धाग्यावेताळाचे धागे काढणे - हक्क की हट्ट?

Submitted by बिपीन चन्द्र हर... on 30 April, 2016 - 09:27

शीर्षकच पुरेसे बोलके आहे. फारसे काही लिहून कोणाच्या भावना दुखावण्यात अर्थ नाही. पण तरीही लिहितो.

मागे जेव्हा धाग्यावेताळाने " गर्लफ्रेंड्सना आपला मोबाईल चेक करायची परवानगी द्यावी का?" असा धागा काढला तेव्हा त्याचे कौतुकच वाटलेले. अर्थात त्याच्या हेतूबद्दल खात्री नव्हती पण तरीही काम धाडसाचेच होते आणि बंडखोरी मला नेहमीच आवडत आलीय.

मात्र सध्या धाग्यावेताळाकडून जे काही चालू आहे त्यात त्याचा काय हेतू आहे, आणि त्याला काय साध्य करायचे आहे, हेच समजेनासे झालेय.

धाग्यावेताळाला या संकेतस्थळावर कैक हक्क नाकारले जातात. कित्येक लेखांवर प्रतिक्रिया देण्यासारख्या जीवनावश्यक बाबींमध्ये त्याला समानतेची वागणूक मिळत नाही. त्याला बाळ, धागा हायजॅक करणारा, प्रत्येक धाग्यावर शाहरुख, सई, गर्ल्फ्रेंड व स्वप्नील (मला तर कधी कधी हे चौघे याच्याकरिता एकच आहेत अशी शंका येते) यांच्यापैकी कुणाही एकाला अथवा सर्वांना धाग्यावर आणणारा, एमेन्सीत काम करुनही कच्चे इंग्रजी असणारा, हाल्फ, फुल्ल असे चक्रावून टाकणारे उच्चार लिहिणारा अशा विशेषणांनी गौरविले (?) जाते. अशा वेळी त्याने केवळ अट्टहासाने नवनवीन विषयावर धागा काढण्याच्या हक्कासाठी लढणे तितकेच गरजेचे आहे का हे मला समजत नाही.

कायद्याच्या समानतेनुसार कोर्ट नक्कीच असा निर्णय देणार की तुम्ही बनियन, मोजे आठवडा आठवडा न धुता तसेच घालण्याचे स्वातंत्र्य तुम्हाला जरूर आहे. पण जर तुम्ही एखादी समाज व्यवस्था मानता, त्या समाज व्यवस्थेच्या चालीरीती आणि परंपरा मानता तर त्याविरुद्ध जाण्यातही काय अर्थ आहे. किंबहुना जे पुरुष या प्रथापरंपरांना मानतात ते या बाबतीत समाजव्यवस्थेच्या विरुद्ध जाऊन या बनियन न धूता नेसण्याची मागणी करणारच नाहीत. मग हा हक्क बनियन न नेसणार्‍या पुरुषांनी मागितला आहे का? आणि तसे असल्यास त्या पुरुषांचा या प्रथांवर विश्वासच नसेल तर त्यांना हा हक्क घेऊन करायचे तरी काय?

आज संध्याकाळी मी एका मित्राच्या घरी गेलो होतो. टीव्ही चालू होता. बातम्या लागल्या होत्या. दिवसभर दुचाकीवरील पाठीमागच्या व्यक्तिलाही हेल्मेटसक्तीसंदर्भाने जो गदारोळ झाला त्याच्याच बातम्या होत्या. मित्राचे बाबा म्हणाले, "या पोरांना काही अक्कल नाही का? या आपल्या मोटर वाहन कायद्याची जी कलमे आहेत ती यांना का मोडायची आहेत? बाकी कामधंदे नाहीत का?"

मी त्या वेळी मुद्दामच मित्राकडे तिरप्या नजरेने पाहिले. तो काही बोलला नाही. पण त्याचा चेहरा सांगून गेला की त्याला आपल्या वडिलांचे बोलणे पटले नव्हते. त्या वक्तव्यावर तो नाराज होता. कायदेभंगाची एक हलकीशी ठिणगी पडली होती. पण चुकीच्या कारणासाठी किंबहुना अनावश्यक हक्कासाठी.

समजा जर त्या मित्राच्या वडीलांनी दुचाकीवरून तीन जणांनी फिरण्याबाबत असे उद्गार काढले असते की दुचाकीवर तीन जणांनी बसून जायची गरज आहे का वगैरे तर मी देखील तिथल्या तिथे ते विधान खोडून टाकले असते. त्यावर त्या मित्राच्ने विरोध दर्शवला असता तर पाठिंबाच दिला असता. पण या केसमध्ये स्त्री-पुरुषांनी एकत्र मोटरसायकलवर हेल्मेटखाली चेहरा लपवित फिरण्याचा मुद्दा घेत मला त्या मित्राच्या नाजूक भावना दुखावण्यात फारसे तथ्य जाणवले नाही.

अर्थात हा माझा विचार झाला. एक पुरुष म्हणून. हा विचार चुकीचाही असू शकतो. स्त्रिया याकडे कश्या बघतात ते स्त्रियांनाच ठाऊक.

या फोरमवर माझ्या ओळखीची एकही स्त्री अथवा पुरुष नसल्याने इतर सदस्यांचे मत जाणून घेण्याकरिता हा धागा काढला.

तर मुद्दा असा की, उठसूट कुठल्याही आलतू फालतू विषयावर धाग्यावेताळाचे धागे काढणे - हा त्याचा हक्क की (बाल) हट्ट?

संदर्भः-

http://www.maayboli.com/node/58218

http://www.maayboli.com/node/58499

http://www.maayboli.com/user/57027/created

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा. ऋन्मेषवरच धागा आलाय. अभिनंदन ऋ!!!
तुम्हाला मायबोलीचे शारुक, स्वप्नील, सई यातला एक किंवा अनेक किंवा सगळे किताब देण्यासाठी सर्वेक्षणाचा धागा काढण्याची मी तुमच्या खर्याखुर्या fan & follower ला आग्रहाची विनंती करतो.

हा हा कापोचे नाही. ते माझ्यापेक्षाही जुने माबोकर आहेत Happy

लिहिलेय चांगले, निरीक्षण अचूक म्हणून कौतुक ईतकेच !

साखळी खेचून गोंगाट करणार्‍या प्रवाशाला खाली उतरवायचा किंवा त्याला गप्प करायचा प्रयत्न करतो.
अमका तमका गोंगाट करतोय असा त्याच्यापेक्षा वरच्या आवाजात , तेही समूहाने कल्ला करतो.

Wink

तुsssssssssssssssssssफान गर्दी असेल तर रेल्वे सोडतो, आणी नुसताच गोंगाट असेल तर डब्बा बदलतो.

दारू प्यालेल्यास उतरवता येतं.आपण जोरात गोंगाट करण्यापेक्षा कानाला हेडफोन्स लावले तर काम सोपं होतं.

चांगले धागे खाली जातात टाईप बोंब मारणारे चांगल्या, हटक्या विषयावर स्वतः हजेरी लावत नाहीत. असे अनेक धागे अनेकदा वर काढले गेले तरी ते त्याच वेगाने लुप्त होतात. धागा कुणाचा आहे यावर पण त्यावर हजेरी लावायची कि नाही हे ठरवणारे महाभाग मायबोलीवर आता यावंसं वाटत नाही हे वाक्य दर तीन दिवसाआड आळवताना दिसतात.

पाणी प्रश्नावर धागा काढला तर एकही महाभाग तिकडे फिरकला नाही. म्हणूनच बनियान वाला धागा काढला होता. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे इथून पुढे जर कुणी मायबोलीवर यावेसे वाटत नाही, अमूक तमूक धागे निघावेत का अशी बोंबाबोंब केली की त्यांना अनेक धाग्यांची यादी देऊन त्यावर अनुपस्थितीची कारणे विचारावीत अशी विनंती माननीय प्रशासक / प्रशासकीय समिती यांच्याकडे करत आहे. उठसूठ रडत बसायचं याला काही अर्थ नाही.

ऋ, चांगले लिहतो.
मला त्याचे धागे वाचायला आवडतात त्याने धागे काढावेत की नाही किती काढावेत कश्यावर काढावेत हे फक्त तो आणि तोच ठरवू शकतो पण मी त्याचे चित्रपटावरचे व क्रिकेट वरचे घागे वाचत नाही कारण त्यात मला इंटरेस्ट नाही.

कापोचे, आक्षेप मान्य आहे.
माझ्यासारखे काही जण, दिवसातून ठराविक वेळीच मायबोलीवर येतात. ( दिवसभरात ऑफिसच्या कामामूळे शक्य नसते ) त्यावेळी असेच काही धागे पहिल्या पानावर दिसतात. ( मध्यंतरी राकुंचे धागे आणि त्यापूर्वी गझला असायच्या )
मागच्या पानावर जायचा आळस करतो मी.

ऋन्मेष ( खरे नाव नाही Happy ) ला सतत फोकसमधे रहायला आवडत असावे असा माझा कयास आहे. त्यासाठी त्याचे सतत प्रयत्न चालू असतात आणि त्याचा तो हेतू इथे साध्यही होतोय.

वर्तमानपत्रातल्यासारखे अभ्यासपूर्ण ( अर्थात इथेही अपवाद आहेतच ) मायबोलीवर असावेत अशी अपेक्षा नसते माझी, पण एकाच साच्यातून काढलेले धागे ( महेश भट्ट च्या सिनेमासारखे ) आता कंटाळवाणे वाटू लागले आहेत.

उत्तम ( अर्थात माझ्या मते ) धाग्यांना प्रतिसाद मिळत नाहीत हे खरेच आहे, पण ज्यांनी मायबोलीचा उभरता
काळ पाहिलेला आहे आणि ज्यांनी त्या काळात भरभरुन प्रतिसाद दिले आहेत, ते सभासद आता इथे फिरकत नाहीत. ( माझा संपर्क असतो त्यांच्याशी ) आणि ते का फिरकत नाहीत, याचा शोध घेतला तर.... असो, पण त्यात कुणाला रस असेल असे वाटत नाही.

दिनेशदा
तुम्ही आवर्जून नाही तर सहजपणे सर्व प्रकारच्या धाग्यांना प्रतिसाद देत असता. अमूक एका प्रतिसाद द्यायचेच नाहीत असं धोरण नाही तुमचं. तुमच्यासारख्यांनी ओरड केली तर ती गंभीरपणे घ्यायला हवी. मला वाटतं तुम्ही समजून जाल. धागे मागे का जातात याचं उत्तर प्रतिसादाविना असंच असायला हवं माझ्या मते.

दिनेश अख्ख्या पोस्टला अनुमोदन.

अनेक उत्तम वाचक आणि प्रतिसादक निव्वळ या धागेरिया मुळे इथे फिरकेना झालेत.
बघेल तेव्हा अत्यंत फालतू आणि तद्दन विषयांवर धागे काढतो हा वेताळ.
अ‍ॅडमिन त्याला इथून हाकलत का नाहीत देव जाणे.

असल्या बिनमहत्वाच्या धाग्यांमुळे महत्वाचे धागे मागे पडतात आणि नजरे आड होतात याचं दु:ख होतं.

माझ्या काही शंका आहेत.

ऋन्मेष ने विणलेले नाहीत असे अनेक धागे प्रतिसादाविना मागे जातात. त्या धाग्यांवर प्रतिसाद देऊ नका म्हणून

ऋन्मेष सांगतो का ? ऋन्मेष धागे काढतो याचा आणि चांगल्या विषयांवरच्या दुर्लक्षित धाग्यांवर प्रतिसाद न
देण्याचा काय संबंध असावा ?

सैराट वर तीन तीन धागे चालू आहेत. ऋन्मेष धागे काढतो म्हणून लोक प्रतिसाद देत नाहीत तर हे धागे का सुपरहीट होतात ? मालिकांवरच्या धाग्यांना कधीही प्रतिसादांचा दुष्काळ जाणवत नाही.

सुवर्णकालाबाबत नो कमेण्ट्स.

सकुरा आभारी आहे . पण कॉपी केल्याने अ विरुद्ध ब असा सामना चालू आहे का असं चित्रं निर्माण होतंय. तसं काही नाही इथे.

मी स्वता माझ्या वेळेनुसार माझ्या आवडीच्या प्रत्येक धाग्यावर प्रतिसाद देतो. एखादा विषय माझ्या आवडीचा असेल पण त्यावर कोणी धागा काढला नसेल तर तो मी स्वता काढतो. मग माझ्यासारखेच आवड राखून असलेले त्या धाग्यावर प्रतिसाद देतात.

लाईफ खूप सिंपल आहे, मायबोली त्यापेक्षा जास्त. आपण उगाचच कॉम्प्लीकेटेड `करून ठेवतो Happy

हक्क, हट्ट यापैकी दोन्ही असेल किंवा नसेल. कु ऋन्मेष अटेन्शनकरता नवनवीन सुमार विषयांवर धागे काढत असतो हे तर कळलेलं आहेच. लोकं तक्रार करत रहातात पण त्याचे धागे वाळीत टाकत नाहीत कारण? सगळ्यांना टवाळक्या करायला जागा आणि विषय हवेच असतात. बघा बरं १००% दुर्लक्ष करून जमतंय का ते.

सायो आपण म्हणता तो उपाय नक्की काम करेल पण शंभर टक्के दुर्लक्ष हे लॉजिकली इनकर्रेक्ट आहे. म्हणजे आपल्याला ज्या धाग्यावर प्रतिसाद द्यायला आवडतो त्यावर देखील द्यायचा नाही कारण त्या धाग्याकर्त्याचा दुसरा एखादा धागा तुम्हाला आवडलेला नसतो.

कपोचे, "चांगल्या" धाग्यांवर चर्चा करायची तर ती जात/धर्म/मोदी/कॉन्ग्रेस यात गुरफटणार. तिथे कोण दगड मारायला येणार? बरे, इथे चर्चा केल्याने काही फार महान व फार गंभीर घडणार नाहिये.

मला 'कधी कधी पहिल्या पानावर एकदम धडाधड २-३ धागे दिसतात' व्यतिरिक्त ऋन्मेषच्या धाग्यांचा काही त्रास वाटलेला नाही. विषय इंटरेस्टिंग असेल तर मी वाचतो व त्यात भागही घेतो. बाकी इग्नोर करतो.

Pages