शब्दांतर

Submitted by स्वाती_आंबोळे on 14 June, 2016 - 11:33

एका चिनी शिवीचा अर्थ मराठीत 'वारंवार वेश्यागमन करणारा म्हातारा' असा आहे अशी मजेशीर माहिती घरच्या मँडरीन शिकणाऱ्या विद्यार्थ्याकडून मिळाली. आता मराठीत याला प्रतिशब्द नाही. त्यावरून विचार करत होते, आपण 'नाव' कशाला देतो? नित्याच्या अनुभवांतल्या किंवा सुखदु:खाची काहीतरी अतिशय परिणामकारक अनुभूती देणाऱ्या वस्तू, घटना यांना. (उदा. मृद्गंध - याला इंग्रजीत petrichore असा प्रतिशब्द आहे हे मला अनेक वर्षं माहीत नव्हतं.)

म्हणजे साधं एखाद्या भाषेत nouns कुठली प्रचलित आहेत त्यातही त्या समाजाचं लख्ख प्रतिबिंब दिसतं.
तुमच्या माहितीत असे (कोणत्याही भाषेतले) कुठले शब्द आहेत ज्यांना one-to-one प्रतिशब्द तुम्हाला माहीत असलेल्या दुसऱ्या कुठल्याही भाषेत नाहीत?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओवाळणे- आरती वगैरे
जीव ओवाळून टाकणे वगैरे चांगल्या अर्थाने वापरतात. म्हणजे
बिपिनजी म्हणतायत तसं 'जां निछावर करणे'
यात जीव ओवाळून टाकणारी व्यक्ती (ओवाळून टाकून दिलेल्या भाकरतुकड्यासारखी) आपल्या जीवाची यापुढे पर्वा करणार नसते असा (चांगला)अर्थ होतो.

जो दुसरा ओवाळून टाकलेला शब्द आहे तो म्हणजे 'दृष्ट लागू नये म्हणून ओवाळलेला भाकरतुकडा कुठेतरी लांब फेकून देतात' तसा ओवाळून टाकलेला असतो.
तो वाईट अर्थाने.

आता आरती ओवाळणे आणि भाकरतुकडा ओवाळून काढणे या गोष्टीच ज्या संस्कृतीत नसतील तिथे या अर्थाचे प्रतिशब्द सापडणार नाहीत.

पण त्या अर्थाचे शब्द जसे - आय विल डेडिकेट माय लाईफ फॉर यू
आणि ओवाळून टाकलेला म्हणजे गुड फॉर नथिंग अशा प्रकारचे भाषांतरापुरते चालू शकतील.

मागे - बहुधा वरदानेच - 'कॉन्टेक्स्ट'ला मराठी प्रतिशब्द विचारला होता आणि सापडला नव्हता.

अर्थान्वय = context.
दुर्गाबाईंनी कुठेतरी 'शब्दसंदर्भ' शब्दही वापरला आहे.

अन्वयार्थ... त्या context मध्ये लागणारा अर्थे. अन्वय पुरेसा होईल. अथे कढला तरी अनर्थ होणार नाही.

इंग्रज आल्यावर इंग्रजी हनीमून या शब्दाचे मराठी भाषांतर मधुचंद्र आले का ?

इंग्रज येण्यापुर्वी मराठीत कोणता शब्द होता ?

Reference to context ह्याला मराठीत ससंदर्भ स्पष्टीकरण असे म्हणत शाळेत हे आठवतयं

मस्तच धागा आहे हा. वाचताना टूथपीक घेऊन बसल्यासारखं वाटतंय! इतका उपयोगी आहे.

ससेहोलपट इंग्रजीत कशी समजावून सांगता येईल?
एका मराठी भाषक पण महाराष्ट्राबाहेर वाढलेल्या मैत्रिणीला समजावताना खरंच ससेहोलपट झाली Lol अजूनही जमलेलं नाही. ससेमिरा सांगायला जमलं.

दोन्ही शब्दांचा सशाशी काय संबंध हेसुद्धा सांगता आलेलं नाही मला Sad

ससेहोलपट ही सश्याच्या शिकारीशी संबंधीत असावी का? सश्याची शिकार करताना आधी त्याला झुडुपातून 'उठवतात'. म्हणजे बिळाच्या तोंडाशी धूर करून, आरडाओरडा करून, जमिनीवर काठ्या आपटून वगैरे नाना प्रकारे घाबरवून त्याला बाहेर काढतात आणि मग शिकारी कुत्री त्याच्या मागे झेपावतात. त्याला पाठलाग करून, अडवून, कोंडीत पकडून दमवतात आणि मग कुत्र्यांच्या तावडीत तो सापडतो. यात त्याला जीव वाचवायचा असेल तर जीवाच्या आकांताने धावणे हा एकच मार्ग समोर असतो.

(ससा हा एक वेगवान प्राणी आहे. डोंगरदर्‍यांतून त्याला पकडताना शिकारी कुत्र्यांच्याही तोंडाला फेस आणतो. )

दे माय धरणी ठाय करणे, त्राहि भगवन् करून सोडणे,
बचकभर, ठण ठण गोपाळ, बावन्नकशी, मेषपात्र, काटाकाळजीने, निगुतीने, सव्यापसव्य, पोंगा पंडित, बाल ब्रह्मचारी, सटवाई या शब्दांना इतर भाषांमध्ये प्रतिशब्द असतील तर वाचायला आवडतील.

कलगीतुरा, लावणी, जोगवा, चैती, गवळण (गाणे या अर्थाने), कजरी, ठुमरी या खास शब्दांनाही प्रतिशब्द नसावेत.

मस्त धागा.

ससेमिरा संस्कृत कथा आहे.

कुणाला तरी कुणीतरी कसला तरी शाप देते... तो स से मि रा बडबडत रहातो.

एक ऋषी येउन श्लोक सांगतो. त्यात चार ओळी असतात त्यांची सुरुवात अनुक्रमे स से मि रा असते.. व तो शाप संपतो

http://www.sanskritimagazine.com/indian-religions/hinduism/sasemira-kath...

गजानन, हाल हाल होणे इतपतच माहिती होतं.
अशी करतात सशाची शिकार? मग त्या सगळ्या प्राणांतिक अवस्थेला तो शब्द चपखल बसतोय.

अकु, बचकभरला म्हणजे handful म्हणता येईल का?

ससेमि-याची कथा आहे होय? वाचते.

इथे कळलेले नेमके शब्द लगोलग गुगललाही अ‍ॅड करत जायला हवे. ते काहीही सांगत असतंय त्याच्या मनाचं.

हाल हाल होणे इतपतच माहिती होतं.
अशी करतात सशाची शिकार? मग त्या सगळ्या प्राणांतिक अवस्थेला तो शब्द चपखल बसतोय.>>
हलाल्चे मांस पण याच अवस्थेवर आधारीत आहे ना?

जपानीत कामावरुन किंवा शाळा कॉलेजातुन इतर लोकांच्या आधी घरी निघताता 'ओसाकीनी शित्सुरे शिमास' म्हणतात तसा कुठल्याच भाषेत शब्द नसावा. इतर कुठल्याही ठिकाणी 'leaving early today' किंवा 'क्षमा करा, लवकर घरी जातोय हं' असे म्हणत नसावेत.

अनेक दिवसांनी भेटल्यावर 'ओहिसाशीबुरी' असे म्हणतात जपानीत. आता LTNS वगैरे वापरतात म्हणा.

अनिल, कथा फारच छान आहे. त्या कथेत जी सुभाषिते आहेत त्या सुभाषितांचा अर्थ त्या कथेत दिला असता तर आणखी छान झाले असते. धन्यवाद.

म्हणजे साधं एखाद्या भाषेत nouns कुठली प्रचलित आहेत त्यातही त्या समाजाचं लख्ख प्रतिबिंब दिसतं.>> ह्या धाग्यावर असे शब्द वाचायला मिळतील अशी अपेक्षा आहे.

लावणी, जोगवा, चैती, गवळण (गाणे या अर्थाने), कजरी, ठुमरी या खास शब्दांनाही प्रतिशब्द >>
सिम्फनी, ओव्हर्चर, अ‍ॅलेग्रो, मार्च, étude अशा शब्दांनाही भारतीय भाषांमधे प्रतिशब्द नाहीत.

'ओसाकीनी शित्सुरे शिमास' म्हणतात तसा कुठल्याच भाषेत शब्द नसावा. >. अमेरिकेत दुसरा कोणी लवकर जातोय असं दिसलं की ' बँकर्स अवर्स आहेत का तुझे ' असं म्हणून चिडवतात.

कापो, तसंच प्रत्येक निरोपाच्या वेळी 'ख़ुदा हाफिज़' म्हणणारा समाज किती भयग्रस्त असेल?
'या' / 'आवजो' इ. मध्ये तुम्ही (आणि आम्हीही) सलामत असणार असा विश्वास अंतर्भूत आहे ना? Happy

अशी करतात सशाची शिकार?
<<
सर्वच शिकारी अशाच करतात. अगदी वाघाची देखिल. आधुनिक बंदुकी आल्यानंतर थोडं सोपं झालं होतं, पण भारतात अन जगभरातही शिकारीची हीच स्टाईल होती.

*

हलाल्चे मांस पण याच अवस्थेवर आधारीत आहे ना?
<<
नाही.

हलाल म्हणजे हाल-हाल नव्हेत. Wink हलाल = अलाऊड. (हराम च्या विरुद्ध) मुस्लिमांत रक्त भक्षण हलाल नाही. तेव्हा, प्राण्याची मान कापून टाकून रक्त वाहून जाऊ दिले, की ते मांस हलाल, अर्थात खाण्यायोग्य होते.

याउलट, ख्रिश्चनांत नुसत्या रक्तापासूनही बनवलेले पदार्थ भक्षण करतात, ते हलाल आहेत.

ज्यू लोकांच्या हलाल बद्दल माहिती गूगलवर मिळेल.

*

@ खुदा हाफिज

हे फक्त मुसलमानांत म्हणत नाहीत, तर याप्रकारचे वाक्यप्रयोग अनेक कल्चर्समधे आहेत. अगदी ओळखीचे व "भयग्रस्त समाजाचे" दुसरे उदाहरण म्हणजे "गुडबाय" Wink

Interestingly, Khuda Hafiz and the English term Goodbye have similar meanings. Goodbye is a contraction of "Go(o)d be with ye"

बाकी "भयग्रस्त समाज" ही संकल्पना अशाप्रकारे व या लेखिकेकडून आलेली पाहून गंमत वाटली.

Pages