माझा एकमेव ड्यु आयडी ( - मदर वॉरिअर)

Posted
6 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago

मायबोलीवर येऊन १३-१५ वर्शं झाली तरी माझा एकच आयडी कायम होता तो म्हणजे बस्के. लोकं ड्युआय का काढतात ह्याचे नवल मात्र कायम वाटायचे. एक म्हणजे गरज काय, अन दुसरे म्हणजे हे सर्व मॅनेज करणे किती अवघड जात असेल?

दोन्ही प्रश्नांची उत्तरं मला मिळाली यथावकाश. मला ड्यु आय घेऊन का होईना पण व्यक्त होण्याची गरज पडली. आणि ते सर्व, दोन दोन आयडेंटिट्या मॅनेज करणे किती अवघड जाते हे ही समजले.

तीन वर्षापूर्वी माझ्या आयुष्यात एक वादळ आले. पहिले एक दिड वर्षं आपलं आपलं मॅनेज करून नेलं निभावून. पण हळूहळू व्यक्त होण्याची गरज ( तीही नॉर्मल, अ‍ॅडल्ट लोकांबरोबर) प्रॉपर संभाषणाची गरज खूप भासू लागली. माझे सोशल लाईफ आधीच तसे कमीच होते व ह्या नवीन परिस्थितीमुळे चांगलेच हँपर झाले होते.

हिच ती गरज व मीच ती मदर वॉरीअर.

सुरवातीला केवळ ऑटीझमबद्दल माहिती पोचवणे व जमेल तितके व्यक्त होणे इतकाच उद्देश होता. व तो पार पाडणे जमतही होते. मात्र हळूहळू मला ह्या दोन दोन आयडेंटिट्यांचा खूप त्रास होऊ लागला. मी बस्के म्हणून मायबोलीवर येणे बरेच कमी केले. कारण चुकून इकडचा संदर्भ तिकडे देणे वगैरे होणे मला तेव्हा परवडण्यासारखे नव्हते.

बरेच ड्युआय सुखाने नांदत असतात. मग मलाच का आयडेंटिटी रिव्हिल करायची आहे? कारण मी अशी मूळात नाहीये. मला जे जसे आहे ते तसे बोलायला, व्यक्त व्हायला आवडते. पण गेल्या काही वर्षात सिचुएशनमुळे व मी तयार केलेल्या ह्या कप्प्यांमुळे मला नॉर्मल संभाषण अवघड बनत गेले. मुलांच्या गप्पा होत असताना मी एकदम शांत बसणार. काही म्हणजे काहीच बोलता येत नाही. कारण ना कोणाला माहित आहे ऑटीझमबद्दल, न मला नॉर्मली बोलता येतंय मुलांचे चिमखडे बोल वगैरे बाबत. शिवाय मला स्वतःला स्प्लिट पर्सनालिटी आहे की काय असे वाटावे इतका गोंधळ सुरू झाला. ज्या मैत्रिणी मुलाचा ऑटीझम जाणून आहेत त्यांनी बस्केला विचारले मवॉ तू आहेस का? बस्के म्हणणार नाही. बस्केच्या ओळखीच्या आयडींशी मदर वॉरिअर , कोण तुम्ही, कुठे असता करत बोलणार! सगळा खरंच सावळा गोंधळ!
माझ्या आधीच कॉम्प्लीकेटेड असलेल्या आयुष्यात हा गोंधळ मला वाढवायचा नव्हता. तो असा वाढेल असे वाटलेही नव्हते. पण झाले खरे तसे.

शिवाय ह्यासर्वात ऑटीझम अवेअरनेसचे काय? मी माझ्या नाव/गावासकट जेव्हा ऑटीझमबद्दल बोलीन, तेव्हा तो जास्त लोकांपर्यंत पोचेल रादर दॅन मवॉमार्फत.
कोण मवॉ? कोण जाणे. तिच्यावर कोणी का विश्वास ठेवावा?

असं सगळं होऊ लागले. अन मला हे अनबेअरेबल झाले. सो... मी, बस्के, भाग्यश्री - मीच मदर वॉरीअर, स्वमग्नता एकलकोंडेकर आहे. इथून पुढे ऑटीझम विभागात बस्केच लिहीत जाईल. Mother warrior, goodbye! You gave me tremendous support when it was truly needed!
थँक्स मायबोलीकर्स, मवॉला इतके सांभाळून घेतल्याबद्दल!

विषय: 
प्रकार: 

_/|\_

बस्के/मदर वॉरियर ताई,
मदर वॉरियर चे सर्व लेख नीट वाचले आहेत आणि त्यानुसार आजूबाजूच्या काही ऑटिस्टीक मुलांना समजून घ्यायला मदत ही झाली आहे.
तुमचा आयडी कोणताही असो, तुम्ही उत्तम प्रकारे परिस्थिती सांभाळताय.अनेक नव्या आयांना त्यातून बरेच शिकण्यासारखे आहे.शुभेच्छा!कोणत्याही पाहिजे त्या आयडीने का होईना, लिहीत रहा.व्यक्त होत रहा.

बस्के Sad
तुला तुझ्या लढ्यात लढण्याच बळ मिळो. स्वतःचा आयडी कबुल करुन तु दाखवुन दिलसं की तु खरच मदर वॉरीयर आहेस.

बस्कु , बिग हग . जेव्हा सांगितलं होतस तेव्हाच तुझा अभिमान वाटलेला . डोक्यावर बर्फ ठेवून हे सर्व मेन्टेन करण हे खरंच हॅट्स ऑफ . कीप इट अप

You are a warrior and we all are with you. +१

यु सेड इट चिन्मय
काही काही गोष्टी मराठीतून नीट्पणे व्यक्त करता येत नाहीत हेच खरे!

बस्कु , बिग हग . जेव्हा सांगितलं होतस तेव्हाच तुझा अभिमान वाटलेला . डोक्यावर बर्फ ठेवून हे सर्व मेन्टेन करण हे खरंच हॅट्स ऑफ . कीप इट अप >>>>>>=१११११११११
टाईट हग !!!!!

बस्कु, एक tight hug..
इथे लिहिल्यावर खूप हलकं वाटत असेल तुला.. खरच पाहिजे त्या आयडीने का होईना, लिहीत रहा.व्यक्त होत रहा.

बस्कु! A big warm hug!! As Chinooks rightly said, it's not about just the id, you are a warrior and we are all with you!
मला तुझं हे प्रांजळ कथन ऐकून उगीच हलकं वाटतंय... बरं केलंस लिहून टाकलंस! I'm so glad to have you as a friend! Proud of you!

बस्के, तू किती प्रकारे एक मार्गदर्शक उदाहरण म्हणून इतरांसमोर उभी आहेस, याची तुला कदाचित कल्पना नसेल.

आम्ही नेहमीच तुझ्यासोबत आहोत.

काल द्न्यान प्रबोधीनीच्या संवादिनीच्या कार्यक्रमाला गेले होते ' चेहरे व मुखवटे' डॉ अनघा लवळेकर त्यानी सांगितलं की तुमचा चेहरा अन मुखवटा दोन्ही एक होतील तेवढा तुमचा तणाव कमी होतो .... अभिनंदन! लिहीत रहा ....

तू किती प्रकारे एक मार्गदर्शक उदाहरण म्हणून इतरांसमोर उभी आहेस, याची तुला कदाचित कल्पना नसेल.
आम्ही नेहमीच तुझ्यासोबत आहोत.>> +१

Pages