शब्दांतर

Submitted by स्वाती_आंबोळे on 14 June, 2016 - 11:33

एका चिनी शिवीचा अर्थ मराठीत 'वारंवार वेश्यागमन करणारा म्हातारा' असा आहे अशी मजेशीर माहिती घरच्या मँडरीन शिकणाऱ्या विद्यार्थ्याकडून मिळाली. आता मराठीत याला प्रतिशब्द नाही. त्यावरून विचार करत होते, आपण 'नाव' कशाला देतो? नित्याच्या अनुभवांतल्या किंवा सुखदु:खाची काहीतरी अतिशय परिणामकारक अनुभूती देणाऱ्या वस्तू, घटना यांना. (उदा. मृद्गंध - याला इंग्रजीत petrichore असा प्रतिशब्द आहे हे मला अनेक वर्षं माहीत नव्हतं.)

म्हणजे साधं एखाद्या भाषेत nouns कुठली प्रचलित आहेत त्यातही त्या समाजाचं लख्ख प्रतिबिंब दिसतं.
तुमच्या माहितीत असे (कोणत्याही भाषेतले) कुठले शब्द आहेत ज्यांना one-to-one प्रतिशब्द तुम्हाला माहीत असलेल्या दुसऱ्या कुठल्याही भाषेत नाहीत?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

संदर्भांसाठी धन्यवाद, चिवडेवाले. Happy
'किती भयग्रस्त असेल' हे खरंतर 'भयग्रस्त असेल का?' असं म्हणायचं होतं आणि ते तसंच लिहायला हवं होतं. Happy

आणि इथे समाज म्हणजे आत्ताचा उर्दूभाषिक समाज नसून तो शब्दप्रयोग 'कॉइन' करणारा तत्कालीन समाज अभिप्रेत आहे हे सांगायची आवश्यकता नसावी.

'God be with ye' आणि 'खुदा तुझी "हिफाजत" करो' यात फरक आहे, नाही?

माझा तो शेरा अख्खा एक समाज लेबल करण्याच्या _जनरलायझेशनबद्दल_ होता.

काशीयात्रेस जायला निघताना घरादारावर तुलसीपत्र ठेवणार्‍या तत्कालीन लोकांतही तितकीच भयग्रस्तता होती, असे तत्कालीन समाजवर्णनांच्या वाचनातून वाटते. तेव्हा आवजो, किंवा या, हे 'विशफुल थिंकिंग'ही असूच शकेल ना? Wink

किंवा तत्कालीन भारतीय समाजांत go with god या अर्थाचे काही होते काय, हे पहायला हवे.

मला वाटायचे खुदा हाफिज हे इतक्यात पुन्हा भेटणार नसेल तर (सो लॉन्ग या अर्थाने) जास्त वापरतात. ते गुजरा हुआ जमाना/आता नहीं दोबारा/हाफिज खुदा तुम्हारा वगैरे.

>>> अख्खा एक समाज लेबल करण्याच्या _जनरलायझेशनबद्दल
नाही, असा काही हेतू नव्हता. तरीही अनवधानाने तसं सूचित झालं असेल तर क्षमस्व. Happy

असा काही हेतू नव्हता. तरीही अनवधानाने तसं सूचित झालं असेल तर क्षमस्व. स्मित

<<

अहो, मी कोण क्षमा करणार? मला उद्देशून तरी त्या क्षमस्वची गरज नाहीच.

तुमच्याकडून ते अनवधानानेच झालं असावं असं वाटलं. म्हणूनच ते वाक्य आल्याने थोडा चकित झालो होतो, तेवढे तिथे नोंदवले. त्याने तुम्हास मनस्ताप झाला असेल तर मीच दिलगीर आहे.

हाफीज म्हणजे कुराण मुखोद्गत असलेला.

यात भय कुठे आहे ?

खुदा व कुराण यांचे स्मरण आहे.

तुम्ही रामराम दशग्रंथी असे म्हणा

हाफीज म्हणजे कुराण मुखोद्गत असलेला.

यात भय कुठे आहे ?

खुदा व कुराण यांचे स्मरण आहे.

तुम्ही रामराम दशग्रंथी असे म्हणा

चेम्बुर, वर 'कॉन्टेक्स्ट'बद्दल चर्चा आहे बघा. Happy

प्राण्याची मान कापून टाकून रक्त वाहून जाऊ दिले, की ते मांस हलाल, अर्थात खाण्यायोग्य होते.>> म्हणजे हालच होत नाहीत का. पण रक्तप्रवाह होऊन मेल्यावर खाटकालाही पाप लागत नाही व खाटीक कापतो म्हणुन खाणार्‍यालाही असे ऐकले आहे.

असो. तर

चित्रावती
सरसं
चंबुगबाळं
साटेलोटे (हिंदीत मिलीभगत)

या शब्दांना आहे का प्रतिशब्द इतर भाषात?

कांदेपोहे,

तुम्ही व्हेजिटेरियन का?

खाण्याची भाजी कशी कापली व मीठ लावून निथळत ठेवली, त्याबद्दलच्या तुमच्या हला(हा)ल कल्पना अंमळ करमणूकप्रधान वाटल्या.

बाकी पापपुण्याबद्दलच्या कल्पना जितक्या भाकड असतात, तितक्याच विनोदीही असतात. सगळ्याच संस्कृतींत.

असो. तर,

चित्राहुती देण्याची पद्धत असलेले इतर कल्चर ठाऊक नाही.

सरसं करणे = ठीकठाक करणेच ना?

चंबुगबाळं = लॉक स्टॉक & बॅरल.

साटे-लोटे = मिलीभगत नव्हे.
लग्नं करताना, या घरातली मुलगी त्या घरात, व त्या घरातली या घरात करून घेतली, तर त्याला साटे-लोटे असे म्हणतात.

-.-.-.-

अनिलभौ, खुदा-हाफिज मधला हिफाजत करणारा असावा. कुराण मुखोद्गत वाला नव्हे?

हलाल = अलाऊड. (हराम च्या विरुद्ध) मुस्लिमांत रक्त भक्षण हलाल नाही. तेव्हा, प्राण्याची मान कापून टाकून रक्त वाहून जाऊ दिले, की ते मांस हलाल, अर्थात खाण्यायोग्य होते. >>

हलालच्या विरुद्धा झटका पद्धत आहे कोंबडी, बकरी वगैरे साठी. ,. जिथे मुस्लिमेतर सामिष खाणारी मंडळी आहेत तिथे झटका मट्ण मिळत असे.

मी लहान असताना घरी झटका मटण येत असे. इथे अमेरिकेत मात्र हलाल मटणच पाहिले आहे. माझ्या ओळखीतले बरेच पारशी लोक सुद्धा झटका मटण आणत असत.

कोशर = ज्यू लोकांचे हलाल. त्यांचे नियम वेगळे आहेत. अन यादीही मोठी आहे. त्यांच्यात अगदी मीठही कोशर प्रकारचे असते.

म्हणजे काल इम्प्युरिटी(खरकट्या)बद्दल बोलत होतो तशीच कन्सेप्ट आहे बेसिकली.

नाही. थोडं सोवळ्या-ओवळ्यासारखं आहे. किंवा उपासाला अमुकच चालतं तसं.

हो - उपासाच्या दिवशी इतर (उपासाला न चालणाऱ्या) अन्नाला खरकटं म्हणतात असाही उल्लेख आला होता, त्या अर्थीच म्हणते आहे. for whatever reason, some foods are considered impure/contaminated - for some (limited or otherwise) amount of time.

सही. खरकटला (नॉन) कोशर हा मस्त शब्द. ते काय वाट्टेल ती गोष्ट कोशर करु शकतात जसं आपण वाट्टेल ती गोष्ट उपवासाला चालणेबल करू शकतो.

परवा एका लेखात Atavistic हा एक शब्द वाचला. आणखी माहिती शोधली तर "आधीच्या पिढ्यांमधली एखादी सवय्/गुण ई. एक दोन पिढ्यांच्या गॅप नंतर पुढच्या पिढीत पुन्हा दिसणे" असे काहीतरी दिसते. कदाचित मेडिकल फिल्ड मधे कॉमन असेल हा शब्द, पण रोजच्या वापरात कधी बघितल्याचे आठवत नाही. यालाही चपखल मराठी शब्द नसेल.

द लॉस्ट वर्ल्ड - जुरासिक पार्क मधे तो जेफ गोल्डब्लम त्या मूळच्या पार्क ओनर च्या पुतण्याला (त्याच्या काकाच्या तुलनेत तो कसा मूर्ख आहे हे सांगताना) "Talent skips a generation. I am sure your kids will be great" म्हणतो ते आठवले Happy

"आधीच्या पिढ्यांमधली एखादी सवय्/गुण ई. एक दोन पिढ्यांच्या गॅप नंतर पुढच्या पिढीत पुन्हा दिसणे" असे काहीतरी दिसते>>>> यावरून आठवलं, पुलंच्या गणगोत किंवा अशाच व्यक्तिचित्रांच्या पुस्तकात "गुण तिसर्‍या पिढीत उतरतात असं माझी आजी म्हणायची" असा उल्लेख आढळतो. म्हणजे आजी/आजोबांचे नातवंडात (आई/वडील 'कॅरिअर' असतात) असं. तेच का हे?

मोरेबी असा एक जपानी शब्द आहे. अर्थ - झाडांच्या पानांमधून जमिनीवर सकाळी पडणारं कोवळं ऊन. एका कवितेत हा शब्द ऐकला होता. कविता विसरलो पण हा शब्द लक्षात राहिला. <<< घराच्या छपराच्या छिद्रातून खाली उतरणार्‍या उन्हाला कवडसा म्हणतात. शिवाय फक्त सकाळच्याच उन्हाला असे बंधन नाही. झाडाच्या पानांमधून उतरणार्‍या उन्हालाही मराठीत हाच शब्द वापरतात का? वाचल्यासारखे वाटतेय.

मला वाटते नुसत्या उन्हाला नव्हे तर घराच्या छपराच्या छिद्रातून खाली उतरणार्‍या उन्हाच्या / प्रकाशाच्या झोताला कवडसा म्हणतात.

आरशावरून परावर्तित होणार्‍या उन्हाला / प्रकाशाच्या झोताला पण कवडसा म्हणतात ना!

गुण तिसर्‍या पिढीत उतरतात असं माझी आजी म्हणायची>>

१२ वीला असताना जीवशास्त्रामधे गुणसुंत्रामधे हेच सांगितले आहे. त्यात एक उदाहरण होते, "hair on the pinnae" म्हणजे जर तुमच्या कानामधे केस असतील तर ते तुमच्या नातवामधे सुद्धा असू शकतात पण मुलाच्या कानात असे केस असू शकणार नाही. माझ्या आजीसारखी चेहर्‍याची ठेवण माझ्या भावाच्या मुलीमधे आहे.

ईंग्रजी मधल्या 'थँक यू' ला जसा 'यू आर वेलकम' असा समर्पक प्रतिसाद आहे, तसा मराठी 'धन्यवाद' साठी काही समर्पक, सहजगत्या तोंडात बसेल असा प्रतिसाद आहे का?

'थँक यू' ला जसा 'यू आर वेलकम' असा समर्पक प्रतिसाद आहे >> स्पॅनिश मधे दे नादा ( इट इज नथिंग ) अशी फ्रेज आहे. त्या धर्तीवर कसचं कसचं चालेल का ?

'कसचं कसचं चालेल का ?' त्यात समोरच्याने दिलेले धन्यवाद ग्रेसफुली न स्वीकारल्यासारखं वाटतं.

जितल्या जेन्युईनली काँप्लिमेंट देता यायला हवी, तितक्याच ग्रेसफुली ती घेता यायला हवी. मी ह्या धन्यवाद चा समर्पक प्रतिसाद खूप काळ शोधतोय.

"'मला आनंद आहे' असं म्हणलं तर?" - पुष्कळ जवळ आहे. कदाचित थोडं विस्तारानं, तुम्हाला उपयोग झाला ह्याचा मला आनंद आहे असं म्हणता येईल. धन्यवाद! Wink

Pages