पाहिला बॉ एकदाचा! अंमळ उशिरच झाला म्हणायचा बघायला. खरं तर बघायचा प्लन पण नव्हता आजिबात, असच टिपिकल स्टोरी असेल जरा चांगली गाणी असलेली म्हणून फार लक्ष नाही दिलं. पुढे थेट्रात पुढे जाऊन पबलिक नाचतय वगैरेचे व्हॉट्स अॅप विडियो यायला लागले आणि मसालाच आयटम दिसतोय असं मनोमन अधोरेखित झालं आणि नाद सोडून दिला.
मग आत्ता काही दिवसांपुर्वी माझे बेकरी फ्रेंड फारएण्ड ह्यांनी टिपापा ह्या ठिकानी येऊन नव्यानं एकदा सैराटच्या कौतूकाचं खातं उघडलं तेव्हा माझे कान परत वर गेले. मग पुढे बाकी इतर फ्रेंडांनी पण तीच री ओढली आणि ते टाकत असलेल्या पोस्टींमुळे माझ्या डोक्यात वातावरण तयार होऊ लागलं. निव्वळ ह्या पोस्टींमुळे मी सैराटची गाणी एकायला आणि पिकचर बघायला घेतला!
२-३ दिवसांपुर्वी सुरवातीची फक्त २० मिनिटं हा सिनेमा बघितला आणि मला त्या सिनेमानी खिशात घातलं! कित्येक दिवसांनी किंवा वर्षांनी एखाद्या पिकचरची झिंगं चढली असं झालं!!!
कुठल्या शॉट बद्दल अन कुठल्या गाण्याबद्दल किंवा कुठल्या एक्स्प्रेशननांबद्दल बोलावं अन किती बोलावं हेच समजेनासं झालय. लोकं आपापल्या अँगलनी सिनेमे बघतात, त्यांना त्यातून बरच वेगळं काही काही सापडतं आणि वेगवेगळ्या कारणांमुळे एखादा सिनेमा त्यांना आवडतो.
एक सिनेमा म्हणून स्वतंत्रपणे तो पिकचर छान असला तरी माझ्याकरता तरी ह्या पिकचरनी काही केलं असेल तर कॉलेजच्या दिवसांपासूनचा पुढचा काही काळ मला अक्षरशः परत जगवून आणलय!
सुरवातीच्या मंजुळेंच्या कॉमेंट्री पासून जी काही एकेक प्रसंगांना सुरवात होते, माणूस त्यात हरवूनच जातो!
काय त्यांची ती कॉमेंट्री अन ते रखरखलेल्या उन्हातलं मैदान अन ते पॅविलियन, ते ढोल तडम ताशे वाले अन सरवात महत्वाचं म्हणजे मॅच सुरु असलेल्या दरम्यान त्या प्लेयरांचं एकेक बोलणं!
लंगड्याच्या "हे हलगथ कोन पाठवलं रे ." " मंग्या मंग्या आरं नीट खेळ मंग्या नीट खेळ!अरं बॉल बघाय आधी बॅट नगं न फिरवू" पासून पुढे परत मंगेश मोहिते पाटलांनी बॉल हुकवल्यवर त्याच्या संतापाचा अक्षरशः अंत होतो तेव्हा " मला खेळायचच नै जा..." म्हणून बॅट सोडून ऑल्मोस्ट तो चालायलाच लागतो हा प्रसंग त्यातली लंगड्याची तळमळ किती लोकांनी अनुभवलेली आहे?
कधी आपण लंगड्याच्या बोटीत शिव्या घालत असतो तर कधी कधी मंग्याच्या सुद्धा बोटीत कारण "अर किती फाष्टाक्तोय बघ्तोन तू?" असाही प्रसंग येऊन गेला असेलच (तुम्ही अगदी स्टार बॅट्समन नसाल तर नक्कीच येउन गेला असेल).
मधल्यामध्ये बिली बाऊडींग अन शकुना आत्याचा सीन पण खल्लास आहे! किती वेळा पोरं आया, आज्या बोंबल्त आल्याकी बॉल बॅट हातात जे असेल ते टाकून पळायचे. फोर सिक्सच्या अॅक्शन पण कहर आहेत! एकदम किडमिडीत अंगकाठी अन त्यावर बनियन, डोक्याला आधी फडकं अन मग त्यावर कॅप! पुर्वी अंपायर लोकं खुप वेळा तसं करायचे! निरिक्षण सॉलिड आहे मंजुळेंचं किंवा ज्यानी कोणी डिटेलिंग केल्य त्याचं.
पर्श्यानी आधी फोर सिक्स मारल्यावर लंगड्याच्या एकेक शिवीसुचक हातवारे (काही न बोलता नेमकी काय शिवी दिली हे लगेच कळतं
) अन पुढे म्याच जिंकून दिल्यावर आडम तिडम मुद्दाम हारलेल्या टीम समोर केलेला नाच!
इतकं बारिक आणि चोख निरिक्षण म्हणजे काय चेष्टाय का राव? अन त्यापेक्षाही ते बरोबर शॉट मध्ये उतरवणं म्हणजे फार भारी! नागराज मंजुळेकी जय!
पुढे तात्यासाहेबांचं भाषण ज्यात खरं एक पुढे होऊ घातलेल्या काही गोष्टींना किती महत्व आहे हे अधोरेखित करणारं वाक्य आहे. "अहो तालुक्याचं राहुद्या आधी आपल्या बायका संभाळा म्हना ह्यांना..." असं ते म्हणतात.
थोडक्यात घरातल्या बाया/मुली ह्यांच्याशी स्वतःची अन घराण्याची इज्जत बांधलेली आहे ह्या टाईपची विचारसरणी असलेलं घर आहे. आणि हे बोलताना त्या सोनलताई का कोण असतात त्या शेजारीच बसलेल्या असतात. 
(ह्याच संदर्भात अजून एक गंमत म्हणजे तात्यासाहेबांच्या बंगल्याचे नाव अर्चना असतं))
नंतर विहिरीचा सीन. तिथे आर्चीची हापिशियल एंट्री होते अन क्या बॉस एंट्री बोले तो एंट्री आहे पोरीची! अर काय एक्स्प्रेशन अन काय तो कान्फिडन्स अन काय तो हेल बोलण्याचा! झन्नाट! ती ज्या पद्ध्तीनी येऊन विहिरीवर एक पाय ठेवून वाकून खाली बघते त्यातच सगळं येतं! पाटलाची पोरगी असल्याचा शुद्ध माज!
अय रत्ताळ्या निग्ग्कीरं भैर... आत्तागंबया भैरा बिराएकाकाय.... अय अय खुळखुळ्या उभाssssर!!!!
खलाssssस... अरे लेडी गब्बर वाटते ती इथे!!! (थांबा अजून! पुढे मी अजून तिचे अन तिच्या अॅक्टिंगच्या तारिफांचा पूल बांधणारच आहे. ही नुसती सुरवात आहे!
)
त्यानंतरची होते ती लंगड्याची होलपट तर निव्वळ कमाल आहे! त्याचे ते तसं चालणं असल्यामुळे ते आण्खिनच विनोदी झालय सगळं. ह्याउपर काय दिसतं ते म्हणजे मैत्री. येवढा पायानी अधू असून सुद्धा लगबगीनी (साबण अंगावर असताना) जाऊन आधी परश्याला सांगतो. (ते कसं सांगतो ते वाचण्यापेक्षा बघण्यातच मजा आहे). पण मी पवायला गेल्तो तिकडं आर्चिनं मला हाकल्ला हे सांगताना मला हाकल्ला ह्याचं तुसभर सुद्धा दु:ख किंवा लाज नाहीचे कुठे! नसतेच. सगळ्यात महत्वाचं काम त्यावेळी असतं ते मित्राला त्याचं सामान (आवडणारी मुलगी) कुठेतरी येऊन उभी आहे हा मेसेज जाणं! त्यात आपली इज्जत गेली तरी बेहत्तर पण मित्राचं झ्यंगाट हे जमवून दिलच पाहिजे, ते परम कर्तव्य असतय लगा!!
परश्याला स्वप्न पडतं तो प्रसंग आणि त्या भोवतीचे डायलॉग तर हसून हसून पुरेवाट आहेत. "कुठं दिवस भर कुत्री मारत हिंडत असतं कै म्हाईत" इति पशाचा बाप. ते नगं घरचे उठतीन आर्चे म्हणताना परश्याचा आवाज अशक्य दबलेला, चिरका अन लाडिक होतो! (स्वप्नात किस सुरु असतो ना?)
स्वप्न पडतात त्यात सुद्धा घरच्यांची भिती असतेच हे टीनेजर असताना काही आजिबात नवीन नसावं!
आता परशाची एंट्री!! म्हणजे सैराट एंट्री ह्या अर्थानं. फायन्ली लंगड्याची तगमग एकदाची "तिथं आर्चि आली आर्चि....." म्हणत कानावर पडल्यावर मग खरी जादू सुरु होते. याड लागलं! भन्नाट म्युजिक, बॅकड्रॉप अन सिनेमॅटोग्राफी! खरं डोळे मिटले आणि फक्त म्युजिक एकलं तर असं वाटेल की एखादा हॉलिवूडमधल्या जबरी म्युजिकलच सुरु असावं. मागची सीनरी जब्बरदस्त जमलीये. डिस्नी म्युजिकल सारखं ग्रँड वाटावं असं म्युजिक पण त्यात आपली माती, गवत, पक्षी अन आपला गावरान परश्या पण अगदी लिलया फिट्टं बसतात! कशाला बॉलिवूडवाले उगच झकमारी करत स्विझरलंडला जाऊन त्या हिरोंना गरम कपड्यात अन हिरवणींना स्लीव्लेस ब्लाऊजांमध्ये बरफात नाचायला लावतात देव जाणे!
पुढे आवरुन सावरुन भांगपट्टी करुन आलेला परशा कपडे अन सँडलांसकट जी उडी मारतो आगा ना पिच्छा बघत व्हिरीत त्यावर मी तर थेट्रात पैशे फेकले असते! ह्याला मंतेत जिगर! आधी उडी मारली, बघून घेतलं आर्चिला आता पुढचं पुढं बघू!
आत्तगंबया हे कुठून पड्लं व्हिरीत यून!
अssय निघ भायेर..
सॉरी सॉरी,
हss सॉरी सॉरीच्या लाडक्या.. आधी निघ भायेर..
मला मैतीच नवतं, बघितलच न्हाईमी..
बरं डोळं झाकून पडला रं हिरीत... आता बघितलं ना? हो भाएर..
आता खरं सीन बाय सीन कौतूक करत बसलो तर तो पर्यंत मंजुळेंचा दुसरा पिच्चर यायचा एखादा! त्यापेक्षा जरा फॉरमॅट बदलून, ज्या गोष्टी मला जास्त आवडल्या त्या बद्दलच लिहितो.
सैराट झालं जी:
ह्या गाण्यानी नुसतं वेड लावलय. खरं खुप सारे फॅक्टर्स आहेत ते गाणे आवडण्यामागे. एक तर आर्ची, परशा आणि त्यांचं एकेक प्रसंगातून फुलणारं प्रेम ह्या गाण्यात एकदम tempo धरतं (मालवहातुक वाला टेंपो नाही, गाण्यातला टेंपो असतो तो!).
अप्रतिम सिनेमॅटोग्राफी आणि त्याला साजेसं तेवढच अत्यंत ग्रँड ग्रँड पण थोडा गावाकडला टच असलेलं म्युजिक! (ढोलांचा वापर आणि ग्रामिण बाज असलेली भाषा)
खरंही वाटत नाही की हे करमाळ्याचं वगैरे शुटिंग आहे! काय एकसे एक अॅंगल घेतले आहेत!
गाण्यातले काही मोमेंट्स पण मस्त टिपले आहेत.
अगं झन्नानलं काळंजामंदी
अन हत्तामंदी हात आलं जी....
सैराट झालं जीssss
सैराट झालं जीssss
ह्या शॉट मध्ये आधी परशा आर्चिला गोल फिरवतो आणि नंतर आर्चि खाली वाकून खळाळून हसताना दाखवलीये.
ही हसतानाची आर्चि माझ्या करता कायमची स्मरणात गेलीये. 
नंतर गाण्यातच आर्चि परशाच्या बहिणीला स्कुटरवरुन घेऊन जाताना दाखवलीये आणि पुढे आर्चि मंदिरातून बाहेर गाभार्यात येते आणि तिथे तिच्या रंगीत चपलांमध्ये गुलाबाची फुलं ठेवलेली असतात. ती इकडे तिकडे बघते शोधत कोणी ठेवले असतील आणि तिला दोन खांबांमधून बसलेला परशा दिसतो, तो पाया पडल्या सारखं करुन मग हाथ जोडतो, मी ठेवले आहेत हे सांगत. मग आर्चि ती फुलं उचलून त्याचा वास घेते आणि मग छातीशी कवटाळते. पुढे आर्चि आणि सपनी, परशा, सल्या अन लंगड्या बसलेले असतात त्यांच्या शेजारून जातात तेव्हा लंगड्या सपनीवर फुल फेकल्याची अॅक्शन करतो! आणि त्या पुढे गेल्या की मग आल्या अन लंगड्या दोघंही बाबा प्रेमीपरशांच्या पाया पडतात की काय बॉ आय्ड्या काढली लगा बाबांनी!!! पोरगी फिदाssss...
(हा शॉट सुरु असताना मला वाटतं मागे आधी वायोलिन आणि नंतर बासरी आणि सॅक्सोफोन आहे. अप्रतिम जमून आलाय शॉट, म्युजिक, चित्रिकरण, सगळ्यांचे एक्स्प्रेशन्स सगळ्याच दृष्टिनी!! टोटल गुंडाळून खिशात जाणार हे असले शॉट दाखवले की आशिक दिलाचा प्रेक्षक!) 
नंतर घोडेस्वारीच्या शॉट मध्ये लंगड्या, सल्या आणि आनी असतातच. बघताना गंमत वाटते पण आपल्याकडे तरुण मुलं मुलींना घोडेस्वारीच काय एकांतात कुलफ्या पण खाऊ देतील कोणी तर शपत. आपल्याला नेमून दिलेली कामं सोडून तरुण मुलं मुलींच्या एकांतात व्यत्यय आणण्यात पोलिस, गावातली इतर लोकं वगैरे अशी सगळी बिन प्रेम करताच कुटुंबवत्सल झालेली मंडळी अगदी तरबेज असतात. सतत बिचार्या प्रेमींना आपलं लक्ष ठेवावं लागतं, कोणी पाहतय का, किंवा मग असं मित्रांना तरी राखणाला ठेवावं लागतं.
(असं कसं? असं आडनिड्या वयातल्या मुलं मुलींना एकांतात कसं काय सोडायचं, नाही? उद्या काही वेडंवाकडं झालं तर? आपल्या इज्जतीचं काय होईल? अहो आम्ही पण बरीच वेडीवाकडी कामं करतोओ पण ते बंद दरवाज्या आड, तिथे कोणाला कळतय?) 
कवळ्या पानात ह्या
सावल्या उन्हात ह्या
पवळ्या मनात ह्या भरलं… भरलं च्या वेळेस जेव्हा परशा हवेत किस सोडतो तेव्हा लंगड्याचा "आयो.." वासताना स्लो मोशन मध्ये स्पष्ट दिसतो!!
पुढच्या कडव्यात रंगा खेळतात तो प्रसंग आहे आणि त्याच्या बॅकग्राऊंड मध्ये काय आहे खरं? आपल्या इथे ग्रामिण परिसरात असतात तशी दगड मातीच्या भिंती असलेली घरं, आजूबाजूला उगवलेलं कोरडं गवत, त्या दगडमातीच्या घरांमधून असलेल्या धुळीच्या वाटा! ह्या असल्या बॅकग्राऊंड असताना सुद्धा आधी बिल्ड केलेल्या वातावरणामुळे आणि म्युजिक, सिनेमॅटोग्राफी मुळे काय जब्बरदस्त भाव खाल्लाय ह्या प्रसंगानी?!
गाणं संपत असतानाचे शॉट्स (त्या कळसाच्या छोट्या गच्चीवर वगैरे) मला वाटतं ड्रोन वापरुन शॉट्स घेतले आहेत. सिंपली (अॅज इन सिंपल) इन्क्रेडिबल!
आर्चि:
आर्चि मला वाटतं एका पिकचर मधलं एक पात्र नसून एक फिनोमेनॉन होऊन गेली आहे. ह्यात खरं तिच्या अॅक्टिंगला दाद द्यावी की मंजुळेंच्या परफेक्ट कास्टिंगला हे समजत नाही कारण ती अॅक्टिंग करते असं मला वाटतच नाही इतकी ती फिट बसली आहे त्या रोल करता. ह्याच अर्थ इथे मी झुकतं माप मंजुळेंच्या कास्टिंग ला देइन, पण ते देत असताना तिनी ज्या प्रकारे रोल पेलला आहे त्याला जवाब नाही. हे मान्य की रिंकु राजगुरु रियल लाईफ मध्ये बरीचशी तशीच चालते बोलते पण पिकचर मध्ये फक्त तिचं चालणं आणि बोलणं नाहीये ना ? खुप ठिकाणी तिला स्ट्राँग इमोशन्स दाखवावे लागले आहेत, एका अल्लड पाटल्याच्या पोरी पासून पुढे हलाखीत दिवस काढून नंतर एकदम मचुअर, आत्मविश्वासानी संसार करणारी तरीही आई वडीलांच्या आठवणीनी झुरणारी आर्चि हे ट्रान्सफॉर्मेशन तिला पेलावं लागलेलं आहे and oh my god has she done it well!!!
आता खरं खुप काही लिहिता येइल पण एक शेवटचा माझ्या कायमचा लक्षात राहिल असा प्रसंग आहे त्या बद्दल लिहून आवरतं घेतो. हा प्रसंग खरं मंजुळेंचं डायरेक्शन, परशा आणि आर्चिच्या अॅक्टिंगमुळे अत्यंत रियलिस्टिक होऊन आपल्या अंगावर येतो अगदी.
त्या फोनच्या पासवर्ड वरुन आधीच परशा जरा उखडलेला असतो, दुसर्या दिवशी कामावर जायच्या आधी पण त्यावरुन खटका उडतो आणि आर्चि निघत असे पर्यंत सुरुच असतं भांडण.
"तिथं कामावर कोणी फोन बघू नये म्हनून बदल्लाय" इथे खरं परशा थोडा शरमल्या सारखा होतो, कारण त्याला स्वतःची चूक लक्षात येते बहुतेक पण तो पर्यंत डॅमेज झालेलं असतं.आर्चिचा संयम संपलेला असतो.
"कुडं चालली?"
"चालली मसनात! कुटं जाती रोज मी?" "तुझ्या ह्या असल्या सबावाचा लै वैताग आला मला"
"काय यवडा वैटे का मी?"
"मंग मी वाईटे का?"
"मी आसकुडं म्हनलं?"
"म्हनायची काय गरजे?"
"कामावर जावच लागल का?"
"लोडय कामाचा, सर वोरड्त्याल"
काम संपवून आर्ची परशाच्या डोसा टपरीवर येते.
परश्या अजून घुसाट्यातच असतो.
"परश्या..... ओ साह्येब... पिकचरला जायचं का?"
"कामय मला.."
"मी इचारतीकी सुमनताईला"
"दुसरं कामेमला"
"चल ना..."
"तुला एकदा सांगितलेलं कळतय का?"
"हळू बोल की मग येवडं वरडतो कशाला?"'
"लै गाजलेला पिच्चरय, तुझ्या आवडत्या हिरोचा"
"...."
"मी एकटी जाईना?"
"जां..."
"खरच एकटी जाईन"
"निग्की मग कशाला थामली!"
"लै इगोए तुला, बस तसाच..."
असं म्हणून आर्चि एकटी पिकचर ला जाते....
त्या प्रेमानी म्हणलेल्या ओ सायेबाला पुढे जी अत्यंत तुसडी वागणूक मिळते ती बघून आणि एस्पशली विहिरीवरची ७-८ पोरांना दमात घेऊन हाकलणारी आर्चि आठवून ह्रदयाला खिंडारं पडतात!
पाटलाची पोरगी म्हणून येवढा माज केलेली, तेवढच ह्या परशावर प्रेम करणारी अन त्याला वाचवताना स्वतःच्या वडिलांकडून मार खाणारी, आबावर गोळी झाडणारी पण नंतर परिस्थितीशी दोन हात करत पण प्रेमानी राहू बघणार्या आर्चिची वाताहत बघवत नाही. पुढे प्रकरण आण्खिन थोडं विकोपाला जाऊन नंतर शेवटी परत ती दोघं आपल्याला एक मेकांशिवाय कोणी नाही हे समजून परत एकत्र येतात.
परशा तसा चांगला दाखवलाय आणि पिकचर मध्ये आर्चिच्या घरचे खुप जास्त कडक दाखवले आहेत पण एकंदरितच हे सगळं आपल्याकडच्या बर्याच मुलीं/स्त्रियांबद्दलचं खुप बोलकं असं उदाहरण आहे.
पळून जाऊन लग्न केलेलं नसलं आणि घरच्यांनी करुन दिलेलं असलं तरी एकदा लग्न करुन दिलं की आपली जबाबदारी संपली आणि माहेरपणाला आनंदानी ये असं म्हणाले तरी टेकनिकली घरी परत जायचे दरवाजे बंद असतात. सो उद्या काही अनबन झाली तरी एक तर तुम्ही ते निभावून न्यायचं किंवा मग आपला आपण मार्ग बघायचा येवढच उरतं.
असो..... 
अकरित घडलया
सपान हे पडलया
गळ्यामंदी सजलंय डोरलं.. डोरलं
साता जन्माच नात रूजलया काळजात
तुला र देवागत पुजलं
रूजल बीज पिरतीच सजणी रुजलं
भिजलं मन पिरमान पुरत भिजलं
सरल मन मारून जगण सरलं
हरलं ह्या पीरमाला समद हरलं
कडाडलं पावसामंदी
अन आभाळाला याट आल जी
सैराट झालं जी…
सैराट झालं जी…
सैराट झालं जी…….
_/\_
बुवा , हायझेन , बघा फ्यान
बुवा , हायझेन , बघा फ्यान असावा तर असा , नाहीतर तुम्ही
कडक ! मान लिया !
कडक ! मान लिया !
तो फॅन कय गाईल ? तुझ्या
तो फॅन कय गाईल ?
तुझ्या थोबड्याचं मी प्रतिबिंब टकलावर गोंदल ं ?
ती आर्ची वाटतच नाहीये, चांदोबातल्या गोष्टीतलं कॅरॅक्टर वाटतय
पण केसातून कला आहे कि टॅटू ?
बहुतेक केसातनं केला असावा
बहुतेक केसातनं केला असावा
च्यायला, ह्या नाव्ह्यास
च्यायला, ह्या नाव्ह्यास गाठायला पाहीजे!
च्यायला, ह्या नाव्ह्यास
च्यायला, ह्या नाव्ह्यास गाठायला पाहीजे! >>>तस करायचा विचार आहे का काय ?
पण केसातून कला आहे कि टॅटू ?
पण केसातून कला आहे कि टॅटू ? >> का फोटोशॉप.
एबीपी माझा सन्मान सोहोळा
एबीपी माझा सन्मान सोहोळा बघतेय. नागराज, आर्ची, परशाला award मिळालं. परशा हजर नव्हता (ट्राफिकमध्ये अडकला होता
).
नागराज काय बोलला, दोन मिनिटंच बोलला पण सॉलिड, डोळ्यातून पाणी आणलं. शिव्या, बोलणी खायची वगैरेची पहिल्यापासून सवय आहे, त्यात मी comfortable असतो. कौतुकाची सवय नाही, आता हळूहळू होतेय. कविता करायचा तर आई विरोध करायची की याने काय पैसे मिळणार आहेत का? पण बाबा support करायचे, छान लिहितोय असं. आज यश बघायला बाबा नाहीत त्याचे. वडार समाजात जन्म झाला म्हणून लेखणी नसती तर छिन्नी हातात आली असती. एक छान कविता म्हणून दाखवली ह्याच अर्थाची.
ह्म्म्म! शेवटी गेलाच तु ४थ्या
ह्म्म्म!
शेवटी गेलाच तु ४थ्या पानावर.
रोज ऊघडून बघायचो अजून काही नवीन प्रतिक्रीया आल्यात का ते, पण आम्ही पण काय करणार ना, रोज रोज कुठून नवीन माहिती अॅड करणार?
असो जा बाबा असाच मग एक एक पान मागे जात जात शेवटी तुझी पण जी काही जागा असेल तिथे जा, तो पर्यंत जोवर आमच्या सारखा कोणीतरी सैराट फॅन उत्खनन करुन परत तुला वर आणत नाही तोपर्यंत.
पण माझ्या आवड्त्या निवडक १० मधे तु राहशीलच याची खात्री देतो मी तुला.
असाच एक सैराट चाहता!
आत्ताच तुनळीवर "सैराट झालं
आत्ताच तुनळीवर "सैराट झालं जी" बघितलं, जे सेन्सॉर कॉपीतील आहे.
थेटरात आणि टीवी वर जे "सैराट झालं जी" दाखवतात ते आणि हे सेन्सॉर कॉपीतील गाणं वेगळं आहे. काही सीन्स सेम आहेत फक्त.
मात्र आवडलं हे पण व्हर्जन.
पण माझ्या आवड्त्या निवडक १०
पण माझ्या आवड्त्या निवडक १० मधे तु राहशीलच याची खात्री देतो मी तुला.
असाच एक सैराट चाहता! >>>> + ११११
माझ्या पण निवडक दहात पहिल्या दिवशीच गेला हा धागा.
काल पूर्ण धागा आणि ५ पाने प्रतिसाद पुन्हा वाचुन काढलेत. आज पुढची पाच पाने.
लय भारी लिहिलंय. प्रतिसाद पण
लय भारी लिहिलंय. प्रतिसाद पण एवढे भरभरुन.
"सैराट" पाहताना मला S.T.
"सैराट" पाहताना मला S.T. Coleridge म्हाणतात तस "willing suspension of disbelief" असच काहीतरी व्हायला होत होत..
वाटत होत..सगळ खरच आहे...ते खरे खुरे.. आर्ची आन.. परश्या...सल्या बाळ्या..सगळ...
कदाचित..हे पण एक खुप महत्वाच कारण असु शकत हा सिनेमा एवढा आवडण्याच... !!!
ह्या धाग्याने चांगलीच गोची
ह्या धाग्याने चांगलीच गोची करून ठेवली आहे, सिनेमा इतक्या बारकाईने पहायची एक दृष्टी देऊन.
आजच सुलतान पहिला, त्यातल्या चूका दाताखाली खडा यावा तश्या जाणवत होत्या, नॉर्मल केस मध्ये माझ्या लक्षात सुद्धा आल्या नसत्या,
काही प्रसंग सांगतो (चुका नाही म्हणता येणार पण कमी प्रमाणात केलेले डिटेलिंग जाणवते)
Baby ko base pasand hai गण्याच्यावेळी ते लग्न मुस्लिम मुस्लिम आहे कि हिंदू मुस्लिम आहे हे काहीच स्पष्ट होत नाही, मुलगी दरग्या मधून बाहेर पडते, शृंगार मुस्लिम वधू प्रमाणे आहे, पण लग्न घरात काहीच मुस्लिम नाही,
त्याच गाण्यात, हरियाणा मधल्या एका छोट्याश्या गावात 8 वर्षा पूर्वी, ते पण पूर्व परिचय नसलेल्या मुस्लिम मुली बरोबर सलमान त्याचा "बेस" हलवत नाचतो ते पण uninvited जाऊन हि फारच सिनेमॅटिक लिबर्टी वाटते.
पहिल्या कुस्ती च्या शॉट मध्ये सगळे गावकरी पांढरे शुभ्र कपडे, फेटे घालून आलेले, सैराट च्या क्रिकेट मॅच ची गम्मत नाही राव,
हर्याणवी मुस्लिम वेगळी भाषा बोलतात का नक्की माहित नाही, पण सगळ्या मुस्लिम पात्रांच्या तोंडी हर्याणवी बोली आहे, एकही खास मुस्लिम शब्द येत नाही,
या शिवाय काळ, घटनांचे बरेच घोटाळे आहेत, ते सेपरेट सुलतान चा धागा आला कि बोलू,
कपडेपट पण बराच गफला करतो, गावठी सलमान गावात सराव करताना एकदम नायके चे शुज घालून धावतो, किंवा दुसऱ्याच दिवशी तालिमीत रेस्टलर चे कपडे घालून जातो इ इ
तर सांगायचा मुद्दा हा.... आपला सैराट लै भारी
सैराट प्रेमींसाठी एक क्वीझ.
सैराट प्रेमींसाठी एक क्वीझ. उत्तर सायंटिफिक आहे
आर्चीची बुलेट बंद पडल्यावर परश्या काय मॅजिक करतो की जबरी किक बसते?
रिझर्वचा नॉब फिरवतो का ?
रिझर्वचा नॉब फिरवतो का ?
रिझर्वचा नॉब फिरवतो का ?>>
रिझर्वचा नॉब फिरवतो का ?>> सही जबाब!
येस हाब. तसंच काहीसं. आधी
येस हाब. तसंच काहीसं. आधी त्याच्या लेफ्टला चोकचा नॉब किंवा तत्सम काहीतरी फिरवतो मग राईटला किक मारतो.

मंग्याला बहुतेक हे माहित नसावं.
मंग्याला बहुतेक हे माहित
मंग्याला बहुतेक हे माहित नसावं. >>
मंग तर. आनीने आधीच आळखलेलं असतं. म्हणून तर आर्ची मंग्याला बोलावते तेव्हा ती आर्चीला म्हणतेच हं याला येतंय व्हय.
सैराट ने सवयी
सैराट ने सवयी बिघडवल्या....आताशा दुसरा कुठलाही सिनेमा बघताना अनेक गोष्टी दाताखाली खडा आल्या सारख्या खटकतात...
सध्या मी सैराट नुस्ता ऐअकत असते... मग बरेचसे बारीक सारीक संवाद - बॅकग्राउंड चे संवाद ऐकू येतात...
उदा... मंगेश पाटलांची ओळ ख अशी अचानक ऐकू आली....( आधीच्या पानावर कुणीतरी उल्लेख केलाय )
>>आताशा दुसरा कुठलाही सिनेमा
>>आताशा दुसरा कुठलाही सिनेमा बघताना अनेक गोष्टी दाताखाली खडा आल्या सारख्या खटकतात >> +१
माझंही हेच झालं. आताच्या लाँग विकांताला मुद्दाम ठरवून दुसरा कोणतातरी मराठी सिनेमा किंवा वेगळी गाणी ऐकायची असं ठरवलं. आधी खूप आवडलेले असे सिनेमे निवडले पण फक्त देऊळ आणि एलिझाबेथ एकादशी शेवटपर्यंत पाहू शकले.
पोस्टर बॉईज, टाईमपास, हे तेव्हा ओके वाटले होते पण आता १० मि पण नाही बघू शकले. असं आता खूप वेळा होणार आहे. मंजुळेंनी बार फार हाय सेट केलाय. सिनेमावाल्यांसाठी आणि प्रेक्षकांसाठी देखील.
गाणी मात्र नाट्यसंगीत, आशा भोसले हीट्स ऐकू शकले.
या फिवरमधून बाहेर पडणं गरजेचं होतं पण आता बरंच बरं आहे. 
हा धागा वर आल्यावर छान वाटले.
हा धागा वर आल्यावर छान वाटले.
दुसरा कुठला दर्जेदार सिनेमा
दुसरा कुठला दर्जेदार सिनेमा बघायचा असेल तर जुलै २०१५ ला आलेला नीरज घायवानचा 'मसान' बघा. यूट्यूबवर आहे. अभिनय आणि दिग्दर्शन आणि वेगळाच विषय. संजय मिश्रा ह्या अभिनेत्याने खाल्लाय सिनेमा. मायबोलीवर परिक्षणं आहेत. पण शेवटी स्वतः बघूनच ठरवा. कान्समध्ये दोन अॅवॉर्ड्स मिळाली आहेत.
एक अलबेला चे शोज सैराट साठी
एक अलबेला चे शोज सैराट साठी बंद केले हे खरे आहे का?
दोन तीन नवे डीटेल्स. : याड
दोन तीन नवे डीटेल्स. :
याड लागलच्या एं डिंगला आर्ची बाइक वरून येते. बॅकग्राउंड मध्ये एक्स वाय झेड पाटील महा विद्यालय अशी पाटी आहे. म्हणजे ते तिच्या घरच्यांनी दे णगी देउन सुरू केलेले, आज्याचे नाव वगिअरे दिलेले कॉलेज आहे. आपलंच कॉलेज अशी ऐट म्हणून आर्ची व प्रिन्स दोघांच्यात आहे . म्हणून तो कुठे ही येउन बसतो.
याड लागलं च्या सुरुवातीला परश्या मस्तीत नाचतो भेटायच्या आधीच तेव्हा मागे तेलवाहू डबे जोडलेली वाघीण गाडी जोरात जाताना दाखविलेली आहे. हा मुलगा पुढे किती ज्वाला ग्राही प्रकरण ठरणार त्याचे सूतोवाच केलेले आहे.
सर्व चित्रपटात पक्ष्यांचा उत्तम उपयोग केला तो स्पेशली बघावा. प्रेमकथा घडत असताना, गोड पक्षी, थवे, हलके उडणारे असे आहेत. पण जसंच विरोध सुरू होतो. मारामारी होते. तेव्हा कावळ्यांच्या घारीच्या धाडी अशूभ आवाजत वर फिरत राहतात. मन अगदी सुन्न करणारे सीन्स.
अमा चांगलं निरीक्षण. हे पाटील
अमा चांगलं निरीक्षण. हे पाटील महाविद्यालयाचं पाहिलं नव्हतं..
)
बुलेट एन्ट्री मधलाच निळा ड्रेस सैराट गाण्यात मनोर्यावर आहे.आणि कवायतीत पण.ड्रेस रिपीट व्हायलाच पायजेत.ते नॅचरल आहे.
त्या फेमस पाण्यात खडकाळ कट्ट्यावर ते बसले आहेत त्या सीन मध्ये इतके जवळून उडणारे पक्षी कसे मॅनेज केले असतील?
सैराट चं ट्रेलर पण एक बघण्यासारखी गोष्ट आहे.मी परत परत बघते.(मला आवडला तितका घरातल्या कोनालच आवडला नाही ही गोष्ट वेगळी.डॉक्युमेंटरी आहे म्हणाले दुसर्या भागाला
अजून किती बारकावे पहायचे बाकी आहेत..परत एकदा युट्यूब वर नीट पाहिला पाहिजे.
ते नेमक्या वेळी फुलपाखरे उडत
ते नेमक्या वेळी फुलपाखरे उडत उडत येणे कसे जमवतात शिनुमात? की एडिटींगच्या वेळी हवी तिथे फुलपाखराची, एखाद्या पक्षांची वगैरे एंट्री मारता येते?
याड लागलच्या एंडिंगला आर्ची
याड लागलच्या एंडिंगला आर्ची बाइक वरून येते. बॅकग्राउंड मध्ये एक्स वाय झेड पाटील महा विद्यालय अशी पाटी आहे. म्हणजे ते तिच्या घरच्यांनी देणगी देउन सुरू केलेले, आज्याचे नाव वगिअरे दिलेले कॉलेज आहे. आपलंच कॉलेज अशी ऐट म्हणून आर्ची व प्रिन्स दोघांच्यात आहे . म्हणून तो कुठे ही येउन बसतो.
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
कर्जतचं (जि. अहमदनगर) दादा पाटील महाविद्यालय आहे ते. छान वाटलं आमचं कॉलेज सिनेमात बघून.
याडं लागलं मधे परश्या
याडं लागलं मधे परश्या मनस्वीपणे नाचत असताना मागून ती हिरवी मालगाडी जात आहे, त्या मालगाडीमुळे एकूण फ्रेम हिरवी(मालगाडी), पिवळी (ज्वारीचे शेत), हिरवी (अलीकडल्या शेतातली झुडुपं) या ३ रंगात बरोबर विभागली गेली आहे.
त्यामुळे ती फ्रेम मस्त दिसतेय.
ते नेमक्या वेळी फुलपाखरे उडत
ते नेमक्या वेळी फुलपाखरे उडत उडत येणे कसे जमवतात शिनुमात? की एडिटींगच्या वेळी हवी तिथे फुलपाखराची, एखाद्या पक्षांची वगैरे एंट्री मारता येते? >>>
अगदी अगदी. आर्ची परशा ला आय लव्ह यु म्हणते त्या सीनमध्ये जरा आधी पक्श्यांच्या थव्याचा आकार काय मस्त आहे. वाटतंच नाही की ते त्याच वेळी शूट केलेलं असेल. नंतर च्या मिक्सिंगची कमाल असेल असं वाटतं. पण त्या सीन मध्ये आर्ची परशा बरोबर बॅकग्राऊंडला जबरी दिसतं राव ते.
Pages