सैराटची जादू....

Submitted by केशव तुलसी on 28 April, 2016 - 12:36

सध्या सर्वत्र सैराटचे प्रोमोज चालू आहेत,टीन एज लवस्टोरीवर हा सिनेमा बेतलेला आहे .पण नागराज मंजुळेच्या फॅण्ड्रीमुळे या चित्रपटाकडून अपेक्शा वाढलेल्या आहेत.नागराज मंजुळे प्रत्येक चित्रपटातून सामाजिक भाष्य कारतात.या चित्रपटातही काही सामाजिक भाष्य असेलच.
विशेष म्हणजे या चित्रपटाची माउथ पब्लिसीटी खूप झाली आहे,ज्याच्या त्याच्या तोंडी सैराटची गाणी ऐकायला मिळत आहेत .कोणत्याही मोठ्या कलाकारांना न घेता चित्रपट हीट करुन दाखवने ही नागराज मंजुळे यांची खासियत या चित्रपटा बाबतीतही पाहायला मिळत आहे.नायक व नायिका आधिच प्रसिद्ध झाले आहेत.
चित्रपटाचा USP म्हणजे अजय अतुल यांचे अत्यंत श्रवनीय संगीत.हॉलीवूडच्या सोनी स्टुडीयोत याचे ट्रॅक्स रेकॉर्ड झाले आहेत,असे करणारा हा पहीला भारतीय चित्रपट आहे .बर्लिन चित्रपट महोत्स्वात सिलेक्ट झालेला हा चौथा मराठी चित्रपट आहे.एकंदर सैराटने झिंगाट जादू केली आहे ,उद्या हा चित्रपट रिलिज होत आहे.सविस्तर परिक्षण येईलच ,तुर्तास महाराष्ट्र तरी " झिंगाट " झालाय हे नक्की.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>उग्गाच आदिम काळातली आत्ता रिलेव्हंट नसणारी उदाहरणे देणारे विचार अतार्किक असतात.
हे लिहून सुद्धा पुन्हा बाजीरावचे उदाहरण. एकतर पोस्ट पुर्ण वाचत नाहीत लोक किंवा कळण्याची पात्रता नसते किंवा मुद्दाम तेच तेच मुद्दे उगाळायचे असतात.

ऋणमेष, मी पहिल्याच ओळीत लिहिले आहे ना की प्रकरणे केली जातात (प्रेम नाही) त्यालाच तू पटवण्याच्या आयडीया म्हणत आहेस.

अरेच्या आदीम काळातले बाकीचे चालते पण या बाबतीतले उदाहरण कसे चालत नाही ? कमालच आहे
सोईस्कर तेवढे चालते किती ढोलकीबाज लोक आहे Wink

कारण तेव्हा दृकश्राव्य माध्यमांचा शोध लागलेला नव्हता म्हणून ती उदाहरणे चुकीची आहेत.
एवढे साधे लॉजिक समजत नाही Happy

नाटक तेव्हा ही केली जात होती. आता ही केली जात आहे. फक्त माध्यमाचा कोन बदलला.

इतके लॉजिक समजत नाही की समजुन घेतले जात नाही.

जंगल बुक बघायला नको होता

हा कसला चित्रपट, आधीच भारतात वाघांची संख्या कमी आहे त्यात एक लहान मुलगा कपटाने वाघाला जाळून मारताना दाखवल्यामुळे आता या प्रकारचे पेव फुटण्याची भीती आहे.
मुळात आपल्या या थोर देशात संतांनी प्राणिमात्रांवर दया करा असे सांगितले आहे. कुठे ते तहानलेल्या गाढवाला पाणी पाजणारे संत एकनाथ आणि एका भुकेल्या वाघाला जाळून मारणारा समाज.

दाखवायचे च होते तर शेरखान ला जोडीदार मिळवून देऊन त्यांचे कुटूंब वाढवले असे दाखवायचे.
माझा चित्रपटाला विरोध नाही त्यामागच्या मानसिकतेला आहे

काल पहिल्यांदाच 'झिंगाट' ऐकलं. काय धमाल गाणे आहे. ठेका जरा एकसुरी आहे पण लिहीले आहे व गायले आहे जबरी. गीतकार कोण आहे बघायला पाहिजे. एकदम झंगडू शब्दरचना आहे :). या वेळेला गणपतीत हेच असणार सगळीकडे.

झिंगाट गाणं मला पण जाम आवडलं. त्यातले शब्द तर फारच भारी.
ते इनेशल टॅटूनं गोंदलया वाचून तर फारच भारी. हे फारच कॉमन असतं.
माझ्या डोळ्यासमोर आमची सोलापूर गँगची लोकंच आली, एकाने इनेशल गोंदवलेली, एक जण ग्रिटींग उघडले की आतून गुलाब बाहेर येतो असलं ग्रिटींग पोरीला द्यायला आणलेला, एकजण 'फ्रेन्डशिप देतेस का' असं विचारणारा.
आणि रात्री नाइट मारताना 'अरं सम्या काय त्या गरिबाच्या राणी मुखर्जीच्या मागे लागला बे' करून टर उडवणारी.

वाघ नामशेष झाल्यास संस्कृती बुडणार नाही असे पहिल्यांदा वाटले पण मग विचार केला देवीचे वाहन नसले तर मग बुलेट वरून फिरण्याशिवाय पर्याय नाही.

बघा चित्रपटाच परीणाम. उगाच नाही लोक विरोध करत.

सैराटसाठी शाहरूखच्या फॅनचे शो उतरवले अश्या आशयाच्या पोस्ट आज व्हॉटसपवर फिरत होत्या.
शाहरूख हे ब्रांडनेम कुठे कुठे वापरले जाईल गिणती नाही.
पण मराठी चित्रपटासाठी वापरले जात असेल तर आनंदच आहे Happy

झिंगाट गाणं खरंच भारी जमलंय.
या वेळेला गणपतीत हेच असणार सगळीकडे + १
एका कडव्यात.. 'ढिंगचँग दारात, टेक्नोवरात..' असं काहीतरी आहे. ते 'टेक्नोवरात' जाम आवडलंय !

सैराटमुळे महाराष्ट्रात बागीने फार मार खाल्लाय. बागीचे शोज शनिवारपासूनच कमी करायला सुरूवात झाली होती.

फॅनची हालत पण तीच झाली असेल. यात शाहरूख ब्रांडनेमचा संबंध नाही, पण मराठी सिनेमा व्यावसायिक स्तरावर अतिशय यशस्वी होत आहे आणि तोही बॉलीवूडी बिग बजेटला मात देत, ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. सैराटवर "तो कमर्शिअल" आहे असा एक बिनबुडाचा आरोप होतोय. जणू काही कमर्शिअल सिनेमा काढणं म्हणजे पाप करणं. कमर्शिअल आहे, आणि पैसावसूल सिनेमा आहे, पण म्हणून त्या सिनेमाचा अस्सलपणा कूठेही कमी होत नाही.

झिंगाटवर "अजय अतुलचे" तेच तेच म्युझिक असल्याचा आरोप आहे. (हे लोकं सैराट आणि याड लागलं ऑप्शनला टाकून हा प्रश्न विचारतात) झिंगाट ज्या सिच्युएशनला वाजवलं जातंय ते पाहता त्याचं संगीत तिथे योग्यच आहे. ढोल ताशे आणि नाचायचा र्हिदम तिथे गरजेचा आहेच. त्या गाण्यामधेय तो प्राचार्य झिंगून नाचताना दाखवलाय. इतकं सूक्षम डीटेलिंग मंजुळेंनी अप्रतिम केलंय.

नंदिनी तो मेसेज मी चेक केलेला पण फेक होता म्हणून बोल्लो.
सैराट तूफान चालतोय याबाबत दुमत नाही.
कमर्शिअल होण्याबाबतही सहमत. मी तर केव्हापासून मराठी चित्रपटांना कमर्शिअल फॅक्टर गरजेचा आहे नाहीतर नष्ट व्हाल असा ओरडा करतोय.
आणि पुरस्कार म्हणाल तर तो बाहुबलीला सुद्धा मिळतो आजकाल..
बाकी हा बागी कुठला चित्रपट आहे. सैराटसमोर छोटेमोठे काही टिकणार नाही सध्या..

मोदी जी फडणवीस से...
.
मोदी - महाराष्ट्र में क्या चल रहा है
.
.
.
.
फडणवीस - फक्त सैराट. .जिंग जिंग ज़िन्गाट..

Pages