धाग्यावेताळाचे धागे काढणे - हक्क की हट्ट?

Submitted by बिपीन चन्द्र हर... on 30 April, 2016 - 09:27

शीर्षकच पुरेसे बोलके आहे. फारसे काही लिहून कोणाच्या भावना दुखावण्यात अर्थ नाही. पण तरीही लिहितो.

मागे जेव्हा धाग्यावेताळाने " गर्लफ्रेंड्सना आपला मोबाईल चेक करायची परवानगी द्यावी का?" असा धागा काढला तेव्हा त्याचे कौतुकच वाटलेले. अर्थात त्याच्या हेतूबद्दल खात्री नव्हती पण तरीही काम धाडसाचेच होते आणि बंडखोरी मला नेहमीच आवडत आलीय.

मात्र सध्या धाग्यावेताळाकडून जे काही चालू आहे त्यात त्याचा काय हेतू आहे, आणि त्याला काय साध्य करायचे आहे, हेच समजेनासे झालेय.

धाग्यावेताळाला या संकेतस्थळावर कैक हक्क नाकारले जातात. कित्येक लेखांवर प्रतिक्रिया देण्यासारख्या जीवनावश्यक बाबींमध्ये त्याला समानतेची वागणूक मिळत नाही. त्याला बाळ, धागा हायजॅक करणारा, प्रत्येक धाग्यावर शाहरुख, सई, गर्ल्फ्रेंड व स्वप्नील (मला तर कधी कधी हे चौघे याच्याकरिता एकच आहेत अशी शंका येते) यांच्यापैकी कुणाही एकाला अथवा सर्वांना धाग्यावर आणणारा, एमेन्सीत काम करुनही कच्चे इंग्रजी असणारा, हाल्फ, फुल्ल असे चक्रावून टाकणारे उच्चार लिहिणारा अशा विशेषणांनी गौरविले (?) जाते. अशा वेळी त्याने केवळ अट्टहासाने नवनवीन विषयावर धागा काढण्याच्या हक्कासाठी लढणे तितकेच गरजेचे आहे का हे मला समजत नाही.

कायद्याच्या समानतेनुसार कोर्ट नक्कीच असा निर्णय देणार की तुम्ही बनियन, मोजे आठवडा आठवडा न धुता तसेच घालण्याचे स्वातंत्र्य तुम्हाला जरूर आहे. पण जर तुम्ही एखादी समाज व्यवस्था मानता, त्या समाज व्यवस्थेच्या चालीरीती आणि परंपरा मानता तर त्याविरुद्ध जाण्यातही काय अर्थ आहे. किंबहुना जे पुरुष या प्रथापरंपरांना मानतात ते या बाबतीत समाजव्यवस्थेच्या विरुद्ध जाऊन या बनियन न धूता नेसण्याची मागणी करणारच नाहीत. मग हा हक्क बनियन न नेसणार्‍या पुरुषांनी मागितला आहे का? आणि तसे असल्यास त्या पुरुषांचा या प्रथांवर विश्वासच नसेल तर त्यांना हा हक्क घेऊन करायचे तरी काय?

आज संध्याकाळी मी एका मित्राच्या घरी गेलो होतो. टीव्ही चालू होता. बातम्या लागल्या होत्या. दिवसभर दुचाकीवरील पाठीमागच्या व्यक्तिलाही हेल्मेटसक्तीसंदर्भाने जो गदारोळ झाला त्याच्याच बातम्या होत्या. मित्राचे बाबा म्हणाले, "या पोरांना काही अक्कल नाही का? या आपल्या मोटर वाहन कायद्याची जी कलमे आहेत ती यांना का मोडायची आहेत? बाकी कामधंदे नाहीत का?"

मी त्या वेळी मुद्दामच मित्राकडे तिरप्या नजरेने पाहिले. तो काही बोलला नाही. पण त्याचा चेहरा सांगून गेला की त्याला आपल्या वडिलांचे बोलणे पटले नव्हते. त्या वक्तव्यावर तो नाराज होता. कायदेभंगाची एक हलकीशी ठिणगी पडली होती. पण चुकीच्या कारणासाठी किंबहुना अनावश्यक हक्कासाठी.

समजा जर त्या मित्राच्या वडीलांनी दुचाकीवरून तीन जणांनी फिरण्याबाबत असे उद्गार काढले असते की दुचाकीवर तीन जणांनी बसून जायची गरज आहे का वगैरे तर मी देखील तिथल्या तिथे ते विधान खोडून टाकले असते. त्यावर त्या मित्राच्ने विरोध दर्शवला असता तर पाठिंबाच दिला असता. पण या केसमध्ये स्त्री-पुरुषांनी एकत्र मोटरसायकलवर हेल्मेटखाली चेहरा लपवित फिरण्याचा मुद्दा घेत मला त्या मित्राच्या नाजूक भावना दुखावण्यात फारसे तथ्य जाणवले नाही.

अर्थात हा माझा विचार झाला. एक पुरुष म्हणून. हा विचार चुकीचाही असू शकतो. स्त्रिया याकडे कश्या बघतात ते स्त्रियांनाच ठाऊक.

या फोरमवर माझ्या ओळखीची एकही स्त्री अथवा पुरुष नसल्याने इतर सदस्यांचे मत जाणून घेण्याकरिता हा धागा काढला.

तर मुद्दा असा की, उठसूट कुठल्याही आलतू फालतू विषयावर धाग्यावेताळाचे धागे काढणे - हा त्याचा हक्क की (बाल) हट्ट?

संदर्भः-

http://www.maayboli.com/node/58218

http://www.maayboli.com/node/58499

http://www.maayboli.com/user/57027/created

Group content visibility: 
Public - accessible to all site users

टण्या
पाणी प्रश्न , दुष्काळ असे धागे दिसतच नाहीत का तुम्हाला ? त्यात कसे काय जाती , धर्म यात दगड मारायला तुम्हाला आमंत्रित केलंय असे वाटले ? की हे धागे चांगले नाहीत असं तुमचं म्हणणं आहे ? की ते बिलो स्टँडर्ड आहेत ?

काहीच्या काही !

प्रतिसाद द्या म्हणून इथे कुणी रडत नाहीये. अमक्याच्या धाग्यांमुळे इतर धागे खाली जातात ही ओरड अतार्किक आहे इतकंच. तुमच्या प्रतिसादांवाचून कुणाचं काही अडलेलं नाही. आम्हाला अमक्या तमक्याचे धागे आवडत नाहीत अशी ओरड असेल तर कुणी काही म्हणत नाही. त्यासाठी चांगले धागे मागे जातात हे कारण कशाला ?

>>आम्हाला अमक्या तमक्याचे धागे आवडत नाहीत अशी ओरड असेल तर कुणी काही म्हणत नाही.>> मला तरी असंच म्हणायचं आहे. मला ऋन्मेष या आयडीचे धागे आवडत नाहीत. म्हणून त्याने मायबोलीवर रोजचा रतीब घालू नये का? त्याची अ‍ॅडमीनकडे तक्रार करावी का? तर अजिबातच नाही. ज्यांना त्रास होत असेल त्यांनी दुर्लक्ष करावं, त्रास होत नसणारी मंडळी असतात तिथे रमलेली. खरंच वाचायचं असल्यास शोधून वाचता येऊ शकतंच.
आम्हांला टाईमपास करायला आमची जागा आहे. ऋन्मेष आणि त्याच्या बीबीची गरज नाही.

ज्यांची ओरड आहे की चांगले धागे मागे जातात त्यांना उद्देशून आहे हे. ज्यांना ओढवून घ्यायचं त्यांना जबाबदार नाही. चांगले धागे का मागे जातात तर प्रतिसादाविना इतकं सिंपल लॉजिक आहे. उगीचच्या उगीच दगड मारणे वगैरे शब्दप्रयोग आले की तशाच टोनमधे उत्तरं मिळतील ही खात्री का बाळगू नये.

सोप्या शब्दात सांगितलेलं कळत नाहीये का ?
रुन्मेषला त्याच्या धाग्यावर स्पष्ट शब्दात नापसंती दर्शवलेली आहे. पण त्यामुळे तो काही धागे काढायचं बंद होत नाही. अ‍ॅडमिनने त्याच्यावर कारवाई केलेली नाही, याचा अर्थ धोरणात बसणारं तो लिहीतो. ज्यांना जे धागे चांगले वाटतात त्यांनी त्यावर प्रतिसाद द्यावेत. प्रतिसाद न देता रडायचं कशाला ?

फा, सायो +१. कधी कधी (रादर बरेचदा) मला पर्सनली रुन्मेशचे धागे नको नको होतात. पण म्हणून त्याला धागे काढायला बंदी किंवा admin कडे तक्रार इ. करणे याला काही अर्थ नाही. चांगले धागे, वाईट धागे असं काही नसतं, ज्याला जे वाचायची इच्छा असते तो ते वाचतो. मला पाल्हाळीक ललितं, भारंभार पाकृ, फालतू सल्ले मागणारे धागे, पूर्वीची मायबोली आणि बऱ्याचदा स्मरणरंजनात रमणारे धागे नाही आवडत, पण तरी ते वाचतोच, जे आवडतं ते पण वाचतो. झाला तर फायदाच होतो, नुस्कनी नाही. आणि मला जे फालतू वाटतंय त्याला हजार प्रतिसाद येतात म्हणजे इतरांना ते आवडतंय.
वर म्हटलंय तसं लोकांकडे वेळ आहे, त्यांना काहीतरी टीपी करायला जागा हवी आहे, गहन चर्चा आणि माहिती असलेल्या धागे ज्यांना आवडतात त्यांनी ते काढावे. भंकस धागे वाईट असला भंपक समज करून आमची ती अभिरुची म्हणून आपण कसे भारी असा धागा काढला तरीही खोऱ्याने प्रतिसाद मिळतील. समविचारी लोकांची कुठेही कमी नाही. सगळ्या गोष्टी माझ्या (स्वघोषित) उच्च अभिरुची मताप्रमाणे झाल्या पाहिजेत ही कुरकुर नको होते. पण म्हणून ज्यांना करायची त्यांना करू दे की.

मला 'कधी कधी पहिल्या पानावर एकदम धडाधड २-३ धागे दिसतात' व्यतिरिक्त ऋन्मेषच्या धाग्यांचा काही त्रास वाटलेला नाही. विषय इंटरेस्टिंग असेल तर मी वाचतो व त्यात भागही घेतो. बाकी इग्नोर करतो.>>>> +१

उगा गळे काढतंय पबलिक. वाचा नैतर नका वाचु. प्रतिसाद द्या नैतर नका देउ. कोणला काय पडलीये?
काय तर म्हणे जुने माबोकर येत नाहीत. बरं मग? त्यांची मर्जी. नव्या धाग्यांमुळे जुने माबोकरांना इथे यायला आवड्त नाही? एवढे जुने आहेत इग्नोर करणं जमुच शकतं ना त्यांना?
चांगले धागे मागे पडतात तर ते शोधा आणि वाचा की मग. नैतर चांगल्या धाग्यांवर प्रतिसाद देउन ते वर पैल्या पानावर आणा.
ऊठ्सुट धागे काढतो, अक्कल नाही, ह्याला हाकलुन दिलं पाहिजे म्हणजे खरंच टु मच.

विषय गंभीर आहे , आपणही खंबीर राहू ..........

हे खरे आहे चांगले धागे मागच्या पानावर गेल्याने तिकडे फिरकणे होत नाही. मीही दिवसातून एकदाच रिक्षा आणतो इकडे ,पण पहिले पान बघून गळपटतो , असेलच चांगले काहीतरी तर नक्कीच वाचतो ,प्रतिसाद देईलच असे नाही पण चांगले धागे वर असावे असे नेहमीच वाटते.
वेताळाचे काही धागे खूप आवडले काही मात्र निव्वळ पांचट वाटले , त्याला धागे काढू नको असे म्हणजे उचित ठरणार नाही. तुम्हाला चांगले धागे हवे असतील तर तुम्ही काढा किंवा इतरांनी काढलेले चांगले धागे वर काढा हा चांगला पर्याय आहे. आणि मित्रा ऋन्मेष तूही असे इतरांचे चांगले धागे वर काढायल मदत करत जा.. कसे आहे तुझ्याकडे जितका वेळ आहे माबोवर रमायला तेवढा क्वचितच कोणाकडे असेल . असो.. व्ययक्तिक मत आहे हलके घ्या .

फारेंड अनुमोदन #

आता एक सभासद म्हणून पोस्ट टाकतो.
आतड्याच्या तळागाळातून कळकळीने लिहितोय. वाचा आणि विचार करा.

मला पद्य साहित्यप्रकारात जराही रस नाही. मग ते कविता असो गझल वा मुक्तछंद, चारोळी, तडका वगैरे.. मी त्यावर क्लिकही करत नाही. माझ्यासाठी ते मायबोलीवर अस्तित्वातच नसते. पहिले अर्धे पान पद्याने भरलेले असल्यास माझ्यासाठी अर्धे पान व्यर्थ असते. एवढेच नव्हे तर कोणी गद्यही भरमसाठ उपमा अलंकार वापरून लिहिले तर ते देखील मी अर्ध्यावरच सोडतो. आता याबाबत मला तुम्ही अभिरुचीहीन म्हणू शकता. पण माझे सव्वीस प्रपोज पैकी सातवा प्रपोज - म्हणजे अगदी क्षुल्लक कारणासाठी कविताने मला नकार दिला. तेव्हापासून ती मनातून उतरली ते आजतागायत उतरलीच!

हिंदी-मराठी-ईंग्लिश कुठल्याही मालिका माझ्याकडून बघितल्या जात नाहीत. त्यामुळे त्या मालिकांवर होणार्‍या मायबोली डेलीसोप चर्चेच्या धाग्यात अपवाद वगळता मी फिरकत नाही. पण इथे तुम्ही मला सिरीअल किलर म्हणू शकत नाही. कारण जे बघतात त्यांच्या सुखाआड मी येत नाही.

राजकारणात काही सनसनीखेज घडल्याशिवाय इथे चालनार्‍या रोजच्या चर्चांमध्ये मी पडत नाही. मी इथे कुठल्या राजकीय पक्षाचा अजेंडा घेऊन येत नाही, ना मी कोणत्या जातीबद्दल वा समाजाच्या एखाद्या घटकाबद्दल कळवळा घेऊन येतो. त्यामुळे तिथे वळलेल्या चर्चांना वळसा घालून मी लागलीच त्या धाग्यांवरून सटकतो. इथे तुम्ही मला अजान किंवा उदासीन नागरीक म्हणू शकता.

माबोवर लिहिल्या जाणार्‍या क्रमश: कथा वाचताना जीव टांगणीला लागू नये आणि एखादी कथा पुर्ण होण्याआधीच मी मेलो तर माझे भूत बनून मायबोलीवर फिरू नये, या कारणास्तव मी त्या वाचत नाही. याबद्दल तुम्ही मला अप्पलपोट्या म्हणू शकता.

पाककृतीच्या धाग्याचे शीर्षक तोंपासू किंवा कुतुहल जागवणारे वाटले ‘तर आणि तरच’ आत जाऊन ‘फक्त आणि फक्त’ प्रचिच बघून येतो. पाक कृती कधी करणेच नसल्याने ती मी कधीच वाचत नाही. याबद्दल तुम्ही मला कृतीहीन किंवा नाकृतीशील म्हणू शकता.

धार्मिक विभागातील धागे वाचत नाही. याबद्दल मला काही म्हणू नका. सर्वांना माहीत आहे की मी नास्तिक आहे.

मायबोलीवर बारा गावच्या गप्पांचे सतराशेसाठ विभाग आहेत. मी तिथे कुठेच नसतो. न मी कोणाशी विपु विपु खेळतो. मला जेमतेम चार लोकं इथे ओळखतात. ईथे माझा कुठलाही मित्रांचा ग्रूप नाहीये, ना मी कुठल्या ग्रूपमध्ये सामील आहे. त्यामुळे माझ्यासाठी मायबोली हा चिटचॅटचा अड्डाही नाहीये. मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. पण मी तसा नाहीये. त्यामुळे तुम्ही मला अमानुष म्हणू शकता.

याव्यतिरीक्तही इथे बरेच काही घडते बिघडते ज्याची मला कल्पनाही नसल्याने त्याचा उल्लेखही करू शकत नाही.

पण मी या सर्वांतूनही माझ्या आवडीचे असे थोडेफार वेचतो आणि त्यातच रमतो. हेच जर आपल्या सर्वांना जमवता आले तर सारे हेवेदावे_रागलोभ_द्वेषमत्सर वगैरे संपुष्टात येतील Happy

...

असो,
आता एक धागाकर्ता म्हणून दोन शब्द लिहितो.

मायबोलीचा पसारा फार मोठा आहे. ज्यात मी एक चुरगळलेला कागद आहे, जो कोणीतरी येऊन पंखा चालू करेन आणि मी थोडा फडफडेन या आशेवर एका कोपर्‍यात पडलेलो आहे. जसे या विश्वाच्या पसार्‍यात लाखो करोडो तारे आपल्याच सुर्यमालेत खुश असतात तसाच एक तारा आहे. दुरून बघणार्‍याला त्याची लुकलुक जाणवूही नये जोपर्यंत त्याला कोणी निरखून बघत नाही. निरखून बघताना माझ्या धाग्यांची सख्या अफाट वाटते मात्र प्रत्यक्षात तसे नसावेही. याला पुष्टी द्यायला काही आकडे उपजवतोय. हे किती मोठे, किती छोटे, आपणच ठरवा.

माझा मायबोलीवरील पहिलाच धागा - http://www.maayboli.com/node/49998
माझा लेटेस्ट धागा - http://www.maayboli.com/node/58499

दोन्ही धाग्यांतील फरक - ५८४९९ - ४९९९८ = ८५०१
माझे एकूण धागे - १५९

टक्केवारी = (१५९/८५०१) * १०० = १.८७ %

म्हणजे हा ऋन्मेष साधा दो टके का मायबोलीकर सुद्धा नाहीये Happy

खरंय. या बाबतीत ऋ च्या मूळ स्वरूपाचा आदर्श घेण्यासारखा आहे. अजिबात फिरकत नाही आपल्या आवताराच्या धाग्यावर Wink

ओ बिपीन चन्द्र हर... काय राव इतका मनाला लावून घेता तुमच्या धाग्यामुळे अजून पब्लिसिटी होईल जे या जन्मात शक्य नव्हता ते तुम्ही त्यांना प्रसिद्ध देऊन करताय.तुम्ही कितीही नाही म्हणालात तरी ते तुम्हाला चावणारच. अजून काही वर्षांनी त्याला मुल झाल्यावर डायपर कोणता घ्यावा पक्षी धागा पण निघेल . लग्न नंतर चा तो एक नाही दोन धागे काढणार नाही अशी माझी समजूत आहे पण जर त्याला ते पण कळत नसेल तर तुम्ही मायबोली सोडून टाका

ऋन्मेषच्या धाग्याबद्दल आधी माझा एप्रोच फारएन्ड ह्यांच्या प्रमाणे होता, परवा त्याच्याच (सॉरी एकेरी उल्लेख करतोय वय समवयस्क असल्याचे assume करुन) धाग्यावर मी ती दर्शवली सुद्धा होती ! पर हे प्रकरण इतके पेटल असं वाटलं नव्हतं, ऋन्मेषचं नाव धाग्यावेताळ कोणी ठेवलं त्याचा मी सत्कार करेल अशी ती पोस्ट होती, अर्थात मला काही ऋन्मेषचे धागे फार असह्य वगैरे झालेत अश्यातला भाग नाही पण मला माझे मत नोंदवावे वाटले इतकेच, बाकी मी कोण काय बोलणारा,

कोणाला काही दुखावले असल्यास माफ़ी मागतो

जय हिंद

-बाप्या

धाग्याच्या विषयाशी थेट संबंध किंवा त्यावर थेट भाष्य नाही..... जस्ट एक विचार

राज, मायबोली पब्लिक गूड (असावी) आहे की कॉमन गूड असे तुम्हाला वाटते?

माझ्या मते ती कॉमन गूड (ऊदा. रस्ते, ट्रेन) आहे आणि म्हणून 'ट्रॅजेडी ऑफ कॉमन्स' च्या तत्त्वांनुसार ती फॉलिबल आहे.

समजा तुम्ही आम्ही आणि सगळ्यांनी माबो पब्लिक गूड (ऊदा. संरक्षण व्यवस्था, जी एकाला जास्तीची मिळाल्याने दुसर्‍याची कमी होत नाही ) म्हणून वापरली तर कुणाला नाराज होण्याचे काही कारण असणार नाही, पण प्रतिक्रिया बघता रिअ‍ॅलिटी तशी नसल्यानेच मी मायबोलीला पब्लिक गूड न म्हणता कॉमन गूड म्हणालो.

ट्रॅजेडी ऑफ कॉमन्स

The tragedy of the commons is an economic theory of a situation within a shared-resource system where individual users acting independently and rationally according to their own self-interest behave contrary to the common good of all users by depleting that resource.
The metaphor illustrates the argument that free access and unrestricted demand for a resource ultimately reduces the resource through over-exploitation, temporarily or permanently.

ईथे रिसोर्स म्हणून जी काही एंटिटी आहे ती आपण माबोकरांची मायबोलीकडून शब्दांत मांडता येणार नाही अशी पूर्ण होणारी गरज थोडक्यात युटिलिटी वॅल्यू. ज्या अर्थी काही लोकांना आक्षेप आहे त्याअर्थे कुठेतरी त्यांची मायबोलीकडून अपेक्षित असलेली युटिलीटी वॅल्यू काही कारणांनी (भारंभार धाग्यांनी ? ) कमी झालेली आहे, किंवा तसा समज झालेला आहे. (हे सध्याच्या टेक्नॉलिजीच्या (माबो साईट फॉर्मॅट) लिमिटेशनमुळेही होऊ शकते)

स्पॅम ईमेलचे लॉजिक प्रत्येकासाठी वेगळे असू शकेल, काही जणांसाठी स्पॅम असलेला मेल ईतरांसाठी महत्त्वाचा असू शकतोच.

प्रतिक्रिया दिल्या नसल्या प्रत्येक धाग्यावर, तरीही ऋन्मेष ने काढलेले प्रत्येक धागे वाचतो. बरेचसे मला आवडतात. त्यामुळे तो भारंभार धागे काढतो हे माझ्यासाठी गौण आहे.

लगे रहो ऋन्मेष .............. Happy

प्रतिसाद द्या म्हणून इथे कुणी रडत नाहीये. अमक्याच्या धाग्यांमुळे इतर धागे खाली जातात ही ओरड अतार्किक आहे इतकंच. तुमच्या प्रतिसादांवाचून कुणाचं काही अडलेलं नाही. आम्हाला अमक्या तमक्याचे धागे आवडत नाहीत अशी ओरड असेल तर कुणी काही म्हणत नाही. त्यासाठी चांगले धागे मागे जातात हे कारण कशाला ?
>>>

काय डब्बल ढोलकी आहे? मागल्या पानावर म्हणालात चांगल्या धाग्यांवर प्रतिक्रिया येत नाहीत. का येत नाहीत लिहिले तर ही अरेरावी. कुठल्या धाग्यावर बीजेपी, मोदी, कॉन्ग्रेस, सोनिया, जात, धर्म आला नाहिये ते सांगा.

अरेरावी ???
बरं

डबल ढोलकी कसली ?
तुम्हाला काहीही समजत नाहीये. तुम्हाला नाही समजले तर काही एक फरक पडत नाही. उपकार केल्याच्या थाटात प्रतिसाद दिला तर त्याला उत्तर तसेच मिळणार ना ? जाऊ द्या, तुम्ही सुद्धा पालथ्या घडा क्लबचे छुपे सदस्य आहात.

कुठल्या धाग्यावर बीजेपी, मोदी, कॉन्ग्रेस, सोनिया, जात, धर्म आला नाहिये ते सांगा. >>> बरेच आहेत की !

टण्या, अरे कापोचेंच्या पाणीप्रश्न धाग्यावर भाजप, काँग्रेस वगैरे नव्हते आले. त्यांना तेच सूचित करायचंय पण स्वतःच्याच धाग्याचं कौतुक कसं करणार म्हणून ते म्हणत नाहीयेत इतकंच.

कापोचे, तुम्हांला 'दुसर्‍यांना काहीच कळत नाही पण मला मात्र सगळंच कळतं' हे ठरवायची फारच घाई ब्वा. Wink

>>राज, मायबोली पब्लिक गूड (असावी) आहे की कॉमन गूड असे तुम्हाला वाटते?<<
मायबोली एक काॅमन प्लॅटफाॅर्म असावा, नाहि तो आहेच. प्रशासकांनी घालुन दिलेल्या नियमांचं उल्लंघन जोवर होत नाहि तोवर प्रत्येकाला या प्लॅटफाॅर्म/सेवेचा लाभ घेण्याची मुभा आहे. आणि एखाद्याने भरमसाट धागे काढल्याने मायबोलीची युटिलिटी वॅल्यु कमी होते असं मला अजिबात वाटत नाहि. मायबोलीची सुरुवात झाल्यापासुन आजवरच्या (सोशल मिडिया) प्रवासात भयंकर उलाढाल झालेली आहे, तरीहि एक पायनियर, ट्रेंड सेटर म्हणुन मायबोलीच्या इंट्रिंसिक वॅल्युला तोड नाहि. माझ्याकरता तरी हे खुप महत्वाचं आहे...

खरा तर admin कडे ऋन्मेष ची तक्रार करायची कल्पनाच अयोग्य वाटते. मला त्याचे धागे आणि लेखनशैली आवडते. एकदम हलकेफुलके विषय असतात आणि प्रामाणिकपणे लिहितो. त्याच्या लेखातून तो कधीही उद्धट, भांडखोर किंवा टोकाच्या मताचा भासत नाही किंवा लिखाणातून कोणाच्या भावना दुखावल्याचेही मलातरी आढळले नाही. मग तक्रार कसली आणि कशाला?
मायबोली हे एक व्यक्त होण्याचं व्यासपीठ आहे आणि नियमात राहून एकदा मनुष्य व्यक्त होत असेल तर कोणाचा आक्षेप नसावा. बाकी त्याच्या धाग्यांची संख्या हा विषय मग गौण ठरतो. बाकी इतरांनी म्हणल्याप्रमाणे ज्यांना वाचायचे आहेत ते वाचतील किंवा सोडतील.

ऋन्मेष, तू लिहित जा...आम्ही वाचत राहू...

फक्त एक प्रश्न आहे...मध्ये तुझ्या धाग्यातून वाचले होते कि तू किमान वर्षासाठी काही अपरिहार्य कारणामुळे माबो वर लिहू शकणार नाही असा धागा काढला होतास... तो प्रोब्लेम solve झालेला दिसतोय Wink

नवीन लेखन पानावर, मायबोलीवर नवीन ऐवजी माझ्यासाठी नवीन हा दुवा पाहिलाय का? तुम्ही ज्या ग्रूपाचे सदस्यत्व घेतले असेल तेवढेच धागे दिसतात.

बाप रे!! त्या राजकारण व जातीवरील सतत होणारी भांडणे जिथेतिथे नजरेस पडणे हा भयानक मनस्ताप असतो, ऋन्मेष्चे धागे नाही. एकवेळ ऋन्मेषचे धागे बंद होतील पण ही कचाकच भांडणे आता कधीच बंद होणार नाहीत याचेच वाईट वाटते.

कापोचे, तुम्हांला 'दुसर्‍यांना काहीच कळत नाही पण मला मात्र सगळंच कळतं' हे ठरवायची फारच घाई ब्वा >>> घाई? चार चार वेळा ती गोष्ट फोडलिह, सोलून लिहीलिये तरी कळत नाही म्हटल्यावर कळत नाही असंच म्हणतात हो आमच्यात. हो आणि बरोब्बर सांगितलंत तुम्ही टण्याला. निदान तुम्हाला एव्हढं तरी कळालं.

आता तुम्हाला मागच्या पानांवरचे प्रतिसाद कळाले नाहीत एव्हढं कळालेलं असेल तर पुन्हा एकदा समजावून सांगतो. पुन्हा नाही समजलं तर तुम्ही ही घ्या सदस्यत्व , कसं ? फ्री आहे एकदम.

_/\_ माफ करा पण आणखी लिहीत सुटू नका. (भीक नको पण कुत्रं आवरा चालीवर) Wink पिळू प्रतिसाद अगदीच वाचवत नाहैअत हो.

मायबोलीवरच्या सर्वात हुषार लोकांसाठी संत्रं सोलून दाखवण्यात येत आहे.

kapoche | 1 May, 2016 - 00:26
चांगले धागे खाली जातात टाईप बोंब मारणारे चांगल्या, हटक्या विषयावर स्वतः हजेरी लावत नाहीत. असे अनेक धागे अनेकदा वर काढले गेले तरी ते त्याच वेगाने लुप्त होतात. धागा कुणाचा आहे यावर पण त्यावर हजेरी लावायची कि नाही हे ठरवणारे महाभाग मायबोलीवर आता यावंसं वाटत नाही हे वाक्य दर तीन दिवसाआड आळवताना दिसतात.

पाणी प्रश्नावर धागा काढला तर एकही महाभाग तिकडे फिरकला नाही. म्हणूनच बनियान वाला धागा काढला होता. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे इथून पुढे जर कुणी मायबोलीवर यावेसे वाटत नाही, अमूक तमूक धागे निघावेत का अशी बोंबाबोंब केली की त्यांना अनेक धाग्यांची यादी देऊन त्यावर अनुपस्थितीची कारणे विचारावीत अशी विनंती माननीय प्रशासक / प्रशासकीय समिती यांच्याकडे करत आहे. उठसूठ रडत बसायचं याला काही अर्थ नाही.

kapoche | 2 May, 2016 - 09:05
माझ्या काही शंका आहेत.

ऋन्मेष ने विणलेले नाहीत असे अनेक धागे प्रतिसादाविना मागे जातात. त्या धाग्यांवर प्रतिसाद देऊ नका म्हणून
ऋन्मेष सांगतो का ? ऋन्मेष धागे काढतो याचा आणि चांगल्या विषयांवरच्या दुर्लक्षित धाग्यांवर प्रतिसाद न
देण्याचा काय संबंध असावा ?

सैराट वर तीन तीन धागे चालू आहेत. ऋन्मेष धागे काढतो म्हणून लोक प्रतिसाद देत नाहीत तर हे धागे का सुपरहीट होतात ? मालिकांवरच्या धाग्यांना कधीही प्रतिसादांचा दुष्काळ जाणवत नाही.

सुवर्णकालाबाबत नो कमेण्ट्स.

-----------------------------------------------------------------------------------------------------

वरच्या प्रतिसादांचा सोप्या मराठीत अर्थ सांगतो.

लेव्हल - इयत्ता पहिली

प्रश्न पहिला - पहिला प्रतिसाद कुणाला उद्देशून आहे ?
उत्तर - चांगले धागे खाली जातात टाईप बोंब मारणारे

यावरून कुणीतरी ऋन्मेष धागे काढतो म्हणून चांगले धागे मागे जातात अशी बोंब मारतात असे लेखकाला म्हणायचे आहे. अशी बोंब कुणीतरी मारत असावे. ज्यांना ते लागायचे ते लागो.

प्रश्न २ - जे बोंब मारतात ते त्यांच्या दृष्टीने चांगल्या धाग्यांवर प्रतिसाद देतात का ?
उत्तर - जर त्यांच्या दृष्टीने चांगल्या धाग्यावर प्रतिसाद देत असते तर ते धागे कसे खाली गेले असते असा या प्रतिसादांचा अर्थ आहे.

सायोताई,
तुम्हाला आता समजले का ?
इतके समजावून सांगितले होते म्हणून कळत नाही अस्सा निष्कर्ष काढलेला होता. यात घाई झालीये असे तुमची अजूनही मत आहे का ? तुमचा पहिला आरोप निरस्त झाला असेल तर मागे घेणार का ? की अजूनही कुरकूर आहे काही ?

आता तुमचा दुसरा आरोप
वर व्यवस्थित समजावून सांगितल्याने इतर सर्वांच्या लक्षात आलेले आहेच, तुमच्याही येईल,, की ऋन्मेष किंवा इतर खूप धागे काढतात म्हणून चांगले धागे मागे जातात.

इथे चांगले धागे हे कोण ठरवतं ? तर बोंब मारणारे. मी नाही. त्यांची चांगली धाग्याची जी काही व्याख्या असेल ते मला माहीत नाही. त्यांच्या दृष्टीने चांगले असणारे धागे का मागे जातात ? तर प्रतिसादाविना. जे बोंब मारतात त्यांना जे धागे चांगले वाटतात त्यातही नेहरू, गांधी, जात असते का ? टण्या यांना हे माहीत असेल तर त्यांनीच तो खुलासा करावा.
अजूनही समजले नसेल तर न लाजता सांगावे.

तिसरा प्रतिसाद इथे द्यायची आवश्यकता आहे का ?
आज पुन्हा पालथे घडे भेटत राहीले तर इरीटेटेड प्रतिसाद येतील किंवा नाही हे आत्ता तरी नाही सांगू शकत.

च्च, मी वर माफ करा म्हणून म्हटलं. पुन्हा हातभर लिहिलंत? कोण वाचणार? माझा पास.
मला जे म्हणायचंय ते मी म्हटलंय. तुमचा मुद्दा जो असेल तो असो. मला इंटरेस्ट नाही तो जाणून घेण्यात.

तुम्ही नका हो वाचू. इतर लोक तर वाचतीलच ना ? Wink
त्यांच्यासाठी लिहीलंय. आधीचा प्रतिसाद तुमच्यासाठी नसताना तुम्ही आलातच. याला कंपूशाही वगैरे म्हणतात का मायबोलीवर ( तुम्ही वाचणार नसल्याने पास , त्यामुळे उत्तर येणार नाही हे अपेक्षित)
पास आहे हे सांगण्याची आवश्यकता नसते.

ता.क : अरेच्चा, तुम्ही माफी वगैरे मागितली होती होय ? लिहीत असतानाच आला ना प्रतिसाद तो. त्या प्रतिसादाला त्याच भाषेत उत्तर दिलं तर लोक संस्कार वगैरे काढतील याची भीती वाटते. शिवाय उत्तर दिले तर पास दिलाय हे विसरून पुन्हा अपमान करण्यासाठी बोटं शिवशिवतील. त्यामुळे ते गाढव ब्रह्मचर्य सारखी अवस्था होईल. नकोच ते .

तुमच्या पुढच्या उत्तराला माझा पास. Lol

पाणीप्रश्नाच्या धाग्यावर हजेरी न लावल्याबद्दल आपले आभार. तिथे काही एक अडले नाही. त्यामुळे मला दोन घास कमी गेले असे काही झाले नाही. बनियन च्या धाग्यावर हजेरी लावल्याबद्दल आभार पुन्हा एकदा. त्यामुळे दोन घास जास्त गेले असेही नाही.

Pages