भोंदू फॉर्वर्डस

Submitted by नीधप on 26 December, 2014 - 02:44

डॉ. देवेंद्र साठे म्हणून एक कार्डिऑलॉजिस्ट आहेत. कोथरूडात रहातात. त्यांच्या नावाने हार्ट अ‍ॅटॅकवर पिंपळपानाच्या काढ्याच्या उपायाची एक पोस्ट फिरतेय व्हॉटसॅपवर. पोस्टमधे पिंपळपानाच्या काढ्याचे उपयोग वगैरे गोष्टी आणि पथ्ये असे दोन भाग आहेत. पथ्ये जी आहेत ती कुठल्याही हृदयविकाराच्या पेशंटने पाळलीच पाहिजेत अशी आहेत (उदा. तेलकट खाऊ नका, मीठ कमी करा, मांसाहार, दारू बंद करा वगैरे). ती कायमची पाळली तर हृदयविकार दूर राहण्यास मदत होते हे जगजाहिर आहे.
पण पिंपळपान संबंधित जे तारे आहेत की हार्ट अ‍ॅटॅक आल्यावर पंधरा दिवस हा काढा घेतल्यास तब्येत सुधारते आणि परत येत नाही. पिंपळामधे हृदयाला शक्ती आणि शांती (?) देण्याची अदभुत क्षमता आहे. पिंपळपान, भगवंताचे पान, त्याचा आकार देवाने हृदयासारखा बनवला आहे याचे कारणच ते हृदयविकारावर गुणकारी आहे हे आहे. इत्यादी भोंदू बडबड आहे.
आमच्या संस्कृतीने लाख्खो वर्षांपूर्वी सगळे शोध लावलेच्च होते असे म्हणणारे अनेक जण ही भोंदू पोस्ट विश्वास ठेवून पुढे ढकलण्यात धन्यता मानतायत.

हे जाहीर लिहिले अश्यासाठी की कोणीही खरोखरीचा हृदयविकारतज्ञ अश्या प्रकारची भोंदू विधाने लिहील असे मला वाटत नाही. लिहिले असेल तर त्याच्या तज्ञ असण्याबद्दल शंका घ्यावी असे म्हणण्यास जागा आहे.

आता हे डॉ देवेंद्र साठे कोण वगैरे मला माहित नाही. त्यांनी हे आर्टिकल पाठवले आहे असे मला सांगण्यात आले. विचारल्यावर त्यांचा पुण्यातला पत्ताही देण्यात आला. तुम्ही कोणी त्यांना ओळखत असाल तर त्यांच्या नावे ही असली पोस्ट फिरते आहे याची त्यांना माहिती जरूर द्या.

बघा आमची संस्कृती कशी महान करत विमान, अणुबॉम्ब, संगणक आम्हीच बनवला होता वगैरेवाल्या पोस्टींकडे इग्नोर मारता येते. पण असल्या डायरेक्ट तुमच्या आरोग्यावर बेतू शकणार्‍या पोस्टींकडे दुर्लक्ष करू नये असे मला वाटते.

हा धागा अश्या प्रकारच्या भोंदू फॉर्वर्डसची माहिती देण्यासाठी वापरावा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Dear friends.
Kindly forward this message send by Col. Prabhakar Chitale, to your near and dear ones. Also to different WhatsApp and facebook groups.

Thanks
Damodar Gurujee Pratishthan, Pune.
*************************************

Pokemon is not a laughing issue, it is a serious threat - not only to the individual who is playing that but also to the security system of our Country.

These kids are using the camera of their cellphones and picturising the surrounding landmarks. All these data is gathered in a gigantic server in Singapore and there are about 1800 people per shift monitoring that data round the clock. Thus they can see the land, roads, buildings, offices, residences, transport facilities, shops, malls (and many other things) without incurring any risk.
In short, by playing this game, you are sending the sensitive data to your enemy. Looking and managing this data, the enemy can easily formulate the mode and style of terrorist attack and device the escape routes too.

Do you remember - when Mumbai was attacked on 26/11, our xxx media was transmitting the live coverage of our commandos who were planning the attack and the bloody Pak attackers were getting the info about our soldiers and their planning.

I've spent 36 years in this field and I can sense danger just like snap of a finger.

It would worry you if I tell you the name of the company in SG and the nationalities of the people working there.?

So please be careful. It's our Country .

Col. Prabhakar Chitale

पियू,
या धाग्याचे नाव भोंदू फॉर्वर्डस आहे. याचाच अर्थ असा की या धाग्यावर टाकलेले फॉर्वर्डस हे भोंदू म्हणजे खोटे असतात.

देशी गाय भले २-३ लिटर दूध देत असेल पण ते अमृत आहे कारण त्यात सोन्याचा अंश आहे असे संशोधनात आढळले आहे, >> मला चिनूक्सांची पोस्ट आठवली, आणखी कशामधे सोन्याचा अंश आहे हे सांगणारी Wink

देशी गाय भले २-३ लिटर दूध देत असेल पण ते अमृत आहे कारण त्यात सोन्याचा अंश आहे असे संशोधनात आढळले आहे,
जर्सी पशुंच्या दुधात सोन्याचा अंश आणि बाकी पोषक तत्व नसतात जी देशी गाईच्या दुधात असतात.>>>>. हे वाक्य वाचुनच कैच्याकै अस वाटल.

वरच्या पॉकेमोनच्या फॉरवर्ड ला आलेलं उत्तर

1. Pokemon go does not need players to take photographs

2. The game uses map information made available by google 10 years before the the game was launched last month

3. The game is not officially launched in India yet

Considering above points it is obvious stupidity to trust information about company in Singapore employing 1800 ppl round the clock to process information by a game which is not supposed to be available in India, the game which uses information already available publicly for many years and it doesn't even capture the information being claimed.

If we get scared at every normal activity that we do in our daily life then terrorist have already won the war.

Don't let terrorist win, think before forwarding senseless messages.

Please forward this message to everyone who sends wrong information about Pokemon go. Forwarding wrong information is assisting terrorists.

*⚜दीप पूजा⚜*

*(दीप अमावस्या)*

येत्या.....
दिनांक: ०२/०८/२०१६
वार:-मंगळवार

*आषाढ अमावस्या म्हणजेच दिव्यांची अमावस्या...!*

*सगळ्यांना गटारी अमावस्या म्हणून चांगलीच लक्षात राहते...!*

♀पण हि दिव्यांची अमावस्या म्हणून ही लक्षात ठेवावी...!

घरातील दिव्यांना दुध पाण्याने धुउन स्वच्छ करावेत...!

पाटावर वस्त्र घालून ठेवावेत त्यांची पूजा करावी...!
आज पासूनच पत्रीचे महत्त्व सुरु होते.

आघाडा, दुर्वा, पिवळी फुले यांनी दिव्यांची पुजा करावी...!

गोडाचा नेवैद्य अर्पण करावा ..!

आपल्या घरातील छोटा / छोटीला औक्षण करावे...! वंशाचा दिवा असतो न म्हणून आता मुलगा मुलगी हा भेद करत नाही त्यामुळे आपल्या दिव्याचे किंवा पणतीचे नक्की औक्षण करावे...!

दुर्वा ही वंश वृद्धीचे प्रतिक आहे , त्यामुळे ते ही अर्पण करून प्रार्थना करावी ....!!

या दिवशी सुवासिनी स्त्रिया घरातले दिवे घासून-पुसून एकत्र मांडतात...!

त्याच्या भोवती रांगोळ्या घालतात व ते दिवे प्रज्ज्वलित करून त्याची पूजा केली जाते....!

पूजेमध्ये पक्वान्नांचा महानैवैद्य दाखविला जातो. त्यावेळी पुढील मंत्राने दिव्याची प्रार्थना करतात...!

•• ती प्रार्थना अशी ••

*‘‘दीप सूर्याग्निरुपस्त्वं तेजसां तेज उत्तमम्‌| गृहाण मत्कृतां पूजां सर्वकामप्रदो भव॥*

•• त्याचा अर्थ असा ••

*‘‘हे दीपा, तू सूर्यरुप व अग्निरुप आहेस...!*
*तेजा मध्ये तू उत्तम तेज आहेस..!*
*माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर.’’..!!*

त्यानंतर दिव्यांची कहाणी ऐकली जाते...!
आयुरारोग्य व लक्ष्मी यांची फलप्राप्ती यामुळे होते...!
असं धार्मिक ग्रंथात सांगितले आहे.

*या पूजाव्रताची कथा खालीलप्रमाणे सांगितली आहे...!*

तमिळ देशाच्या पशुपती शेट्टी नावाच्या श्रेष्ठीला विनीत व गौरी अशी दोन मुले होती..!

लहानपणीच दोघांनी असं ठरविले की गौरीला ज्या मुली होतील त्या तिने विनीतच्या मुलांना द्याव्या...!

पुढे गौरीला तीन मुली व विनीतला तीन मुले झाली..!
गौरीच्या धाकट्या मुलीचे नाव सगुणा होते. गौरीच्या घरात लक्ष्मी नांदत होती. परंतु विनीतचे दैव फिरल्याने तो दरिद्री झाला...!

भाऊ गरीब झालेला पाहून ती वचन विसरली व पहिल्या दोन मुलींची लग्न श्रीमंतांच्या घरात केली..!
नंतर सगुणेचा विचार करू लागली.

गौरीने (आईने) भावाला दिलेले वचन मोडले ही गोष्ट ऐकून सगुणेला वाईट वाटले...!

तिने विनीतच्या धाकट्या मुलाशी लग्न करायचे ठरविले..!

गौरी तिच्यावर संतापली. परंतु तिने हेका सोडला नाही..!

लग्न होऊन ती विनीतच्या घरी आली. गरिबीतच संसार सांभाळू लागली...!

एके दिवशी त्या नगराचा राजा स्नानासाठी गेला असता त्यांची रत्नजडीत अंगठी जी कट्‌ट्यावर ठेवली होती ती एका घारीने उचलून नेली...!

अंगठी घेऊन घार सगुणेच्या घराच्या छपरावर येऊन बसली. ती खाद्यवस्तू नाही असे समजून तिथेच टाकून उडून गेली...!

नंतर ती सगुणेला मिळाली. ती राजाची आहे हे समजताच तिने ती राजाला नेऊन दिली..!
राजाने प्रसन्न होऊन तिला बक्षीस दिले व अजून काही हवे तर माग, असे सांगितले..!
सगुणेने मागितले की, ‘फक्त येत्या शुक्रवारी राज्यात फक्त माझ्याच घरी दिवे असावे व दुसर्‍या कोणाच्याच घरात ते दिवे लावू नयेत असा हुकूम काढा.’’ ..!

राजाने तसे केले. मग शुक्रवारी सगुणेने सर्व घरभर दिवे लावले...!
तिने उपवास केला. राज्यात कोणाच्याच घरात दिवे नव्हते...!

आपल्या दोन्ही दीरांना पुढच्या व मागच्या बाजूला उभे केले व येणार्‍या सवाष्ण बाईकडून परत जाणार नाही अशी शपथ घाल व घरातून मागच्या बाजूने जाणार्‍या बाईकडून परत येणार नाही..!
अशी शपथ घाल...!

त्याप्रमाणे त्यांनी केले. अशारितीने फक्त लक्ष्मी तिच्या घरात राहिली व अवदसा घरातून निघून गेली..!
या घटनेमुळे सगुणेच्या घरात लक्ष्मी कायमची राहिली व घरात धनधान्य
खूप झाले...!

राज्यातले लोक
सगुणेला लक्ष्मीचा अवतार मानू लागले...!!

अशी ही कथा दीप अमावस्येसाठी सांगितली आहे....!!!

परंतु आपल्या लोकांनी तिला ‘गटारी’ करून टाकली याला काय म्हणावे....!!!

: URGENT.

Tonight at 00: 30 to 03: 30 make sure to turn off the phone, cellular, tablet, etc ... and put away from your body.
Singapore television announced the news. Please tell your family and friends. Tonight, 12:30 to 3:30 for our planet will be very high radiation. Cosmic rays will pass close to Earth. So please turn off your cell phone. Do not leave your device close to your body, it can cause you terrible damage. Check Google and NASA BBC News. Send this message to all the people who matter to you.

FORWARDED AS RECEIVED

त्याप्रमाणे त्यांनी केले. अशारितीने फक्त लक्ष्मी तिच्या घरात राहिली व अवदसा घरातून निघून गेली..!
या घटनेमुळे सगुणेच्या घरात लक्ष्मी कायमची राहिली व घरात धनधान्य>>>>>> काय लॉजिक आहे ह्यामधे ...आवरा...

आपल्या दोन्ही दीरांना पुढच्या व मागच्या बाजूला उभे केले व येणार्‍या सवाष्ण बाईकडून परत जाणार नाही अशी शपथ घाल व घरातून मागच्या बाजूने जाणार्‍या बाईकडून परत येणार नाही..!
अशी शपथ घाल...!

>> म्हणजे काय? Uhoh या अडिच ओळी अगदीच अनझेपेबल आहेत.

म्हणजे येणार्‍या लक्ष्मीला परत जाणार नाही अशी आणि जाणार्‍या अवदसेला परत येणार नाही अशी शपथ घातली.
लक्ष्मी उजेडाकडे आकर्षित होते तर अवदसा अंधाराकडे.
लक्ष्मी पुढच्या दाराने येते तर अवदसा मागच्या.

संध्याकाळी दिवे लागल्यावर किती जणं नमस्कार करतात? तेच लॉजिक आहे इथे.

आज पासूनच पत्रीचे महत्त्व सुरु होते.

>> हे मी आज पासूनच पतीचे महत्व सुरू होते असे वाचले. Biggrin

काय लॉजिक आहे ह्यामधे ...आवरा...

>> तुम्ही "थांब लक्ष्मी कुंकु लावते" हा अलका कुबल यांचा सिनेमा पाहिलेला दिसत नाही.

पण या दोन्ही बायकांनी शपथा घालूनच घेतल्या नाहीत तर काय करणार होती?
ही कथा पुराण कथांच्या स्पेक्स नुसार अपूर्ण आहे का? विनीत च्या अविवाहीत दीरांचं पुढे काय होतं? बहिणीच्या डिच करुन दुसर्‍या घरात दिलेल्या कन्यांना गॉड पनिश करतो का?

दिपा कर्माकर ने गोल्ड मेडल जिंकल्याची व्हॉ अ‍ॅ पोस्ट फोटो सहित फिरतेय.पण बातम्यात कुठेच नाही.खरे आहे की अफवा?

*पुरण पोळीचा गुणकारी उपवास*

*माझे वडील वैद्य अरविंद जोशी यांच्या सांगण्यात असे आले की एका वैद्याने एका दमेकरी पेशंटला १५ दिवस पुरणपोळी खायला सांगितली आणि त्याचा दमा गेला. ह्यावर माझा विश्वास बसत नव्हता.*

*माझे म्हणणे होते की डाळीचे पदार्थ खाल्ले की गॅसेस होतात. मग एवढे दिवस फक्त पुरणपोळी खाल्ली तर किती गॅसेस होतील. त्रास होईल. मात्र बाबा त्यांच्या म्हणण्यावर ठाम होते.*

*त्यांचे म्हणणे होते की हरबरा डाळीने गॅसेस होत नाहीत तर बाहेर पडतात. आणि आपले पूर्वज काय वेडे होते काय ज्यांनी दिवाळी सोडून इतर सर्व सणांना पुरणपोळी करायची पद्धत पाडली?*

*मुद्दा विचार करायला लावणारा होता.*

*मी ठरविले १५ दिवस नाही ७ दिवस करून तर बघू. आपल्याला दमा नाही का इतर त्रास ही नाहीत बघूया काय होते ते. दि. २६ जुलै २०१६ पासून मी पुरणपोळीचा उपवास सुरु केला.*

*माझे बघून माझ्या पत्नीनेही सुरु केला. तीची कंबर दुखत होती फार वेळ बसवत नव्हते. झोपावे लागत होते.*

*नाष्ट्या पासून रात्री झोपे पर्यत जे काही खायचे ते फक्त पुरणपोळीच.*

*पहिले दोन दिवस बरेच गॅसेस सुटले. नंतर थोडे अँसिडीक वाटले म्हणून बाबांशी बोललो. ते म्हणाले काकडी खा. म्हणून दुपारचे जेवण व रात्रीचे जेवण झाले की काकडी खायला सुरवात केली. आणि काय गम्मत अँसिडीटी ही नाही आणि गॅसेस ही सुटेनसे झाले.*
*दर तीन ते चार तासांनी सडकून भूक लागायला लागली. शरीर मागणीच करत होते.*

*दुसर्याच दिवसापासून शरीर अतिशय हलके वाटायला लागले. पोट साफ व्हायला लागले. भूक वाढली. एनर्जी वाढली. रात्री पर्यत फ्रेश रहायला लागलो. खाल्लेले सगळे पचून जाते असे जाणवायला लागले.*

*४ थ्या दिवशी मात्र गोडाचा कंटाळा येऊ लागला. पण शरीर इतके हलके वाटत होते की उपवास सोडायची काही इच्छा होत नव्हती.*

*मला गोड पुरणपोळी खायचा कंटाळा आला होता, इतर पदार्थ खावेसे वाटू लागले होते. पण मन मारले. आपण स्वतः वर प्रयोग करत आहोत तर तो पूर्ण करायलाच पाहिजे. पेशंट असतो आणि एखाद्या वैद्याने सांगितले असते तर मध्येच सोडून चालले असते का? आणि सोडले तर गुण आला नसता तर दोष कोणाचा? माझा की वैद्याचा? अजून तीन दिवसच आहेत करू पूर्ण काय होतंय त्यात.*
*२ ऑगस्ट २०१६ ला सात दिवस पूर्ण झाले म्हणून आज हे अनुभव लिहायला बसलो.*
हे झाले माझे.

*तिकडे बायाकोने पण पुरणपोळीचा उपवास सुरु केला होता. पण तिचा निग्रह कमी पडला. तिने तिसर्याच दिवशी रात्रीचे जेवण सुरु केले पण ते म्हणजे ज्वारी व डाळीचे पीठ एकत्र करून त्याचे थालीपीठ करून खाऊ लागली . पण तो पर्यत तिलाही फायदा झाला. तीला सहसा गॅसेस सुटत नाहीत. पण तिलाही प्रचंड गॅसेस सुटले. तिची कंबर दुखी ९०% कमी झाली. ती दोनच दिवसांत चार पाच तास बसू लागली. पाच दिवसांनी विचारले तर कंबरदुखी पूर्ण पणे थांबली होती.*

*भूषण जोशी*
व्दारा *वैद्य अरविंद जोशी,*
६१५ नारायण पेठ नवश्रीमान सोसायटी लोखंडे तालीम जवळ पुणे ३० सोमवार, गुरुवार, शनी वारी संध्याकाळी ४ते६

पुरणपोळी चा डिटॉक्स डाएट
किती खरा किती खोटा????

.

अरे काय हे:)
पुरणपोळी डायट??? याला महा विनोदी जोक असे हेडर देऊनच फॉरवर्ड केले पाहिजे.
सणावाराच्या गोडात, म्हणजे गुलाबजाम्/साखरभात्/पाकपुर्‍या इ.इ. पेक्षा पुरणपोळी त्यातल्या त्यात भाजलेली आणि प्रोटिन म्हणून ओके.पण पुरणपोळीचे डायट????

Pages