अननसाला सद्गती !!

Submitted by इन्ना on 3 August, 2016 - 05:42
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

घरी, आमच्या परिचितांच्या शेतातून अननस आले. पहिले दोन दिवस दुर्लक्ष्य केल, कारण ते कापणे साफ करणे कधी करून माहित नाही. Wink टिनातल्या चकत्याच वापरल्या होत्या. दोन दिवसांनी अननसाचा घमघमाट सुटला स्वैपाकघरात. मग म्हटल ह्याला सद्गती द्यावीच. मास्टर शेफ चे सलग काही एपिसोड नुकतेच सलग पाहिल्याने काहितरी भरभक्कम नावाच , नाट्यपूर्ण कराव अस घाटत होतं ( मनातल्या मनातच हां ) पण मग नवर्‍याच्या बंगाली मित्राच्या घरी खाल्लेली एक चटणी / रायत आठवल. लगेच आंतर्जालावर साकड घातल. अन एक रेसिपी हाताला लागली.

करून पहायच ठरवल अन बरी झाल्यास फोटो टाकता यावेत म्हणून फोटो प्रपंच केला. प्रपंच म्हणजे ; आमच्या नेहेमीच्या हक्काच्या फोटोग्राफरनी साफ नकार दिल्यानी, करणे , अन फोटो काढणे आपापले. फोटोत इतर पसारा न येउ देण्याची दक्षता घेणे Wink वगैरे.

तर आता दोन वाक्याच्या रेसिपीला पुरेशी लांबड लाउन झाल्यानी पुढे, साहित्य फोटोतून कळेलच. माप अंदाजे.

क्रमवार पाककृती: 

अननस कापुन चकत्या बनवल्या. आल्याच्या लांब सळ्या कापून घेतल्या
1

मसाल्यासाठी लवंग , दालचिनी , बडीशेप, जिरं , सुक्या लाल मिरच्या अन मोहरीची डाळ

2

मग हे जरास भाजून भरड करून घेतल

3

अननसाचे सेंटिमिटर क्युब्स कापून घेतले

4
ह्याचा मधला भाग ( कोअर) काढणे अपेक्षित होते , पण माहित नसल्यानी तसेच तुकडे केले अन ते जरासे निबर लागतात रायत्यात.

मग तुपात पहिल्यांदा आल, मग भरड वाटलेला मसाला टाकला अन अननसाच्या फोडी पण.
जरास परतून घेतल .

5

पाणी घालून , पंधरा वीस मिनीट झाकण घालून शिजवल. मधेच आठवल् तेव्हा सहा सात चम्चे साखर टाकली . अननसाच्या चवी प्रमाणे ही अंदाजे घातली . फोडी मौ झाल्यावर अर्ध्या लिंबाचा रस पिळला.

limbo

अन झाल अस डिक्लेअर केल. गरम फुलक्यांबरोबर मस्त लागल.

final

वाढणी/प्रमाण: 
मी एकटीही संपवू शकते
अधिक टिपा: 

पुढच्यास ठेच प्रशिक्षण ( सुगरणीनी/बल्लवांनी हे ऑप्शन ला टाकल तरी चालेल)

१) अननस कापायला येत नसेल तर टिनच बरा . किंवा तो नीट कापायला शिकल पाहिजे .
२) अननसाच्या फोडी अजून बारीक अथवा एकदा मिक्सर मधून फिरवून काढल्या असत्या तर कनिस्टन्सी रायत्या सारखी झाली असती.
३) तुपा ऐवजी सरसो च तेल बरं लागेल, मी खाल्लेल्या बंगाली पदार्थात असाव.
४) आंबट गोड तिखट अन मसाले ह्याची एक सुरेख चव तयार होते. मुळ बंगाली पदार्थाच्या ५-१० अंश सरकलेली असली तरी मस्त.

माहितीचा स्त्रोत- मैत्रीणीनी दिलेली लिंक , इतर आंतर्जालीय रेस्प्या , अन शेवटी हाताशी असलेली सामग्री.

मास्टर्शेफ टाइप कमेंट-
१) हिरो ऑफ द डिश इज पायनॅपल
२) अ‍ॅसिडिटी इज वेल बॅलन्स्ड विद जिंगर अ‍ॅन्ड अदर स्पाइसेस.
३) प्रेझेन्टेशन मॅटर्स , म्हणून अननसाच्या सगळ्या फोडी एकसारखे क्युब्स , आल्याचे ज्युलिअन्स, अन पिवळ्या अननसाला कॉन्ट्रास्ट लाल सुक्या मिरच्या

इती दोन वाक्याची रेसिपी पानभरात संपूर्ण Lol

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इन्ना एक पण फोटो दिसत नाही त्यामुळे पाककृतीचे नेत्रसुख घेता आले नाही.
तेव्हढे फोटो टाक की जरा परत.

एक पण फोटो दिसत नाही त्यामुळे पाककृतीचे नेत्रसुख घेता आले नाही.
तेव्हढे फोटो टाक की जरा परत.>>>

छान दिसतायेत की फोटु!!

भारी लिहिलंय, करून बघेन
फोटोही छान दिसतोय शेवटचा

अननस कापणे ही खरेच जिकिरीची गोष्ट आहे, टीव्हीवरची मंडळी लोणी कापल्यासारखी सरसर सुरी फिरवून अननसाचा कोथळा आणि एकसारख्या फोडी वेगळ्या करतात तसे जमलेले नाही अजून. त्यामुळे कापता येईना अननस वाकडे म्हणून नाद सोडून देतो.

फोटो अजूनही दिसत नाहियेत. Sad पिकासावरून टाकलेत का? Uhoh
मग ऑफिसमध्ये नाही दिसणार, रात्री घरून चेक करीन.

इन्ना मलाबी दिसंना फोटू.

बाकी लिवलंय भारी.

ऋन्मेष काही मायबोलीकराना झालंय दर्शन, दिसतायेत फोटो. वरच्या प्रतिसादावरून कळतंय.

आता दिसतायत का फोटो?
पण हे संपादनातून लेखात कोंबता येइनात.कसरती कराव्या लागतील पहायला पण ; नो पेन नो सद्गती Wink

IMG_6034.jpgIMG_6038.jpgIMG_6039.jpgIMG_6043.jpgIMG_6044.jpg

मला इथे आणि मिपावर दोन्ही ठिकाणी लेखातले फोटो दिसत आहे. पण दोन्ही संस्थळावर सदस्यांची फोटो बद्दल तक्रार आहे. असे का होते आहे? याचा शोध घेतल्यावर असे दिसले की, फायर फॉक्स ब्राउजर वापरल्यावर लेखातले आणि प्रतिसादातील फोटो दिसताहेत. पण इंटरनेट एक्सप्लोरर वापरल्यावर फक्त प्रतिसादातील फोटो दिसताहेत लेखातील नाही.

इन्नाबाय थँक्यु. इथले दिसतायेत. भारी फोटो, कलरफुल.

मला गुगल क्रोम आणि i e दोन्हीवर वरचे दिसले नाहीत, फायर फॉक्सवर नाही बघितले.

Pages