सावरकरांनी मराठीला दिलेल्या शब्दांबाबत

Submitted by अभि_नव on 24 March, 2016 - 11:15

सावरकरांनी अनेक नवे शब्द मराठीला दिले.
त्या सर्वांची "अधिकृत" यादी आणि ते सर्व शब्द सावरकरांनी कोणत्या लिखाणातुन ( वर्तमानपत्र / पुस्तक ई.) जगासमोर मांडले त्यांचे अधिकृत स्त्रोत / संदर्भ मिळु शकतील काय?
मोघम संदर्भ नको. एखादे छापील पुस्तक / लेख / वर्तमानपत्र ई. प्रकारचे काही असेल तर चांगले.
आगाऊ धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाळाराम सावरकरांचे सख्खे धाकटे भाऊ होते/आहेत. ( बाळाराम सध्या हयात आहेत किंवा नाही माहित नाही ) मी वाचलेल्या चरित्रात तसा उल्लेख आहे.

मराठीत सावरकरांनी दिलेले शब्द म्हणुन लांबच लांब शब्द सांगुन त्यातुन विनोद निर्मीती अगदी सावरकरांचा
द्वेष न करणारे सुध्दा सहजरित्या करायचे.

उदा. म्हणे सावरकरांनी रेल्वेचा सिग्नलला अग्निरथ भयसुचक तांब्रलोह पट्टीका असा शब्द दिला. यावर पुढे पुस्ती जोडली जायची की हा शब्द लक्षात ठेवायला वापर करायला किती कठीण आहे इ.

यातुन शब्दाची व्यवहारी अडचण सांगण्या ऐवजी त्या विचारांवर टीका हाच हेतु असावा.

वास्तविक सावरकरांनी शोधलेले किंवा इतरांनी शोधलेले व बाळाराम सावरकरांनी संपादित केलेल्या पुस्तकावरुन असे लक्षात येते की अनेक सोपे/ कधी काळी प्रचलित असलेले शब्द या माध्यमातुन पुढे येऊन मराठीला शब्द समृध्द करण्याचा हा प्रयत्न होता. जसे

मेयर = महापौर

सिग्नल - बावटा

रेडिओ - नभोवाणी

आजकाल जी मराठीवर आक्रमणे सुरु आहेत त्यावरुन मराठीचा आग्रह कसा आवश्यक आहे हे मायबोलीवर सांगावयास नको.

नितीनचंद्र, सावरकरांचे थोरले बंधु गणेश सावरकर यांना सुद्धा बाळाराव म्हणत.
हे पुस्तक लिहिणारे ते नव्हेत.

आ. अत्रे यांनी काही कृत्रिम शब्दांची टर उडवली होती. पण तो निखळ विनोद होता. त्यांची 'कषायपेयपात्रपतितमक्षिकेप्रत' ही विडंबन कविता प्रसिद्ध आहे. 'विधि' शब्दाचीही त्यांनी टिंगल केली होती. ते स्वतः विधानसभा किंवा विधानपरिषदेचे सदस्य असताना ते म्हणाले होते : कायद्याला विधी म्ह्णायचं तर आम्हांला कोणी विचारलं की तुम्ही सभागृहामध्ये काय करता, कायदेमंडळातले लोक काय करतात तर आम्ही विधी करतो असं म्हणायचं का?
आ. अत्रे यांची भाषा अस्सल मराठी, दख्खनची पठारी मराठी होती. देशी आणि तद्भव शब्दांची रेलचेल असलेली. श्री. म. माटे यांचीही तशीच होती. मातीचा वास असणारी. अत्यावश्यक तेथेच संस्कृत शब्द वापरणारी.
बावटा हा शब्द जुना आहे. बाहूपासून आलेला. हात उंचावून खूण करणे अश्या अर्थी.

महत्वाचा चर्चा विषय !

याची जास्त चांगली माहिती जुन्या पिढीतील संपादक, पत्रकार, वाचक, संग्राहक, ग्रंथपाल, ग्रंथ जाणते यांच्या कडुन साहित्या निशी मिळण्याची शक्यता आहे. आंजा वर तुलनेने नविन लोक असल्यामुळे खात्रीलायक माहिती फारशी देवु शकणार नाहित असे वाटते.

स्वा. सावरकरांच्या भाषा शुद्धी चे प्रयत्न, खात्रीशीर पुराव्या निशी आपल्यापुढे आले तर ते महत्वाचे डॉक्युमेंटेशन असेल.

मोठे भाऊ - गणेश उर्फ बाबाराव - हे पण अंदमानात होते
मधले भाऊ - विनायक उर्फ तात्याराव = स्वा.वि.दा. सावरकर
धाकटे भाऊ - नारायण उर्फ बाळाराव (राम नव्हे)
आणि मैना नामक एक बहिण होती