Submitted by स्वाती_आंबोळे on 14 June, 2016 - 11:33
एका चिनी शिवीचा अर्थ मराठीत 'वारंवार वेश्यागमन करणारा म्हातारा' असा आहे अशी मजेशीर माहिती घरच्या मँडरीन शिकणाऱ्या विद्यार्थ्याकडून मिळाली. आता मराठीत याला प्रतिशब्द नाही. त्यावरून विचार करत होते, आपण 'नाव' कशाला देतो? नित्याच्या अनुभवांतल्या किंवा सुखदु:खाची काहीतरी अतिशय परिणामकारक अनुभूती देणाऱ्या वस्तू, घटना यांना. (उदा. मृद्गंध - याला इंग्रजीत petrichore असा प्रतिशब्द आहे हे मला अनेक वर्षं माहीत नव्हतं.)
म्हणजे साधं एखाद्या भाषेत nouns कुठली प्रचलित आहेत त्यातही त्या समाजाचं लख्ख प्रतिबिंब दिसतं.
तुमच्या माहितीत असे (कोणत्याही भाषेतले) कुठले शब्द आहेत ज्यांना one-to-one प्रतिशब्द तुम्हाला माहीत असलेल्या दुसऱ्या कुठल्याही भाषेत नाहीत?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
रामबाण = एस किंवा ट्रम्प
रामबाण = एस किंवा ट्रम्प म्हणता येईल का?
स्वाती, मस्त धागा. कालच
स्वाती, मस्त धागा.
कालच पर्युत्सुक हा श ब्द वाचण्यात आला. ह्याचा इंग्लीश पर्याय काय होईल? खरं तर मराठीतही ह्याला समांतर शब्द
हवा आहे.
aroused?
aroused?
' aroused ' म्हणजे '
' aroused ' म्हणजे ' उद्दीपित' असा अर्थ वाटतो.
' पर्युत्सुक ' मधल्या उत्सुकतेत एक प्रकारची हुरहुर असावी असं वाटतं. ती ' aroused ' मधे नाही दिसत.
हो, बरोबर आहे. विचार करते
हो, बरोबर आहे. विचार करते आहे.
मस्तच आहे हा धागा. आपल्या
मस्तच आहे हा धागा.
आपल्या देशात पावसाळ्याचं महत्त्व अतिशय. त्यामुळे त्याचे अनेक संदर्भ येतात.
चिंब भिजणे, न्हाऊन निघणे .... इथे पाण्यानंच नव्हे तर स्वरांनी, आनंदानी, स्तुतीनी असं काही असू शकतं. कारण (पावसाच्या) पाण्यात भिजल्यावर मिळणारा आनंद आणि तृप्ती या वाक्प्रचारांत आहे.
मी इतके पावसाळे पाहिलेत हे वाक्यही तसंच. पावसाळ्यांचा अनुभव आहे हे महत्त्वाचं अधोरेखित करणारं.
पर्युत्सुक चा अर्थ काय
पर्युत्सुक चा अर्थ काय आहे?
इथे very anxious or curious म्हटलंय. (पान १०४४)
इथे
हळूहळू किनाऱ्यावर संध्याछाया पसरायला लागल्या. सायप्रस वृक्षांच्या आकृती आता हळूहळू छायाकृतीसारख्या झाल्या. कातरवेळेला असे काही खूप सुंदर पहिले कि एकाएकी मनाला उदासी का वाटते, कळत नाही. पाहता पाहता सारे अंधारात बुडून जात असल्याची अनुभूती माणसाच्या जीवनाच्या अखेरच्या त्या अटळ अंधाराचे नकळत स्मरण करून देते काय कळत नाही. कालिदासाचा “पर्युत्सुक” शब्द हि भावावस्था दाखवतो. पण अबोधपूर्व न्युनाच्या स्मरणापेक्षा अंतिम निरोपाच्या क्षणाच्या स्मरणाची ती उदासी असावी! कोण जाणे!
– पु. ल. देशपांडे (“जावे त्यांच्या देशा” मधून )
स्वाती प्रणयोत्सुक म्हणत्येय का?
स्वाती, अमितव, धन्यवाद!
स्वाती, अमितव, धन्यवाद!
अमितव, मला हे आठवत होतं. म्हणून मीही पुस्तक काढून वाचलं. पण ते वर्णन "पर्युत्सुक" शब्दाच्या अनुषंगानी येणार्या भावावस्थेचं वर्णन आहे. त्या शब्दाला पर्यायी मराठी/इंग्लीश शब्द शोधतीय.
ओह मग माझ्या डोक्यात चुकीचा
ओह मग माझ्या डोक्यात चुकीचा अर्थ घर करून बसला होता तर.
शब्दकत्नाकरात शोधला, पण पर्युत्सुक सापडला नाही.
व्याकुळ म्हणता येईल का?
पर्युत्सुक = प्रिमनिशन?
पर्युत्सुक = प्रिमनिशन? (पुलंच्या उतार्याच्या आधारे)
मस्त! माझे आवडते काही जर्मन
मस्त!
माझे आवडते काही जर्मन शब्दः
- Fernweh- फेर्नवे- अत्ता ह्या क्षणी आपण दुसरीकडे असावं अशी भावना किंवा इच्छा. साधारण होम सिकनेसच्या विरुद्धार्थी.
- Kummerspeck- stress eating मुळे वाढलेलं वजन
- Treppenwitz- त्रेपन्विट्झ- एखादा संवाद किंवा चर्चेनंतर सुचलेला प्रतिवाद
- Schadenfreude- शाडनफ्रॉईडS- दुसर्याच्या दुर्दॅवातून झालेला आनंद
"दैवदुर्विलास" ह्याला असेल का
"दैवदुर्विलास" ह्याला असेल का काही शब्द इतर भाषांत!
- Schadenfreude- शाडनफ्रॉईडS-
- Schadenfreude- शाडनफ्रॉईडS- दुसर्याच्या दुर्दॅवातून झालेला आनंद>>
रसायन, अशा आनंदाला आपण विकृत आनंद म्हणतो. ईंग्रजीमधे Sadistic pleasure किंवा to gloat असे दोन शब्द आहेत.
स्वाती, व्याकुळ पण परत
स्वाती, व्याकुळ पण परत भावावस्थेचंच वर्णन आहे. त्यात उत्सुकता नाहीये. असो. खूप आवडला हा धागा.
राज, तुम्ही दिलेला शब्द माहितीचा नाहीये. बघायला लागेल.
To miss something or someone
To miss something or someone ह्याला मराठीत प्रतिशब्द काय? मला सापडला नाही.
To miss something or someone
To miss something or someone - पोकळी जाणवणे होऊ शकेल
जिज्ञासा, अभाव,
जिज्ञासा, अभाव, अनुपस्थिती
अमुक व्यक्तिचं "नसणं" ( न असणं) असं पण म्हणतात.
आखाड
आखाड सासू,
डुचकी
आगाऊ
शिष्ट
भंपक
कुर्रेबाज
नखरेल
सारवासारव
दळण
कुजकट( स्वभावाला उद्देशून)
कोकणात घाण वासाला पण ५ - ६ शब्द आहेत असे पुलंच्या एका लेखात वाचले आहे.
एस्किमो भाषेत स्नो ला
एस्किमो भाषेत स्नो ला समानार्थी २०-२२ शब्द आहेत असं वाचलं होतं >>> एस्किमो लोकांच्या प्रदेशात अनेक भाषा बोलल्या जायच्या - निदान १५-१६ तरी. त्या सगळ्या भाषा प्रामुख्याने दोन भाषा कुळांत मोडतात तरी त्या भिन्न भाषा आहेत. त्या सगळ्या भाषांत मिळून २०-२२ शब्द असतील तर ते फार नाहीत.
एस्किमोंच्या भाषा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत कारण बहुतेक नवीन पिढी इंग्रजी अथवा इतर युरोपिअन भाषा वापरू लागली आहे. मध्यंतरी एस्किमोंच्या लोककथांचे (भाषांतरीत) पुस्तक वाचले. त्या कथा फारशा आवडल्या नाहीत पण लेखकाने त्यांच्या भाषांबद्दल खूप माहिती दिली होती.
मनी (MONEY) या शब्दाला
मनी (MONEY) या शब्दाला समानार्थी शब्द मराठीत काय आहे?
आपण याला जवळचे इतर शब्द वापरतो पण त्यांचे अर्थ वेगळे आहेत.
जसे की,
चलन = करन्सी
रुपया = भारताचे चलन
पैसा = रुपयाचा शंभरावा भाग
रक्कम = अमाऊंट
धन = वेल्थ
मग मनी (MONEY) या शब्दाला समानार्थी शब्द मराठीत काय आहे?
मनी: पैसे? ( कलेक्टिव्ह
मनी: पैसे? ( कलेक्टिव्ह नाउन. ) माझ्याकडे पैसे नाहीत. पैसे भरले का? ह्यातले?
अमा, पण मनीचा शब्दशः अर्थ
अमा, पण मनीचा शब्दशः अर्थ पैसे होत नाहीना? पैसा हे तर चलन आहे.
रावसाहेब मधलं वाक्यं आहे. "
रावसाहेब मधलं वाक्यं आहे.
" रेडीयोवर सतारीवर काहीतरी वाजू लागतं. पर्युत्सुक करणारा स्मृतीगंध [?] दरवळू लागतो. त्यांच्या लेडी सितारीष्टची आठवण होते"
त्यावरून
पर्युत्सुक म्हणजे मिसिंग समवन , असा अर्थ मी घेतला होता.
स्वाती धागा आवडला.
money = रोकड ?
money = रोकड ?
नाही माधव, रोकड = रोख = कॅश
नाही माधव,
रोकड = रोख = कॅश (CASH)
http://sanskrit_english.enaca
http://sanskrit_english.enacademic.com/20399/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D...
इथे पर्युत्सुकचा अर्थ
पर्युत्सुक _paryutsuka
पर्युत्सुक a. Sorrowful, sorry, regretting, sad; ˚त्वम् sorrow; R.5.67; पर्युत्सुकीभवति यत् सुखितो$पि जन्तुः Ś.5.2 (v. l.).
-2 Eagerly desirous, anxious, anxiously longing for; स्मर पर्युत्सुक एष माधवः Ku.4.28; V.2.16.
-3 Agitated, excited; मुहूर्तं पर्युत्सुकमना आसीत् Ś.6.
असा दिला आहे.
मराठी मध्ये ज्याला अपण खरकटे
मराठी मध्ये ज्याला अपण खरकटे म्हणतो त्याला इंग्रजी मध्ये प्रतिशब्द नाही असे ऐकले होते.
अय्या, ईश्य्यं हे आणि असे
अय्या, ईश्य्यं हे आणि असे उद्गारवाचक शब्द
आतागंबया, अगंबाई
मेल्या , मुडदा बशिवला तुजा
एस्किमोंच्या भाषा नामशेष
एस्किमोंच्या भाषा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत कारण बहुतेक नवीन पिढी इंग्रजी अथवा इतर युरोपिअन भाषा वापरू लागली आहे. मध्यंतरी एस्किमोंच्या लोककथांचे (भाषांतरीत) पुस्तक वाचले. त्या कथा फारशा आवडल्या नाहीत पण लेखकाने त्यांच्या भाषांबद्दल खूप माहिती दिली होती.>> माधव ह्या पुस्तकाचे नाव लिहा आठवत असेल तर.
मराठी मध्ये ज्याला अपण खरकटे म्हणतो त्याला इंग्रजी मध्ये प्रतिशब्द नाही असे ऐकले होते.>> leftover food = उरलेले अन्न किंवा ताटात टाकलेले अन्न अर्थात खरकटे.
काल किंवा परवा मटा मधे एक लेख
काल किंवा परवा मटा मधे एक लेख होता. काहीतरी एक जपानी शब्द आहे (तो विसरले
) ज्याचा अर्थ म्हातारपणी एकट्याने / एकाकी अवस्थेत आलेले मरण असा काहीसा आहे.
मला वाटते मराठीधे असा काही समानार्थी शब्द नाही.
Pages