पाहिला बॉ एकदाचा! अंमळ उशिरच झाला म्हणायचा बघायला. खरं तर बघायचा प्लन पण नव्हता आजिबात, असच टिपिकल स्टोरी असेल जरा चांगली गाणी असलेली म्हणून फार लक्ष नाही दिलं. पुढे थेट्रात पुढे जाऊन पबलिक नाचतय वगैरेचे व्हॉट्स अॅप विडियो यायला लागले आणि मसालाच आयटम दिसतोय असं मनोमन अधोरेखित झालं आणि नाद सोडून दिला.
मग आत्ता काही दिवसांपुर्वी माझे बेकरी फ्रेंड फारएण्ड ह्यांनी टिपापा ह्या ठिकानी येऊन नव्यानं एकदा सैराटच्या कौतूकाचं खातं उघडलं तेव्हा माझे कान परत वर गेले. मग पुढे बाकी इतर फ्रेंडांनी पण तीच री ओढली आणि ते टाकत असलेल्या पोस्टींमुळे माझ्या डोक्यात वातावरण तयार होऊ लागलं. निव्वळ ह्या पोस्टींमुळे मी सैराटची गाणी एकायला आणि पिकचर बघायला घेतला!
२-३ दिवसांपुर्वी सुरवातीची फक्त २० मिनिटं हा सिनेमा बघितला आणि मला त्या सिनेमानी खिशात घातलं! कित्येक दिवसांनी किंवा वर्षांनी एखाद्या पिकचरची झिंगं चढली असं झालं!!!
कुठल्या शॉट बद्दल अन कुठल्या गाण्याबद्दल किंवा कुठल्या एक्स्प्रेशननांबद्दल बोलावं अन किती बोलावं हेच समजेनासं झालय. लोकं आपापल्या अँगलनी सिनेमे बघतात, त्यांना त्यातून बरच वेगळं काही काही सापडतं आणि वेगवेगळ्या कारणांमुळे एखादा सिनेमा त्यांना आवडतो.
एक सिनेमा म्हणून स्वतंत्रपणे तो पिकचर छान असला तरी माझ्याकरता तरी ह्या पिकचरनी काही केलं असेल तर कॉलेजच्या दिवसांपासूनचा पुढचा काही काळ मला अक्षरशः परत जगवून आणलय!
सुरवातीच्या मंजुळेंच्या कॉमेंट्री पासून जी काही एकेक प्रसंगांना सुरवात होते, माणूस त्यात हरवूनच जातो!
काय त्यांची ती कॉमेंट्री अन ते रखरखलेल्या उन्हातलं मैदान अन ते पॅविलियन, ते ढोल तडम ताशे वाले अन सरवात महत्वाचं म्हणजे मॅच सुरु असलेल्या दरम्यान त्या प्लेयरांचं एकेक बोलणं!
लंगड्याच्या "हे हलगथ कोन पाठवलं रे ." " मंग्या मंग्या आरं नीट खेळ मंग्या नीट खेळ!अरं बॉल बघाय आधी बॅट नगं न फिरवू" पासून पुढे परत मंगेश मोहिते पाटलांनी बॉल हुकवल्यवर त्याच्या संतापाचा अक्षरशः अंत होतो तेव्हा " मला खेळायचच नै जा..." म्हणून बॅट सोडून ऑल्मोस्ट तो चालायलाच लागतो हा प्रसंग त्यातली लंगड्याची तळमळ किती लोकांनी अनुभवलेली आहे? कधी आपण लंगड्याच्या बोटीत शिव्या घालत असतो तर कधी कधी मंग्याच्या सुद्धा बोटीत कारण "अर किती फाष्टाक्तोय बघ्तोन तू?" असाही प्रसंग येऊन गेला असेलच (तुम्ही अगदी स्टार बॅट्समन नसाल तर नक्कीच येउन गेला असेल).
मधल्यामध्ये बिली बाऊडींग अन शकुना आत्याचा सीन पण खल्लास आहे! किती वेळा पोरं आया, आज्या बोंबल्त आल्याकी बॉल बॅट हातात जे असेल ते टाकून पळायचे. फोर सिक्सच्या अॅक्शन पण कहर आहेत! एकदम किडमिडीत अंगकाठी अन त्यावर बनियन, डोक्याला आधी फडकं अन मग त्यावर कॅप! पुर्वी अंपायर लोकं खुप वेळा तसं करायचे! निरिक्षण सॉलिड आहे मंजुळेंचं किंवा ज्यानी कोणी डिटेलिंग केल्य त्याचं.
पर्श्यानी आधी फोर सिक्स मारल्यावर लंगड्याच्या एकेक शिवीसुचक हातवारे (काही न बोलता नेमकी काय शिवी दिली हे लगेच कळतं ) अन पुढे म्याच जिंकून दिल्यावर आडम तिडम मुद्दाम हारलेल्या टीम समोर केलेला नाच!
इतकं बारिक आणि चोख निरिक्षण म्हणजे काय चेष्टाय का राव? अन त्यापेक्षाही ते बरोबर शॉट मध्ये उतरवणं म्हणजे फार भारी! नागराज मंजुळेकी जय!
पुढे तात्यासाहेबांचं भाषण ज्यात खरं एक पुढे होऊ घातलेल्या काही गोष्टींना किती महत्व आहे हे अधोरेखित करणारं वाक्य आहे. "अहो तालुक्याचं राहुद्या आधी आपल्या बायका संभाळा म्हना ह्यांना..." असं ते म्हणतात.
थोडक्यात घरातल्या बाया/मुली ह्यांच्याशी स्वतःची अन घराण्याची इज्जत बांधलेली आहे ह्या टाईपची विचारसरणी असलेलं घर आहे. आणि हे बोलताना त्या सोनलताई का कोण असतात त्या शेजारीच बसलेल्या असतात.
(ह्याच संदर्भात अजून एक गंमत म्हणजे तात्यासाहेबांच्या बंगल्याचे नाव अर्चना असतं))
नंतर विहिरीचा सीन. तिथे आर्चीची हापिशियल एंट्री होते अन क्या बॉस एंट्री बोले तो एंट्री आहे पोरीची! अर काय एक्स्प्रेशन अन काय तो कान्फिडन्स अन काय तो हेल बोलण्याचा! झन्नाट! ती ज्या पद्ध्तीनी येऊन विहिरीवर एक पाय ठेवून वाकून खाली बघते त्यातच सगळं येतं! पाटलाची पोरगी असल्याचा शुद्ध माज!
अय रत्ताळ्या निग्ग्कीरं भैर... आत्तागंबया भैरा बिराएकाकाय.... अय अय खुळखुळ्या उभाssssर!!!!
खलाssssस... अरे लेडी गब्बर वाटते ती इथे!!! (थांबा अजून! पुढे मी अजून तिचे अन तिच्या अॅक्टिंगच्या तारिफांचा पूल बांधणारच आहे. ही नुसती सुरवात आहे! )
त्यानंतरची होते ती लंगड्याची होलपट तर निव्वळ कमाल आहे! त्याचे ते तसं चालणं असल्यामुळे ते आण्खिनच विनोदी झालय सगळं. ह्याउपर काय दिसतं ते म्हणजे मैत्री. येवढा पायानी अधू असून सुद्धा लगबगीनी (साबण अंगावर असताना) जाऊन आधी परश्याला सांगतो. (ते कसं सांगतो ते वाचण्यापेक्षा बघण्यातच मजा आहे). पण मी पवायला गेल्तो तिकडं आर्चिनं मला हाकल्ला हे सांगताना मला हाकल्ला ह्याचं तुसभर सुद्धा दु:ख किंवा लाज नाहीचे कुठे! नसतेच. सगळ्यात महत्वाचं काम त्यावेळी असतं ते मित्राला त्याचं सामान (आवडणारी मुलगी) कुठेतरी येऊन उभी आहे हा मेसेज जाणं! त्यात आपली इज्जत गेली तरी बेहत्तर पण मित्राचं झ्यंगाट हे जमवून दिलच पाहिजे, ते परम कर्तव्य असतय लगा!!
परश्याला स्वप्न पडतं तो प्रसंग आणि त्या भोवतीचे डायलॉग तर हसून हसून पुरेवाट आहेत. "कुठं दिवस भर कुत्री मारत हिंडत असतं कै म्हाईत" इति पशाचा बाप. ते नगं घरचे उठतीन आर्चे म्हणताना परश्याचा आवाज अशक्य दबलेला, चिरका अन लाडिक होतो! (स्वप्नात किस सुरु असतो ना?) स्वप्न पडतात त्यात सुद्धा घरच्यांची भिती असतेच हे टीनेजर असताना काही आजिबात नवीन नसावं!
आता परशाची एंट्री!! म्हणजे सैराट एंट्री ह्या अर्थानं. फायन्ली लंगड्याची तगमग एकदाची "तिथं आर्चि आली आर्चि....." म्हणत कानावर पडल्यावर मग खरी जादू सुरु होते. याड लागलं! भन्नाट म्युजिक, बॅकड्रॉप अन सिनेमॅटोग्राफी! खरं डोळे मिटले आणि फक्त म्युजिक एकलं तर असं वाटेल की एखादा हॉलिवूडमधल्या जबरी म्युजिकलच सुरु असावं. मागची सीनरी जब्बरदस्त जमलीये. डिस्नी म्युजिकल सारखं ग्रँड वाटावं असं म्युजिक पण त्यात आपली माती, गवत, पक्षी अन आपला गावरान परश्या पण अगदी लिलया फिट्टं बसतात! कशाला बॉलिवूडवाले उगच झकमारी करत स्विझरलंडला जाऊन त्या हिरोंना गरम कपड्यात अन हिरवणींना स्लीव्लेस ब्लाऊजांमध्ये बरफात नाचायला लावतात देव जाणे!
पुढे आवरुन सावरुन भांगपट्टी करुन आलेला परशा कपडे अन सँडलांसकट जी उडी मारतो आगा ना पिच्छा बघत व्हिरीत त्यावर मी तर थेट्रात पैशे फेकले असते! ह्याला मंतेत जिगर! आधी उडी मारली, बघून घेतलं आर्चिला आता पुढचं पुढं बघू!
आत्तगंबया हे कुठून पड्लं व्हिरीत यून!
अssय निघ भायेर..
सॉरी सॉरी,
हss सॉरी सॉरीच्या लाडक्या.. आधी निघ भायेर..
मला मैतीच नवतं, बघितलच न्हाईमी..
बरं डोळं झाकून पडला रं हिरीत... आता बघितलं ना? हो भाएर..
आता खरं सीन बाय सीन कौतूक करत बसलो तर तो पर्यंत मंजुळेंचा दुसरा पिच्चर यायचा एखादा! त्यापेक्षा जरा फॉरमॅट बदलून, ज्या गोष्टी मला जास्त आवडल्या त्या बद्दलच लिहितो.
सैराट झालं जी:
ह्या गाण्यानी नुसतं वेड लावलय. खरं खुप सारे फॅक्टर्स आहेत ते गाणे आवडण्यामागे. एक तर आर्ची, परशा आणि त्यांचं एकेक प्रसंगातून फुलणारं प्रेम ह्या गाण्यात एकदम tempo धरतं (मालवहातुक वाला टेंपो नाही, गाण्यातला टेंपो असतो तो!).
अप्रतिम सिनेमॅटोग्राफी आणि त्याला साजेसं तेवढच अत्यंत ग्रँड ग्रँड पण थोडा गावाकडला टच असलेलं म्युजिक! (ढोलांचा वापर आणि ग्रामिण बाज असलेली भाषा)
खरंही वाटत नाही की हे करमाळ्याचं वगैरे शुटिंग आहे! काय एकसे एक अॅंगल घेतले आहेत!
गाण्यातले काही मोमेंट्स पण मस्त टिपले आहेत.
अगं झन्नानलं काळंजामंदी
अन हत्तामंदी हात आलं जी....
सैराट झालं जीssss
सैराट झालं जीssss
ह्या शॉट मध्ये आधी परशा आर्चिला गोल फिरवतो आणि नंतर आर्चि खाली वाकून खळाळून हसताना दाखवलीये.
ही हसतानाची आर्चि माझ्या करता कायमची स्मरणात गेलीये.
नंतर गाण्यातच आर्चि परशाच्या बहिणीला स्कुटरवरुन घेऊन जाताना दाखवलीये आणि पुढे आर्चि मंदिरातून बाहेर गाभार्यात येते आणि तिथे तिच्या रंगीत चपलांमध्ये गुलाबाची फुलं ठेवलेली असतात. ती इकडे तिकडे बघते शोधत कोणी ठेवले असतील आणि तिला दोन खांबांमधून बसलेला परशा दिसतो, तो पाया पडल्या सारखं करुन मग हाथ जोडतो, मी ठेवले आहेत हे सांगत. मग आर्चि ती फुलं उचलून त्याचा वास घेते आणि मग छातीशी कवटाळते. पुढे आर्चि आणि सपनी, परशा, सल्या अन लंगड्या बसलेले असतात त्यांच्या शेजारून जातात तेव्हा लंगड्या सपनीवर फुल फेकल्याची अॅक्शन करतो! आणि त्या पुढे गेल्या की मग आल्या अन लंगड्या दोघंही बाबा प्रेमीपरशांच्या पाया पडतात की काय बॉ आय्ड्या काढली लगा बाबांनी!!! पोरगी फिदाssss...
(हा शॉट सुरु असताना मला वाटतं मागे आधी वायोलिन आणि नंतर बासरी आणि सॅक्सोफोन आहे. अप्रतिम जमून आलाय शॉट, म्युजिक, चित्रिकरण, सगळ्यांचे एक्स्प्रेशन्स सगळ्याच दृष्टिनी!! टोटल गुंडाळून खिशात जाणार हे असले शॉट दाखवले की आशिक दिलाचा प्रेक्षक!)
नंतर घोडेस्वारीच्या शॉट मध्ये लंगड्या, सल्या आणि आनी असतातच. बघताना गंमत वाटते पण आपल्याकडे तरुण मुलं मुलींना घोडेस्वारीच काय एकांतात कुलफ्या पण खाऊ देतील कोणी तर शपत. आपल्याला नेमून दिलेली कामं सोडून तरुण मुलं मुलींच्या एकांतात व्यत्यय आणण्यात पोलिस, गावातली इतर लोकं वगैरे अशी सगळी बिन प्रेम करताच कुटुंबवत्सल झालेली मंडळी अगदी तरबेज असतात. सतत बिचार्या प्रेमींना आपलं लक्ष ठेवावं लागतं, कोणी पाहतय का, किंवा मग असं मित्रांना तरी राखणाला ठेवावं लागतं.
(असं कसं? असं आडनिड्या वयातल्या मुलं मुलींना एकांतात कसं काय सोडायचं, नाही? उद्या काही वेडंवाकडं झालं तर? आपल्या इज्जतीचं काय होईल? अहो आम्ही पण बरीच वेडीवाकडी कामं करतोओ पण ते बंद दरवाज्या आड, तिथे कोणाला कळतय?)
कवळ्या पानात ह्या
सावल्या उन्हात ह्या
पवळ्या मनात ह्या भरलं… भरलं च्या वेळेस जेव्हा परशा हवेत किस सोडतो तेव्हा लंगड्याचा "आयो.." वासताना स्लो मोशन मध्ये स्पष्ट दिसतो!!
पुढच्या कडव्यात रंगा खेळतात तो प्रसंग आहे आणि त्याच्या बॅकग्राऊंड मध्ये काय आहे खरं? आपल्या इथे ग्रामिण परिसरात असतात तशी दगड मातीच्या भिंती असलेली घरं, आजूबाजूला उगवलेलं कोरडं गवत, त्या दगडमातीच्या घरांमधून असलेल्या धुळीच्या वाटा! ह्या असल्या बॅकग्राऊंड असताना सुद्धा आधी बिल्ड केलेल्या वातावरणामुळे आणि म्युजिक, सिनेमॅटोग्राफी मुळे काय जब्बरदस्त भाव खाल्लाय ह्या प्रसंगानी?!
गाणं संपत असतानाचे शॉट्स (त्या कळसाच्या छोट्या गच्चीवर वगैरे) मला वाटतं ड्रोन वापरुन शॉट्स घेतले आहेत. सिंपली (अॅज इन सिंपल) इन्क्रेडिबल!
आर्चि:
आर्चि मला वाटतं एका पिकचर मधलं एक पात्र नसून एक फिनोमेनॉन होऊन गेली आहे. ह्यात खरं तिच्या अॅक्टिंगला दाद द्यावी की मंजुळेंच्या परफेक्ट कास्टिंगला हे समजत नाही कारण ती अॅक्टिंग करते असं मला वाटतच नाही इतकी ती फिट बसली आहे त्या रोल करता. ह्याच अर्थ इथे मी झुकतं माप मंजुळेंच्या कास्टिंग ला देइन, पण ते देत असताना तिनी ज्या प्रकारे रोल पेलला आहे त्याला जवाब नाही. हे मान्य की रिंकु राजगुरु रियल लाईफ मध्ये बरीचशी तशीच चालते बोलते पण पिकचर मध्ये फक्त तिचं चालणं आणि बोलणं नाहीये ना ? खुप ठिकाणी तिला स्ट्राँग इमोशन्स दाखवावे लागले आहेत, एका अल्लड पाटल्याच्या पोरी पासून पुढे हलाखीत दिवस काढून नंतर एकदम मचुअर, आत्मविश्वासानी संसार करणारी तरीही आई वडीलांच्या आठवणीनी झुरणारी आर्चि हे ट्रान्सफॉर्मेशन तिला पेलावं लागलेलं आहे and oh my god has she done it well!!!
आता खरं खुप काही लिहिता येइल पण एक शेवटचा माझ्या कायमचा लक्षात राहिल असा प्रसंग आहे त्या बद्दल लिहून आवरतं घेतो. हा प्रसंग खरं मंजुळेंचं डायरेक्शन, परशा आणि आर्चिच्या अॅक्टिंगमुळे अत्यंत रियलिस्टिक होऊन आपल्या अंगावर येतो अगदी.
त्या फोनच्या पासवर्ड वरुन आधीच परशा जरा उखडलेला असतो, दुसर्या दिवशी कामावर जायच्या आधी पण त्यावरुन खटका उडतो आणि आर्चि निघत असे पर्यंत सुरुच असतं भांडण.
"तिथं कामावर कोणी फोन बघू नये म्हनून बदल्लाय" इथे खरं परशा थोडा शरमल्या सारखा होतो, कारण त्याला स्वतःची चूक लक्षात येते बहुतेक पण तो पर्यंत डॅमेज झालेलं असतं.आर्चिचा संयम संपलेला असतो.
"कुडं चालली?"
"चालली मसनात! कुटं जाती रोज मी?" "तुझ्या ह्या असल्या सबावाचा लै वैताग आला मला"
"काय यवडा वैटे का मी?"
"मंग मी वाईटे का?"
"मी आसकुडं म्हनलं?"
"म्हनायची काय गरजे?"
"कामावर जावच लागल का?"
"लोडय कामाचा, सर वोरड्त्याल"
काम संपवून आर्ची परशाच्या डोसा टपरीवर येते.
परश्या अजून घुसाट्यातच असतो.
"परश्या..... ओ साह्येब... पिकचरला जायचं का?"
"कामय मला.."
"मी इचारतीकी सुमनताईला"
"दुसरं कामेमला"
"चल ना..."
"तुला एकदा सांगितलेलं कळतय का?"
"हळू बोल की मग येवडं वरडतो कशाला?"'
"लै गाजलेला पिच्चरय, तुझ्या आवडत्या हिरोचा"
"...."
"मी एकटी जाईना?"
"जां..."
"खरच एकटी जाईन"
"निग्की मग कशाला थामली!"
"लै इगोए तुला, बस तसाच..."
असं म्हणून आर्चि एकटी पिकचर ला जाते....
त्या प्रेमानी म्हणलेल्या ओ सायेबाला पुढे जी अत्यंत तुसडी वागणूक मिळते ती बघून आणि एस्पशली विहिरीवरची ७-८ पोरांना दमात घेऊन हाकलणारी आर्चि आठवून ह्रदयाला खिंडारं पडतात!
पाटलाची पोरगी म्हणून येवढा माज केलेली, तेवढच ह्या परशावर प्रेम करणारी अन त्याला वाचवताना स्वतःच्या वडिलांकडून मार खाणारी, आबावर गोळी झाडणारी पण नंतर परिस्थितीशी दोन हात करत पण प्रेमानी राहू बघणार्या आर्चिची वाताहत बघवत नाही. पुढे प्रकरण आण्खिन थोडं विकोपाला जाऊन नंतर शेवटी परत ती दोघं आपल्याला एक मेकांशिवाय कोणी नाही हे समजून परत एकत्र येतात.
परशा तसा चांगला दाखवलाय आणि पिकचर मध्ये आर्चिच्या घरचे खुप जास्त कडक दाखवले आहेत पण एकंदरितच हे सगळं आपल्याकडच्या बर्याच मुलीं/स्त्रियांबद्दलचं खुप बोलकं असं उदाहरण आहे.
पळून जाऊन लग्न केलेलं नसलं आणि घरच्यांनी करुन दिलेलं असलं तरी एकदा लग्न करुन दिलं की आपली जबाबदारी संपली आणि माहेरपणाला आनंदानी ये असं म्हणाले तरी टेकनिकली घरी परत जायचे दरवाजे बंद असतात. सो उद्या काही अनबन झाली तरी एक तर तुम्ही ते निभावून न्यायचं किंवा मग आपला आपण मार्ग बघायचा येवढच उरतं.
असो.....
अकरित घडलया
सपान हे पडलया
गळ्यामंदी सजलंय डोरलं.. डोरलं
साता जन्माच नात रूजलया काळजात
तुला र देवागत पुजलं
रूजल बीज पिरतीच सजणी रुजलं
भिजलं मन पिरमान पुरत भिजलं
सरल मन मारून जगण सरलं
हरलं ह्या पीरमाला समद हरलं
कडाडलं पावसामंदी
अन आभाळाला याट आल जी
सैराट झालं जी…
सैराट झालं जी…
सैराट झालं जी…….
_/\_
२१०१
आकाश मस्तच आहे दिसायला, एकदम
आकाश मस्तच आहे दिसायला, एकदम मराठीतला "शाहिद कपुर" त्यात जर बॉडि वैगरे बिल्ड केली तर मराठीला तरुण तडफदार ,हॅन्डसम हिरो मिळेल. >>>> + ११११
त्याचे डोळेपण छान आहेत.
मराठी मातीतले, तुमच्या आमच्या
मराठी मातीतले, तुमच्या आमच्या सारखे वागणारे, बोलणारे, राहणारे आपल्याच गल्ली बोळातले वाटावे असे आर्ची पर्श्या नागराजने आपल्याला दाखवले आणि आपल्याला ते मनापासून भावले.
ऊद्या तेच रिंकू/आकाश पॉलिश्ड अॅक्सेंट, स्लिम ट्रिम किंवा बॉडी बिल्ड करून, बॉलिवुडी स्टाईल कपडे घालून आले तर मग पायलीला पन्नास भेटणार्या हिरो हिरॉईन पेक्षा ते वेगळे कसे वाटतील बुवा?
त्यांचं वेगळेपण आपल्याला आवडलं म्हणून आपणच त्यांना परत टाईपकास्ट होण्यास भाग पाडायचं काय अर्थ आहे. मिडियाने ऑलरेडी त्यांना ऑबजेक्ट्/प्रॉप म्हणून विकणं/वापरणं कधीच चालू केलं आहे. नागराज्/अनिरुद्ध्/सुजय डहाके वगैरे लोक आधीच सांगत होते की ओवर एक्स्पोजर नको पण मला वाटतं फेम कुणाला नको असतो.
पुन्हा पब्लिसिटी साठी कॉन्ट्रॅक्चुअल टर्म्स पण असतील म्हणा, पण एकंदर डोक्यावर घेणे, अवास्तव महत्व देणे असे पब्लिक चाळे नवीन नाहीतच. सिनेमाशी अनरिलेटेड काहीही माझ्यामते टोटली अनवॉरंटेड आहे.
हायझेन मस्त पोस्ट , आणि यशाची
हायझेन मस्त पोस्ट , आणि यशाची हवा खुप लवकर डोक्यात जाते, होप असं काही होणार नाही.
हा ब सहमत. वर आरचीचा मेक
हा ब सहमत. वर आरचीचा मेक ओव्हर फोटो आहे ते बघून सेम असेच वाटले.
Honestly I'm surprised seeing
Honestly I'm surprised seeing bunch of posts ( actually all) mentioning how actors should look like character/ maintain simple lifestyle even though they become successful/star !
Anyways ..
डिजे +१
डिजे +१
डिज्जे +१. मंजुळेंना जसं ओवर
डिज्जे +१.
मंजुळेंना जसं ओवर एक्स्पोजरची काळजी वाटत असेल त्या पोरांविषयी तशीच त्यांना होपफुली त्या मुलांना त्यांना जे हवय ते करायला स्वातंत्र्य आहे हे सुद्धा लक्षात असावं. पिकचरशी रिलेटेड गोष्टींमध्ये त्यांनी थोडा अधिकार दाखवला एक वेळ चालून जाईल पण पुढे शेवटी ती मुलं स्वतंत्र व्यक्ती आहेत आणि हा पिकचर्चा संबंध सोडला तर मंजुळे त्यांना काही म्हणू नाही शकत. त्यांनी (त्या मुलांनीच) मंजुळेंचा सल्ला घ्यायचा ठरवलं तर मग प्रश्नच मिटतो. पण तो निर्णय त्यांचा आहे हे कोणी विसरायला नको.
अॅक्टर्सचं काँट्रॅक्ट वगैरे
अॅक्टर्सचं काँट्रॅक्ट वगैरे असेल कॅरॅक्टरसारखं रहाणे तर प्रश्नच नाही पण नसेल तर राहु देत हवं तसं त्यांना ऑफस्क्रीन ..
त्यांच्या डोक्यात हवा जाणे , हेअर ़कलर वा स्ट्रेटनिंग करणे, मेकोव्हर वगैरे चिंता करणारे आपण कोण
केलीच तर त्यांचे पालक करतील चिंता !
क्म्मॉन , एवढ्या यशा नंतर स्टार झाल्यानंतर थोडा अॅटीट्युड यांनी दाखवायचा नाहीतर मग कोणी ?
ऑफस्क्रीन ते आर्ची आणि परश्या नाहीत , कायम तसेच रोल्स करतीलच असं नाही !
पुन्हा एकदा नागराज म्हणतो तेच खरं! पब्लिक सिनेमा फार सिरियसली घेतं .
असो, दॅट्स जस्ट ं माय थिंकिंग अँड आय गेस आयॅम द ओन्ली वन हिअर , मला स्लम्डॉगच्या ऑस्कर मंचावर कृतकृत्त्य झालेला चेहरा करणार्या अनिल कपुर पेक्षा ' असाल तुम्ही हॉलिवुड स्टार , आयॅम द बेस्ट अॅटीट्युड' मधे त्याच मंचावर टेचात येणारा शाहरुख बघून जास्तं आनंद होतो :).
Oh ok, thanks Buwa, Swati ,
Oh ok, thanks Buwa, Swati , I'm not the only one
पुन्हा सैराट वर.. लंगड्या ला
पुन्हा सैराट वर..
लंगड्या ला झिंगाट गाण्यानंतर दाखवलं नाहीये. पण डायरेक्ट परशाला भेटायला आर्ची ला घेऊन येतो तेव्हा च दाखवलाय. पण गाण्याच्या वेळी, कार च्या बाहेर पण एकटा सल्या च राखणदारी करत असतो. लंगड्या नाहीये. तिथून नंतर पूर्ण वेळ सल्या च आहे परशा सोबत.
ह्या भावना काही कायमच्या
ह्या भावना काही कायमच्या राहणार नाहीयेत, एखाद्या महिन्यामध्ये सैराटची हवा उतरुन जाईल नंतर ते कसे वागतील काय करतील ह्याच्याशी कोणालाही घेण देणं नसेल.
वरच्या पोश्टी आल्यात त्या कॅरेक्टर्सच्या प्रेमात पडल्याने. नाहीतर आताही घेणं देणं नाही.
I'm still surprised Shree .
I'm still surprised Shree :).
अरेरे डीजे यू गॉट मी
अरेरे डीजे यू गॉट मी राँग...
कॅरॅक्टर सारखंच रहा असं कोणीच म्हणत नाहीये (मी तर नाहीच नाही), मी ऑफ स्क्रीन कपिल माधुरी शोब्वगिरे आजिबातच फॉलो करत नाही त्यामुळे त्यांच्या राहणीमानावर काही बोलण्यात आजिबात ईंट्रेस्ट नाही तो आपला अधिकारही नाही हे कळतं म्हणूनच पब्लिकचं अपेक्षा लादणं खटकलं. हे रहाणीमान चेंज करणे वगैरे मार्कटिंग प्रेशर/पिअर प्रेशर/फॅन प्रेशर मुळे होते असे मला वाटते. रॉ टॅलेंटला पॉलिश करायला गेलात तर मग तसे पॉलिश्ड ऑबजेक्ट्स बाजारात भरपूर मिळतात असेही वाटते.
माझा रोख पब्लिकच्या रिस्पॉन्सवर होता/आहे अॅक्टर्सच्या आजिबातंच नाही.
ऑन अ सेपरेट नोट
शाहरूख, अनिल नं अॅटिट्यूड दाखवणं आणि रिंकू/आकाशने ह्यात फरक असेल ना (जर ते दाखवत असल्यास, मला कल्पना नाही)?
जाऊद्या सिरियस बोलणं जे आधीपासून टाळत आलो होतो ते आताही नकोच... बॅक टू सैराट
अार्चीने इशारा केल्यावार
अार्चीने इशारा केल्यावार परश्याच सल्याला सांगतो, सोबत चल आणि राखण कर.
पहिली लाथ तोच खातो.
एकुण हे प्रकरण फार कुणाला कळणार नाही अश्याप्रकारे हँडल केले तात्यांनी. नाहीतर सगळा गाव जमला होता पार्टीला. सगळ्या तालुक्यात बोभाटा झाला असता.
HB, It was not just for you
HB,
It was not just for you , in general reading all messages I was surprised
Yes, back to Sairat !
(No subject)
लग्नात माळ प्रथम मुलगी घालते
लग्नात माळ प्रथम मुलगी घालते मुलाच्या गळ्यात. पण आर्ची परशाच्या लग्नात प्रथम परशा आर्चीच्या गळ्यात माळ घाल्ताना दाखवलाय. काही कारण असेल का त्या मागे?
मी हायझेनबर्ग च्या मताशी
मी हायझेनबर्ग च्या मताशी पुर्ण सहमत आहे..
मला वाटत त्या कलाकार कडुन आपण जरा जास्तच आपेक्षा करायला लागलोय...
आपल्या आपेक्षान्च ओझ त्या कलाकारनी का वाहाव हे नाही कळल....
आपेक्षान्च ओझ == हेच नेसाव, तेच घालाव, असच बोलव आणि तसच वागाव... इ...इ
आपेक्षाच जर करायची असेल तर ती त्यन्च्या कडुन होनार्या एक्टिन्ग बद्द्ल करावी अस मला तरी वाटत...
ममो! सगळे स्टिरिओटाइप
ममो! सगळे स्टिरिओटाइप मोडायचेत नागराजला!
मी असच सहज म्हणुन पाहिल...
मी असच सहज म्हणुन पाहिल... तुनळी वर यातील चारही गाण्यच्या (जे ओफीशियल आहेत ते)
त्याच्या एकुण हिट्स ४१ मिलीयन च्या वर आहेत..
म स्त च...!!!!
त्या दोघाना मायबोल शर्ट
त्या दोघाना मायबोल शर्ट देयुया
हाब म्हणजे हायझेनबर्ग होय. मी
हाब म्हणजे हायझेनबर्ग होय. मी आधी लगा सारखं हाब पण काहीतरी ग्रामीण संबोधन असेल असं समजून वाचत होते. वर कुणीतरी हा ब असं लिहिल्यावर कळलं !!!
अगो, लोल मी ही असंच समजत होते
अगो, लोल मी ही असंच समजत होते
माझ थोडं वेगळं मत आहे। रिंकू
माझ थोडं वेगळं मत आहे। रिंकू आणि आकाश ने कायम आर्ची परशा बनून रहावे ही अपेक्शा नाहिये. त्या दोघांच वय आणि ह्या। इंडस्ट्रीचा त्याना नसलेला अनुभव ह्या मुळे नागराज ने त्यांना कव्हर / प्रोटेक्ट / गाईड करणं (निदान सुरुवातीच्या काळात) हे पटतं. अरथात हे माझं वैयक्तिक मत
जाउदेत. आपण परत सैराटवर येऊयात. परशा जेव्हा बाळ्या आणि सल्याला घेउन आर्चीला शेतात भेटायला येतो, तेव्हा आर्ची म्हणते की कामाचे गडी नाहीत हितं सारे वस्तीवर गेलेत जेवायला. त्या वेळची सल्या आणि बाळ्याची नेत्रपल्लवी लक्शात आली का कोणाला.
अशी आनि होण्याची वेळ कॉलेजात
अशी आनि होण्याची वेळ कॉलेजात एक्दा आलेली. त्यात मित्र एकच होता. माझेही एक्ष्प्रेशन तिच्यासारखेच झालेलेत!
रविवारी पाहिला थेटरात. या आधी
रविवारी पाहिला थेटरात. या आधी censor copy खुप वेळा पाहिला पण झिंगाट गाण्यापर्यंतच, पूर्ण २ वेळाच पाहिला. खूप गोष्टी मोठ्या पडद्यावर नीट कळल्या, सुंदरही दिसल्या. खरंतर आर्ची खूप सुंदर दिसते. ज्यांनी अजूनही थेटरात नाही पाहिला त्यांनी खरंच एकदा पहावा.
ईथे सांगितल्याप्रमाणे चहाच्या सीनलाच मुलीला घेऊन बाहेर पडलो. लेकीने छान enjoy केला.
आता मला जाणवलेल्या गोष्टी
पहिल्या भागात आर्चीची नखं नीट manicure केलेली आहेत, अगदी नेलपेंट लावलेली. पण दुसऱ्या भागात, हैदराबादमध्ये, नखं अगदी साधी आहे. फक्त लग्न आणि डोहाळे फोटो शूट मध्ये नखं छान आहेत. मी अनेक चित्रपटात पाहिलं आहे, कष्टकरी बायकांची manicured नखं.
"लई इगो हाय रं तुला" सीन मध्ये आर्चीचे डोळे लाल झाले आहेत. खूप वाईट वाटलं आहे हे डोळ्यातूनच दिसतं. हे छोट्या स्क्रिनवर नाही दिसत.
परश्या आर्चीशी फार तावातावाने भांडतो ( जास्तीत जास्त hurt करुन), पण आर्ची समोर असे पर्यंतच. ज्या क्षणी ती नजरेआड होते, हा बिथरतो. ( हे मला खुप रिलेट झालं. मीही नवऱ्याशी असंच भांडते, तो खूप गुणाचा आहे.) त्याच क्षणी त्याला जाणवतं की जिच्यावर आपण इतकं प्रेम करतो तिलाच आपण दुखावलं, हिच्याशिवाय आपलं कुणी नाही आहे. आणि तिथेच त्याची आर्ची शोधमोहीम सुरू होते, तिथेच रस्त्यावर.
पूर्ण सिनेमात प्रदीप ची
पूर्ण सिनेमात प्रदीप ची फॅमिली आणि फॅमिली बिझनेस काय आहे हे आले नाही का?
झिंगाट च्या वेळी परश्या सल्याला बाजूला काढतो, तेव्हा कदाचित प्रदीप नाचण्यात मग्न असेल, आणि नंतर पण सर्व किस्सा त्याच्यापर्यंत उशिरा पोहचला असेल.यावरून असं पण वाटतं की प्रदीप चं घर सलया परश्या पासून बरंच लांब असावं.
आर्ची परश्या पळून जाण्याच्या सीन मध्ये सर्वात जास्त मार त्यालाच बसलाय.त्याला दगडावर उताणं आपटलंय ते पाहिला का?प्रत्यक्षात असं आपटल्यास स्पायनल कॉर्ड ला लागून कायमचं पैरालाइज होऊ शकतं.
अजून एक स्टिरीओटाईप
अजून एक स्टिरीओटाईप ब्रेक....लग्नात ते एकमेकांना नुस्तेच हार घालतात...मंगळसूत्र घातलेलं नाही दाखवलं...रजिस्टर्ड लग्न केलं तरी बरेच लोक हार व मंगळ्सूत्र घालतात....नंतरही आर्ची मंगळसूत्र घालतं नाही.
अकलूजला जाऊन ‘आर्ची’ला
अकलूजला जाऊन ‘आर्ची’ला पाहण्यासाठी पैसे नाहीत म्हणून घरफोडी
‘सैराट’च्या अफाट लोकप्रियतेमुळे दररोज वेगवेगळे अनुभव घेणारी ‘टीम नागराज’ मेताकुटीला आली असतानाच ‘आर्ची’ची डोकेदुखी वाढवणाऱ्या एका नव्या घटनेची त्यात भर पडली आहे. ‘आर्ची’ला पाहण्यासाठी अकलूजला जायचे, मात्र पैसे नाहीत म्हणून एका अल्पवयीन आरोपीने चक्क घरफोडी केल्याची घटना उजेडात आली आहे. घरफोडीत मिळालेले ५० हजार रुपये आणि चोरीच्या दोन दुचाकी घेऊन गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेल्या एका सहकाऱ्यासह तो अकलूजला गेला. आर्चीच्या शाळेजवळ तिला पाहिल्याचा इतका आनंद झाला की तो साजरा करण्यासाठी १५ हजार रुपये उडवल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे.
Pages