीत असताना अन्तरराष्ट्रीय समुदायात पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर आणून पाकिस्तानला एकटे पाडणे आणि त्याबरोबरच बलुचिस्तान/ गिलगिट -बाल्टिस्तान आणि पाक-अधिकॄत काश्मिर मधल्या पाक सैन्याच्या अत्याचाराना हायलाइट करणे तसेच बलुचिस्तानच्या स्वातन्त्र्यलढ्यास नैतिक आर्थिक/ लष्करी मदत पुरवून पाकिस्तानचे तुकडे पाडून सम्पवणे हाच पाकिस्तानच्या समस्येवरचा जालिम अन रामबाण इलाज आहे ,असे माझे स्पष्ट अन प्रामाणिक मत आहे . येणार्या काळात पाकिस्तानात निर्नायकी माजून जगाच्या नकाशावरून पाकिस्तान नाहीसा झाला,तर मला मुळीच आश्चर्य वाटणार नाही!

जय हिन्द ! जय भारत!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>>पाक फुटला तर तेथे असंख्य छोटे मोठे अतिरेकी ग्रूप्स होतील - कोणाचाही अंकुश नसलेले. त्यांच्या त्रासातून वाचण्याकरता अनेक लोक सीमापार येतील - आणि मग त्यातले अतिरेकी कोणते आणि त्यांच्यापासून वाचायला आलेले कोणते हे कळणार नाही. युरोप मधे जे चालले आहे साधारण तसेच पण जास्त अनिर्बंध, आपली सीमा पाहता. परत या संघटनांची एक जागा नसल्याने त्यांना शोधून काढून नष्ट करणे हे ही अवघड होईल, आणि इतर देशांना त्यात काहीच इंटरेस्ट नसेल भारताला मदत करायला.

आणि मुख्य म्हणजे त्यातून भारताच्या फायद्याचे फारसे काही निष्पन्न होणार <<<<

पाक फुटण्याचे परिणाम डिस्कस करण्याची वेळ खरे तर आलेलीच नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर फक्त एक संदेश दिला गेलेला आहे की बलुचिस्तानमधील नागरिक भारत, इराण, अफगाणिस्तान व इतर जगाकडे अपेक्षेने पाहत आहेत. 'माझ्याच घरचे घराबाहेरच्यांकडे अपेक्षेने पाहत आहेत' ही भावना पाकला आधीपेक्षा अधिक हादरवणारी असू शकते. (आधीपेक्षा म्हणजे भारताने नुसतेच आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकविरुद्ध पुरावे वगैरे देऊन हादरवण्यापेक्षा).

तेव्हा पाकिस्तान फुटणे हे अजून कोणाच्या कल्पनेतही नाही आहे. बलुचिस्तानात असंतोष आहे आणि तो चव्हाट्यावर आणता येतो इतकाच मामला आहे. त्यामुळे मी फारेण्ड ह्यांच्या पोस्टच्या 'बेसिसशी' सहमत नाही.

बेफि, मूळच्या लेखातः

बलुचिस्तानच्या स्वातन्त्र्यलढ्यास नैतिक आर्थिक/ लष्करी मदत पुरवून पाकिस्तानचे तुकडे पाडून सम्पवणे हाच पाकिस्तानच्या समस्येवरचा जालिम अन रामबाण इलाज आहे ,असे माझे स्पष्ट अन प्रामाणिक मत आहे . येणार्या काळात पाकिस्तानात निर्नायकी माजून जगाच्या नकाशावरून पाकिस्तान नाहीसा झाला,तर मला मुळीच आश्चर्य वाटणार नाही!

आहे त्यावर मी ते लिहीले आहे.

विकु - ख्रिस्टिन नेहमीच पाक विरोधात लिहीत असेल तर त्यामुळे ते चुकीचे ठरत नाही. अमेरिकन लिबरल थिन्क टॅन्क याला (बलुचिस्तान बद्दलच्या उल्लेखाला) चिथावणी न समजता प्रत्युत्तर समजतोय ही मोठी गोष्ट आहे. एरव्ही अमेरिकन लिबरल विचार हा सहसा उलटा असतो. तुमचे "त्यापेक्षा आधी आपल्या घरी बघा" हे पटले नाही - काश्मीर चा प्रश्न अंतर्गत प्रश्न म्हणूनच राहिला पाहिजे. पाक चा सध्याच्या काश्मीरशी काय संबंध? ते काड्या घालू लागले, तर बलुचिस्तान मधे आम्हीही घालू शकतो हा संदेश आहे. इंटरनॅशन्ल डिप्लोमसी मॅनेज करून तो दिला गेला असेल तर त्यात काही नुकसान नसावे. तसे केले नसेल तर राजकीय अपरिपक्वता आहे. पण ते येत्या काही दिवसांत दिसेल.

काही आयडीच्या पोस्ट्स वाचून मायबोलीचाच कंटाळा आलेला आहे. अतिशय घाणेरड्या वैयक्तिक आणि काहीही विचार नसलेल्या केवळ शिवीबाजीच्या या पोस्ट्सचा माझ्यातर्फे निषेध!>>>>>>>

हेच आजवर खूप वेळा खूप जणांनी म्हटलेय. माबोला काही फरक पडत नाही. सगळीकडून हाकलले गेलेले लोक इथे वेगवेगळी रूपे घेऊन कायमचे पडीक.

मायबोली प्रशासकानी स्वतःच एकदा मायबोली सर्वे करावा. साधारण पाच वर्षांपूर्वीचे एका पूर्ण महिन्याचे माबो पान काढून तेव्हा काय पद्धतीचे, साहित्य, कला आणि इतर विषय चर्चिले जात ते पाहावे आणि त्याची तुलना आजच्या एखाद्या महिन्यांशी करावी. किती आयडी जे आजही इतर संकेतस्थळांवर कार्यरत आहेत पण माबोवरून कायमचे गेलेत ते पाहावे.

हि अपेक्षा too much वाटायची शक्यता आहे याची जाणीव आहेच.

फारएण्ड छान पोस्ट्स.
ते काड्या घालू लागले, तर बलुचिस्तान मधे आम्हीही घालू शकतो हा संदेश आहे. इंटरनॅशन्ल डिप्लोमसी मॅनेज करून तो दिला गेला असेल तर त्यात काही नुकसान नसावे. तसे केले नसेल तर राजकीय अपरिपक्वता आहे. पण ते येत्या काही दिवसांत दिसेल.>>>> ..पटले.

भारताच्या पाकिस्तानातल्या एंबसीच्या लोकांना आपल्या मुलांना तिथल्या शाळेतुन काढुन घरी परत पाठवायचे आदेश सरकारने २६ जुलैलाच दिले आहेत. तिथे काम करणारर्या कर्मचार्यांच्या शिवाय फक्त त्याच्या बायकोला तिथे रहाता येईल,

https://www.youtube.com/watch?v=SKBY1z97hss

भारताच्या पाकिस्तानातल्या एंबसीच्या लोकांना आपल्या मुलांना तिथल्या शाळेतुन काढुन घरी परत पाठवायचे आदेश सरकारने २६ जुलैलाच दिले आहेत. तिथे काम करणारर्या कर्मचार्यांच्या शिवाय फक्त त्याच्या बायकोला तिथे रहाता येईल, >>>
हे आदेश २६ जुलै २०१६ ला नव्हे तर २०१५ सालीच काढले होते जेणेकरून पाकिस्तानातील वकिलातीतील कर्मचार्यांच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही.
एप्रिल २०१६ पासून सुरू झालेल्या नवीन शैक्षणिक वर्षात भारतीय कर्मचार्यांची मुले पाकिस्तानात शिकत नाहीत.

बलुचिस्तानबाबत काही नवीन घडामोडी झाल्या. तेथील लोक म्हणे आता 'मेरी जान, हिंदुस्तान'चे नारे देत आहेत. रेडिओवर बलुच भाषेत काही ऐकायला मिळेल. एका फॉर्वर्डेड मेसेजनुसार तेथे मराठा वंशाचे लोक आहेत (खखोदेजा).

बलुचिस्तान हा मुद्दा दणदणीत आहे. भारतीय पंतप्रधानांच्या अचूक वेळी अचूक वार करण्याच्या कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन!

Pages