पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१

Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर

या ठिकाणी
आणि या ठिकाणी

अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोल्हापुरी मटणाच्या लोणच्याबद्दल खुप वाचलेय. कोणाला माहित आहे का त्याची पाकृ????

जामोप्या, कुसकुस गव्हापासून करतात. साधारण रव्यासारखे दिसते. कोमट ते गरम पाण्यात ते भिजवून मग वाफवावे लागते. ते इतर भाज्या वा सलादमधे घालून खातात. ( पण त्यापेक्षा आपला रवा वापरणे, आपल्याला जास्त सोपे जाते )

शेल पास्ता आणि बो पास्ताच्या वेज रेसिपी कुणी सान्गेल का? सगळ्या पस्तामध्ये अन्डे असतेच का? काही काही वर तसे लिहिलेले असते....
पास्ता रेसिपीसाठी कसा तयार करायचा? किती वेळ शिजवायचा?

आजच व्हाईत सॉस मधला पास्ता केलाय मी. इथे आहेत बर्‍याच कृति.
सगळ्या पास्ता मधे अंडे नसते. ( सहसा घटक असतात डुरम व्हीट आणि मीठ )
पास्ता किती वेळ शिजवायचा तेही पाकिटावर लिहिलेले असते. वेळ साधारणपणे ८ ते १० मिनिटे असते.
कमीही असू शकते.
उकळत्या पाण्यात मीठ टाकून तो शिजवायचा असतो, पाणी भरपुर्‍ लागते. मग शिजला कि पाणी ओतून टाकायचे. थंड पाण्यातून काढायचा, परत निथळायचा. मग थोडे तेल लावून ठेवायचा.
सॉससकट पास्ताची पाकिटे मिळतात.

स्वाती
मी नेहमी करते तिरामीसु, हवी असेल तर लिहीते थोड्या वेळाने. फक्त फोटो नाहीयेत माझ्याकडे. टाकायला

हाय,
रवीवारी मला एका पिकनीक साठी पास्ता सॅलॅड न्यायच आहे. नेहमीच मेयो घालुन केलेल कोल्ड आणि टॉम-बेसिल घालुन केलेल वॉर्म सोडुन काहितरी नविन सुचवाल का?

तू पेस्टो घालून पोटॅटो सॅलड ,पास्ता सॅलड (विकतची रॅविओली आणून पेस्टो घरी बनवून) करून घेवून जावू शकतेस. कोल्ड ,वार्म कसेही चालू शकेल(पळेल). Happy

खूसखूस सॅलडओरझो सॅलड हे सुद्धा मस्त आहे. ह्या दोन्हीची रेसीपी नो कटकट आहे व सेम आहे. ह्यात सेलेरी, रेसीन्स्,बेसील,कांदा मस्त लागते.

धन्स ग मनु आणि एमबीजपान.
एम बी तुझी रेसिपी चांगली वाटत्येय. पण कच्च्या कांद्याला वास येइल ना? कांद्याशिवाय बर लागेल का?

मनु तुझी रॅविओली ची आयडिया मस्त.

लाजो म्हणूनच कच्चा कांदा आवडत नसेल तर वगळला तरी चालेल असे लिहिले आहे.
आणि कांद्या शिवाय पण छान लागते हे सॅलड.मला पण कच्चा कांदा आवडत नाही. मी नेहेमीच बिना कांद्याचे करते आणि छान लागते.
--मानसी

मटणाचे लोणचे करताना अर्धा किलो मटण, हळद, मीठ आणि थोडे पाणी घालून शिजवून घे.सुकेखोबरे, तीळ, आणि खसखस कोरडीच भाज. खोबरे हाताने कुस्कर व त्यात तीळ, खसखस, गरम मसाला,हळद, तिखट, मीठ, आले-लसणाची पेस्ट आणि कोथिंबीर घालून मिक्स कर.मटण शिजल्यावर ते काढून घेऊन, कढईत तेल घालून थोडे थोडे मटण घालून तळून घे.नंतर तळलेले मटण आणि वरील सर्व मसाला घालून त्यावर लिंबू पिळ व त्यावर कोथिंबीर घाल. मग खा. कसे झाले ते सुद्धा सांग... Happy

मला अर्जंट मदत हवी आहे. मला खव्याच्या करंज्या करायच्या आहेत. त्यासाठी खव्याचे सारण कसे करायचे? आणी जर बेक्ड करंजी करायची असेल तर ते कसे करायचे? पिल्सबरीची आयडीया छान आहे पण त्यासाठी बाजारात जावे लागेल मागे इथे काहीतरी वाचले असे वाटते आहे . कोणाला माहीती असेल कॄपया लिंक द्यावी.

http://www.maayboli.com/node/9776

इथे प्रीतीने लिहिलेल्या करंज्या आहेत सारण तसे करता येईल. तिथेच खाली पायक्रस्ट घरी कसा करता येईल त्याची मी दिलेली लिंक आहे ती पहा!

मदत हवी आहे...
माझ्याकडे १ पाहुणी आलीये राहायला,ती कान्दा लसूण आणि मिरची/लाल तिखट हे खात नाही.
तिच्या साठी रोज काय भाज्या कराव्यात ते सुचतच नाहीये, प्लिज सुचवाल मला.
तोषवी.

स्वाती_राजेश,

हा धागा फक्त पाककृती विचारण्यासंबंधी आहे; कृपया "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरुन कृती लिहा. या बा.फ. वर पाककृतींबद्दल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे, कृती लिहीण्यासाठी हा बा.फ. अयोग्य आहे.

धन्यवाद,
मदत समिती.

उसळी करता येतील, पालेभाज्या करता येतील, वरणांचे वेगवेगळे प्रकार, पालेभाजी+डाळ असे प्रकार करता येतील करता येतील. सगळ्यात कांदा/लसून घातला नाही तरी पण करता येतात की या सगळ्या गोष्टी. तसच खोबरे+कोथिंबीर, टोमॅटो प्युरी, चिंच, गूळ, कोकम, आमचूर असे वेगवेगळे पदार्थ भाज्यात घालता येतील स्वाद आणि चवीसाठी. हिरवी मिरची चालत असेल तर ती वापरता येईल.

मिरची आपल्याकडे येण्यापुर्वी, सुंठ, आले, मिरी व पिंपळी यांचा वापर होत असे.
जिरे, मिरी, लसुण व हिन्ग वापरुन बरेच प्रकार करता येतात. भाज्या नुसत्या वाफवून वरुन चाट मसाला, दहि वगैरे घालता येते. सलाद तर अनेक प्रकारे करता येतात.

स्वाती धन्यवाद.. रविवारी करते आणि सोमवारी कळवते तुला...

वेगळा धागा काढुन लिहिलस तर इतरांनाही लगेच्च सापडेल.

कांद्याच्या लोणच्याबद्दल ऐकलं आहे. कोणी कृती देवू शकेल काय? गावाकडून अर्धी गोणीभरून अगदी छोटे छोटे कांदे आले आहेत. थोडे कांदे व्हिनेगरमध्ये घालून ठेवलेत. बाकीचे सध्यातरी स्टोअरमध्ये पसरवून ठेवले आहेत. अजून काही करता येईल का? अनायसे भरपूर कांदे उपलब्ध आहेत. Happy

मिनोती, आहेस का ? मला ती अ‍ॅपल क्रिस्पची लिंक देतेस का शोधुन ?

अल्पना, कांद्याला मधुन आडवे -उभे काप दे. मसाल्यासाठी तयार लोणचं मसाला त्यात कैरीचा किस मिक्स करुन कांद्यात भरायचा आणि वरतुन गरम करुन गार केलेले हिंगाचं तेल घालायचं. तयार मसाला नसेल तर मोहोरीची पुड, तिखट, मीठ, हळद, थोडी मेथ्याची पुड मिक्स करुन घे.

ह्यातले काही कांदे ठेचून कडकडीत उन्हात वाळवून घ्यावेत. हवे तेव्हा तेलात तळून मसाल्यात, रश्श्यात वापरता येतात.

Pages