आंबाकाजू वडी

Submitted by मंजूताई on 16 June, 2016 - 05:20
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ वाटी काजू पूड, १ वाटी रवा, २ वाट्या आमरस, २ वाट्या दूध व ४ वाट्या साखर सजावटीसाठी भोपळ्याच्या बिया/काजू तुकडे

क्रमवार पाककृती: 

सगळे जिन्नस एकत्र करून शिजत ठेवा घट्ट होईपर्यंत! एका वाटीत पाणी घेऊन हे मिश्रण टाका. गोळी झाली तर समजा वड्या थापायला हरकत नाही. तूप लावलेल्या ताटलीत पसरवून काजू/बिया शिवरा व वड्या कापा.

वाढणी/प्रमाण: 
आवडीनुसार
अधिक टिपा: 

रवा भाजायचा नाही व तूप अजिबात नाही.
उपासाच्या करायच्या असतिल तर राजगीरा/शिंगाडा पीठ वापरुनही छान लागतात.
काजू ऐवजी बदाम्/पिस्ता/ओला नारळ्/डेसिकेटेड कोकोनट वापरू शकता.

माहितीचा स्रोत: 
स्वप्रयोग
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users