Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
धन्यवाद रुनि आणि दिनेशदा, डाळ
धन्यवाद रुनि आणि दिनेशदा,
म्हणून सध्या धणे -जिर्या वरच काम भागवतेय.खोबर आणि कोथिम्बीर सढळ हाताने वापर्तेय्,अधुन मधुन दाण्याच कूट....
डाळ पालक डाळ मेथी अस केल होत.आयडीया आवडली.आता पुढल्या अठवड्यात उसळी करते.
खर सन्गायच तर तिला लाल तिखटाने/मिरची ने acidity होते,म्हणून तिच्यासाठी गरम मसल्यातले पदार्थ पण नाही चालणार
परत एकदा धन्यवाद्!आजकाल कोणताही प्रश्ण पडला की मायबोलीचीच आठवण येते चटकन.....
हे घे
हे घे सिंडे
http://evolvingtastes.blogspot.com/2008/03/pear-apple-and-cranberry-cris...
http://evolvingtastes.blogspot.com/2008/09/fruit-crisp-for-any-season.ht...
बारक्या कांद्याचं सांबार पण मस्त लागतं . अजून एक कोकणी रेसिपी आहे, लिहिते संध्याकाळी.
कोण्तीही रेसीपी करताना
कोण्तीही रेसीपी करताना त्यान्च्यासाठी मसाले व तिखट घालण्याआधी बाजुला काढून ठेवावी. ( शिजलेला पदार्थ व मीठ किन्चित असे) त्य हवे ते सीजनीन्ग वरून घालून घेऊ शकतील. तुम्ही किती खपणार वेगळे.
जसे मधू मेहींसाठी आपण साखर घालण्याआधी आमटी बाजूला काढ्तो वाटी भर. परत पाहुणे आले की त्यान्च्या बरोबरही हिन्डावे लागते. घरी आले की त्याना जेवण लगेच हवे असते. करणारा दमतो ना.
नमस्कार, मी माबो वर आत्ताच
नमस्कार, मी माबो वर आत्ताच प्रवेश केला आहे.
-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-
शिमला मिर्चिचि भाजि कशि करतात ?
अगदी मनातल
अगदी मनातल बरका,अश्विनिमामी.....!!!
मनु ची लो कॅलरी बनाना ब्रेड
मनु ची लो कॅलरी बनाना ब्रेड कृती कुठे गेली ? कोणाकडे सेव्ह केलेली आहे का ?
आहे आहे. चुकुन डिलीटली गेली
आहे आहे. चुकुन डिलीटली गेली होती. ती लिहितेय परत.
प्रज्ञा, इथे भाज्या प्रकारात
प्रज्ञा, इथे भाज्या प्रकारात शोधलं तर सिमला मिरचीच्या बर्याच पाककृति मिळतील.
हाय, १. उपवासाला कुठली
हाय,
१. उपवासाला कुठली कडधान्य/डाळी चालतात का? मला एक मैत्रिण विचारत होती. मी म्हंटल इथे विचारु....
२. साबुदाणा, वरी, राजगिरा यांना पर्याय काय (भाज्या/फळे/कंदमुळे सोडुन)?
"उपाशी रहा" हा पर्याय झेपणार्यातला नाही...
३. उपासाची बटाट्याची कचोरी करताना बटाट्यात साबुदाण्याचे पीठ घातले तर चालेल का? बेक करायच्या असतिल तर अजुन काय करावे लागेल की जे करुन कचोर्या/पॉटिस फुटणार नाहित. जुना माबो धागा पाहिलाय....
४. साबुदाणा चिवडा घरी करायचा असेल तर साबुदाणा आधी भिजवुन, वाळवुन मग तळायचा का? तळायच्या ऐवजी बेक/लाह्यांसारखा फुलवता येतो का? मला साबुदाणा चिवडा खूप आवडतो. पण इथे मिळत नाही
लाजो माझ्या माहितीप्रमाणे
लाजो माझ्या माहितीप्रमाणे साबुदाण्याच्या चिवड्यासाठी वेगळा साबुदाणा मिळतो "नायलॉन साबुदाणा" नावाचा तो तळून त्याचा चिवडा बनवतात. नेहमीचा साबुदाणा नाही चालणार.
नायलॉन सबुदाणा नाही मिळाला
नायलॉन सबुदाणा नाही मिळाला तरी साबुदाण्याच्या पापड्या मिळतील कदाचित. त्या तळुन, कुस्करुन चिवडा होइल.
ती मैत्रिण कानडी असेल तर भात,
ती मैत्रिण कानडी असेल तर भात, भाकरी आणि पोळी सोडुन सगळे चालते
अगदी रव्या उपमा-शीरा, थालीपीठ देखील 
कचोरीमधे साबुदाण्याचे पीठ घालायला हरकत नाही. टूथपीकने एखादे छिद्र पाडून बेक करता येतील.
अजुन काही पदार्थ -
१. बटाटा खिसुन त्यात साबुदाण्याचे पीठ, मिरची, दाण्याचे कुट घालुन थालीपीठ
२. दह्यातला/ताकातला साबुदाणा
३. रताळ्याचा खीस
४. साबुदाण्याच्या पिठाची धिरडी
५. केळीचे पीठ मिळाल्यास त्याची धिरडी/दशम्या
६. फळांच्या कोशिंबीरी - सफरचंद, अननस, पेरू, हिकामा, संत्रे वगैरेच्या
७. पिकनीक (PikNik) नावाच्या ब्रँडचा तळलेला बटाट्याचा खीस मिळतो त्याचा चिवडा.
अजुन आठवेल तसे लिहेन.
धन्स सुगरणींनो. अगदी लग्गेच
धन्स सुगरणींनो. अगदी लग्गेच उत्तर...
रुनी, इथे नायलॉन पोहे पण नाही मिळत... नायलॉन साबुदाणा तेर अशक्यच... इथला देशी दुकानातल्या साध्या साबुदाण्याल पण जरा विचित्रच वास येतो. मी सुपर्मार्केटात मिळणारा पुडिंग करायचा सॅगो आणते. तो लवकर भिजतो पण आणि खिचडीही मोकळी होते. दाणे फक्त लहान असतात इतकच.
सिंडी, साबुदाणा पापडी पण नाही बघितली इथे. पण प्रिया का एम्टीआर चे साबुदाणा पापड मिळाले होते एकदा. पण ते पातळ आणि रुपयाच्या आकाराचे. मायक्रोत चांगले फुलले होते. ते परत मिळाले तर त्याचाच करीन चिवडा. आयडिया चांगली आहे.
मिनोती, नाही गं मैत्रिण साउथी नाही. नुकतच लग्न झालय आणि सासुने सांगितलय जमल्यास उपास कर. हिला साबुदाणा आवडत नाही...
बटाटे खाऊन जाड होइल म्हणु बटाटे खायचे नाहित..

मग काय खायच?
साबुदाणा पीठ घालुन करुन बघते कचोर्या. टुथपिक ची आयडिया सही आहे. मला तळणीचे पदार्थ एव्हढे आवडत नाहित त्यामुळे बेक केलेल्या ट्राय करते.
परत एकदा सगळ्यांना धन्यवाद. अजुन काही आठवल तर जरुर सांगा...
मिल्क पावडरच्या दुधाचे काल मी
मिल्क पावडरच्या दुधाचे काल मी दही लावले... दोन बाउल पैकी एकात थन्ड पाण्यात दूध केले होते. दुसर्यात उकळलेल्या पाण्यात दूध केले होते... पहिल्या मध्ये दह्याची छान इडली झाली आहे. दही मध्ये गोळा झाले आहे आणि बाजूला पाणी... दुसर्यात मात्र दही खाली आहे, घट्टसर आहे.. आणि वर पाणी आहे.
... मिल्क पावडरच्या दुधासाठी योग्य पद्धत कुठली ?
जामोप्या, मी अलिकडेच दूध
जामोप्या, मी अलिकडेच दूध पावडरचे दहि कसे लावायचे, ते सविस्तर लिहिलेय.
विकिपेडियावर दुधात यीस्ट
विकिपेडियावर दुधात यीस्ट घातले की दही होते असे म्हटले आहे....असे दही करता येते का ?
मला उपासाच्या भाजणीचे प्रमाण
मला उपासाच्या भाजणीचे प्रमाण हवे आहे. म्हणजे वरई , साबुदाणा आणि राजगिरा कोणत्या प्रमाणात घेऊन भाजायचा ? आणि जिरे किती घालायचे यात ? हे सगळे कोरडेच भाजायचे ना ?
धन्यवाद प्रिती, आर्च. जर कैरी
धन्यवाद प्रिती, आर्च. जर कैरी नसेल तर त्याऐवजी आमचुर पावडर वापरली तर चालेल?
शोनु आज रात्रीसाठी त्या बारक्या कांद्यांचं सांबार केलय. धन्यवाद सुचवल्याबद्दल.
साबुदाणा चिवडा घरी करायचा
साबुदाणा चिवडा घरी करायचा असेल तर साबुदाणा आधी भिजवुन, वाळवुन मग तळायचा का? तळायच्या ऐवजी बेक/लाह्यांसारखा फुलवता येतो का? >>>>>हो येतो..माझी आई असं करते. आधी नेहेमी प्रमाणे खिचडी करुन ती उन्हात कडकडित वाळवायची, मग कढईत थोडी थोडी टाकुन भाजली की साबुदाणे फुलतात. मुळात खिचडिच असते ना ती त्यामुळे चिवड्याला पण चव येतेच, अजुन काही करायला लागत नाही. (हे आई खिचडी उरली तर करते.) फक्त दाण्याचं कुट जपुन टाक नाहीतर भाजताना ते जळेल...नाही टाकलं तरी चालेल.
दाण्याचं कूट न घालता खिचडी
दाण्याचं कूट न घालता खिचडी चांगली होते ? साबुदाणा चिकटणार नाही का ?
हम्म्म..कदाचित गोळा होईल ना
हम्म्म..कदाचित गोळा होईल ना साबुदाण्याचा?...थोडंसं चालेल कुट मग. (नाहितर ते गोळे भाजल्यावर भाजलेले साबुदाणा वडे होतील...डाएट वडे
)
यीष्ट साखरेचे विघटन करुन
यीष्ट साखरेचे विघटन करुन अल्कोहोल व कार्बन डाय ऒक्साईड वायू तयार करते
त्याने दहि जमेल का, याची मला शंका आहे. दही जमवण्यासाठी एक कोरडे कल्चर
मिळते.
उपवासाच्या भाजणीसाठी हे तिन्ही सारख्याच प्रमाणात घ्यायचे. वरी लालसर भाजायच्या,
राजगिऱ्याच्या भाजताना लाह्याच होतात. साबुदाणा मात्र शेवटी भाजून तो गरम असतानाच
दळायचा.
हाय, कोबी ची जरा वेगळी भाजी
हाय,
कोबी ची जरा वेगळी भाजी सुचवा ना? जुन्या मबो वरचे सगळे प्रकार करुन झालेत.
इथे ठराविकच भाज्या मिळतात त्यामुळे २ आठवड्यातुन एकदा तरी कोबी होतेच... आज पण करायची आहे
कोबिच्या पानाच्या
कोबिच्या पानाच्या आळूअडीसारख्या वड्या करता येतात. तसेच कोथिंबीरीच्या वडीसारख्या पण वड्या करता येतात. वाफवल्यावर न तळता तेल, जिरे, मोहरी हिंग, तीळ, घालुन फोडणी करायची.
मिनोती, आयडिया छान आहे. पण आज
मिनोती, आयडिया छान आहे. पण आज करता येणार नाही...कारण मी कोबी ऑलरेडी चिरुन ठेवलाय
पुढच्या वेळेस करुन बघेन. दुसर काही सुचतय का चिरलेल्या भाजीसाठी?
कोथिंबीरीच्या वडीसारख्या
कोथिंबीरीच्या वडीसारख्या वड्या कर ना. किंवा रोल करुन ते वाफवून घ्यायचे आणि मग कापून शॅलो फ्राय. नाहीतर कोफ्ते.
लाजो, कोबी कोफ्ता कर ना.
लाजो, कोबी कोफ्ता कर ना. लालुने सांगितलेल्या वड्या करुन त्या मसाला ग्रेव्हीत सोडायच्या. वड्या न करता गोळे सुद्धा करु शकते.
मला कोणितरी 'उकड' काय असत आणि
मला कोणितरी 'उकड' काय असत आणि ति कशि करायचि ते सांगा ना प्लिज.
धन्स ललु, प्रिन्सेस. आयडिया
धन्स ललु, प्रिन्सेस. आयडिया चांगल्या आहेत. तसच कहितरी करते...
मोगरा.केतकी, उकडीसाठी ही लिंक
मोगरा.केतकी, उकडीसाठी ही लिंक पहा - http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/46695.html?1130614239
Pages