सैराटची जादू....

Submitted by केशव तुलसी on 28 April, 2016 - 12:36

सध्या सर्वत्र सैराटचे प्रोमोज चालू आहेत,टीन एज लवस्टोरीवर हा सिनेमा बेतलेला आहे .पण नागराज मंजुळेच्या फॅण्ड्रीमुळे या चित्रपटाकडून अपेक्शा वाढलेल्या आहेत.नागराज मंजुळे प्रत्येक चित्रपटातून सामाजिक भाष्य कारतात.या चित्रपटातही काही सामाजिक भाष्य असेलच.
विशेष म्हणजे या चित्रपटाची माउथ पब्लिसीटी खूप झाली आहे,ज्याच्या त्याच्या तोंडी सैराटची गाणी ऐकायला मिळत आहेत .कोणत्याही मोठ्या कलाकारांना न घेता चित्रपट हीट करुन दाखवने ही नागराज मंजुळे यांची खासियत या चित्रपटा बाबतीतही पाहायला मिळत आहे.नायक व नायिका आधिच प्रसिद्ध झाले आहेत.
चित्रपटाचा USP म्हणजे अजय अतुल यांचे अत्यंत श्रवनीय संगीत.हॉलीवूडच्या सोनी स्टुडीयोत याचे ट्रॅक्स रेकॉर्ड झाले आहेत,असे करणारा हा पहीला भारतीय चित्रपट आहे .बर्लिन चित्रपट महोत्स्वात सिलेक्ट झालेला हा चौथा मराठी चित्रपट आहे.एकंदर सैराटने झिंगाट जादू केली आहे ,उद्या हा चित्रपट रिलिज होत आहे.सविस्तर परिक्षण येईलच ,तुर्तास महाराष्ट्र तरी " झिंगाट " झालाय हे नक्की.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सिंफनी नंतर एकदम 'याड लागलं' शब्द फार मिसमॅच वाटतात Happy
बाकी सिनेमॅटोग्राफी उत्तम दिसतेय, गाणी चांगली आहेतच पण टिपिकल अजय अतुल !
सिनेमा येतोय इथे , नेमका वेळ नाहीये त्या दिवशी, फँड्री अजिबातच आवडला नव्हता :(.

अजय अतुल चं म्युझिक कोणाला आवडो न आवडो पण त्यांचं म्युझिक तांत्रिक दृष्ट्या खूप जबरदस्त वाटतं. आणि लोकसंगीताचा प्रभाव आणि विशेषतः ढोल खूप इम्प्रेसिव्ह वाटतो. तसंच भक्तीसंगीत (?) ( जे थोडं लाऊड प्रकारात मोडेल, कामींग इफेक्ट ज्यात असायची गरज नाही) तेही जबरदस्त वाटतं.

मला फँड्री आणि हायवे दोन्हीं आवडले.

ओह्. मी नीट वाचलं नाही मग. फिल्मोग्राफी मध्ये जनरल ते नाव बघून वाटलं त्याचंच दिग्दर्शन. थँक्यू.

आणि आश्चर्यही वाटलं त्याबद्दल कारण मोठी, प्रसिद्ध नावं त्याला नको असतात त्याच्या पिक्चर्स करता?

अल्पवयीन मुलगी लफड्यात पडते तेंव्हा
अल्पवयीन मुलीस प्रेमाच्या जाळ्यात घेवून लैंगिक शोषण...
अल्पवयीन मुलगी पळून जावून लग्न करते तेंव्हा....
काय अवस्था होते.... बापाची...भावाची बहिणीची ...आईची अन कुटूंबाची..
कल्पना करा.... त्या अल्पवयीन मुलीच्या ठिकाणी आपली मुलगी पहा...
अन मगच करा.... समर्थन सैराट चित्रपटाच.
शाळा... टाईमपास... टाईमपास 2 , फैंड्री तून काय संस्कार करण्यात आले पौगंडावस्थेतील विद्यार्थीदशेतील अल्पवयीन मुला मुलींवर...
सुजाण पालकांनो... भानावर या.
त्यातच सैराट आलाय...
अल्पवयीनांच्या प्रेम प्रकरणांचे प्रतिनिधित्व करायला.
या चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शकांना नि कलाकारांना व सर्वच टिमला म्हणे सामाजिक प्रबोधन करायच आहे. या प्रबोधन कार्यासाठी बालकलाकारांची प्रेम प्रकरण दाखवण गरजेच आहे का. ?
अहो... निर्मातेसाहेब... तुम्ही सामाजिक प्रबोधन करताय की समाजात शैक्षणीक प्रवाहात असणा-या कोवळ्या वयातील मुलांमध्ये बालवयातील प्रेमप्रकरणांची विकृती पसरवताय. ?
या चित्रपटांच्या पटकथेचा आदर्श घेवून ग्रामीण तसेच शहरी भागात शालेय विद्यार्थ्यांमध्ये आंबटशौकीनपणा वाढीस लागलाय.
ज्या वयात उज्वल भविष्य घडवायच.. करीअर घडवताना यशोशिखर गाठायची. नाव कमवायच अगदी त्याच वयात... शाळा महाविद्यालयांत शिक्षण घेणारी अल्पवयीन मुले मुली त्याच शाळेच्या गार्डनमध्ये... गच्चीवर... ग्रंथालयात, मुतारीत.. शौचालयात जिथ जागा मिळेल तिथ प्रेमाचे चाळे करताना दिसून येतात. हे असच सुरू राहणार असेल तर अल्पवयातील प्रेगन्सीची उदाहरणे ऐकावयास मिळाली तर नवल वाटायला नको.
सध्या सर्वत्र सैराटचे प्रमोशन पहायला मिळतेय... लक्षपुर्वक पहा... हे प्रमोशन
यातील मुख्य भुमिका निभावणारे विद्यार्थी दशेतील मुलं पहा...त्यांचा प्रेमाचा खेळ पहा... शालेय कवायतीतला बेशिस्तपणा, सार्वजनिक ठिकाणात केलेले अश्लिल हावभाव... खुणवाखुणवी.. प्रेमप्रकरणाला प्रोत्साहन देणारे चित्रीकरण पहा....
असा प्रोमो आपल्या घरातील मुलांनी केला तर आपण त्याचे समर्थन कराल का. ?
आपल्या घरातील मुलांची अशी प्रेम प्रकरण आपण खपवून घ्याल का...?
महत्वाच.... राज्यात बालकामगार बंदी आहे. 14 वर्षाच्या आतील बालकामगार जिथे असतील तर तिथ कायदेशीर कारवाई करणेत येते ... मग या ठिकाणी सुट कशासाठी....?
पालकांनो सजग रहा...
आदर्श पालक व्हा..
(टिप : मी चित्रपटाविरोधी नाही पण त्यातल्या मानसिकते च्या विरोधात आहे)
< : © वैदिक हिंदू संस्कृती ग्रूप >

श्यामची आई हा सिनेमा बघून कीती साने गुरुजी निपजले याचा विदा द्याल का उडन खटोलाजी,जर सिनेमे संस्कार करत असते तर आईबाप कशाला हवे होते मग?

अल्पवयीन मुला- मुलींच प्रेम दाखवल्याने तसं मुला - मुलींना करावं वाटतं की ते तसं प्रत्यक्ष जीवनात आहे म्हणून चित्रपटात दाखवलं जातं ?? सैराट हा वास्तववादी चित्रपट वाटतोय तो काल्पनिक नाही मग जे घडतय ते पडद्यावर मांडलं तर वाईट काय ?

मी परवाच ( पिक्चर प्रदर्शीत होण्यापुर्वी ) मुसरुड न फुटलेल्या पोराला त्याच्याच वयाच्या असणाऱ्या मुलीला गल्लीच्या कोपऱ्यावर फुल देताना पाहिलं, परभणीत स्मार्टफोन व What's up आजच्या इतकं प्रचलित नसतानाही ( ते एक कारण दिलं जातं अल्पवयीन प्रेमाचं ) शाळेतल्या मुला मुलींना गुपचुप भेटताना अनेकदा पाहिलंय व मास्तर होतो तेंव्हा १६ वर्षाच्या डिप्लोमाच्या "मैं तुम्हारे बगैर जी नहीं सकता" टाईप पोरा पोरींना पाहिलय व समजवलय ही.

ही सर्व मुलं काय वह्या घेऊन शाळा, टाईमपास, फँड्री व आता सैराट पाहून नोट्स काढून मग प्रेम करत असतील / करतील असं वाटतं का ?

सलमान व शाहरुख वयाने ५० च्या पुढचे एखाद्या समवयस्क ( कधी पोरीच्या वयाच्याही, पण तो भाग वेगळ्या दिवशी ) नटीला बागेत घेऊन हुंदडत असतील तर १६ वर्षाच्या पोराला असं वाटतं का - की हा प्रौढ आहे हा त्यांचा प्रेमप्रकार वेगळा हे आपल्या वयाला शोभत नाही, चला शुभं करोती म्हणूया ?

जर दोष द्यायचा असेल तर लहान, मोठ्या सगळ्या प्रकारच्या प्रेमकथांना द्या, माध्यमांना द्या जे भडक चित्र दाखवतात , शिक्षण पद्धतीला द्या जी लैंगिक शिक्षणाचा विटाळ मानून बसलीये, आजच्या आई वडिलांना द्या जे मुलींना forward तेच्या नावाखाली खरंच सैराट सोडतात व अजून खूप काही ही यादी खूप मोठी आहे व होईल.

तुझ्या बहिणीचं असं झालं तर चालेल का ? हा प्रश्न एक विचारला जातो तर त्याच उत्तर हेच की कुठलाही भाऊ स्वतः असं त्याच्या बहिणीला अडनिड्या वयात प्रेमात पड म्हणणार नाही पण हे ही खरंय की प्रत्येक व्यक्ती त्या वयात कुणाच्या तरी प्रेमात पडतोच मग ती माझी बहीण असली तरी त्यात काय बदल नाही. फक्त तुम्हाला ते कळत की तुमच्यापासून लपुन राहातं हाच मुद्दा राहतो व प्रेमात पडल्यानंतर कळलं तर समजावून सांगणे , समजून घेणे हे समजूतदार भावाकडून अपेक्षित असतं ते मी केलं असतं.
शेवटी तो चित्रपट पहावा वाटला तर पाहा नाही वाटला तर नका पाहू. त्या चित्रपटाचे परिणाम फायदे तोटे सांगू नका, पिक्चर पाहून समाज बदलत असता तर स्वदेस पाहून सगळे NRI लातूरात जलयुक्त शिवाराच्या कामावर टोपलं घेऊन दिसले असते.

उल्हास रामदासी
अंबाजोगाई

स्वदेस पाहून सगळे NRI
लातूरात जलयुक्त शिवाराच्या कामावर टोपलं घेऊन दिसले
असते.>>>>>>> एकही मारा लेकीन जोर से मारा
.

कहर Proud

मी दहावित असताना, "गणित २१ अपेक्षित मधे एक उदाहरण आय एम पी होतं त्यात एके ठिकाणी समिकरणाला ७१ ने भाग असायचा ..." तसंच आहे हे अजय अतुल = लोक संगीत. मग भरपुर प्रचार, भन्नाट प्रोमोज.
ह्या जोडीची गाणी छान असतात वादच नाहि , पण जसा शिरा १ प्लेट च्या वर खाल्ला जात नाही तसच काहिस आहे हे .
बाकी ते मानसिकता, भडकपणा ती हि एक बाजु आहेच,

आशुचँप - सर्व मुद्दे सुंदर.

फक्त एक सांगा - "आजच्या आई वडिलांना द्या जे मुलींना फॉर्वर्ड तेच्या नावाखाली खरंच सैराट सोडतात" म्हणजे हे आई वडील नक्की काय करतात?

>>>फक्त एक सांगा - "आजच्या आई वडिलांना द्या जे मुलींना फॉर्वर्ड तेच्या नावाखाली खरंच सैराट सोडतात" म्हणजे हे आई वडील नक्की काय करतात?<<<
+१

आशूचँप,

हो मलाही तोच प्रश्ण पडलाय. त्याची दुसरी बाजू अशी का नाही की आई वडील ," मुलांना" सुद्धा सैराट सोडतात आजकाल? कि हे मुलींनाच लागू होतय?

>>पिक्चर पाहून समाज बदलत असता तर स्वदेस पाहून सगळे NRI लातूरात जलयुक्त शिवाराच्या कामावर टोपलं घेऊन दिसले असते.
अगदीच असमंजस आणि बालिश विधान आहे.
दृकश्राव्य माध्यमाचा सर्वांवर कमी अधिक प्रमाणात बरा वाईट परिणाम होत असतो. दुर्दैव हे की वाईट परिणाम जास्त लवकर आणि मोठ्या प्रमाणावर होतो.
ए.दु.के.लि. हा चित्रपट पाहून प्रेमी युगुलांचे आत्महत्येचे प्रमांण वाढले होते की नाही हे त्या काळातल्या लोकांना विचारा.
अपहरण, खंडणी, खून, बलात्कार, इ. च्या प्रेरणा अमुक तमुक चित्रपटावरून मिळाली अशा केसेस पण बर्याच दिसतील.
स्वदेसचे उदाहरण माहिती नाही, पण चिठ्ठी आई है, गीत पाहून / ऐकून रडणारी आणि स्वदेशात परत जायचा निर्णय घेणारी माणसे मी पाहिली आहेत.
तात्पर्य : वर बोल्ड केले आहे.

आज खूप दिवसांनी मल्टीप्लेक्सला असं वातावरण दिसलं की सलमानचा सिनेमा आल्यानंतर जसे त्याच्याच सिनेमाचे प्रत्येक स्क्रीनवर खेळ चालू असतात तसंच सैराटचे खेळ सर्वत्र चालू आहेत. त्यासाठी शाहरूख खानचा फॅन हा सिनेमा सैराट साठी उतरवण्यात आला. सकाळी एका स्क्रीनवर नऊ वाजता, दुसरीकडे नऊ पाच, तिसरीकडे सव्वा नऊ अशी सुरूवात होते. हे सर्व खेळ हाऊसफुल्ल झालेले आहेत.

वरच्या काही प्रतिक्रिया पाहून असं विचारावंसं वाटतंय की सैराट मुळे महिलांमुळे आपली घरची इज्जत जाते ही भावना नष्ट होईल कि काय !! मुलीला तिचा निर्णय घेऊ द्यावा असा बदल पालकांच्या मनात घडून येईल का ? असा बदल झाला की इथल्या पंडितांच्या दूरदृष्टीला आपण दाद द्यायलाच हवी.

>>पिक्चर पाहून समाज बदलत असता तर स्वदेस पाहून सगळे NRI लातूरात जलयुक्त शिवाराच्या कामावर टोपलं घेऊन दिसले असते.
अगदीच असमंजस आणि बालिश विधान आहे>>>>
तुम्हाला तर असेच वाटणार Wink

पिक्चर पाहून समाज बदलतो की नाही हा खरे तर वेगळ्याच धाग्याचा विषय आहे, पण जर समाजावर काहीच फरक पडत नसेल तर सेन्सॉर बोर्ड नक्की कशाला स्थापन केले आहे? बघू द्या च्या मायला ज्याला जे बघायचे आहे ते Happy

पण जर समाजावर काहीच फरक पडत नसेल तर सेन्सॉर बोर्ड नक्की कशाला स्थापन केले आहे? >> देअर यू आर.
सेन्सॉरशिपची खरं तर काहीच आवश्यकता नाही. त्याला अट अशी आहे की समाज तेव्हढा प्रगल्भ हवा.

चांगल्या गोष्टींचा समाजावर मंद गतीने परिणाम होतो. समाज बदलण्याची शक्यता एका सिनेमात नसते.
पण काही उपद्रवी गोष्टी , दोन समाजात तणाव निर्माण करणे , हे सिनेमा, वृत्तपत्रं, न्यूज चॅनेल्स, सोशल मीडीया मधून होऊ शकतं. त्यावर आळा घालायला सेन्सॉर बोर्ड आहे.
प्रेम करणे हा उपद्रव आहे हा समजच उपद्रवकारक आहे. सिनेमामुळे प्रेम होत असतं तर बाजीराव मस्तानी कुठल्या शो ला जाऊन आले होते यावर संशोधन व्हायला हवं. हीर रांझा, सोहनी महिवाल अशा अनेक प्रेमकहाण्या आहेत. जय मल्हार मधे तरी थ्रीजी तंत्रज्ञान दाखवलंय...

जास्तीत जास्त मुले मुली सिनेमांच्या प्रभावाखाली येऊनच प्रकरणे करत असतात हे ज्ञात सत्य आहे.
(फार कमी केसेसमधे ते सच्चा प्यार असते)
हे माहित असुनही उग्गाच आदिम काळातली आत्ता रिलेव्हंट नसणारी उदाहरणे देणारे विचार अतार्किक असतात.

जेव्हा कोणतीही कलाकृती ओपन टू ऑल केली जाते, तेव्हा त्यावर सर्व लोकांनी फक्त चांगलीच मते दिली पाहिजेत हा अट्टाहास चुकीचा आणि हास्यास्पद आहे.

वैयक्तिक मला बा.म.चित्रपटाचा अत्यंत राग आहे. कट्यार ५०% च ठिक आहे, वळू अजिबात आवडला नव्हता.
हो म्हणजे कोणाला असे वाटत असेल की काही लोकांना काही ठराविकच चित्रपट आवडतात तर ते तसे नाही यासाठी स्वतःचे उदा. दिले.

जास्तीत जास्त मुले मुली सिनेमांच्या प्रभावाखाली येऊनच प्रकरणे करत असतात हे ज्ञात सत्य आहे.
>>>
मला वाटते प्रेमप्रकरण हे नैसर्गिक प्रेरणेने केले जाते. पिक्चरमधून मुले-मुली पटवायच्या आयडीयाज उचलल्या जातात.

Pages