धाग्यावेताळाचे धागे काढणे - हक्क की हट्ट?

Submitted by बिपीन चन्द्र हर... on 30 April, 2016 - 09:27

शीर्षकच पुरेसे बोलके आहे. फारसे काही लिहून कोणाच्या भावना दुखावण्यात अर्थ नाही. पण तरीही लिहितो.

मागे जेव्हा धाग्यावेताळाने " गर्लफ्रेंड्सना आपला मोबाईल चेक करायची परवानगी द्यावी का?" असा धागा काढला तेव्हा त्याचे कौतुकच वाटलेले. अर्थात त्याच्या हेतूबद्दल खात्री नव्हती पण तरीही काम धाडसाचेच होते आणि बंडखोरी मला नेहमीच आवडत आलीय.

मात्र सध्या धाग्यावेताळाकडून जे काही चालू आहे त्यात त्याचा काय हेतू आहे, आणि त्याला काय साध्य करायचे आहे, हेच समजेनासे झालेय.

धाग्यावेताळाला या संकेतस्थळावर कैक हक्क नाकारले जातात. कित्येक लेखांवर प्रतिक्रिया देण्यासारख्या जीवनावश्यक बाबींमध्ये त्याला समानतेची वागणूक मिळत नाही. त्याला बाळ, धागा हायजॅक करणारा, प्रत्येक धाग्यावर शाहरुख, सई, गर्ल्फ्रेंड व स्वप्नील (मला तर कधी कधी हे चौघे याच्याकरिता एकच आहेत अशी शंका येते) यांच्यापैकी कुणाही एकाला अथवा सर्वांना धाग्यावर आणणारा, एमेन्सीत काम करुनही कच्चे इंग्रजी असणारा, हाल्फ, फुल्ल असे चक्रावून टाकणारे उच्चार लिहिणारा अशा विशेषणांनी गौरविले (?) जाते. अशा वेळी त्याने केवळ अट्टहासाने नवनवीन विषयावर धागा काढण्याच्या हक्कासाठी लढणे तितकेच गरजेचे आहे का हे मला समजत नाही.

कायद्याच्या समानतेनुसार कोर्ट नक्कीच असा निर्णय देणार की तुम्ही बनियन, मोजे आठवडा आठवडा न धुता तसेच घालण्याचे स्वातंत्र्य तुम्हाला जरूर आहे. पण जर तुम्ही एखादी समाज व्यवस्था मानता, त्या समाज व्यवस्थेच्या चालीरीती आणि परंपरा मानता तर त्याविरुद्ध जाण्यातही काय अर्थ आहे. किंबहुना जे पुरुष या प्रथापरंपरांना मानतात ते या बाबतीत समाजव्यवस्थेच्या विरुद्ध जाऊन या बनियन न धूता नेसण्याची मागणी करणारच नाहीत. मग हा हक्क बनियन न नेसणार्‍या पुरुषांनी मागितला आहे का? आणि तसे असल्यास त्या पुरुषांचा या प्रथांवर विश्वासच नसेल तर त्यांना हा हक्क घेऊन करायचे तरी काय?

आज संध्याकाळी मी एका मित्राच्या घरी गेलो होतो. टीव्ही चालू होता. बातम्या लागल्या होत्या. दिवसभर दुचाकीवरील पाठीमागच्या व्यक्तिलाही हेल्मेटसक्तीसंदर्भाने जो गदारोळ झाला त्याच्याच बातम्या होत्या. मित्राचे बाबा म्हणाले, "या पोरांना काही अक्कल नाही का? या आपल्या मोटर वाहन कायद्याची जी कलमे आहेत ती यांना का मोडायची आहेत? बाकी कामधंदे नाहीत का?"

मी त्या वेळी मुद्दामच मित्राकडे तिरप्या नजरेने पाहिले. तो काही बोलला नाही. पण त्याचा चेहरा सांगून गेला की त्याला आपल्या वडिलांचे बोलणे पटले नव्हते. त्या वक्तव्यावर तो नाराज होता. कायदेभंगाची एक हलकीशी ठिणगी पडली होती. पण चुकीच्या कारणासाठी किंबहुना अनावश्यक हक्कासाठी.

समजा जर त्या मित्राच्या वडीलांनी दुचाकीवरून तीन जणांनी फिरण्याबाबत असे उद्गार काढले असते की दुचाकीवर तीन जणांनी बसून जायची गरज आहे का वगैरे तर मी देखील तिथल्या तिथे ते विधान खोडून टाकले असते. त्यावर त्या मित्राच्ने विरोध दर्शवला असता तर पाठिंबाच दिला असता. पण या केसमध्ये स्त्री-पुरुषांनी एकत्र मोटरसायकलवर हेल्मेटखाली चेहरा लपवित फिरण्याचा मुद्दा घेत मला त्या मित्राच्या नाजूक भावना दुखावण्यात फारसे तथ्य जाणवले नाही.

अर्थात हा माझा विचार झाला. एक पुरुष म्हणून. हा विचार चुकीचाही असू शकतो. स्त्रिया याकडे कश्या बघतात ते स्त्रियांनाच ठाऊक.

या फोरमवर माझ्या ओळखीची एकही स्त्री अथवा पुरुष नसल्याने इतर सदस्यांचे मत जाणून घेण्याकरिता हा धागा काढला.

तर मुद्दा असा की, उठसूट कुठल्याही आलतू फालतू विषयावर धाग्यावेताळाचे धागे काढणे - हा त्याचा हक्क की (बाल) हट्ट?

संदर्भः-

http://www.maayboli.com/node/58218

http://www.maayboli.com/node/58499

http://www.maayboli.com/user/57027/created

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हारजीत आणि ऐश करण्याचा प्रश्नच नाही.

बरं मी स्पार्टाकस, तर मग तुम्ही ऋन्मेष का?

निराधार आरोप करण्यात काय अर्थ आहे.

आधीच्या एका प्रतिसादात तुम्ही लोक चांगल्या धाग्यांवर प्रतिसाद देत नाहीत म्हणून ते खाली जातात हे पुराव्यानिशी सिद्ध केलंय - तुमचाच बनियान चा धागा आणि पाणी समस्येचा धागा यांची तूलना करून.

तेच लॉजिक लावायचं तर ....

{{{ तुम्ही जे कुणी असाल ते, तुम्ही ज्या महापुरुषाला वगैरे मानता, त्याच्यावर बेछूट आरोप करून त्याचे संदर्भ दिले नाहीत तर चालेल का तुम्हाला ?
काहीच्या काही. }}}

तुम्ही महापुरुषांच्या आरोपांवरच्याच धाग्याला प्रतिसाद देता असं म्हणावं लागेल. त्यांच्याविषयी काही चांगलं लिहिणारे धागे काढले तर (तुमच्यासकट) त्या महापुरुषांच्या नावाने यत्र तत्र सर्वत्र गळे काढणारे कुणीच प्रतिसाद देत नाहीत.

हा पहा आरसा :-

http://www.maayboli.com/node/57555

बिपीनचन्द्र कामुळकर हा आयडी जो कुणी ( निकाळजे किंवा गुगळे) असेल तो असो, याची लायकी गाढवाइतकीही नाही हे आधीच लक्षात आलेले असल्याने त्याला इग्नोर केलेले आहे. तरी या आयडीने आपले थर्डक्लास संस्कार जिथे तिथे पाजळू नयेत.

और भिडु लोक, बोलेतो ऐसा झगडा करने ना किसिकी सॅलरी बढने वाली है और ना कोई सुधरनेवाला है, सो लेट्स कोन्स्न्ट्रेट टु वर्क.

कैदी नं. 57680 हा ज्याचा अनुल्लेख करतो त्याचा तसा पुन्हा विशेष उल्लेख करून त्याच्या धाग्याला पुन्हा पुन्हा प्रतिसाद देत वर आणतो. इंटरेस्टींग.

म्हातारी मेल्याचं दु:ख नाही पण काळ सोकावतो या चालीवर धाग्यावेताळाच्या धागे काढण्याबद्दल आक्षेप नाही पण मग सुमार साहित्य प्रसवण्याची ही वृत्ती तिळा तिळाने वाढत जाते आणि एकूणच कुणी आंतरजालावरील मराठी साहित्याचा परामर्श घेतला तर त्याला मोठ्या प्रमाणात कमी दर्जाचं साहित्य दिसून येईल. आता कुणी किलो किलोने धागे विणणार्‍या किलोत्तमा प्रकट झाल्या आहेत नंतर पुढे अजून कुणी यंत्रमागातून काढावेत तसे टनावारी धाग्यांचे जाळे सोडणारे टनोत्तम येतील.

कालाय तस्मै नमः

Pages