Submitted by स्वाती_आंबोळे on 14 June, 2016 - 11:33
एका चिनी शिवीचा अर्थ मराठीत 'वारंवार वेश्यागमन करणारा म्हातारा' असा आहे अशी मजेशीर माहिती घरच्या मँडरीन शिकणाऱ्या विद्यार्थ्याकडून मिळाली. आता मराठीत याला प्रतिशब्द नाही. त्यावरून विचार करत होते, आपण 'नाव' कशाला देतो? नित्याच्या अनुभवांतल्या किंवा सुखदु:खाची काहीतरी अतिशय परिणामकारक अनुभूती देणाऱ्या वस्तू, घटना यांना. (उदा. मृद्गंध - याला इंग्रजीत petrichore असा प्रतिशब्द आहे हे मला अनेक वर्षं माहीत नव्हतं.)
म्हणजे साधं एखाद्या भाषेत nouns कुठली प्रचलित आहेत त्यातही त्या समाजाचं लख्ख प्रतिबिंब दिसतं.
तुमच्या माहितीत असे (कोणत्याही भाषेतले) कुठले शब्द आहेत ज्यांना one-to-one प्रतिशब्द तुम्हाला माहीत असलेल्या दुसऱ्या कुठल्याही भाषेत नाहीत?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Jigsaw puzzleला मराठीत काय
Jigsaw puzzleला मराठीत काय म्हणतात? <<< भाराभर चिन्द्या..
एकतर असं येताजाता धन्यवादायची
एकतर असं येताजाता धन्यवादायची पद्धत मराठीत नाही. तेव्हा देवनागरीत "यल्कम" हा पुरेसा रिस्पॉन्स असावा.
कुणी धन्यवाद म्हटलंच तर ज्या
कुणी धन्यवाद म्हटलंच तर ज्या व्यक्तीला म्हटलंय ती ओशाळल्यागत किंवा लाजून 'हो हो..' किंवा 'धन्यवाद कशाला' किंवा 'कसचं कसचं' असं काही तरी म्हणते किंवा नुसतीच वेडगळ मान हलवते.
"कुणी धन्यवाद म्हटलंच तर ज्या
"कुणी धन्यवाद म्हटलंच तर ज्या व्यक्तीला म्हटलंय ती ओशाळल्यागत किंवा लाजून 'हो हो..' किंवा 'धन्यवाद कशाला' किंवा 'कसचं कसचं' असं काही तरी म्हणते किंवा नुसतीच वेडगळ मान हलवते." -
म्हणूनच हा प्रश्न पडला.
"एकतर असं येताजाता
"एकतर असं येताजाता धन्यवादायची पद्धत मराठीत नाही." - बुंदी पाडतात, तशी पाडून घ्यावी, बरं असतय ते! अरे हो, प्रतिसादाबद्दल धन्यवाद बरं का!
कधीपण! (जसं इंग्रजीत एनी टाईम
कधीपण! (जसं इंग्रजीत एनी टाईम म्हणतात तसं) ग्रेसफुल आहे एकदम. बरोबर चेहेऱ्यावर हसू, डोळे थोडे वर उडवलेले आणि एकाहाताने थंब्सप.
मला आनंद आहे, या वाक्यातला
मला आनंद आहे, या वाक्यातला 'आनंद' हा शब्द तुम्ही कसा उच्चारता त्यावरही बरेच काही अवलंबून आहे. 'आनंद' शब्दावर विशिष्ट आघात किंवा जोर दिल्यास त्याचा विपरित अर्थ होतो.
अय्यो ! मग 'तुमच्यासाठी
अय्यो !
मग 'तुमच्यासाठी कायपण!' कसलं भारी वाटेल कुणी 'धन्यवाद' म्हटल्यावर!
नाही, नाही, विशिष्ट शहरातील
नाही, नाही, विशिष्ट शहरातील लोकांना तसं बोलताच येणार नाही!!
reminisce ला मराठी शब्द आहे
reminisce ला मराठी शब्द आहे का? ईंग्रजी अर्थ : indulge in enjoyable recollection of past events.
स्मृतीरंजन
स्मृतीरंजन
स्मृतीरंजन शब्द फारच छान आहे.
स्मृतीरंजन शब्द फारच छान आहे. अजून सोपा शब्द असेल तर सांगा. जो आपण रोजच्या भाषेत सहज वापरु शकू. धन्यवाद माधवजी.
मला एका शब्दा बद्दल संदेह
मला एका शब्दा बद्दल संदेह आहे. दुकाना समोर लिहीलेलं असतं ," इथे निवडक वाणसामान मिळेल ". मला खूप दिवस असं वाटायचं की म्हणजे इथे ठराविक (सिलेक्टेड फ्यू) आयटेम्स मिळतात ..आत्ता आत्ता कळलं की निवडक म्हणाजे साफ केलेलं , स्वच्छ धान्य वगैरे!
तसे असेल तर तेथे 'निवडक'
तसे असेल तर तेथे 'निवडक' योग्य वाटत नाही.
निवडक म्हणजे
निवडक म्हणजे सिलेक्ट.
निवडलेले ला निवडक काही बरोबर नाही.
म्हणजे निवडक = निवडलेले हे
म्हणजे निवडक = निवडलेले हे चूक, आणि ते मुळात निवडलेले आहे असा क्लेम - या दोन्ही अर्थाने ते चूक आहे
खरंय , फार एंड......
खरंय , फार एंड......
शुन्यात बघणे किंवा तंद्री
शुन्यात बघणे किंवा तंद्री लागणे ला इतर भाषात समांतर शब्द आहे का?
शून्यात बघणे आणि तंद्री लागणे
शून्यात बघणे आणि तंद्री लागणे यांचे अर्थ वेगळे आहेत ना?
शून्यात बघणे = blank expression = धन बी नाय न् ऋण बी नाय
तंद्री लागणे = ???? = कशाच्यातरी अंमलाखाली असणे
वेचक
वेचक
तंद्री लागणे > zoned out
तंद्री लागणे > zoned out
कृष्णा......वेचक शब्द अगदी
कृष्णा......वेचक शब्द अगदी योग्य आहे!
स्मृतीरंजन वापरायचा नसेल तर
स्मृतीरंजन वापरायचा नसेल तर 'आठवणींत रमणे' असे साधे सोपे म्हणू शकतो.
आठवणी चांगल्या/वाईट दोन्ही प्रकारच्या असल्या तरी 'रमणे' क्रीयापद वापरल्यास चांगल्या/गोड आठवणी असाच अर्थ असतो.
तंद्री लागणे >> Engrossed,
तंद्री लागणे >> Engrossed, captivated, mesmerized , enraptured . . लॉस्ट इन थॉट्स
मुका मार = contusion असं एके
मुका मार = contusion असं एके ठिकाणी वाचलं आज ..
Pages