करवंदाची चटणी

Submitted by दिनेश. on 8 April, 2016 - 06:58
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

माहितीचा स्रोत: 
मावशी !
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आभार,
संपदा, मला इथल्या आफ्रिकेतल्या जंगलातही सापडतात या जाळ्या !

बाँड, माझे आजोळ, मलकापूर ( जिल्हा कोल्हापूर ) आणि रेडे करवंदे खायची ती अंबोलीला.

भारी आहे चटणी. करेन आता. मिळतायेत मस्त कच्ची करवंद आता बाजारात.

चार दिवसांपुर्वी कच्ची करवंद मिठाच्या पाण्यात टाकली आहेत, छान मुरली आहेत आता. मस्त लागतात.

मला करवंदातील बिया खुप आवडतात, त्यामुळे बियांसकट करेन चटणी.

पिकलेल्या करवंदांपेक्षा कच्ची करवंदे मला आवडतात -किती वर्षापूर्वी खाल्ली तेही आता आठवत नाही.... Happy

दा - पाककृतीतील जादूगार आहात बुवा - काय काय पेश कराल एकदम -- तुम्हीच जाणे !! Happy

आहा Happy करवंदं जाम आवडतात. लोणचंसुद्धा.

बादवे, दिनेश, भोकराचं लोणचं कुठे आणि कसं मिळेल? करत वगैरे बसणार नाही म्हणुन आयत्याचं विचारतेय.

सई, तुळशीबागेत ( तुळशीबागेतुन निघाल्यास डाव्या बाजूला दगडुशेट चे मन्दिर आहे, आणी उजव्या बाजूला वळल्यास मन्डईकडे रस्ता जातो त्या रस्त्याला समोरच ) एक तयार लोणची मसाले विकणारे छोटे दुकान आहे. त्याच्या कडे विचारुन बघ. मी तिथुनच माईनमुळ्याचे लोणचे आणले होते. तुळशीबागेसमोरच आडव्या लाईनीत बरीच मसाले आणी तेल वगैरेची दुकान आहेत. चितळे समोर ( शनीपार ) खाकरे, मठिया विकणार्‍या कान्ताबेनला विचारुन बघ. गुजराथी लोक भोकराचे लोणचे जास्त करतात. कुठे विकत मिळतील हे विचारुन बघ तिला. ( आणी कळले तर इथे पण लिही)

दिनेशजी, करवन्दे खूप आवडतात, पण चीका मुळे नकोसे होते. मात्र लोणची कृती छान आहे.

दुसरे म्हणजे मन्डईतच ( त्या रस्त्याला ) जो श्री स्वामी समर्थान्चा मठ आहे त्याच रस्त्याला ते दुकान आधी लागते, मला नाव माहीत नाही.

हीरा, कच्च्या करवंदातल्या बिया तेवढ्या कडक नसतात. ती पिकली कि त्या कडक होतात.

रश्मी, करवंदे अर्धी कापून थोडा वेळ मिठाच्या पाण्यात ठेवली तर चीक निघून येतो. मग चोळून चोळून धुवायची. बियाही निघतात.

अन्जू.... मीठातली करवंदे, ऑलिव्ह पेक्षाही लय भारी लागतात ! ग्रीक सलाद मधेही वापरलीत मी.

ट्रेकला जाताना करवंदे हमखास खायला मिळतात. कधी कधी ट्रेक करतानाचा करवंदांचा साठा करुन घरी आणायचो.

आता मात्र शेतावर जाऊन करवंदे आणावी लागतील.

ट्रेकवर असतानाही, दगडावर ( स्वच्छ धुतलेल्या ) ठेचून ही चटणी करता येईल. त्या नेहमीच्या ट्रेक स्पेशल खिचडीला आणखी रंगत येईल.

जबरा दिसतेय. लागतही भारीच असणार.. हा फोटो चोरून व्हॉटस्सप ग्रूपवर आपलाच म्हणून टाकून ग्रूपमधल्या पोरांची जळवायचा मोह होतोय.. करवंदे फार आवडीची.. कोकणातीलच असल्याने चालता चालता टिपली आणि पानांच्या द्रोणात भरून खात खात पुढे गेले ही मजा लहानपणी अनुभवली आहे.. आताशी लोणच्यात खाणे होते.. गाजर-करवंद-मिरची हे मिक्स लोणच्याचे डेडली कॉम्बिनेशन.. पण त्यातही करवंदे पहिला टिपून खाल्ली जातात Happy