शब्दांतर

Submitted by स्वाती_आंबोळे on 14 June, 2016 - 11:33

एका चिनी शिवीचा अर्थ मराठीत 'वारंवार वेश्यागमन करणारा म्हातारा' असा आहे अशी मजेशीर माहिती घरच्या मँडरीन शिकणाऱ्या विद्यार्थ्याकडून मिळाली. आता मराठीत याला प्रतिशब्द नाही. त्यावरून विचार करत होते, आपण 'नाव' कशाला देतो? नित्याच्या अनुभवांतल्या किंवा सुखदु:खाची काहीतरी अतिशय परिणामकारक अनुभूती देणाऱ्या वस्तू, घटना यांना. (उदा. मृद्गंध - याला इंग्रजीत petrichore असा प्रतिशब्द आहे हे मला अनेक वर्षं माहीत नव्हतं.)

म्हणजे साधं एखाद्या भाषेत nouns कुठली प्रचलित आहेत त्यातही त्या समाजाचं लख्ख प्रतिबिंब दिसतं.
तुमच्या माहितीत असे (कोणत्याही भाषेतले) कुठले शब्द आहेत ज्यांना one-to-one प्रतिशब्द तुम्हाला माहीत असलेल्या दुसऱ्या कुठल्याही भाषेत नाहीत?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मेधा | 14 June, 2016 - 11:27
जर्मन मधे पूडेल नास अशी फ्रेज आहे. पुडल कुत्री पावसात भिजली की त्यांची फर भिजून जटांसारखी दिसते तसे आपण चिंब ओले केस म्हणू . जर्मन शिकल्याला आता चाळीस एक वर्षे झाली, पण ती फ्रेज अजून आठवते आहे.

पॅलिम्प्सेस्ट याला पण मराठीत नेमका प्रतिशब्द नाही, कारण आपल्याकडे ती पद्धतच नाही.

पेट्रिकोअर (असाच असावा बहुधा उच्चार) मलाही माहीत नव्हता. मुळात तो कन्सेप्ट इतर ठिकाणी आहे हेच माहीत नव्हते.

पेट्री - हा शब्दाचा भाग दगड या अर्थाने वापरला गेलेला पाहिला आहे (पेट्रिफाईड). इथे तो माती या अर्थाने वापरलेला दिसतो.

म्हणजे साधं एखाद्या भाषेत nouns कुठली प्रचलित आहेत त्यातही त्या समाजाचं लख्ख प्रतिबिंब दिसतं. >. एस्किमो भाषेत स्नो ला समानार्थी २०-२२ शब्द आहेत असं वाचलं होतं. इंग्रजीत फक्त स्नो, स्लीट, फ्रॉस्ट, आइस, हेल एवढे(च) शब्द आहेत. मराठीत बर्फ, हिम ( हा काही एवढा बोली भाषेत वापरला जाणारा नाही ) आणि गारा.

कोकणी भाषिक लोकांमधे 'लेप' म्हणून एक शब्द आणि कन्सेप्ट आहे. उष्टं , खरकटं, याच्या पलिकडे - जेवणं चालू असताना जेवणार्‍यांनी उजव्या हाताने पाणी प्यायलं की लेप, कुठल्याही भांड्यातून काही स्वतः वाढून घेतलं की लेप. एवढंच नव्हे तर वाढणार्‍याने भाताचे प्रकार वाढले की पण लेप. मग त्या वाढणार्‍याने / वाढणारीने डाव्या हाताने तांब्यातलं पाणी उजव्या हातावर शिंपडायचं. मग लेप गायब ! मगच दुसरे काही पदार्थ वाढायला घ्यायचे.

पणजी, आते मामे मावस भावंडांच्या आज्या यांच्या जमान्यात एकदम कटाक्षाने चालत असे हे सर्व. आता आई, मावश्या, काकू, आत्या वगैरे कोणी हे पा़ळत नाहीत. अगदी देवळातल्या लग्नात सुद्धा पंगतीत वाढणारे लोक भात वाढल्यानंतर हातावर पाणी घेत नाहीत.

मेधा, हे लेप म्हणजे आपलं ज्युवेनाइल अंगोटी/खाजोटी असलं काहितरी होतं त्याचं प्रौढ, सोवळं ओवळं व्हर्जन वाटत आहे Happy

इंटरेस्टिंग चर्चा.
लेप नाही, पण उष्ट्या हाताने काही वाढलं, खरकटे हात उपासाला चालणाऱ्या पदार्थाला लावले की ओरडा अनेकवेळा खाल्लेला आहे. म्हणजे मराठीतही ही/ अशीच पद्धत आहे. पण कुणास ठावून कन्सेप्ट/ शब्द तयार नाही झाला.

>> म्हणजे साधं एखाद्या भाषेत nouns कुठली प्रचलित आहेत त्यातही त्या समाजाचं लख्ख प्रतिबिंब दिसतं. >> हे कदाचित असेलही खरं पण खूपच लवकर अनुमान काढलं असं वाटलं.

कोमोरेबी असा एक जपानी शब्द आहे. अर्थ - झाडांच्या पानांमधून जमिनीवर सकाळी पडणारं कोवळं ऊन. एका कवितेत हा शब्द ऐकला होता. कविता विसरलो पण हा शब्द लक्षात राहिला.

फ्रेंच भाषेत काही मस्त शब्द आहेत.

तार्तिने (tartiner) = ब्रेडवर लोणी किंवा जॅम पसरवणे.
ला दुलर एक्स्क्विझ (हे आम्ही क्लासमध्ये नेहमी वापरायचो) = जी व्यक्ती कधीही आपलं प्रेम स्वीकारणार नाही, अशा व्यक्तीवर प्रेम बसणं.
रत्रुव्हाय - आवडत्या व्यक्तीला खूप दिवसांनंतर भेटणे.
याऊर्ते = गाणं येत नसल्यास ला ला ला ला करत गाणे.

मला ते अनुमान पटले. म्हणजे त्या समाजाला "जज" करण्याकरता अशा अर्थाने नव्हे. त्या समाजाची संस्कृती, नेहमीच्या लाईफ मधल्य कोणत्या गोष्टींना महत्त्व आहे वगैरे. अगदी नॉन-जजमेण्टल. उष्टे हा कन्स्पेट भारतात सर्रास पाहिला आहे, तेथे तो भाषांमधे दिसतो. इतर अनेक ठिकाणी नाही. हे एक उदाहरण

>>> रत्रुव्हाय - आवडत्या व्यक्तीला खूप दिवसांनंतर भेटणे.
भरतभेट?

अमित, जजमेन्टल अजिबातच नाही. त्यात सामाजिक / (वर शोनूने उदाहरण दिल्याप्रमाणे) भौगोलिक आणि असे अनेक पॅरामीटर्स असतात ना?

भरतभेट आपण प्रियकर-प्रेयसी किंवा नवरा-बायको यांच्यासाठी वापरू का? म्हणजे, आपण वापरू, असं वाटत नाही. 'रत्रुव्हाय' या शब्दामध्ये खूप दिवसांनंतर भेटल्याच्या आनंदाचा भाव आहे.
भरतभेट या शब्दामागे विशिष्ट कथा आणि नातं असल्यानं मला तो चपखल वाटत नाहीये.

>>> प्रियकर-प्रेयसी किंवा नवरा-बायको यांच्यासाठी वापरू का? म्हणजे, आपण वापरू, असं वाटत नाही.
Lol
मान्य! Happy

लग्न समारंभात किंवा एरवी देखील अनेक लोकांना एकावेळी एका जागेवर शिस्तीत गोळा करणे याला कोकणीत बेब्या तुलाभार ( बेडकांचा तुलाभार ) म्हणतात. दोघां तिघांना एकत्र करे पर्यंत कोणीतरी सटकलेलं असणार. इंग्रजीत हर्डिंग कॅट्स अशी फ्रेज आहे . पण मला तरी बेब्या तुलाभार जास्त मजेशीर वाटते .
अर्थात तुलाभार याला सुद्धा चपखल इंग्रजी शब्द नाही बहुतेक

"ती भाजी खा"
"सकाळी खाल्ली की!"
"मग काय उपकार केले का?"

मधला जो 'उपकार' चा वापर आहे त्याला चपखल शब्द इतर भाषांत आहे का? Happy

favor! रोज वापरावा लागत असल्यामुळे माहीत आहे! Proud
किंवा भाजी खायचं अनिच्छेने का होईना मान्य केल्यावर 'आॅब्लाइज्ड!' असं म्हणायचं. Proud

ऋणानुबंध - eternal bond (सेरेमोनी ऑफ ईटर्नल बाँडिंग म्हणजे लग्नंगाठ असं कुठे तरी वाचलं होतं आणि त्यावरून ऋणानुबंधांच्या तुटून पडल्या गाठी ही आठवल्याचं नक्की)

वाह! आजच petrichore वापरला एकाला मृदगंध म्हणजे काय हे समजावताना आणि इथे लगेच हाच शब्द सामोरा आला. सांस्कृतिक संदर्भ असलेले अनेक शब्द असतात ज्यांना प्रतिशब्द मिळू शकत नाही. परवा मला वाटतं मायबोलीवर कुठेतरी मेधाने (बहुतेक) टचवूड चा अर्थ सांगितला जो मला माहिती नव्हता! तसं मग रामबाण उपाय, कृष्णनीती असे शब्द सुचत आहेत!
गंमत म्हणजे माझ्या डोक्यात परवाच असं आलं की हे असले dated संदर्भ कितीतरी शब्दांना आहेत आपल्याकडे!
यक्षप्रश्न, झारीतले शुक्राचार्य, तिलांजली, अर्घ्य, जानवे, मोक्ष इत्यादी इत्यादी.

मस्त आहे हे. सध्या एका नाटकाच्या भाषांतराचं काम चालू आहे. त्यात असे प्रश्न पडताहेत, कारण फारच रीजनल रेफरन्सेस आहेत नाटकात. उदा 'फोडणीचा ठसका'

Pages