माझा एकमेव ड्यु आयडी ( - मदर वॉरिअर)

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

मायबोलीवर येऊन १३-१५ वर्शं झाली तरी माझा एकच आयडी कायम होता तो म्हणजे बस्के. लोकं ड्युआय का काढतात ह्याचे नवल मात्र कायम वाटायचे. एक म्हणजे गरज काय, अन दुसरे म्हणजे हे सर्व मॅनेज करणे किती अवघड जात असेल?

दोन्ही प्रश्नांची उत्तरं मला मिळाली यथावकाश. मला ड्यु आय घेऊन का होईना पण व्यक्त होण्याची गरज पडली. आणि ते सर्व, दोन दोन आयडेंटिट्या मॅनेज करणे किती अवघड जाते हे ही समजले.

तीन वर्षापूर्वी माझ्या आयुष्यात एक वादळ आले. पहिले एक दिड वर्षं आपलं आपलं मॅनेज करून नेलं निभावून. पण हळूहळू व्यक्त होण्याची गरज ( तीही नॉर्मल, अ‍ॅडल्ट लोकांबरोबर) प्रॉपर संभाषणाची गरज खूप भासू लागली. माझे सोशल लाईफ आधीच तसे कमीच होते व ह्या नवीन परिस्थितीमुळे चांगलेच हँपर झाले होते.

हिच ती गरज व मीच ती मदर वॉरीअर.

सुरवातीला केवळ ऑटीझमबद्दल माहिती पोचवणे व जमेल तितके व्यक्त होणे इतकाच उद्देश होता. व तो पार पाडणे जमतही होते. मात्र हळूहळू मला ह्या दोन दोन आयडेंटिट्यांचा खूप त्रास होऊ लागला. मी बस्के म्हणून मायबोलीवर येणे बरेच कमी केले. कारण चुकून इकडचा संदर्भ तिकडे देणे वगैरे होणे मला तेव्हा परवडण्यासारखे नव्हते.

बरेच ड्युआय सुखाने नांदत असतात. मग मलाच का आयडेंटिटी रिव्हिल करायची आहे? कारण मी अशी मूळात नाहीये. मला जे जसे आहे ते तसे बोलायला, व्यक्त व्हायला आवडते. पण गेल्या काही वर्षात सिचुएशनमुळे व मी तयार केलेल्या ह्या कप्प्यांमुळे मला नॉर्मल संभाषण अवघड बनत गेले. मुलांच्या गप्पा होत असताना मी एकदम शांत बसणार. काही म्हणजे काहीच बोलता येत नाही. कारण ना कोणाला माहित आहे ऑटीझमबद्दल, न मला नॉर्मली बोलता येतंय मुलांचे चिमखडे बोल वगैरे बाबत. शिवाय मला स्वतःला स्प्लिट पर्सनालिटी आहे की काय असे वाटावे इतका गोंधळ सुरू झाला. ज्या मैत्रिणी मुलाचा ऑटीझम जाणून आहेत त्यांनी बस्केला विचारले मवॉ तू आहेस का? बस्के म्हणणार नाही. बस्केच्या ओळखीच्या आयडींशी मदर वॉरिअर , कोण तुम्ही, कुठे असता करत बोलणार! सगळा खरंच सावळा गोंधळ!
माझ्या आधीच कॉम्प्लीकेटेड असलेल्या आयुष्यात हा गोंधळ मला वाढवायचा नव्हता. तो असा वाढेल असे वाटलेही नव्हते. पण झाले खरे तसे.

शिवाय ह्यासर्वात ऑटीझम अवेअरनेसचे काय? मी माझ्या नाव/गावासकट जेव्हा ऑटीझमबद्दल बोलीन, तेव्हा तो जास्त लोकांपर्यंत पोचेल रादर दॅन मवॉमार्फत.
कोण मवॉ? कोण जाणे. तिच्यावर कोणी का विश्वास ठेवावा?

असं सगळं होऊ लागले. अन मला हे अनबेअरेबल झाले. सो... मी, बस्के, भाग्यश्री - मीच मदर वॉरीअर, स्वमग्नता एकलकोंडेकर आहे. इथून पुढे ऑटीझम विभागात बस्केच लिहीत जाईल. Mother warrior, goodbye! You gave me tremendous support when it was truly needed!
थँक्स मायबोलीकर्स, मवॉला इतके सांभाळून घेतल्याबद्दल!

विषय: 
प्रकार: 

मी ह्या आयडीकडे 'डुप्लिकेट आयडी' म्हणून कधीही बघितलं नाही तर अ‍ॅनॉनिमसली व्यक्त होण्याची गरज म्हणून एका खर्‍या व्यक्तीने घेतलेले सार्थ टोपणनाव आणि प्रामाणिक, कळकळीचे लेखन अशा नजरेतूनच कायम मदर वॉरियरचे लेख वाचले.>>>>>>> अगो +१!!!

I am glad you were able to achieve whatever you wanted to through this ID. मला माझी तुझ्या पहिल्याच लेखावर दिलेली प्रतिक्रिया आठवली. जिथे मी विमानात आधी ऑक्सिजन मास्क स्वतःला लावून मग आपल्या मुलांना वगैरे मदत करा असं सांगितलेलं असतं. माझ्यासकट तुला बर्‍याच जणांनी "स्वतःची काळाजी घ्या" हा सल्ला दिला होता खरी पण तरीही तुझे लेख वाचताना, तू ह्या सगळ्यातून जात असताना तुझी मानसिक अवस्था काय होत असेल ह्याबद्दल विचार यायचा. I remember wondering if you are really taking care of yourself. सगळं काही धैर्यानी करत असताना कधी कधी माणूस आतून खचून गेलेला असतो पण ज्या पद्धतीनी आता तू हा आयडी बाजूला ठेवलास it almost tells me you have made so much progress from where you began! This a clear sign of strength!
Very happy for you and your family!
Happy

तू मवॉ असशील असं डोक्यातच आलं नव्हतं. पण तुझ्या खुलाश्यामुळे तुझी जास्तच काळजी वाटली. कारण तू इतरत्र वावरत असताना तुझ्यावर असणार्‍या ताणाची चुणूक सुद्धा दिसली नव्हती.
कुठेही ऑटिझमचा उल्लेख झाला की केवळ मवॉचे लेख आठवायचे :). एक आई हा लढा देत असताना एक माणूस म्हणून तुझे स्वतःकडे किती दुर्लक्ष होत असेल ह्याचा अंदाज आहे. इतक्या लांब राहून मी तुला एव्हढेच म्हणू शकते की तुला कधीही काहीही बोलायची गरज भासल्यास हक्काने कॉल कर.

अगो आणि वैद्यबुवांना +१.

वरील अनेक प्रतिक्रियांशी सहमत. बुवा +१
तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या. वेळ मिळेल तसे आता बस्के आयडीने लेख नक्की लिही. म वॉ ने किती विचार करून, प्रत्येक गोष्टीवर जास्तीत जास्त प्रयत्न करून लेख लिहिलेले ते पदोपदी जाणवायच. रिस्पेक्ट.

बस्के, सहज सुचवते. काहीजणांनी पेट थिरपीचा सल्ला दिला आहे मवॉच्या लेखानंतर. कुत्रा घरी पूर्णवेळ आणण्यापेक्षा आधी थोडे दिवस ह्युमेन सोसायटीमधे थेरपी डॉग सेशन असतात तिथे त्याला घेऊन जा आणि कसा प्रतिसाद मिळतो ते बघ. स्वानुभवावरून सांगते, डॉग्स कडे खूप हीलींग पॉवर असते अर्थात वेल ट्रेन्ड पाहिजे. मी स्वतः बरीच वर्षे डॉग फोबिक होते, किंबहुना अजूनही काही ब्रीडची जबरदस्त भीती वाटते. इतकी की मी थरथर कापते. हार्ट बीट्स वाढतात पण आता घरी पपी आहे. तिने खूप खूप आनंद दिलाय. मुख्य म्हणजे माझी एन्झायटि प्रचंड प्रमाणात कमी झालीये. बर्‍याच वर्षांची थॉट प्रोसेस होती पपी घेण्याआधी. घरी डॉग असेल तर काम वाढते निदान ते सेट होईपर्यन्त तरी लहान मूल असल्याप्रमाणे. अजून ताण पडू शकतो. त्यामुळे रीड टू डॉग्स, सुपरवाइझ्ड प्ले डेट सारखे प्रोग्राम्स करून बघ.

थँक्यू सो मच.. रिअली.. तुमच्या शुभेच्छांचे पाठबळ आहे आमच्यामागे ही भावना खूप मानसिक बळ वाढवणारी आहे.

धनश्री - Happy [ अजुन फारसे घरी माहित नाहीये गं कोणाला. आता देशवारी आहे पुढच्या महिन्यात तेव्हा कळेलच.]

मी ऑटीझम व सर्व्हिस डॉग्ज बद्दल बरंच (चांगले) वाचत असते. पण इतके दिवस नील अतिशय लीस्ट इंटरेस्टेड असायचा डॉग्जबाबत म्हणून कधी विचार आला नव्हता. परंतू गेल्याच आठवड्यात बिल्डींगमधल्या नेबरच्या डॉगशी अस्सा खेळला आहे रमून! पळापळी, त्याची शेपूट पकडायला जा.. त्याला (डॉगीला) त्याचा मिकी ऑफर कर.. आम्हाला आधी कुत्र्याबद्दल काळजी व नंतर मजा वाटली. तेव्हापासून हा विचार घोळत आहे डोक्यात. परवाच आमच्या एका मित्राने ही लिंक पाठवली: http://www.cnn.com/2016/03/11/health/turning-points-iris-grace-autism/in...
थेरपी कॅटदेखील असते हे मला माहित नव्हते. पण कदाचित आम्हाला डॉग जास्त आवडेल. एनीवे, हे सगळे इमले आहेत. पण नकी विचार करू पेटचा.

डोन्ट वरी. घरचे सगळे तुझ्या पाठिशी असतील याची मला खात्री आहे. मामा-मामींची जिद्द आणि सकारात्मकता तुझ्यात आहे. टेक केअर.

Happy Happy

अगो आणि मैत्रेयि - +१
बस्के तुझं मन मोकळं केलस हे छान केलस. तू मवॉ असशील असं अजिबात वाटलं नव्हतं, रादर अगो ने म्हटल्याप्रमाणे एका व्यक्तीने अनॉनिमसली व्यक्त होण्याची गरज म्हणूनच हे नाव घेतलं असणार असच वाटलं होतं. मवॉचे सगळेच लेख अभ्यसपूर्ण, कळकळीने लिहिलेले असल्याने connect झाले. आता तर खात्री झाली आहे तू किती strong person आहेस याची.
तुम्हा तिघानाही शुभेच्छा.

तुझ्या ब्लॉग वरच्या 'काय करतेस दिवसभर' या पोस्ट पासून वाचतेय लिखाण नेहमीच खुप कौतुक वाटायच वेगळा विचार , कलागुण सजगपणे जोपसणारी व्यक्ती म्हणून. संयुक्ता आणि मायबोली च्या एतर उपक्रमात असलेला सहभाग बघून अजुनच कौतुक वाटायच. या सगळ्यात मागे बराच वेळ आहे एतर काही चिंता नाहीत हे गृहीताक होत.

मावॉ चे लेख नेहमीच वाचले आणि प्रत्येकवेळी वाटायच ज्यांची पेलायची ताकद असते त्यानाच अशी आवाहन समोर येतात. कधी प्रतिक्रिया दिल्या नाहीत पण अनेकानी म्हणलेय त्याप्रमाणे काय बोलाव ना कळून फक्त आदर वाटत राहिला.

आता या दोन्हीची सांगंड तू दिवसरात्र घालते आहेस हे कळल्यापासून फक्त Respect Respect Respect
तुम्हा तिघाना खूप शुभेच्छा.!!!

लिहीत राहा अशीच...

वरच्या सगळ्या पोस्टना अनुमोदन ....

म वॉ चे सगळे लेख वाचलेत आणि दरवेळी त्यातून तुमचा सकारात्मक लढा पुढे येत गेला ..तिकडे मी कधी प्रतिक्रिया दिली नसेल कदाचित पण प्रत्येक वेळी तुम्हाला मनोमन सलाम केला आहे...या लेखां मागची खरी व्यक्ती कोण ह्याचा कधी विचारच केला नाही.. तुम्ही अश्याच व्यक्त होत राहा लिहत राहा.. तुम्हाला खूप सकारात्मक उर्जा मिळत राहू देत नेहमीच..

जालावरची ओळख (??) त्यात मी फक्त वाचक....पण प्रचंड कौतुक आणि अभिमान वाटला तुझा.
मवॉचे लेखन भारावून टाकायचे.
अनेक अनेक शुभेच्छा !!!

तुमच्या इतका डुआयडी चा सुयोग्य वापर खचितच कोणी केला असेल .
तुम्हाला खूप खूप शुभेच्छा !
मध्ये पुण्यात तुळजाभवानी trust तर्फे एक चित्रकला स्पर्धा घेतली होती तेव्हा मुले व पालकांचा खूप छान प्रतिसाद मिळाला होता . त्यांच्या पत्रिकांचा अभ्यास करायचा डोक्यात आहे . बघू कसे जमते ते .

बस्के ग्रेट आहेस तु... सगळेच प्रतिसाद +++++१

बस्के, तू किती प्रकारे एक मार्गदर्शक उदाहरण म्हणून इतरांसमोर उभी आहेस, याची तुला कदाचित कल्पना नसेल. >>> ++++++१००

मवॉ चं लिखाण कळकळीचं आहे. अशा आयडीमागे कोण आहे हे माहीत असण्याची गरज नाही. >> +१

almost tells me you have made so much progress from where you began! This a clear sign of strength!
Very happy for you and your family! >> ह्याला संपूर्ण अनुमोदन ! hats of to you !

मी फॉर सम रिझन इथे १७न्दा प्रतिसाद द्यायला आले, थँक्स म्हणायला आले. पण मला अजिबात शब्दात मांडता येत नाहीये काही. शब्द खुंटले आज. एव्हढंच म्हणेन, मला प्लीज लार्जर दॅन लाईफ प्रतिमा देऊ नका. मी अतिशय चुका करणारी, चिडचिड करणारीच आई आहे. फक्त ज्या परिस्थितीला डील करतीय ती थोडी वेगळी आहे इतकंच. बाकी.. लिहीते त्यातून कधीच १००% सत्य बाहेर येत नाही. ते सर्व माझे मलाच लेसन्सदेखील असतात. असं वागले पाहिजे अमुक सिचुएशनमध्ये. मी तसं कायमच वागते असं नाहीये. आय मीन, मला कुठेही तुमच्या शुभेच्छांना अव्हेरायचे नाहीये, पण तुम्हा सर्वांचे कौतुक पाहून मी ह्याला खरंच पात्र आहे का असंही वाटून जात आहे गेले दोन दिवस..

हे माझे कमिंग आउट(ऑटीझमच्या संदंर्भात) झाले असले तरी मला राहून राहून 'त्या' मित्रमैत्रिणींची आठवण येत आहे. जे अशाच सिचुएशनशी लढत आहेत. त्या सर्वांना अजुन ह्याबाबत ओपन व्हायचे नसेल, धैर्य नसेल, इच्छाच नसेल.. काहीही असो.. पण ते सर्वजण ह्या प्रवासात आहेत ह्याची मला पूर्ण जाणिव आहे. इन फॅक्ट.. द वे दे डील विथ सिचुएशन, मला असंही वाटू लागले आहे की मी जरा जास्तच गाजावाजा करत आहे की काय. Uhoh पण अशाच परिस्थितीतून जाणार्‍या कोणालाही ह्याबाबतीत बोलायचे असेल, तर ऐकण्यासाठी माझा कान व आधारासाठी माझा खांदा नक्की असेल!

मी तसेच इतर ऑटीझम पॅरेंट्स जितके जास्त ह्याबद्दल बोलू तितका अवेअरनेस वाढणार आहे. व तो वाढायला हवाय. मायकेल जॅक्सन म्हणतो तसा.. हील द वर्ल्ड. मेक इट बेटर प्लेस फॉर यू & फॉर मी ( माझी अ‍ॅडिशन मेनली फॉर देम- अवर किड्स...) त्यांना आपलेसे वाटेल असे जग बनवणे ही आपली जबाबदारी म्हणूनच मी इतकी बडबड करत आहे गेले वर्ष- दोन वर्ष.

थँक्स परत एकदा. Happy

बस्के U deserve the credit Happy
चुका, चिडचिड सगळ्याच पालकांची होते पण तु किती सहजपणे इथे सांगतेस... सगळयांनाच जमत नाही.

तुझा पहिला लेख वाचुन तर मला कित्येक दिवस फक्त हाच विषय मनात होता. फ्लु व्हॅक्सीन मुळे असे काही होऊ शकते आणि डॉ. तर व्हॅक्सीन मुळे काही होत नाही असे सांगतात तेव्हा खुप चिडचिड झाली होती. अजुनही फ्लु चा शॉट नको सांगितले की डॉ. नापसंती व्यक्त करतातच. आणि वाद पण होतोच.
असो इतर कोणी पालक असतील तर तुझ्या लेखांबद्दल सांगेनच.

April is National Autism Awareness Month

तुझ्या उपायांना लवकर यश मिळो हिच सदिच्छा !! Happy Happy

आधी मदर वॉरिअर चे लेख थोडे थोडे वाचले होते...

आता परत वाचले...

खुप आदर वाढला तुमच्या बद्दल...

तुम्हाला तुमच्या परिवाराला खुप मनापासुन शुभेच्छा ...

बस्के, सप्रेम नमस्कार!!!! तुझ्या आईचे पत्र अजून आठवते आणि कधीच विसरणार नाही.

तू आत्ता जे वर लिहिले ना ते खूपच समंजस लिहिलेस. तू कौतुकास का पात्र आहे तर अशा परिस्थितीमधे तुला चौफेर विचार करायला जमत आहे. तू ह्यातून जाताना तुझा तोल जात नाही आहे. तुला तुझ्या दु:खात राहूनही खोलवर विचार करायला जमत आहे आणि तू इतरांसाठी (हील द वर्ल्ड. मेक इट बेटर प्लेस फॉर यू & फॉर मी) इतका विचार करते आहेस त्यासाठी तुझ्या पाठिवर खूप पॅटींग्स! परदेशात राहून जिथे आपल्या पतीशिवाय इतर कुणी जवळचे असे नसते शिवाय नोकरी आणि पैशाची गरज असताना तु स्वत इतकी हिम्मत दाखवत आहे त्याबद्दल तुझे कौतुक करावे तेवढे कमीच. खूप कमी.

अधूनमधून मी फेसबुकवर तुझे फोटो पाहिले आहेत. तुझे मजकुर वाचले आहेत. आता परत ते फोटो आठवून मला तुझ्या चेहर्‍यावरचे भाव लक्षात येत आहेत. ते बोलके वाटत आहेत.

कीप ईट अप! आपल्या आतमधे जी शक्ती असते ना तीच आपल्या खरी कामाची असती. तुझ्यामधे एक दुर्गा आहे!!!!!

बस्के दोन्ही आयडी दोन वेगवेगळे व्यक्तिमत्व वाटताहेत...
तु खरच वॉरीयर आहेस किप इट अप! hats off to u..

Its world autism day today, and its my fortune to read such a brief information on autism. Thanks for sharing all this knowledge with us and hats off to your identitiy which you have taken here to write on autism & confession is more appriciable than that.

Keep it up and all the best.

सर्व वाचुन तुमच्या बद्दलचां आदर द्विगुणित झालाय . आज च्या मटा च्या मंथन पुरवणीत स्वमग्नतेवर मेधा वागळे यांचा छान लेख आलाय .तो वाचताच मला माबोवरील या लेखमालेची आठवण झाली .

हो आज ऑटीझम डे तर एप्रिला महिना हा ऑटीझम अवेअरनेस मंथ म्हणून ओळखला जातो. Happy
अवेअरनेसला हातभार म्हणून तुम्ही माझ्या जर्नी विथ ऑटीझम वेबसाईटची लिंक शेअर करू शकता. http://marathi.journeywithautism.com/

कृपया ध्यानात घ्या मला अजुनतरी फेसबुकवर ह्या गोष्टी शेअर करणे कम्फर्टेबल वाटत नाही. त्यामुळे माझ्या मित्रपरिवारातील व्यक्तींनी माझ्या प्रोफाईलला टॅग वगैरे करू नये. थँक्यू!

Pages