माझा एकमेव ड्यु आयडी ( - मदर वॉरिअर)

Posted
4 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
4 वर्ष ago
Time to
read
1’

मायबोलीवर येऊन १३-१५ वर्शं झाली तरी माझा एकच आयडी कायम होता तो म्हणजे बस्के. लोकं ड्युआय का काढतात ह्याचे नवल मात्र कायम वाटायचे. एक म्हणजे गरज काय, अन दुसरे म्हणजे हे सर्व मॅनेज करणे किती अवघड जात असेल?

दोन्ही प्रश्नांची उत्तरं मला मिळाली यथावकाश. मला ड्यु आय घेऊन का होईना पण व्यक्त होण्याची गरज पडली. आणि ते सर्व, दोन दोन आयडेंटिट्या मॅनेज करणे किती अवघड जाते हे ही समजले.

तीन वर्षापूर्वी माझ्या आयुष्यात एक वादळ आले. पहिले एक दिड वर्षं आपलं आपलं मॅनेज करून नेलं निभावून. पण हळूहळू व्यक्त होण्याची गरज ( तीही नॉर्मल, अ‍ॅडल्ट लोकांबरोबर) प्रॉपर संभाषणाची गरज खूप भासू लागली. माझे सोशल लाईफ आधीच तसे कमीच होते व ह्या नवीन परिस्थितीमुळे चांगलेच हँपर झाले होते.

हिच ती गरज व मीच ती मदर वॉरीअर.

सुरवातीला केवळ ऑटीझमबद्दल माहिती पोचवणे व जमेल तितके व्यक्त होणे इतकाच उद्देश होता. व तो पार पाडणे जमतही होते. मात्र हळूहळू मला ह्या दोन दोन आयडेंटिट्यांचा खूप त्रास होऊ लागला. मी बस्के म्हणून मायबोलीवर येणे बरेच कमी केले. कारण चुकून इकडचा संदर्भ तिकडे देणे वगैरे होणे मला तेव्हा परवडण्यासारखे नव्हते.

बरेच ड्युआय सुखाने नांदत असतात. मग मलाच का आयडेंटिटी रिव्हिल करायची आहे? कारण मी अशी मूळात नाहीये. मला जे जसे आहे ते तसे बोलायला, व्यक्त व्हायला आवडते. पण गेल्या काही वर्षात सिचुएशनमुळे व मी तयार केलेल्या ह्या कप्प्यांमुळे मला नॉर्मल संभाषण अवघड बनत गेले. मुलांच्या गप्पा होत असताना मी एकदम शांत बसणार. काही म्हणजे काहीच बोलता येत नाही. कारण ना कोणाला माहित आहे ऑटीझमबद्दल, न मला नॉर्मली बोलता येतंय मुलांचे चिमखडे बोल वगैरे बाबत. शिवाय मला स्वतःला स्प्लिट पर्सनालिटी आहे की काय असे वाटावे इतका गोंधळ सुरू झाला. ज्या मैत्रिणी मुलाचा ऑटीझम जाणून आहेत त्यांनी बस्केला विचारले मवॉ तू आहेस का? बस्के म्हणणार नाही. बस्केच्या ओळखीच्या आयडींशी मदर वॉरिअर , कोण तुम्ही, कुठे असता करत बोलणार! सगळा खरंच सावळा गोंधळ!
माझ्या आधीच कॉम्प्लीकेटेड असलेल्या आयुष्यात हा गोंधळ मला वाढवायचा नव्हता. तो असा वाढेल असे वाटलेही नव्हते. पण झाले खरे तसे.

शिवाय ह्यासर्वात ऑटीझम अवेअरनेसचे काय? मी माझ्या नाव/गावासकट जेव्हा ऑटीझमबद्दल बोलीन, तेव्हा तो जास्त लोकांपर्यंत पोचेल रादर दॅन मवॉमार्फत.
कोण मवॉ? कोण जाणे. तिच्यावर कोणी का विश्वास ठेवावा?

असं सगळं होऊ लागले. अन मला हे अनबेअरेबल झाले. सो... मी, बस्के, भाग्यश्री - मीच मदर वॉरीअर, स्वमग्नता एकलकोंडेकर आहे. इथून पुढे ऑटीझम विभागात बस्केच लिहीत जाईल. Mother warrior, goodbye! You gave me tremendous support when it was truly needed!
थँक्स मायबोलीकर्स, मवॉला इतके सांभाळून घेतल्याबद्दल!

विषय: 
प्रकार: 

बस्के - मदर वॉरीयर,
दोन्ही आयडीज बद्दल खूप रिस्पेक्ट आहे.
तुझ्या आयडीघेण्यामागे आणि रिव्हल करण्याब्द्दल दोन्ही भूमिका पटल्या.
मदर वॉरियर तू आहेसच त्यामुळे तो ड्युआय नाहीच म्हणु शकत मी :).
तुला आणि नील ला खूप शुभेच्छा !

रिस्पेक्ट !

ऑटीझम बद्द्ल लिहाच. या आधी माझ्यासाठी ती वेगळीच दुनिया होती. ती समजण्यास जाणून घेण्यास तुम्हीच भाग पाडलेत.

परंतु बस्के या आयडीनेही ईतर विषयांवरचे लिखाण आता येऊ द्या. दुसरा आयडी घेण्याचा निर्णय आपण सार्थ ठरवलात. आता तो आयडी उघड करण्याचाही निर्णय देखील नक्की सार्थ ठरवाल. मनापासून शुभेच्छा Happy

बस्के तुला बिग हग, मदर वॉरिअर बद्दल रिस्पेक्ट होताच, आहेच तुला आणि तुझ्या पिल्लाला खूप शुभेच्छा

<<तुझ्या आयडीघेण्यामागे आणि रिव्हल करण्याब्द्दल दोन्ही भूमिका पटल्या. +१

बस्के, अतिशय गलबलुन आलं हे वाचून. मदर वॉरिअरचे जेंव्हा वाचले तेंव्हा तिच्याबद्द्ल खुप आदर आणि कौतुक वाटत आले आहे. तुझ्या हिमतीला, संयमाला सलाम ! तुला आणि पिल्लूला खूप खूप शुभेच्छा !

मदर वॉरिअरबद्दल कायमच आदर वाटत आलेला आहे, प्रत्येक लेखानंतर तो वाढतच गेला. जरी मी तुम्हाला वैयक्तिक रित्या (दोन्ही आयडीज ) ओळखत नसले तरी लेख वाचुन तर तुम्ही खरेच ग्रेट आहात असेच वाटले. जेव्हा सत्य स्विकारुन पुढे जायचे ठरवतो, तेव्हाच अर्धी लढाई आपण जिंकलेलो असतो.
All The Best...Never doubt your abilities for a moment in a life...Best wishes and Good Luck ! Happy

बस्के__/\__
सगळ्या ना ++१०००
अवल, अगो यांच्या पोस्ट्स बेस्ट ... पर्फेक्ट लिहिलय.
You are a warrior and we all are with you!!<< yes! always!!
तुम्हा सर्वांना खुप खुप शुभेच्छा!

बस्के - you are simply great!
तुम्हा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!

बस्के, तुझ्या या लेखासकट पूर्वीच्या प्रत्येक लेखातून प्रकर्षाने जाणवतं कि तू खरोखरंच फायटर आहेस.

वरील कित्येकांनी माझ्या मनातलंच लिहिलंय..

आता तुला मोकळं वाटतंय ना अशीच व्यक्त होत राहा..

we all are so so proud of You, Girl!!!

तुझ्या धैर्या ला, प्रामाणिकपणाला सलाम !!!

'म वॉ ' चे लिखाण खुप काळजीपुर्वक वाचलेय. ते सर्व लेख, अगदी प्रतिक्रियांसहित प्रेरणादायी आहेत यात शंका नाही. असंही 'मवॉ' च्या मागे काहितरी खरं नाव असणारच, ते गृहित धरलेलं होतच.
फरक हा की आता सलाम त्या आभासी आयडी बरोबर या मूर्त 'मवॉ ला सुद्धा.

अपार कौतुक गं राणी तुझं. अगो,आशुडी, नंदिनी यांनी अगदी नेमक्या पोचवल्यात भावना. पिल्लुला, तुला बिग हग!
यु आर अ हिरो!

बस्के, हॅट्स ऑफ तुझ्या जिद्दीला, धैर्याला, आणि अथक परिश्रमाला. बाकी फार नाही लिहू शकत. शब्दच खुंटले आहेत. तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा.
बर्‍याच दिवसांत इकडे फिरकले नाही पण मवॉचे बहुतेक लेख वाचले आहेत. खूप चांगल्याप्रकारे माहिती संग्रहीत केली आहेस. स्वमग्न मुलांच्या पालकांना तसेच इतरांनादेखील यातून खूप काही शिकण्यासारखे आहे.

मवॉ आयडीबद्दल कसलाच असा संशय आलाच नाही. कारण लिहिलेला विषय महत्वाचा होता. आणि त्या विषयामूळेच वाचले जायचे लेख.

तसेही, कुठलीही नवीन आयडी माबोवर आली तर कोण , कुठली, कोणाची असावी असले खेळ कोणाबरोबर खेळायचा पांचटपणा करण्यात रस नसतोच/नाही. असो.
------------------------------------------------------
बस्के ह्या आयडीला ओळखत न्हवते/नाही.
मवॉ हिच आयडीने दर वेळेस विचार करण्यास भाग पाडलेले. प्रत्येक भाग वाचून मी मनातल्या मनात थक्क व्हायचे. नंतर माबोहून लॉग ऑफ होवून, दहा मिनिटे शांत होवून विचार करायचे, काय चिकाटी आहे ह्या 'आईमधे'. हि आई आराम कधी करते? कसं स्वतःला सांभाळते? का कुणास ठावूक मला हिच चिंता वाटली ज्यास्त.
प्रत्येक आई आपल्या बाळासाठी बेस्ट करायचा प्रयत्न करतेच. पण इतक्या धकाधकीतूनही, नीट मांडणं, माहीती संकलीत करणं हेच एक काम होतं/आहे.
जे तुम्हाला वाटलं ते केलेत हेच चांगलं, लोकं काय कधीही, कुठेही नावं ठेवणारच, चर्चा करणारच. असो.

तुम्हाला खूप शुभेच्छा!

मदर वॉरिअरबद्दल कायमच आदर वाटत आलेला आहे, प्रत्येक लेखानंतर तो वाढतच गेला. जरी मी तुम्हाला वैयक्तिक रित्या (दोन्ही आयडीज ) ओळखत नसले तरी लेख वाचुन तर तुम्ही खरेच ग्रेट आहात असेच वाटले. जेव्हा सत्य स्विकारुन पुढे जायचे ठरवतो, तेव्हाच अर्धी लढाई आपण जिंकलेलो असतो.
All The Best...Never doubt your abilities for a moment in a life...Best wishes and Good Luck ! >>>१००००+

बस्केच लिखाण या अगोदर बरेच दा वाचलं होतं .
तुम्ही स्व.ए . हे नाव बदलून मवॉ घेतलतं ते फार आवडलं .

रिस्पेक्ट !
ऑटीझम बद्द्ल लिहाच. या आधी माझ्यासाठी ती वेगळीच दुनिया होती. ती समजण्यास जाणून घेण्यास तुम्हीच भाग पाडलेत.>>>+ १००००० .
प्रामाणिकपणे सांगायचे तर तुमच्याकदून मी पेशन्स शिकले .
तुमच लिखाण वाचताना सारखं मी माझ्या मुलाशी कसं वागते ते आठवायचं Sad .
बरेच सुधारले मी आता Happy

बाप्रे, मला खुप धक्का बसला हे वाचुन.. बस्के, कसे काय निभावलेस हे सगळे.. मवॉचे लेख वाचल्यावर काहीही सुचत नाहीये असे वाटायचे पण तरीही मवॉला मी ओळखत नव्हते. आणि आता कळतेय की माझ्या ओळखीची व्यक्ती यातुन जातेय. मला खुप डिस्टर्बिंग वाटतेय हे सगळे.

तुला एक बिग हग.

बस्के, कसे काय निभावलेस हे सगळे.. मवॉचे लेख वाचल्यावर काहीही सुचत नाहीये असे वाटायचे पण तरीही मवॉला मी ओळखत नव्हते. आणि आता कळतेय की माझ्या ओळखीची व्यक्ती यातुन जातेय. मला खुप डिस्टर्बिंग वाटतेय हे सगळे. <<<< बस्के. मलाही हे लिहायचे होते काल. पण काल फारसे काही सुचत नव्हते. (भावनेच्या भरात लिहिताना चुकीचा अर्थ निघण्याच्या शक्यतेने फारसे लिहिले नाही.) साधना, धन्यवाद.

बस्के - मदर वॉरीयर,
दोन्ही आयडीज बद्दल खूप रिस्पेक्ट आहे.
तुझ्या आयडीघेण्यामागे आणि रिव्हल करण्याब्द्दल दोन्ही भूमिका पटल्या.
मदर वॉरियर तू आहेसच त्यामुळे तो ड्युआय नाहीच म्हणु शकत मी स्मित.
तुला आणि नील ला खूप शुभेच्छा !
>> ++ 1.
Tight hug Baske!

तुम्ही बस्के या आयडीने लिहिलेले लिखाण अपवादानेच वाचले असेल. परंतु तुम्ही स्वमग्नता एकलकोंडेकर/मदर वाॅरियर या आयडीने लिहिलेले लिखाण प्रत्येक वेळी वाचले आहे.>> + १११

वरच्या सगळ्यांना मम आणि पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा.

-^- . म वॉ चं लिखाण वाचलय. ऑटीझम बद्द्ल लिहाच. >+१
दुसरा आय डी ही गरज होती. पण ताण येतोय कळल्यावर तो जाहीर व्यक्त करणं. दोन्हीही छान निर्णय. मुळात गरज आणि ताण योग्य वेळी डिफाईन करता आले तुम्हाला. खूप मोठी गोष्ट आहे ही.

Pages