माझा एकमेव ड्यु आयडी ( - मदर वॉरिअर)

Posted
4 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
4 वर्ष ago
Time to
read
1’

मायबोलीवर येऊन १३-१५ वर्शं झाली तरी माझा एकच आयडी कायम होता तो म्हणजे बस्के. लोकं ड्युआय का काढतात ह्याचे नवल मात्र कायम वाटायचे. एक म्हणजे गरज काय, अन दुसरे म्हणजे हे सर्व मॅनेज करणे किती अवघड जात असेल?

दोन्ही प्रश्नांची उत्तरं मला मिळाली यथावकाश. मला ड्यु आय घेऊन का होईना पण व्यक्त होण्याची गरज पडली. आणि ते सर्व, दोन दोन आयडेंटिट्या मॅनेज करणे किती अवघड जाते हे ही समजले.

तीन वर्षापूर्वी माझ्या आयुष्यात एक वादळ आले. पहिले एक दिड वर्षं आपलं आपलं मॅनेज करून नेलं निभावून. पण हळूहळू व्यक्त होण्याची गरज ( तीही नॉर्मल, अ‍ॅडल्ट लोकांबरोबर) प्रॉपर संभाषणाची गरज खूप भासू लागली. माझे सोशल लाईफ आधीच तसे कमीच होते व ह्या नवीन परिस्थितीमुळे चांगलेच हँपर झाले होते.

हिच ती गरज व मीच ती मदर वॉरीअर.

सुरवातीला केवळ ऑटीझमबद्दल माहिती पोचवणे व जमेल तितके व्यक्त होणे इतकाच उद्देश होता. व तो पार पाडणे जमतही होते. मात्र हळूहळू मला ह्या दोन दोन आयडेंटिट्यांचा खूप त्रास होऊ लागला. मी बस्के म्हणून मायबोलीवर येणे बरेच कमी केले. कारण चुकून इकडचा संदर्भ तिकडे देणे वगैरे होणे मला तेव्हा परवडण्यासारखे नव्हते.

बरेच ड्युआय सुखाने नांदत असतात. मग मलाच का आयडेंटिटी रिव्हिल करायची आहे? कारण मी अशी मूळात नाहीये. मला जे जसे आहे ते तसे बोलायला, व्यक्त व्हायला आवडते. पण गेल्या काही वर्षात सिचुएशनमुळे व मी तयार केलेल्या ह्या कप्प्यांमुळे मला नॉर्मल संभाषण अवघड बनत गेले. मुलांच्या गप्पा होत असताना मी एकदम शांत बसणार. काही म्हणजे काहीच बोलता येत नाही. कारण ना कोणाला माहित आहे ऑटीझमबद्दल, न मला नॉर्मली बोलता येतंय मुलांचे चिमखडे बोल वगैरे बाबत. शिवाय मला स्वतःला स्प्लिट पर्सनालिटी आहे की काय असे वाटावे इतका गोंधळ सुरू झाला. ज्या मैत्रिणी मुलाचा ऑटीझम जाणून आहेत त्यांनी बस्केला विचारले मवॉ तू आहेस का? बस्के म्हणणार नाही. बस्केच्या ओळखीच्या आयडींशी मदर वॉरिअर , कोण तुम्ही, कुठे असता करत बोलणार! सगळा खरंच सावळा गोंधळ!
माझ्या आधीच कॉम्प्लीकेटेड असलेल्या आयुष्यात हा गोंधळ मला वाढवायचा नव्हता. तो असा वाढेल असे वाटलेही नव्हते. पण झाले खरे तसे.

शिवाय ह्यासर्वात ऑटीझम अवेअरनेसचे काय? मी माझ्या नाव/गावासकट जेव्हा ऑटीझमबद्दल बोलीन, तेव्हा तो जास्त लोकांपर्यंत पोचेल रादर दॅन मवॉमार्फत.
कोण मवॉ? कोण जाणे. तिच्यावर कोणी का विश्वास ठेवावा?

असं सगळं होऊ लागले. अन मला हे अनबेअरेबल झाले. सो... मी, बस्के, भाग्यश्री - मीच मदर वॉरीअर, स्वमग्नता एकलकोंडेकर आहे. इथून पुढे ऑटीझम विभागात बस्केच लिहीत जाईल. Mother warrior, goodbye! You gave me tremendous support when it was truly needed!
थँक्स मायबोलीकर्स, मवॉला इतके सांभाळून घेतल्याबद्दल!

विषय: 
प्रकार: 

मुक्तेश्वर कुलकर्णींची प्रतिक्रिया समजली नाही! मवॉ हा आयडी बस्केचा असल्याने आता लोक तिचे लेखन स्वीकारतील की नाही असे का वाटले ?तिने एका आयडीने वेगळे आणि दुसर्‍या आयडीने कॉन्फ्लिक्टिंग लिखाण केले असते तर गोष्ट वेगळी होती. इथे तसे काहीच नाहीये.

नेहमीच वाचत आलेले मदर वॉरियरचे लिखाण. अन जाणवायची एक अतिशय प्रगल्भ, बॅलन्स्ड व्यक्ती. अतिशय अभ्यासू आणि प्रचंड पेशन्स असणारी व्यक्ती. अन जाणवाचं की हे सगळं पेलणं खरच किती अवघड! त्यामुळे त्यावर काही प्रतिसाद देणं कधीच जमलं नाही ...
हे सगळं मांडावंसं वाटलं ते एका डु आयडीतून हेही कळायचं. अन अजूनच जाणवायची ती वेदना. की इतक्या सुलझ्या व्यक्तित्वालाही व्यक्त होण्यासाठी मदर वॉरयर लागतेय. मनात सतत प्रार्थना असायची की तिला बळ मिळू दे ___/\___ हे सगळं पेलायचं बळ मिळू दे! आणि आज खूप खूप कौतुक वाटतय की हे बळही मदर वॉरियरने मिळवलय!
खूप अवघड गोष्ट आहे ही! हे असं व्यक्त होणं, आणि तेही इतक्या समर्पक शब्दांमधे! खरोखर हॅट्स ऑफ टू यु, एक कडक सॅल्युट बयो ___/
तुझ्या भावी लढाईला आता बस्केचे बळही मिळतेय! आम्हा सर्वांच्या शुभेच्छा आहेतच तुझ्या पाठीशी. लव्ह यु मदर वॉरियर, लव्ह यु बस्के ___/\___

अवल, खूप छान मांडले आहेत विचार.

बस्के, म.वॉरियर चे लिखाण वाचत आलेत.तुझी लढाई प्रत्येक शब्दात कळते. Hats off to you.
कित्येक जणींसाठी उपयोगी लिखाण केलं आहेस ते पण तुझा स्वतःचा स्ट्रगल चालू असताना. _/\_

सगळ्यांना अनुमोदन.... _/\_
सगळ्यांसाठी प्रेरणादायी मैत्रीण आहेस तु.... खूप काही शिकते आहे तुझ्याकडुन...

वरदा आणि स्वाती२ यांच्या प्रतिसादाला हजारो +१
मैत्रिण चा जन्म आणि प्रगती हेही तू गेले वर्षभर सांभाळत आहेस! तुला खरच कडक सलाम!

.

मैत्रीणची प्रगती.

मराठी आंतरजालविश्वामधला एक अनोखा प्रयोग बस्कूने करून दाखवलाय. तिची ही आयडेंटीटी देखील तितकीच महत्त्वाची आहे.

बस्के, मवॉचा पहिला लेख वाचला तेव्हाच ही व्यक्ती मायबोलीवर / सोशल साईट्सवर आधी वावरलेली असावी हे लक्षात आलं होतं. मी ह्या आयडीकडे 'डुप्लिकेट आयडी' म्हणून कधीही बघितलं नाही तर अ‍ॅनॉनिमसली व्यक्त होण्याची गरज म्हणून एका खर्‍या व्यक्तीने घेतलेले सार्थ टोपणनाव आणि प्रामाणिक, कळकळीचे लेखन अशा नजरेतूनच कायम मदर वॉरियरचे लेख वाचले.

वृत्तपत्रांतून अनेकदा लोकं असं टोपणनावाने लिहितात. त्या टोपणनावामागची खरी व्यक्ती कोण ते कालांतराने समजतेही. आंतरजालाच्या माध्यमातून तुझ्याशी चांगली आणि जुनी ओळख असल्याने सुरुवातीला धक्का बसला पण गोंधळ अजिबात झाला नाही. तू मदर वॉरियर आहेसच. पण टोपणनावाने लिहिताना तुझ्यावर जो मानसिक ताण आला होता तोही मी समजू शकते.
म वॉ बद्दल प्रचंड आदर होता आणि तुझ्याबद्दलही खूप कौतुक, अभिमान. तुझ्या आयुष्यातले हे दोन कप्पे एकत्र झाल्यावर तुझ्या जिद्दीचं, सकारात्मक विचारांचं, अत्यंत डिव्होटेड असण्याचं जे समग्र चित्र तयार झालं त्यामुळे हा आदर, कौतुक आणि अभिमान कित्येक, कित्येक पटींनी वाढलाय.

अ बिग हग टू यु अँड नील. आम्ही सगळे तुझ्याबरोबर होतो, आहोत आणि असू Happy

सगळेच +१
बस्कु, तुझा कायमच अभिमान वाटत आलाय आणि आज पुन्हा एकदा वाचून अभिमान दुप्पट झाला.
बरं झालं व्यक्त झालीस. आत अमलाच हलकं वाटतंय खुप Happy
याआधीही तुझ्याकडून/ मवॉ कडून हजारो गोष्टी शिकलेय.
लव्ह यू अलॉट्ज!

झ्या आयुष्यातले हे दोन कप्पे एकत्र झाल्यावर तुझ्या जिद्दीचं, सकारात्मक विचारांचं, अत्यंत डिव्होटेड असण्याचं जे समग्र चित्र तयार झालं त्यामुळे हा आदर, कौतुक आणि अभिमान कित्येक, कित्येक पटींनी वाढलाय. >> असंच म्हणतो.

तुझ्या बरोबरच आहोत आणि असूही !!

मी ह्या आयडीकडे 'डुप्लिकेट आयडी' म्हणून कधीही बघितलं नाही तर अ‍ॅनॉनिमसली व्यक्त होण्याची गरज म्हणून एका खर्‍या व्यक्तीने घेतलेले सार्थ टोपणनाव आणि प्रामाणिक, कळकळीचे लेखन अशा नजरेतूनच कायम मदर वॉरियरचे लेख वाचले. >> हे अत्यंत समर्पक लिहीले आहे.

अगो+१ ड्यु आय नव्हे तर टोपण नाव! मोठे मोठे लेखक, कवि, कवयत्री पण टोपण नाव घेऊन आपले मनोगत व्यक्त करतात.

अगोचा प्रतीसाद पण छान आणी आश्वासक वाटला.

'मैत्रीण' बद्दल या आधी काहीच माहित नव्हतं. वरच्या काही प्रतिक्रियांमधून त्याबद्दल समजलं. त्यामुळे आणि त्या आधी माबो वरच्या इतक्या वर्षांच्या अस्तित्वामुळे, ह्या दोन्ही आयडेंटिटीं बरोबर वावरण्यातली अडचण, कुचंबणा जास्त उठावदारपणे समोर आली. मवॉ चे लेखन वाचलं आहे, त्यातली प्रामाणिक धडपड आणि फायटिंग स्पीरीट ला कायमच नतमस्तक व्हायला होत होतं. त्यावर प्रतिक्रिया द्यायला जमलं नाही कधीच. काय लिहावं सुचलं नाही. एखादी कथा, कादंबरी, कविता वाचली की त्यावर व्वा, छान लिहिणं सोपं असतं, पण मवॉच्या लेखांवर शब्दच सुचायचे नाही प्रतिक्रिया द्यायला.
पुढील वाटचाली साठी अनेक शुभेच्छा !

अगो +1
मैत्रेयी + 1

कोणत्याही आयडीने लिहिलेस तरी तू mother warriorच आहेस आमच्यासाठी Happy
तुला, तुझ्या कुटुंबियांना आणि माझ्या लाडक्या हिरोला खूप खूप शुभेच्छा Happy

बस्कु , बिग हग . जेव्हा सांगितलं होतस तेव्हाच तुझा अभिमान वाटलेला . डोक्यावर बर्फ ठेवून हे सर्व मेन्टेन करण हे खरंच हॅट्स ऑफ . कीप इट अप >> +१

तू तर एक 'दीपस्तंभ'आहेस कैक जणांसाठी.
तुला एक कडक सॅल्युट आणि शुभेच्छा ! >> +१

बस्के, खूपदाच तुझा विचार मनात येतो. खास करुन मुलांनी पेशन्स संपवला आणि चिडचिड व्हायला लागली की तुझे लेख आठवतात आणि कठीण परिस्थितीत ज्या पेशन्सने तू सगळं निभावून नेतेस ते आठवून पेशन्स चा एक डोस स्वतःला दिला जातो. तुझ्या लेखांमधून कित्येक जणांना कित्येक गोष्टी मिळाल्या आहेत.

ह्या सगळ्यात 'मैत्रिण' करता वेळ देऊन ती वाटचाल चालू ठेवणं हे ही तू यशस्वीपणे पार पाडते आहेत्स.

खरंच तुझा अभिमान वाटतो. तुम्हा तिघांनाही शुभेच्छा!

सर्वांचे मनापासून आभार मानते..
मला दुसरा आयडी वापरण्याबाबत काही गिल्ट नव्हता. इट हॅड अ पर्पज. पण मला मुखवट्यामागे राहायचा वीट आला. असंही म्हणता येईल, की आम्ही जर मुलाच्या ऑटीझममुळे मुखवट्यामागे लपणार असू तर उद्या ह्यातून मुलाला काय मेसेज जाईल? प्रॉब्लेम्सपासून पळा, लपून राहा? ते नको व्हायला. जे आहे ते , आहे तसे स्विकारता आले पाहिजे - ह्याची ही एक पहिली स्टेप होती.

तुम्हा सर्वांचे खरंच मनापासून आभार मानते. डोळ्यात पाणी आले तुम्हा सर्वांचे प्रतिसाद वाचताना.
थँक्स अ लॉट..

मी ह्या आयडीकडे 'डुप्लिकेट आयडी' म्हणून कधीही बघितलं नाही तर अ‍ॅनॉनिमसली व्यक्त होण्याची गरज म्हणून एका खर्‍या व्यक्तीने घेतलेले सार्थ टोपणनाव आणि प्रामाणिक, कळकळीचे लेखन अशा नजरेतूनच कायम मदर वॉरियरचे लेख वाचले >>>> अनुमोदन ! अनेकदा ड्यू आयडींच्या मुखवट्यांमागचे चेहेरे जाणून घेण्याची उत्सुकता वाटते पण पण म.वॉ. ह्या आयडीबद्दल तसं कधीच वाटलं नाही.

तुम्हांला तिघांना अनेक शुभेच्छा !

Pages