पाहिला बॉ एकदाचा! अंमळ उशिरच झाला म्हणायचा बघायला. खरं तर बघायचा प्लन पण नव्हता आजिबात, असच टिपिकल स्टोरी असेल जरा चांगली गाणी असलेली म्हणून फार लक्ष नाही दिलं. पुढे थेट्रात पुढे जाऊन पबलिक नाचतय वगैरेचे व्हॉट्स अॅप विडियो यायला लागले आणि मसालाच आयटम दिसतोय असं मनोमन अधोरेखित झालं आणि नाद सोडून दिला.
मग आत्ता काही दिवसांपुर्वी माझे बेकरी फ्रेंड फारएण्ड ह्यांनी टिपापा ह्या ठिकानी येऊन नव्यानं एकदा सैराटच्या कौतूकाचं खातं उघडलं तेव्हा माझे कान परत वर गेले. मग पुढे बाकी इतर फ्रेंडांनी पण तीच री ओढली आणि ते टाकत असलेल्या पोस्टींमुळे माझ्या डोक्यात वातावरण तयार होऊ लागलं. निव्वळ ह्या पोस्टींमुळे मी सैराटची गाणी एकायला आणि पिकचर बघायला घेतला!
२-३ दिवसांपुर्वी सुरवातीची फक्त २० मिनिटं हा सिनेमा बघितला आणि मला त्या सिनेमानी खिशात घातलं! कित्येक दिवसांनी किंवा वर्षांनी एखाद्या पिकचरची झिंगं चढली असं झालं!!!
कुठल्या शॉट बद्दल अन कुठल्या गाण्याबद्दल किंवा कुठल्या एक्स्प्रेशननांबद्दल बोलावं अन किती बोलावं हेच समजेनासं झालय. लोकं आपापल्या अँगलनी सिनेमे बघतात, त्यांना त्यातून बरच वेगळं काही काही सापडतं आणि वेगवेगळ्या कारणांमुळे एखादा सिनेमा त्यांना आवडतो.
एक सिनेमा म्हणून स्वतंत्रपणे तो पिकचर छान असला तरी माझ्याकरता तरी ह्या पिकचरनी काही केलं असेल तर कॉलेजच्या दिवसांपासूनचा पुढचा काही काळ मला अक्षरशः परत जगवून आणलय!
सुरवातीच्या मंजुळेंच्या कॉमेंट्री पासून जी काही एकेक प्रसंगांना सुरवात होते, माणूस त्यात हरवूनच जातो!
काय त्यांची ती कॉमेंट्री अन ते रखरखलेल्या उन्हातलं मैदान अन ते पॅविलियन, ते ढोल तडम ताशे वाले अन सरवात महत्वाचं म्हणजे मॅच सुरु असलेल्या दरम्यान त्या प्लेयरांचं एकेक बोलणं!
लंगड्याच्या "हे हलगथ कोन पाठवलं रे ." " मंग्या मंग्या आरं नीट खेळ मंग्या नीट खेळ!अरं बॉल बघाय आधी बॅट नगं न फिरवू" पासून पुढे परत मंगेश मोहिते पाटलांनी बॉल हुकवल्यवर त्याच्या संतापाचा अक्षरशः अंत होतो तेव्हा " मला खेळायचच नै जा..." म्हणून बॅट सोडून ऑल्मोस्ट तो चालायलाच लागतो हा प्रसंग त्यातली लंगड्याची तळमळ किती लोकांनी अनुभवलेली आहे? कधी आपण लंगड्याच्या बोटीत शिव्या घालत असतो तर कधी कधी मंग्याच्या सुद्धा बोटीत कारण "अर किती फाष्टाक्तोय बघ्तोन तू?" असाही प्रसंग येऊन गेला असेलच (तुम्ही अगदी स्टार बॅट्समन नसाल तर नक्कीच येउन गेला असेल).
मधल्यामध्ये बिली बाऊडींग अन शकुना आत्याचा सीन पण खल्लास आहे! किती वेळा पोरं आया, आज्या बोंबल्त आल्याकी बॉल बॅट हातात जे असेल ते टाकून पळायचे. फोर सिक्सच्या अॅक्शन पण कहर आहेत! एकदम किडमिडीत अंगकाठी अन त्यावर बनियन, डोक्याला आधी फडकं अन मग त्यावर कॅप! पुर्वी अंपायर लोकं खुप वेळा तसं करायचे! निरिक्षण सॉलिड आहे मंजुळेंचं किंवा ज्यानी कोणी डिटेलिंग केल्य त्याचं.
पर्श्यानी आधी फोर सिक्स मारल्यावर लंगड्याच्या एकेक शिवीसुचक हातवारे (काही न बोलता नेमकी काय शिवी दिली हे लगेच कळतं ) अन पुढे म्याच जिंकून दिल्यावर आडम तिडम मुद्दाम हारलेल्या टीम समोर केलेला नाच!
इतकं बारिक आणि चोख निरिक्षण म्हणजे काय चेष्टाय का राव? अन त्यापेक्षाही ते बरोबर शॉट मध्ये उतरवणं म्हणजे फार भारी! नागराज मंजुळेकी जय!
पुढे तात्यासाहेबांचं भाषण ज्यात खरं एक पुढे होऊ घातलेल्या काही गोष्टींना किती महत्व आहे हे अधोरेखित करणारं वाक्य आहे. "अहो तालुक्याचं राहुद्या आधी आपल्या बायका संभाळा म्हना ह्यांना..." असं ते म्हणतात.
थोडक्यात घरातल्या बाया/मुली ह्यांच्याशी स्वतःची अन घराण्याची इज्जत बांधलेली आहे ह्या टाईपची विचारसरणी असलेलं घर आहे. आणि हे बोलताना त्या सोनलताई का कोण असतात त्या शेजारीच बसलेल्या असतात.
(ह्याच संदर्भात अजून एक गंमत म्हणजे तात्यासाहेबांच्या बंगल्याचे नाव अर्चना असतं))
नंतर विहिरीचा सीन. तिथे आर्चीची हापिशियल एंट्री होते अन क्या बॉस एंट्री बोले तो एंट्री आहे पोरीची! अर काय एक्स्प्रेशन अन काय तो कान्फिडन्स अन काय तो हेल बोलण्याचा! झन्नाट! ती ज्या पद्ध्तीनी येऊन विहिरीवर एक पाय ठेवून वाकून खाली बघते त्यातच सगळं येतं! पाटलाची पोरगी असल्याचा शुद्ध माज!
अय रत्ताळ्या निग्ग्कीरं भैर... आत्तागंबया भैरा बिराएकाकाय.... अय अय खुळखुळ्या उभाssssर!!!!
खलाssssस... अरे लेडी गब्बर वाटते ती इथे!!! (थांबा अजून! पुढे मी अजून तिचे अन तिच्या अॅक्टिंगच्या तारिफांचा पूल बांधणारच आहे. ही नुसती सुरवात आहे! )
त्यानंतरची होते ती लंगड्याची होलपट तर निव्वळ कमाल आहे! त्याचे ते तसं चालणं असल्यामुळे ते आण्खिनच विनोदी झालय सगळं. ह्याउपर काय दिसतं ते म्हणजे मैत्री. येवढा पायानी अधू असून सुद्धा लगबगीनी (साबण अंगावर असताना) जाऊन आधी परश्याला सांगतो. (ते कसं सांगतो ते वाचण्यापेक्षा बघण्यातच मजा आहे). पण मी पवायला गेल्तो तिकडं आर्चिनं मला हाकल्ला हे सांगताना मला हाकल्ला ह्याचं तुसभर सुद्धा दु:ख किंवा लाज नाहीचे कुठे! नसतेच. सगळ्यात महत्वाचं काम त्यावेळी असतं ते मित्राला त्याचं सामान (आवडणारी मुलगी) कुठेतरी येऊन उभी आहे हा मेसेज जाणं! त्यात आपली इज्जत गेली तरी बेहत्तर पण मित्राचं झ्यंगाट हे जमवून दिलच पाहिजे, ते परम कर्तव्य असतय लगा!!
परश्याला स्वप्न पडतं तो प्रसंग आणि त्या भोवतीचे डायलॉग तर हसून हसून पुरेवाट आहेत. "कुठं दिवस भर कुत्री मारत हिंडत असतं कै म्हाईत" इति पशाचा बाप. ते नगं घरचे उठतीन आर्चे म्हणताना परश्याचा आवाज अशक्य दबलेला, चिरका अन लाडिक होतो! (स्वप्नात किस सुरु असतो ना?) स्वप्न पडतात त्यात सुद्धा घरच्यांची भिती असतेच हे टीनेजर असताना काही आजिबात नवीन नसावं!
आता परशाची एंट्री!! म्हणजे सैराट एंट्री ह्या अर्थानं. फायन्ली लंगड्याची तगमग एकदाची "तिथं आर्चि आली आर्चि....." म्हणत कानावर पडल्यावर मग खरी जादू सुरु होते. याड लागलं! भन्नाट म्युजिक, बॅकड्रॉप अन सिनेमॅटोग्राफी! खरं डोळे मिटले आणि फक्त म्युजिक एकलं तर असं वाटेल की एखादा हॉलिवूडमधल्या जबरी म्युजिकलच सुरु असावं. मागची सीनरी जब्बरदस्त जमलीये. डिस्नी म्युजिकल सारखं ग्रँड वाटावं असं म्युजिक पण त्यात आपली माती, गवत, पक्षी अन आपला गावरान परश्या पण अगदी लिलया फिट्टं बसतात! कशाला बॉलिवूडवाले उगच झकमारी करत स्विझरलंडला जाऊन त्या हिरोंना गरम कपड्यात अन हिरवणींना स्लीव्लेस ब्लाऊजांमध्ये बरफात नाचायला लावतात देव जाणे!
पुढे आवरुन सावरुन भांगपट्टी करुन आलेला परशा कपडे अन सँडलांसकट जी उडी मारतो आगा ना पिच्छा बघत व्हिरीत त्यावर मी तर थेट्रात पैशे फेकले असते! ह्याला मंतेत जिगर! आधी उडी मारली, बघून घेतलं आर्चिला आता पुढचं पुढं बघू!
आत्तगंबया हे कुठून पड्लं व्हिरीत यून!
अssय निघ भायेर..
सॉरी सॉरी,
हss सॉरी सॉरीच्या लाडक्या.. आधी निघ भायेर..
मला मैतीच नवतं, बघितलच न्हाईमी..
बरं डोळं झाकून पडला रं हिरीत... आता बघितलं ना? हो भाएर..
आता खरं सीन बाय सीन कौतूक करत बसलो तर तो पर्यंत मंजुळेंचा दुसरा पिच्चर यायचा एखादा! त्यापेक्षा जरा फॉरमॅट बदलून, ज्या गोष्टी मला जास्त आवडल्या त्या बद्दलच लिहितो.
सैराट झालं जी:
ह्या गाण्यानी नुसतं वेड लावलय. खरं खुप सारे फॅक्टर्स आहेत ते गाणे आवडण्यामागे. एक तर आर्ची, परशा आणि त्यांचं एकेक प्रसंगातून फुलणारं प्रेम ह्या गाण्यात एकदम tempo धरतं (मालवहातुक वाला टेंपो नाही, गाण्यातला टेंपो असतो तो!).
अप्रतिम सिनेमॅटोग्राफी आणि त्याला साजेसं तेवढच अत्यंत ग्रँड ग्रँड पण थोडा गावाकडला टच असलेलं म्युजिक! (ढोलांचा वापर आणि ग्रामिण बाज असलेली भाषा)
खरंही वाटत नाही की हे करमाळ्याचं वगैरे शुटिंग आहे! काय एकसे एक अॅंगल घेतले आहेत!
गाण्यातले काही मोमेंट्स पण मस्त टिपले आहेत.
अगं झन्नानलं काळंजामंदी
अन हत्तामंदी हात आलं जी....
सैराट झालं जीssss
सैराट झालं जीssss
ह्या शॉट मध्ये आधी परशा आर्चिला गोल फिरवतो आणि नंतर आर्चि खाली वाकून खळाळून हसताना दाखवलीये.
ही हसतानाची आर्चि माझ्या करता कायमची स्मरणात गेलीये.
नंतर गाण्यातच आर्चि परशाच्या बहिणीला स्कुटरवरुन घेऊन जाताना दाखवलीये आणि पुढे आर्चि मंदिरातून बाहेर गाभार्यात येते आणि तिथे तिच्या रंगीत चपलांमध्ये गुलाबाची फुलं ठेवलेली असतात. ती इकडे तिकडे बघते शोधत कोणी ठेवले असतील आणि तिला दोन खांबांमधून बसलेला परशा दिसतो, तो पाया पडल्या सारखं करुन मग हाथ जोडतो, मी ठेवले आहेत हे सांगत. मग आर्चि ती फुलं उचलून त्याचा वास घेते आणि मग छातीशी कवटाळते. पुढे आर्चि आणि सपनी, परशा, सल्या अन लंगड्या बसलेले असतात त्यांच्या शेजारून जातात तेव्हा लंगड्या सपनीवर फुल फेकल्याची अॅक्शन करतो! आणि त्या पुढे गेल्या की मग आल्या अन लंगड्या दोघंही बाबा प्रेमीपरशांच्या पाया पडतात की काय बॉ आय्ड्या काढली लगा बाबांनी!!! पोरगी फिदाssss...
(हा शॉट सुरु असताना मला वाटतं मागे आधी वायोलिन आणि नंतर बासरी आणि सॅक्सोफोन आहे. अप्रतिम जमून आलाय शॉट, म्युजिक, चित्रिकरण, सगळ्यांचे एक्स्प्रेशन्स सगळ्याच दृष्टिनी!! टोटल गुंडाळून खिशात जाणार हे असले शॉट दाखवले की आशिक दिलाचा प्रेक्षक!)
नंतर घोडेस्वारीच्या शॉट मध्ये लंगड्या, सल्या आणि आनी असतातच. बघताना गंमत वाटते पण आपल्याकडे तरुण मुलं मुलींना घोडेस्वारीच काय एकांतात कुलफ्या पण खाऊ देतील कोणी तर शपत. आपल्याला नेमून दिलेली कामं सोडून तरुण मुलं मुलींच्या एकांतात व्यत्यय आणण्यात पोलिस, गावातली इतर लोकं वगैरे अशी सगळी बिन प्रेम करताच कुटुंबवत्सल झालेली मंडळी अगदी तरबेज असतात. सतत बिचार्या प्रेमींना आपलं लक्ष ठेवावं लागतं, कोणी पाहतय का, किंवा मग असं मित्रांना तरी राखणाला ठेवावं लागतं.
(असं कसं? असं आडनिड्या वयातल्या मुलं मुलींना एकांतात कसं काय सोडायचं, नाही? उद्या काही वेडंवाकडं झालं तर? आपल्या इज्जतीचं काय होईल? अहो आम्ही पण बरीच वेडीवाकडी कामं करतोओ पण ते बंद दरवाज्या आड, तिथे कोणाला कळतय?)
कवळ्या पानात ह्या
सावल्या उन्हात ह्या
पवळ्या मनात ह्या भरलं… भरलं च्या वेळेस जेव्हा परशा हवेत किस सोडतो तेव्हा लंगड्याचा "आयो.." वासताना स्लो मोशन मध्ये स्पष्ट दिसतो!!
पुढच्या कडव्यात रंगा खेळतात तो प्रसंग आहे आणि त्याच्या बॅकग्राऊंड मध्ये काय आहे खरं? आपल्या इथे ग्रामिण परिसरात असतात तशी दगड मातीच्या भिंती असलेली घरं, आजूबाजूला उगवलेलं कोरडं गवत, त्या दगडमातीच्या घरांमधून असलेल्या धुळीच्या वाटा! ह्या असल्या बॅकग्राऊंड असताना सुद्धा आधी बिल्ड केलेल्या वातावरणामुळे आणि म्युजिक, सिनेमॅटोग्राफी मुळे काय जब्बरदस्त भाव खाल्लाय ह्या प्रसंगानी?!
गाणं संपत असतानाचे शॉट्स (त्या कळसाच्या छोट्या गच्चीवर वगैरे) मला वाटतं ड्रोन वापरुन शॉट्स घेतले आहेत. सिंपली (अॅज इन सिंपल) इन्क्रेडिबल!
आर्चि:
आर्चि मला वाटतं एका पिकचर मधलं एक पात्र नसून एक फिनोमेनॉन होऊन गेली आहे. ह्यात खरं तिच्या अॅक्टिंगला दाद द्यावी की मंजुळेंच्या परफेक्ट कास्टिंगला हे समजत नाही कारण ती अॅक्टिंग करते असं मला वाटतच नाही इतकी ती फिट बसली आहे त्या रोल करता. ह्याच अर्थ इथे मी झुकतं माप मंजुळेंच्या कास्टिंग ला देइन, पण ते देत असताना तिनी ज्या प्रकारे रोल पेलला आहे त्याला जवाब नाही. हे मान्य की रिंकु राजगुरु रियल लाईफ मध्ये बरीचशी तशीच चालते बोलते पण पिकचर मध्ये फक्त तिचं चालणं आणि बोलणं नाहीये ना ? खुप ठिकाणी तिला स्ट्राँग इमोशन्स दाखवावे लागले आहेत, एका अल्लड पाटल्याच्या पोरी पासून पुढे हलाखीत दिवस काढून नंतर एकदम मचुअर, आत्मविश्वासानी संसार करणारी तरीही आई वडीलांच्या आठवणीनी झुरणारी आर्चि हे ट्रान्सफॉर्मेशन तिला पेलावं लागलेलं आहे and oh my god has she done it well!!!
आता खरं खुप काही लिहिता येइल पण एक शेवटचा माझ्या कायमचा लक्षात राहिल असा प्रसंग आहे त्या बद्दल लिहून आवरतं घेतो. हा प्रसंग खरं मंजुळेंचं डायरेक्शन, परशा आणि आर्चिच्या अॅक्टिंगमुळे अत्यंत रियलिस्टिक होऊन आपल्या अंगावर येतो अगदी.
त्या फोनच्या पासवर्ड वरुन आधीच परशा जरा उखडलेला असतो, दुसर्या दिवशी कामावर जायच्या आधी पण त्यावरुन खटका उडतो आणि आर्चि निघत असे पर्यंत सुरुच असतं भांडण.
"तिथं कामावर कोणी फोन बघू नये म्हनून बदल्लाय" इथे खरं परशा थोडा शरमल्या सारखा होतो, कारण त्याला स्वतःची चूक लक्षात येते बहुतेक पण तो पर्यंत डॅमेज झालेलं असतं.आर्चिचा संयम संपलेला असतो.
"कुडं चालली?"
"चालली मसनात! कुटं जाती रोज मी?" "तुझ्या ह्या असल्या सबावाचा लै वैताग आला मला"
"काय यवडा वैटे का मी?"
"मंग मी वाईटे का?"
"मी आसकुडं म्हनलं?"
"म्हनायची काय गरजे?"
"कामावर जावच लागल का?"
"लोडय कामाचा, सर वोरड्त्याल"
काम संपवून आर्ची परशाच्या डोसा टपरीवर येते.
परश्या अजून घुसाट्यातच असतो.
"परश्या..... ओ साह्येब... पिकचरला जायचं का?"
"कामय मला.."
"मी इचारतीकी सुमनताईला"
"दुसरं कामेमला"
"चल ना..."
"तुला एकदा सांगितलेलं कळतय का?"
"हळू बोल की मग येवडं वरडतो कशाला?"'
"लै गाजलेला पिच्चरय, तुझ्या आवडत्या हिरोचा"
"...."
"मी एकटी जाईना?"
"जां..."
"खरच एकटी जाईन"
"निग्की मग कशाला थामली!"
"लै इगोए तुला, बस तसाच..."
असं म्हणून आर्चि एकटी पिकचर ला जाते....
त्या प्रेमानी म्हणलेल्या ओ सायेबाला पुढे जी अत्यंत तुसडी वागणूक मिळते ती बघून आणि एस्पशली विहिरीवरची ७-८ पोरांना दमात घेऊन हाकलणारी आर्चि आठवून ह्रदयाला खिंडारं पडतात!
पाटलाची पोरगी म्हणून येवढा माज केलेली, तेवढच ह्या परशावर प्रेम करणारी अन त्याला वाचवताना स्वतःच्या वडिलांकडून मार खाणारी, आबावर गोळी झाडणारी पण नंतर परिस्थितीशी दोन हात करत पण प्रेमानी राहू बघणार्या आर्चिची वाताहत बघवत नाही. पुढे प्रकरण आण्खिन थोडं विकोपाला जाऊन नंतर शेवटी परत ती दोघं आपल्याला एक मेकांशिवाय कोणी नाही हे समजून परत एकत्र येतात.
परशा तसा चांगला दाखवलाय आणि पिकचर मध्ये आर्चिच्या घरचे खुप जास्त कडक दाखवले आहेत पण एकंदरितच हे सगळं आपल्याकडच्या बर्याच मुलीं/स्त्रियांबद्दलचं खुप बोलकं असं उदाहरण आहे.
पळून जाऊन लग्न केलेलं नसलं आणि घरच्यांनी करुन दिलेलं असलं तरी एकदा लग्न करुन दिलं की आपली जबाबदारी संपली आणि माहेरपणाला आनंदानी ये असं म्हणाले तरी टेकनिकली घरी परत जायचे दरवाजे बंद असतात. सो उद्या काही अनबन झाली तरी एक तर तुम्ही ते निभावून न्यायचं किंवा मग आपला आपण मार्ग बघायचा येवढच उरतं.
असो.....
अकरित घडलया
सपान हे पडलया
गळ्यामंदी सजलंय डोरलं.. डोरलं
साता जन्माच नात रूजलया काळजात
तुला र देवागत पुजलं
रूजल बीज पिरतीच सजणी रुजलं
भिजलं मन पिरमान पुरत भिजलं
सरल मन मारून जगण सरलं
हरलं ह्या पीरमाला समद हरलं
कडाडलं पावसामंदी
अन आभाळाला याट आल जी
सैराट झालं जी…
सैराट झालं जी…
सैराट झालं जी…….
_/\_
हायला ऑकवर्डनेस, ओवरशॅडो
हायला ऑकवर्डनेस, ओवरशॅडो वगैरे शब्दं सुद्धा रिपिट झाले.
ग्रेट फॅन्स थिंक ब्ला ब्ला!!
इंटर्व्ह्युज घेणारे ( मराठी
इंटर्व्ह्युज घेणारे ( मराठी चॅनलवाले) पण बरेचह्से नमुनेच होते .
सगळ्यावर उत्तर ' खूप भारी वाट्तय' देतात रिंकु आकाश :), प्रश्न तसेच होते, कसं वाटतय..
एक तर अकलुजचा इंटर्व्ह्युअर
" ज्या माउलीमुळे महाराष्ट्राला रिंकु सारखी स्टार मिळाली , तिच्याशी आपण बोलणार आहोत
हिंदीमधे माय्रं रविशकुमार, अनुपमा चोप्रा यांचा सिनेमावरचा अभ्यास, प्रश्न मात्रं इंटेलिजन्ट वाटले .
रिंकु अजुनही सिनेमातलेच कपडे
रिंकु अजुनही सिनेमातलेच कपडे घालते किंवा भयंकर प्रौढ काहीतरी , ती इतकी लहान आहे, लहान मुलींसारखी / टिनेज मुलींच्या फॅशन्स करायला हरकत नाही, एवढी मस्तं उंच आहे, लांब दाट केस ..केवढा स्कोप आहे तिला एक्स्परिमेन्ट करायला.
आकाश मात्रं अत. हळुहळु थोडा स्मार्ट रहायला लागलाय , माधुरी जज होती त्या डान्स शो मधे चांगला आला होता.
रिंकु काहीतरी विचित्रं कपड्यात आली होती , शरारा कि गरारा टाइप घालून >> १००%
इंटर्व्ह्युज घेणारे नमुने >>
इंटर्व्ह्युज घेणारे नमुने >> +१ हे आपल्याकडे त्रिकालाबाधित सत्य आहे.
काही सिलेक्ट लोकांनी घेतलेले सिलेक्ट इंटरव्हू सोडले तर वेडगळ प्रश्न विचारतात.
रविशकुमार, सैराट एकदम
रविशकुमार, सैराट एकदम ग्राऊंड ब्रेकिंग सोशल ईंजिनियरिंग एक्स्पिरिमेंट असल्यासारखं बोलत होता.
आणि
अनुपमा चोप्रा - एखादा फेडेक्स सीईओ कुठ्ल्याही ईफ्रास्ट्रक्टरशिवाय डबा सिस्टिम कशी काय फंक्शन करते बघून 'अचंबित' झाल्यासारखे प्रश्न विचारीत होती.
मला तर काय दोघांचंही खास अपील झालं नाही.
शेवटी नागराज म्हणतो तेचं खरं .. लोकं (ईंटर्व्यू घेणारे दिग्गंज सुद्धा) लाईफ नाही पण सिनेमा भलताच सिरियसली घेतात.
नमुन्यांबद्द्ल +१! आजिबात
नमुन्यांबद्द्ल +१! आजिबात समजून वगैरे घेत नाहीत किंवा जरा सेन्स करतील असे प्रश्न विचारत नाहीत.
रविशकुमारचं भाष्य आवडलं मला. मस्त बोलला. ते सिनेमा सिरियसली घेतात हा मला वाटतं सर्कास्टिक रिमार्क आहे सिनेमातल्या बारिक बारिक गोष्टी घेऊन त्याचा विपर्यास करणार्यां लोकांसाठी. किंवा सिमेमाच्या अतिप्रेमात पडून विरुद्ध दिशेनी पण परत विपर्यास करणार्यांकरता. रविशकुमार एकदम मस्त आणि स्गाळे योग्य मुद्दे मांडत एकदम इंटेलेजंटली बोलला.
वर कोणि तरी.. एक कामाचा गडी
वर कोणि तरी.. एक कामाचा गडी होता ही स्टोरी सन्गितली...
स्टोरी चन्गली असेल..पण "लफड" हा शब्द खटकला..
कामाचा गडी होता आणि त्याने प्रेम केल तर ते "लफड"...
आणि इतरानी केल तर ते "प्रेम"...
काय हे
..!!!
Great bhet by nikhil wagle
Great bhet by nikhil wagle was the best interview imo. Impressed with both. I had never watched both nikhil n nagraj before.
अरे ते लफडं, अफेअर, झ्यांगाट,
अरे ते लफडं, अफेअर, झ्यांगाट, ग्याटम्याट हे टिपिकली वापरले जाणारे शब्द आहे पोरा पोरींचा टाका भिडला की.
कामाचे गडी न्हाईत ईथं समदे
कामाचे गडी न्हाईत ईथं समदे वस्तीवर गेलेत जेवायला.
तेव्हा आपण प्रपोजचा कार्यक्रम ऊरकून घेवू म्हण्जे लफ्डं करायचं का त्याबद्दल बोलू
नताशा +१ ..कारण तो सगळं
नताशा +१ ..कारण तो सगळं ग्लॅमर पसरायच्या आधीचा होता.
हायझेनबर्ग | 30 June, 2016 -
हायझेनबर्ग | 30 June, 2016 - 23:02 नवीन
कामाचे गडी न्हाईत ईथं समदे वस्तीवर गेलेत जेवायला.
तेव्हा आपण प्रपोजचा कार्यक्रम ऊरकून घेवू म्हण्जे त्याबद्दल बोलू >>
रिंकु ने एका ईन्टर्व्यु मधे
रिंकु ने एका ईन्टर्व्यु मधे बोलतांना सांगितलेल की लोक मागे लागतात. एकज्ण हात पकडुन सारख आवडतेस आवडतेस करत होता तर शेवटी तिने अंकल ठिक आहे आता हात सोडा अस काहीस सांगितल्याचे आठवते. लोक वेडेपणा करत असतात त्यामुळे बॉडी गार्ड्स ठेवलेत काही दिवस तर चुकीच किंवा उगीचच वाटत नाहीये.
रिंकु ने एका ईन्टर्व्यु मधे
रिंकु ने एका ईन्टर्व्यु मधे बोलतांना सांगितलेल की लोक मागे लागतात. एकज्ण हात पकडुन सारख आवडतेस आवडतेस करत होता तर शेवटी तिने अंकल ठिक आहे आता हात सोडा अस काहीस सांगितल्याचे आठवते. लोक वेडेपणा करत असतात त्यामुळे बॉडी गार्ड्स ठेवलेत काही दिवस तर चुकीच किंवा उगीचच वाटत नाहीये.
तिनी अभिनय छानच केलाय खरं पण
तिनी अभिनय छानच केलाय खरं पण दिसण्यामध्ये किंवा एक आर्चि म्हणून जे तिनी कॅरॅक्टर उभं केलय त्यात कॅमेरावर्क अन मंजुळेंचे डायरेक्शन ह्याला खुप महत्व आहे. दिसायला ती ट्रडिशनली ज्याला सुंदर म्हणतात तशी आजिबातच नाहीये पण ह्या सगळ्या फॅक्टर्स मुळे जसं की तिचं बिनधास्त कॅमेर्यापुढे वावरणे, अॅटिट्युड, तिच्या तोंडी दिलेले संवाद, तिला स्क्रीनवर दाखवत असताना घेतलेले अँगल हे सगळं जबाबदार आहे.
(हे ह्याचा करता लिहिलं की लहान तर लहान मोठे बापये सुद्धा असं फुल्ल टू वेडे वगैरे होतात स्क्रिनवरच्या हिरवणींना पाहून त्यावरुन म्हणत होतो.)
कपिल शर्माच्या शो मध्ये
कपिल शर्माच्या शो मध्ये प्रदिप तर प्रपोज करताना आय मिस यू म्हणतो आणि त्या पोरीपेक्षा स्वतःच लाजतोय.
रविशकुमार, सैराट एकदम ग्राऊंड
रविशकुमार, सैराट एकदम ग्राऊंड ब्रेकिंग सोशल ईंजिनियरिंग एक्स्पिरिमेंट असल्यासारखं बोलत होता.
आणि
अनुपमा चोप्रा - एखादा फेडेक्स सीईओ कुठ्ल्याही ईफ्रास्ट्रक्टरशिवाय डबा सिस्टिम कशी काय फंक्शन करते बघून 'अचंबित' झाल्यासारखे प्रश्न विचारीत होती.
<<
हाब,
अहो मोस्ट्ली त्यांना कमर्शिअयल dumb बॉलिवुडी सिनेमांबद्दल बोलावं लागत असेल , अचानक डोक्याला खाद्य मिळ्याल्यानी तुटून पडल्यानी थोडं overwhelming झालं असेल त्यांच्यातल्या समीक्षकांना :).
रविशकुमारनी तर फँड्रीही पाहून घेतला त्यामुळे त्याच्याकडे खूप प्रश्नं होते !
२१०० व्या शतकाकडे वाटचाल.
२१०० व्या शतकाकडे वाटचाल.
+१ डिज्जे. मला वाट्तं
+१ डिज्जे. मला वाट्तं चोप्रांनी कोणत्यातरी हिंदी सिनेमाचं नाव पण घेतलं. टोटली डंब होता असं काहीस म्हणाल्या.
House full 3
House full 3
अहो मोस्ट्ली त्यांना
अहो मोस्ट्ली त्यांना कमर्शिअयल dumb बॉलिवुडी सिनेमांबद्दल बोलावं लागत असेल , अचानक डोक्याला खाद्य मिळ्याल्यानी तुटून पडल्यानी थोडं overwhelming झालं असेल त्यांच्यातल्या समीक्षकांना स्मित.
रविशकुमारनी तर फँड्रीही पाहून घेतला त्यामुळे त्याच्याकडे खूप प्रश्नं होते ! >> नाही, मला वाटतं. कॉजेशन ऊलटं आहे.
चित्रपटाने व्यवसाय केला म्हणून दखल घेणं भाग पडलं आणि त्यात त्यांना क्वालिटी वगैरे दिसली, खाद्य मिळालं. क्वालिटी आणि खाद्यं फँड्री मध्येही होतं पण तेव्हा चोप्रा आणि रविश कुमारांना ती दिसली नाही कारण पैशांचे ढोल तेव्हा सगळीकडे दुमदुमले नव्हते आणि ते त्यांच्या कानांपर्यंत पोचले नव्ह्ते.
चोप्रांच्या चेहर्यावरचा सरप्राईझ्ड लूक त्या शेवटपर्यंत लपवू शकल्या नाहीत.
डिजे ची फॅशन सेन्स विषयीची
डिजे ची फॅशन सेन्स विषयीची पोस्ट पटली, पण मुळातच ही मन्डळी फार साधी आणि नागराज म्हणतो ती पुर्व दिशा टाइप वाटली, (त्यातसुधा नागराज आणि मुख्य ४ कलाकारामधे प्रोफेशनल/फॉर्मल रिलेशन नाहिये हेही कळतय) त्यामुळे त्यानी एवढया अभुतपुर्व यशानतर ही काहीही बदल केले नसावेत जे खरतर करायला हरकत नाही...
चोप्रांच्या चेहर्यावरचा सरप्राईझ्ड लूक त्या शेवटपर्यंत लपवू शकल्या नाहीत.>> अगदी अगदी!
क्वालिटी आणि खाद्यं फँड्री
क्वालिटी आणि खाद्यं फँड्री मध्येही होतं पण तेव्हा चोप्रा आणि रविश कुमारांना ती दिसली नाही कारण पैशांचे ढोल तेव्हा सगळीकडे दुमदुमले नव्हते आणि ते त्यांच्या कानांपर्यंत पोचले नव्ह्ते.
<<
यात पॉइंट आहेच, कमर्शियली सक्सेसफुल .
असो, मला फँंड्री आवडला नव्हता तेंव्हा माझं दुमत आहे, खाद्यं नक्कीच होतं अर्थात पण इथे सैराट धाग्यावर नाही बोलत :).
आय मीन मला फँड्री आवडला नसला तरी माझं दुमत क्वालिटी , खाद्य असण्याबद्दल नाही पण एवढी सगळ्या मिडियाने , अमराठी लोकांनी वगैरे दखल घेण्याजिगा सिनेमा फॅड्रीही होता याबाबत माझं नक्कीच दुमत, तो ठताविक क्लासला आवडेल असा सिनेमा आहे.
सैराट इज समथिंग एल्स.. शोले सारखे व्हायरल जाण्याइतके हिट डॉयलॉग्ज असून, कमर्शियल सिनेमा सारखी गाणी हे असूनही सैराट रिअॅलिस्टिक आहे, थॉट प्रवोकिंग आहे, सिनेमाला क्वलिटी आहे आणि क्वालिटी असूनही डॉक्युमेंटरी सारखा नाही , एंटरटेनिंग आहे, स्पीड आहे, सगळीच भट्टी जमून आली आहे.
असे सिनेमे इन जनरलच कमी पाहिलेत म्हणून सैराट डिझर्व्ज व्हॉट फँड्री डीडन्ट गेट !
डीजे फँण्ड्रीच नाही पण असे
डीजे फँण्ड्रीच नाही पण असे किती तरी लो बजेट सिनेमे येतात, ज्यांत क्वालिटी आणि कंटेंट असतो पण बॉक्स ऑफिस ग्राफ ईंपॅक्टफूल नसल्या कारणाने ते चोप्रा बाईंपर्यंत पोचत नाहीत. त्यांना स्वतःचा प्रोग्राम रेटायला कमर्शिअली सक्सेसफुल सिनेमा किंवा मोठा अॅक्टर्/डिरेक्टर लागतो कायम. असो!
पहिल्या 'गप बस कोण न्हाई ऊठंत' च्या सीन पासून थेट 'मी वतलाय, नेवून द्यायचा' सीन पर्यंत आर्चीची मान ऊडवीत ऑर्डरी देण्याची स्टाईल नोटीस केली का? आणि ज्यावेळी ती अर्चना पाटील नसून फक्त आर्ची असते तेव्हा ती ऑर्डरीही सोडीत नाही आणि मानही ऊडवत नाही.
दीपांजली | 30 June, 2016 -
दीपांजली | 30 June, 2016 - 22:14
बुवा,
गावठी / गावंढळ ही लेबलं लावली कि काही लोक ऑफेंड होतात, ती त्यांच्या मतीतली भाषा आहे जी अशीच आहे , म्हणूनच त्यांना सैराट मधे रोल मिळाले स्मित.
>>
इथे मुद्दा नाही कळला.. म्हणजे ज्या लोकाना व्हायच आहे त्यानी ऑफेंड व्हाव कि नाही..?
जर होउ नये अस असेल तर..ह्म्म..त्या मताशी पुर्ण असहमत ...माझ्या माहिती प्रमाणे
गावठी हे "row, rustic"
गावंढळ हे "illiterate or behavioral related" वापरतात.. दोन्ही शब्दा मध्ये एक नकारत्म्क टोन आहे...
जर रेफरन्स हा बोली भाषे विषयी असेल तर त्याला "ग्रमीण" भाषा अस म्हणतात..
वा म्हन्टल जाव किमान अस तरी वाटत...असो..
हायझेनबर्ग | 1 July, 2016 - 00:59
पहिल्या 'गप बस कोण न्हाई ऊठंत' च्या सीन पासून थेट 'मी वतलाय, नेवून द्यायचा' सीन पर्यंत आर्चीची मान ऊडवीत ऑर्डरी देण्याची स्टाईल नोटीस केली का? आणि ज्यावेळी ती अर्चना पाटील नसून फक्त आर्ची असते तेव्हा ती ऑर्डरीही सोडीत नाही आणि मानही ऊडवत नाही.
>>>
मस्त निरीक्षण...
तु लिहल्यावर परत एकदा आठवुन पाहील सगळ..अगदी बरोबर निरीक्षण केल आहेस..
That's exactly what I meant
That's exactly what I meant Morpankhnis , it sounds negative.
हायझन, बॉक्स ऑफिस कलेक्शन
हायझन, बॉक्स ऑफिस कलेक्शन जोरदार झाल्यावर मग इंट्रव्यु बाबत क्रेक्ट आहेस तू पण त्यांचा धंदाच आहे ना तो? फक्त क्रिटिकली अॅक्लेम्ड असलेले सिनेम्यांबाबत ते बोलायला लागले तर त्यांचा पोग्राम कोण बघणार?
मी फक्त हेच लिहायला आले की -
मी फक्त हेच लिहायला आले की - परशा किती क्यूट आहे ना, किती गोड हसतो तो. मराठी चित्रपटाना गुणी चोकलेट हीरो मिळाला शेवटी, किती दिवस बोलका बाहुला स्वप्नील ला बघायचे कॉलेज कुमार म्हणून!
किती क्यूट असावे माणसाने,
किती क्यूट असावे माणसाने, हद्द! क्यूट परशा स्पेशल -
"भीती वाटते?"
"तूच्च चढ"
"अजुन वर?"
"चढ की"
"नग हे, शणडा तुट्ल"
"मग मला कशाल्या बसवल्या असल्या झाडावर?"
"ही ही ही" (क्यूट परशा लाफ)
"शेंडा तूटल"
"अय्यो ........ आर्ची, तू कवा आली?"
क्यूट स्माइल ओवरलोड
"मला तुझी लय आठवण येत व्हती"
"मला पण तुझी लय लय लय आठवण येत व्हती"
"बाप उठ्ल"
"आर्चे घरचे उठतील ना आर्चे"
"गपे तू कशाला बी घाबर्तो, नाय कोण उठत"
"हळू बोल आर्चे, घरची उठतील"
"झोपलेत सगळे, गप. झोपलेत सगळे नाय कोण उठत"
"मला एक पप्पी दे ना"
"काय"
"पप्पी ... किस्स, दे ना"
"ओ बबब्बबबब आर्चे घरचे उठतील की"
"चुपे"
"आर्चे घरचे उठतील"
"चूप"
""आर्चे घरचे उठतील" "आर्चे घरचे उठतील" "आर्चे घरचे " "आर्चे घरचे" "आर्चे...."
"एक पानी बॉटल देना"
एक काम कर, पैशे धर
दुकानातं सामान घेऊन य.. तांदूळ, डाळ
अजुन काय आनायाच?
अजुन?
कांदा, लसुन, तिखट मीठ, आणखी तुझया मानाने स्वायपकाला
आनशील ना? सूपर क्यूट स्माइल, कातील नजर हृदयाचा घाव चुकला....
पुर्ण मूवीत. आणचील?, मारचील,
पुर्ण मूवीत.
आणचील?, मारचील, करचील असं बोलत व्हता.
तू काय सामान आणचील ना?
---
आकाशचे डोळे क्युट आहेत.
नागराज त्या मुलांना मस्त कंट्रोल करतोय. एका मुलाखतीत म्हणाला, आकाशला सूट घालून यायचं होतं मुलाखतीला. तर त्याने दम भरला. आकाश जरासा नाराज झाला पाहून मगच नागराजने परवानगी दिली.
नागराजचे म्हणणे होते की, कशाला आपलं राहणीमान बदलायचे?
मूवी हिट हो गया तो मै चार के बदले दस रोटीया नही खाता( हे अगदी नागराजने मराठी हिंदीत सांगितले)
तरूण मुलांना आवडणारच सजायला धजायला कि हो...
Pages