भोंदू फॉर्वर्डस

Submitted by नीधप on 26 December, 2014 - 02:44

डॉ. देवेंद्र साठे म्हणून एक कार्डिऑलॉजिस्ट आहेत. कोथरूडात रहातात. त्यांच्या नावाने हार्ट अ‍ॅटॅकवर पिंपळपानाच्या काढ्याच्या उपायाची एक पोस्ट फिरतेय व्हॉटसॅपवर. पोस्टमधे पिंपळपानाच्या काढ्याचे उपयोग वगैरे गोष्टी आणि पथ्ये असे दोन भाग आहेत. पथ्ये जी आहेत ती कुठल्याही हृदयविकाराच्या पेशंटने पाळलीच पाहिजेत अशी आहेत (उदा. तेलकट खाऊ नका, मीठ कमी करा, मांसाहार, दारू बंद करा वगैरे). ती कायमची पाळली तर हृदयविकार दूर राहण्यास मदत होते हे जगजाहिर आहे.
पण पिंपळपान संबंधित जे तारे आहेत की हार्ट अ‍ॅटॅक आल्यावर पंधरा दिवस हा काढा घेतल्यास तब्येत सुधारते आणि परत येत नाही. पिंपळामधे हृदयाला शक्ती आणि शांती (?) देण्याची अदभुत क्षमता आहे. पिंपळपान, भगवंताचे पान, त्याचा आकार देवाने हृदयासारखा बनवला आहे याचे कारणच ते हृदयविकारावर गुणकारी आहे हे आहे. इत्यादी भोंदू बडबड आहे.
आमच्या संस्कृतीने लाख्खो वर्षांपूर्वी सगळे शोध लावलेच्च होते असे म्हणणारे अनेक जण ही भोंदू पोस्ट विश्वास ठेवून पुढे ढकलण्यात धन्यता मानतायत.

हे जाहीर लिहिले अश्यासाठी की कोणीही खरोखरीचा हृदयविकारतज्ञ अश्या प्रकारची भोंदू विधाने लिहील असे मला वाटत नाही. लिहिले असेल तर त्याच्या तज्ञ असण्याबद्दल शंका घ्यावी असे म्हणण्यास जागा आहे.

आता हे डॉ देवेंद्र साठे कोण वगैरे मला माहित नाही. त्यांनी हे आर्टिकल पाठवले आहे असे मला सांगण्यात आले. विचारल्यावर त्यांचा पुण्यातला पत्ताही देण्यात आला. तुम्ही कोणी त्यांना ओळखत असाल तर त्यांच्या नावे ही असली पोस्ट फिरते आहे याची त्यांना माहिती जरूर द्या.

बघा आमची संस्कृती कशी महान करत विमान, अणुबॉम्ब, संगणक आम्हीच बनवला होता वगैरेवाल्या पोस्टींकडे इग्नोर मारता येते. पण असल्या डायरेक्ट तुमच्या आरोग्यावर बेतू शकणार्‍या पोस्टींकडे दुर्लक्ष करू नये असे मला वाटते.

हा धागा अश्या प्रकारच्या भोंदू फॉर्वर्डसची माहिती देण्यासाठी वापरावा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दस्त नाही हो, फक्त गॅसेस!
Wink

मला तर ते फॉर्वर्ड नसून भोंदू फॉर्वर्डसचं मुद्दाम केलेलं विडंबन वाटतंय.

साती, हे वैद्य जोशी, हल्ली whtsapp वरून मार्केटिंग करत असतात स्वात: चे, आमच्या बिल्डिंगच्या ग्रुप वर अधून मधून त्यांचे मेसेज फिरत फिरत येतात.
मागे एकदा टरमरिक लाटे, म्हणजेच आपले हळदीचे दूध , आणि मग आपल्या कडे कसे सग्गळं सग्गळं होतं चे कौतुक. Happy

Watch this space फॉर more वैद्य fwds :p

या डिटॉक्स डाएटला ' मुक्तपादासन डाएट 'असे नाव दिले गेले पाहीजे Biggrin

मुक्तपादासन >> पवनमुक्तासन असे एक अ‍ॅक्च्युअल आसन पाहिले आहे योगासनाच्या पुस्तकांत.

पुलंच्या "गाळीव इतिहास" मधे काही ग्रंथांची नावे आहेत, त्यात "पवनविजय" हे नाव वाचून ते त्यांना आयुर्वेदिक औषधाचे नाव वाटले असा उल्लेख आहे Happy

गॅस सुटले वाचून हसणार्‍यांनी विठ्ठल नाम घेतल्यावर हार्ट अटॅक वाचतो(म्हणजे माणूस हार्ट अटॅक पासून वाचतो) हे फॉरवर्‍ड वाचावे.

आजकाल भारतात डायबेटीस चे प्रमाण जास्त आहे. रोज पुरण पोळी खाल्याने साखर अचानक वाढू शकते. "पाहुया तरी करून " अशा विचारानेही हे करू नये. जाणकारांनी अधिक लिहावे. ...

पुरणपोळी शुद्ध (केमिकल विरहित) गुळापासून बनविली, त्यात वेलची कुटून आणि अगदी किंचित प्रमाणात सहाणेवर घासून जायफळ पूड घातली तर गुळ + चणा डाळ (कर्बोदके + प्रथिने) या मिश्रणाने रक्तातली शर्करा वाढेल काय? तसेच ही पुरणपोळी गायीच्या दुधापासून बनविलेल्या तुपासोबत खाल्लीतर पोटाकरिता फायदेशीर ठरु शकेल काय?

त्याकरता आधी मधुमेहावरील रामबाण उपाय द्यावा. मग पुरणपोळ्या खाउ घालायच्या. हाय काय न नाय काय.

बिपीनचंद्र , केमिकल विरहित वाटणार्‍या गुळातसुद्धा C12H22O11 नावाचं केमिकल असतंच असतं.
त्यामुळे बाकी तुम्ही लिहिलेल्या काहीही प्रोसिजर केल्यात तरी साखर वाढणारच.
Happy

धन्यवाद साती.

{{{केमिकल विरहीत म्हणजे नक्की काय? }}}

इथला पहिलाच प्रतिसाद वाचा.

http://www.maayboli.com/node/50522

इथेही ह्या लेखांमध्ये त्याचा उल्लेख आहे.

http://www.maayboli.com/node/31879

http://prahaar.in/%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%9A...

http://www.esakal.com/esakal/20100224/4987170175863820604.htm

म्हणजे भेसळ विरहीत.
सेंद्रिय, ऑर्गॅनिक हा शब्द प्रयोग मी पण वापरतो, तसा गुळ मी पण वापरतो.

माझा प्रश्न विजय कुलकर्णींना होता,त्यांच्या तंबाखु/सिगरेट प्रश्नाला मला उत्तर द्यायचं होते. Happy

आयुर्वेदाच्या नावावर काहीही?!!

पुरणपोळी डाएट सोशल मिडियावर जाम व्हायरल झालाय. त्यासंबंधी काही आयुर्वेदीय.....

1) पुरणपोळी इतका पचायला जड पदार्थ सलग पंधरा दिवस खायला सांगणारा ग्रंथ माझ्या तरी वाचनात नाही. कुणी वाचला असेल तर कृपया माहिती द्यावी. माझे अज्ञान दूर करता येईल.

2) हरभरा डाळच काय, सर्व कडधान्यं रुक्ष आणि वातकर आहेत. (म्हणून त्यांच्यासोबत भरपूर दूध / तूप / तेल घेण्याची प्रथा आहे.) वातप्रधान आजारात ती खाल्ली तर आजार निश्चितपणे वाढतातच.
हरभरा खाल्ल्यावर गॅसेस सुटतात म्हणजे आधी प्रचंड मोठ्या प्रमाणात पोटात तयार होतात, त्यातले फार थोडे बाहेर पडतात. त्यात हुरळून जाण्यासारखं काही नाही. कारण खूपसे गॅसेस आतच राहून छळतात. (सोबत तूप/ तेल / लिंबू असेल तरच काही धडगत.)

3) काकडी तर स्वतःच पित्तकर आहे असा कैक रुग्णांचा अनुभव आहे. 'अजीर्णमंजिरी' मधे गव्हाच्या अजीर्णावर काकडी हा उपाय सांगितला आहे. (म्हणून आपल्याकडे पुरणपोळी बरोबर काकडीची कोशिंबीर अनिवार्य असावी.) रुग्णाला काकडी खाऊन बरे वाटले याचा अर्थ त्याला गव्हाचे अजीर्ण झाले असावे, अॅसिडीटी नव्हे.

4) दम्याचा रुग्ण कफाने भरलेला असेल, तर रुक्ष हरभरा- त्या रुग्णाच्या कफाचे शोषण करु शकतो . म्हणून रुग्णाला कफ कमी झाला असे वाटू शकते. पण त्यासाठी पुरणपोळीची काय गरज? ती गोड असल्याने पचायला जड आणि कफ वाढवणारच. त्यापेक्षा फुटाणे जास्त उपयोगी. ते भाजलेले असल्याने खूप जड नसतात. तरी त्याबाबत वैद्यांचा सल्ला आवश्यक ठरतोच.

5) कंबरदुखीवर हरभरा हा तर जीवघेणा विनोद आहे.

6) सावधान.....निसर्गातील वस्तू / पदार्थ वापरुन केलेला कुठलाही प्रयोग म्हणजे आयुर्वेद नव्हे. वरील पोस्ट चे लेखक वैद्य नसून बी. एस्सी. आहेत याची नोंद घ्यावी. वैद्य सुचित्रा कुलकर्णी M.D.आयुर्वेद, ठाणे

या सुचित्रा कुलकर्णी वैद्य आमच्या एका व्हॉ अ‍ॅ ग्रुप मध्ये आहेत(या माहितीची गरज नाही, असेच आपले मिरवायला Happy )
सेन्सीबल असतात पोस्ट त्यांच्या.

सुचित्रा कुलकर्णी वैद्य या रविवारच्या लोकसत्तामध्ये आयुर्वेदावर सदर चालवायच्या.

भोंदू फाॅरवर्डला प्रत्युत्तराचा उतारा दिल्याबद्दल धन्यवाद!

{{{ माझा प्रश्न विजय कुलकर्णींना होता,त्यांच्या तंबाखु/सिगरेट प्रश्नाला मला उत्तर द्यायचं होते. }}}

त्यांनी तर पुरणपोळी / गुळाची तुलना थेट तंबाकूसोबत केलेली आहे. अशा महान व्यक्तिला म्या पामर काय उत्तर देणार?

Pages