सैराटची जादू....

Submitted by केशव तुलसी on 28 April, 2016 - 12:36

सध्या सर्वत्र सैराटचे प्रोमोज चालू आहेत,टीन एज लवस्टोरीवर हा सिनेमा बेतलेला आहे .पण नागराज मंजुळेच्या फॅण्ड्रीमुळे या चित्रपटाकडून अपेक्शा वाढलेल्या आहेत.नागराज मंजुळे प्रत्येक चित्रपटातून सामाजिक भाष्य कारतात.या चित्रपटातही काही सामाजिक भाष्य असेलच.
विशेष म्हणजे या चित्रपटाची माउथ पब्लिसीटी खूप झाली आहे,ज्याच्या त्याच्या तोंडी सैराटची गाणी ऐकायला मिळत आहेत .कोणत्याही मोठ्या कलाकारांना न घेता चित्रपट हीट करुन दाखवने ही नागराज मंजुळे यांची खासियत या चित्रपटा बाबतीतही पाहायला मिळत आहे.नायक व नायिका आधिच प्रसिद्ध झाले आहेत.
चित्रपटाचा USP म्हणजे अजय अतुल यांचे अत्यंत श्रवनीय संगीत.हॉलीवूडच्या सोनी स्टुडीयोत याचे ट्रॅक्स रेकॉर्ड झाले आहेत,असे करणारा हा पहीला भारतीय चित्रपट आहे .बर्लिन चित्रपट महोत्स्वात सिलेक्ट झालेला हा चौथा मराठी चित्रपट आहे.एकंदर सैराटने झिंगाट जादू केली आहे ,उद्या हा चित्रपट रिलिज होत आहे.सविस्तर परिक्षण येईलच ,तुर्तास महाराष्ट्र तरी " झिंगाट " झालाय हे नक्की.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आभार.. हे शेअर केल्याबद्दल. आरएमडी. मस्तं झालाय ट्रॅक. (ढोल ताशा नसल्याने ऐकलं तेव्हढं तरी सुरेख वाटतय)

झी च्या सुरुवातीच्या मालिकांची शीर्षक गीतं अजय अतुल ने केलेली आहेत. श्रवणीय आहेत. लोकसंगीताचा अभ्यास दांडगा आहे.

खेळ मांडला सारखी शब्दांना महत्व देणारी गाणी अजय अतुल कडे असतात. झिंग झिंग झिंगाट मधे ती आवश्यकता नाही.

मला या चित्रपटाच्या गाण्यात वाद्यांचा अतिवापर वाटतोय. मूळ लोकसंगीतात तो जोरकस ठेका असतोच पण त्याला तोडीस तोड ठरतील असे त्या लोककलकारांचे आवाजही असतात. इथे या कलाकारांना तसे गाता आलेले नाही.
कदाचित त्यांचे आणि वाद्यमेळाचे रेकॉर्डींग स्वतंत्रपणे झाले असेल ( आता ते तसेच असते बहुदा )

कदाचित त्यांचे आणि वाद्यमेळाचे रेकॉर्डींग स्वतंत्रपणे झाले असेल>>>> असेच होते हल्ली.
मला गाणी ,संगीत सगळच खुप आवडल.फक्त प्रत्येक ट्रॅक आपण च गायचा हट्ट आता अजय ने सोडायला हवा.अस ही वाटल. अर्थात त्याचा आवाज ग्रामीण ठसका असलेला,आनि त्याच ढंगाचा चित्रपट असल्याने बरोबर आहे.मात्र परश्याकडे बघा ना राव.कसला क्युट्,लाजाळु दाखवला आहे,त्याला अजुन दुसरा आवाज जास्त शोभला असता.

लोकसंगीताचा चांगला वापर केला होता रामभाऊ कदमांनी.
तेव्हा शब्दांना, अर्थाला पण महत्व फार होते. आता काय आनंदच आहे सगळा. Sad

अंकु, हज्जार मोदक आणि प्रत्येकावर तुपाची धार.
लोकसंगी तावर आधारित चालींमुळे गाणी चटकन भिडतात. पण त्या चालींसाठी हवा तो रॉनेस फक्तं आवाजात येतो.. सगळीचकडे ताशा वाजवून तोच एक मूड बनत रहातो.
आजकाल मालवणी मसाला घातल्यावर प्रत्येक भाजी मालवणी म्हणून खाऊ घालण्याचा प्रकार आहे तसच काहीसं.

Sairat chi gani A 1 ahet. Camera work, acting, music sagle ch top class distay. Cinema baghnar. Nakki ch.

ए आरच्या गाण्यांमधे शब्दांना फार महत्व देतो तो.
>>>>>>

दाद, कदाचित असतीलही त्याच्या गाण्यात शब्द आणि गीते चांगली पण कानाच्या आत पोचायला तर हवीत. त्याच्या आधीच्या बरेच गाण्यात खूप वेळा गाणे ऐकल्यावरच शब्द समजायचे. त्यातही गायक तोच असेल तर सारेच धन्य धन्य असते. दिलसे गाणे तर मी आजही आंडूगुंडू सौथेंडीयन एक्सेंटमध्येच गातो. हल्लीचे माहीत नाही, सध्या त्याची गाणी ऐकणे सोडलेय मी Happy

संगीतकार आणि गीतकार या वेगळ्या व्यक्ती असल्याने त्यांना त्यांच्या त्यांच्या कामाचे श्रेय द्यावे. मात्र वाद्यांचा गदारोळ वाढला की त्यात शब्द लपतात हे खरेय..

प्रचंड वाद्यमेळ असूनही, जोरकस ठेका असूनही काही गाणी त्यातील गायक कलाकारांमूळे वाद्यांना पुरुन उरली..

१) जांभूळ पिकल्या झाडाखाली ( आशा भोसले )
२) मुंबई नगरी ग बडी बांका ( छोटा गंधर्व )
३) मला हो म्हनत्यात लवंगी मिरची ( सुलोचना चव्हाण )

आणि हिंदीत तर अनेक

१) तेरे नैना तलाश करे जिसे ( मन्ना डे )
२) मचलती आरजू खडी बाहे पसारे ( लता )
३) होठोंपे ऐसी बात ( लता / भूपेंद्र )
४) पंख होते तो ( लता )
५) चुनरी संभाल गोरी ( लता, मन्ना डे )

हे काही लोक कलाकार नव्हते, पण वाद्यमेळ आणि गायकांचे आवाज यांचा उत्तम तोल साधला होता.

सैराट हे अजय-अतुलच अजुन एक मास्टरपीस आहे, त्यातली बरिच गाणि त्यानी लिहली पण आहे शिवाय पुर्ण चित्रपटाला आवश्यक टेम्पो ती गाणि आणतात...
ट्रेलर आणी गाणि बघताना जाणवलेली अजुन एक गोश्ट म्हणजे कॅमेरामन जादुगार असेल तर करमाळा सारख्या साध्याशा गावाला सुधा अप्र्तिम दाखवु शकतो हे त्यातुन कळतय.. खोल विहिर्,जुनाट बुरुज्,मन्दिर्,उसाची शेत सहज कुठल्याही गावात दिसणारी द्रुश्य
नागराज हा किती उत्तम प्र्तिचा दिग्दर्शक आहे हे पण कळतय ते अस की मुख्य भुमिकेतले कलाकार (फॅन्ड्रि ,सैराट) कधिही कॅमेरा न बघितले , साधेसे असले तरी त्याच्याअक्डुन त्याने अशी उत्तम काम करुन घेतली... (मागे एकदा दुनियादारी आणी त्यातले कलाकार याची वय, मोठा प्रोजेक्ट ही झालेली चर्चा त्यावरुन मला हा मुद्दा जास्त ठळकपणे जाणवला.)
सैराट ची जादु पार झिन्ग झिन्गाट आहे...

हो ही गाणी आहेत अशी.. जुन्या गाण्यांबाबत असे आढळते. मला फारसे तांत्रिक ज्ञान नाही पण जुनी वाद्ये आणि नवीन वाद्ये यात फरक असावा. जुन्या उडत्या चालीच्या गाण्यांमध्येही मेलोडी आढळायची जसे वरचेच होटो पे ऐसी बात, फेव्हरेट गाणे माझे. पण हल्ली मेलोडी मुळातच हरवलीय असे वाटते. ए आर रेहमान यांचा तर वाद्यांचा ईतका पसारा असतो की प्रत्येकाने मुंगीला ऐकू जाईल एवढ्या आवाजात वाजवले तरी सर्वांचा एकत्रित वाघाच्या डरकाळीसारखा आवाज होईल. नक्की कारण सांगता येणार नाही पण रेहमान यांची मला कित्येक गाणी आवडली तरी कुठलेही माझ्या ऑल टाईम फेव्हरेटमध्ये जात नाही. अपवाद स्वदेस!

अजय अतुल बद्दल एक मराठी माणूस म्हणून अभिमान आहे. मरगळलेल्या किंबहुना मेलेल्या मराठी चित्रपट संगीताला त्यांनी नवीन जानच नाही दिली तर ग्लॅमरही दिले, सर्वात महत्वाचे म्हणजे नॉन मराठी लोकांमध्येही पोचवले. पर्यायाने मराठी चित्रपटही दूर पोचला. अन्यथा आपण अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांनाच सीमा मानली असती.

घिसीपिटी स्टोरीलाइन वाटतेय. नाहितरी माझ्यामते मंजुळे ओवररेटेड डायरेक्टर आहे; फॅंन्ड्रित एव्हढं काय जगावेगळं होतं बुवा?..

आणि गाणी हाॅलिवुड मध्ये रेकाॅर्ड होणं हि अचिवमेंट आहे हे वाचुन गंमत वाटली...

मायबोलीवर लिहिलेला फँड्रीचा रिव्यु वाचून बघावासा वाटला नव्हता आणि बघितला नाही. सैराट अजून इथे ज्या साईटवर बघता येईल तिथे आलेला दिसला नाही त्यामुळे अजून थोडे दिवस थांबावं लागेल.

सायो, फॅण्ड्री नक्कीच पाहण्यासारखा आहे. मात्र गंभीर आहे. सैराट आता कट्यार प्रमाणेच अमेरिकेतील सगळ्या शहरात दाखवला जाईल असे दिसते. तेवढी वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी मिळत आहे त्याला.

फा, बघायला हवं इथे आलाय्/येतोय का आणि अर्थातच थेटरला जायला वेळ मिळायला हवा.

मी प्रोमो पाहिलेत. गाण्यांमधे फार काही ग्रेट वाटलं नाही. कदाचित अजयच्या आवाजामुळे असेल किंवा पुन्हा पुन्हा वापरलेल्या ठेक्यामुळे (उदा. जोगवाच्या गाण्यांचा )असेल पण मला तोच तोपण वाटला.

Pages