शब्दांतर

Submitted by स्वाती_आंबोळे on 14 June, 2016 - 11:33

एका चिनी शिवीचा अर्थ मराठीत 'वारंवार वेश्यागमन करणारा म्हातारा' असा आहे अशी मजेशीर माहिती घरच्या मँडरीन शिकणाऱ्या विद्यार्थ्याकडून मिळाली. आता मराठीत याला प्रतिशब्द नाही. त्यावरून विचार करत होते, आपण 'नाव' कशाला देतो? नित्याच्या अनुभवांतल्या किंवा सुखदु:खाची काहीतरी अतिशय परिणामकारक अनुभूती देणाऱ्या वस्तू, घटना यांना. (उदा. मृद्गंध - याला इंग्रजीत petrichore असा प्रतिशब्द आहे हे मला अनेक वर्षं माहीत नव्हतं.)

म्हणजे साधं एखाद्या भाषेत nouns कुठली प्रचलित आहेत त्यातही त्या समाजाचं लख्ख प्रतिबिंब दिसतं.
तुमच्या माहितीत असे (कोणत्याही भाषेतले) कुठले शब्द आहेत ज्यांना one-to-one प्रतिशब्द तुम्हाला माहीत असलेल्या दुसऱ्या कुठल्याही भाषेत नाहीत?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चुंबळ ला सहसा पॉट-रेस्ट म्हणतात (पण त्यात ती फक्त डोक्यावर ठेवण्यासाठी वापरली जाते जी छटा येत नाही)

leftover food = उरलेले अन्न किंवा ताटात टाकलेले अन्न अर्थात खरकटे. >>
पण म्हणजे दोन शब्द वापरून खरकटे हा अर्थ ध्वनित केला. खरकटे ला प्रतिशब्द म्हणून शब्द नाही.
उरलेले अन्न ला leftover food म्हटले.

निंबुडा: जेवणाच्या संदर्भात leftover नंतर food लावायची गरज नाही. फक्त leftover असे म्हंटले तरी कळते. आपणही खरकटे हात, खरकटे ताट, खरकटे अन्न असे नाम खरकटे नंतर लावतोच की नक्की काय खरकटे हे सांगायला.

उदा:

१) सिंक मधली भांडी घासायच्याआधी मी त्यातील खरकटे अन्न बीन्स मधे टाकतो म्हणजे सिंक मधे ते अडकणार नाही.
२) दरवेळी तुला खरकटे हात शर्टाला पुसायची वाईट सवय आहे.
३) ती वाटी घेऊ नको ती खरकटी आहे.

उष्टे अन्न आणि खरकटे अन्न असे दोन शब्द मराठी भाषेत आहे. उष्टे अन्नाला = Disconfirming food
म्हणतात.

खरकटे हात असं पण म्हणतात ना
वाढणार्‍याने धुतलेल्या हाताने पोळी वाढली आणि हात सकृत दर्शनी स्वच्छ दिसत असला तरी तो हात खरकटा झाला.
असा हात दुसर्‍या कुठल्या खाण्याच्या पदार्थाला परत न धुता लावलेला चालत नाही. (विशेषतः दुध-दुभत्याला किंवा उपासाला चालणार्‍या पदार्थांना)
सोवळे ओवळे ह्या संकल्पना कालबाह्य होत असल्या तरी काही (टोन्ड डाऊन) प्रमाणात / मवाळ स्वरुपात अस्तित्वात आहेत.
सोवळे ओवळे हे देखिल असेच प्रदेशनिष्ठ शब्द आहेत.

मी लिहित असतानाच हर्टचा प्रतिसाद आला

पण हर्टा तू दिलेल्या उदाहरणानुसारही खरकटे ह्या शब्दाच्या सोबत हात / वाटी ई. वापरल्यावर लेफ्ट ओव्हर मधून अर्थ पोचत नाहीये ना

I am missing you मधल्या मिसिंग च्या अर्थाचा मराठी शब्द सुचवा.>>

मला तुझी उणिव जाणवते/भासते.

पण हर्टा तू दिलेल्या उदाहरणानुसारही खरकटे ह्या शब्दाच्या सोबत हात / वाटी ई. वापरल्यावर लेफ्ट ओव्हर मधून अर्थ पोचत नाहीये ना>>

हर्पेन, तेच मीही सांगत आहे की ज्या संदर्भात आपण बोलत आहोत ती गोष्टी खरकटे नंतर यायची गरज नाही. जसे की मी जर वाटी घेत आहे जेवायला आणि ती जर खरकटी असेल तर आईने जर मला असे म्हणंते की 'ती खरकटी आहे घेऊ नकोस" तर "खरकटी वाटी" घेऊ नको असे मुद्दाम दोन शब्द वापरायची गरज नाही.

आठवण येते म्हणजे remembering you. हर्ट, उणीव भासते हे बर्‍यापैकी जवळ जातंय मिसिंग यू च्या. धन्यवाद!

उष्टे अन्न, उरलेले अन्न हे वेगळे.
खरकटे म्हणजे टाकाऊच.>>>

मग उपवासाचे आणि खरकटे हे शब्द प्रयोग कसे... खरकटे आहे ते उपवासाला नाही चालणार

खरकटे या शब्दात खरंच वर लिहिलेल्या छटा येत नाहीत.

भाताचे सगळे पदार्थ खरकटे असं एक शास्त्र असतं बर्‍याच लोकांच्यात.
त्यामुळे वरण भाताचा एकत्र कूकरही लावत नाहीत.
डाळ खरकटी होते म्हणून.
जर उजव्या हाताने ईडली/ भात /भाताचे प्रकार खात असू तर डावा हात पुस्तकाला,अन्नपदार्थालाही लागलेला चालत नाही.
भात असलेले ताट जर जमिनीवर्/टेबलावर ठेवले तर तेवढा भाग शेणगोटा केल्याशिवाय खरकट्याचा सोवळा होत नाही असेही मानतात.

काही लोकांच्यात अगदी देवळातही प्रसादाला भाताचा प्रकार असतो पण आपण घरी नेणार असतो तेव्हा पुजारी कडीच्या भांड्यात तो ठेवून , शरीरापासून दूर ठेवून ते भांडं आपल्या हातात ठेवतात.
'मुसरी इदे' म्हणजे खरकटे आहे असे दहादा बजावून सांगतात.
घरी गेल्यावर 'कै तळकोंडी उणो' म्हणजे व्यवस्थित खरकटा हात धुवून , बाकीचा प्रसाद खाऊन मग हे खा असे सांगतात.

Contaminated makes sense.
Impure - for any of the myriads of reasons - बहुधा अर्थाच्या सर्वात जवळ जाईल.

साती, भाताबद्दल माहीत नव्हतं, पण शिजलेल्या भाताला चिकटपणा असतो हे कारण असू शकेल की काय असं वाटलं.
(लहानपणी चाळीत मुलं पतंग चिकटवायला खळ मिळाली नाही तर घरून भात मागून न्यायची हे सहज आठवलं त्यावरून. Happy )

आपल्या अप्सरांसारखा निम्फ (nymph) प्रकार माहीत आहे, परी हे fairyचं भाषांतर - किंबहुना एक उच्चारांतर म्हणता येईल कदाचित. बाकी यक्ष, किन्नर, गण, गंधर्व वगैरेंचे इतर कुठल्या मिथककथांत काही counterparts आहेत का?

याबद्दल बहुधा पूर्वी अन्यत्र चर्चा झाली आहे, पण इंग्रजी 'रोमान्स/रोमँटिक', तसंच उर्दू 'जुनून'ला मला चपखल मराठी प्रतिशब्द सापडलेले नाहीत.

जुनून - महत्त्वाकांक्षा / ध्यास / पॅशन
रोमँटिक - अद्भुत

तरी मला अजून या दोन मराठी शब्दांना इंग्रजीत काय म्हणावे ते सुचत नाही.

  1. ओवाळणे / औक्षण
  2. ओवाळून टाकणे

वरील दोन्ही शब्दांचे मराठीत अर्थ वेगळे आहेत. दुसर्‍या शब्दाला उर्दूत निछावर करना असा समानार्थी शब्दप्रयोग आहे.

यक्ष, किन्नर, गंधर्व यांना celestial beings म्हणतात. पण हे प्रतिशब्द होऊ शकत नाहीत.

हो, खरकटं, सोवळं-ओवळं याचा संबंध ritual purity शी थेट्/दुरून असतो म्हणूनच तो वरचा इंग्लिश शब्द वापरतात

ओवाळून टाकणे >> - गावावरुन ओवाळून टाकलेला अशा नेगटिव्ह अर्थाने असतं त्याला कोकणीत निवासून / निवाळसून उडयलेलो म्हणतात . टळ इथून म्हणायला पण ' निवासून वच'

रोमॅन्टिक गाणं म्हणजे अद्भुत गाणं नव्हे ना? Happy

उर्दू/फारसीत 'सदका/सतका' म्हणतात ओवाळून टाकण्याला. (आठवा 'जान का सतका माल और इज्जत का सतका जान!')
पण बाकी कुठे ही कन्सेप्टच नसावी.

Pages