कविता हा तसा आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय. कवितेशी आपली ओळख आपल्या जन्मापासूनच होत असावी. बाळाला झोपवायला घेतलं की, आपोआप आई काहीतरी गुणगुणू लागते आणि आईच्या तोंडाकडे पाहत, ते गुणगुणणं ऐकत बाळ कधी झोपतं ते आईलाही कळत नाही.
शाळेत गेल्यावरही पहिली ओळख होते ती बडबडगीतांशी. बहुतेक सगळ्या लहान मुलांना 'मग शाळेत काय काय कविता, पोएम्स्, शिकवल्या तुला?' या प्रश्नाचा सामना करावा लागलेला आहे. मग काही धीट मुलं धडाधड कविता म्हणून दाखवतात, तर काही आईमागे लपून प्रश्नकर्ता कधी जातोय, याची वाट पाहतात.
कविता अशा जन्मापासूनच आपल्या सोबत असल्यामुळे की काय, अगदी पहिलीत वाचलेली कविताही आपल्याला वयाच्या पन्नाशीत जशीच्या तशी आठवत असते.
तर अशाच काही कविता, ज्यांच्याबरोबर आपण वाढलो, आज आम्ही इथे सादर करतोय, पण प्रकाशचित्रांमधून. कवितेच्या आशयाला समर्पक अशी काही प्रकाशचित्रे आम्ही देऊ, ज्यातून चाणाक्ष मायबोलीकर ती कविता ओळखतील.
हा एक खेळ आहे, आपल्याला भावलेल्या कविता प्रकाशचित्रांच्या माध्यमातून परत एकदा अनुभवण्याचा.
मंडळी, गुगलबाबाची मदत न घेता, केवळ स्मृतीवर विसंबुन कविता ओळखता येतात का हा शोध घ्यायला किती गंमत येईल ना? गुगलबाबावर तर रोबोसुद्धा कविता शोधेल, पण त्या शोधाला स्मृतींचा गंध असेल का?
प्रकाशचित्रांवरुन आठवणीत वसलेली कविता शोधायची गंमत अनुभवताना कदाचित असेही होईल की नंतर कधीतरी कवितेला परत भेट देताना इथले एखादे प्रकाशचित्र लख्खकन डोळ्यासमोर चमकुन जाईल. तेव्हा गुगलची मदत न घेता आपल्याला किती आठवतेय याचा अनुभव आणि आनंद एकदा नक्कीच घेऊन बघा.
कविता क्र. १ - 'पानगळ' - इंदिरा संत - विजेती- रैना
कविता क्र. २ - 'कणा' - कुसुमाग्रज - विजेती- स्निग्धा
कविता क्र. ३ - 'कोलंबसाचे गर्वगीत' - कुसुमाग्रज - विजेते - भरत मयेकर
कविता क्र. ४ - 'गवतफुला' - इंदिरा संत - विजेती- स्निग्धा
कविता क्र. ५ - 'सांगा कसे जगायचे' - मंगेश पाडगावकर - विजेती- सोनू.
कविता क्र. ६ - 'तुतारी '- केशवसुत - विजेते - गजानन
कविता क्र. ७ - 'श्रावणमासी हर्ष मानसी'- बालकवी - विजेते - भुईकमळ
कविता क्र. ८ - 'जोगिया'- ग .दि .माडगुळकर - विजेते - भरत मयेकर
कविता क्र. ९ - 'पैठणी'- शांता शेळके - विजेते - शब्दाली
कविता क्र. १०- 'देणा-याचे हात घ्यावे. '- विंदा करंदीकर - विजेते - भुईकमळ
कविता क्र. ११- 'मराठी असे आमुची मायबोली '- माधव ज्युलियन - विजेते - रैना
कविता क्र. १२- 'धरित्रीच्या कुशीमध्ये '- बहिणाबाई चौधरी - विजेते - मानव पृथ्वीकर
कविता क्र. १३- 'गडद निळे गडद निळे जलद भरुनी आले'- बा.भ. बोरकर - विजेते - स्निग्धा
मानव पृथ्वीकर, नाव राखलेत.
मानव पृथ्वीकर, नाव राखलेत.
धरित्रीच्या कुशीमध्ये बी-बियाणं निजली - बहिणाबाई चौधरी.
हे घ्या तुमचे बक्षिस.
मानव पृथ्वीकर, लय
मानव पृथ्वीकर, लय भारी..........
अरे वा! सगळेजण एक एक घ्या!
अरे वा!
सगळेजण एक एक घ्या!
वा वा मानव पृथ्वीकर! अभिनंदन!
वा वा मानव पृथ्वीकर! अभिनंदन!
अभिनंदन !
अभिनंदन !
धन्यवाद सगळ्यांना
धन्यवाद सगळ्यांना
कविता १३, खूण पहिली
कविता १३, खूण पहिली

घन ओथंबून येती
घन ओथंबून येती
नभ उतरू आलं. इथंही नभावर अनेक
नभ उतरू आलं.
इथंही नभावर अनेक कविता असल्याने स्पर्धा तगडी आहे.
घन घन माळा, नभी दाटल्या
घन घन माळा, नभी दाटल्या
नाही. थोडी दिशा दाखवण्यासाठी
नाही.

थोडी दिशा दाखवण्यासाठी ही घ्या खूण
कविता १३, खूण दूसरी
ये रे घना ये रे घना न्हाऊ घाल
ये रे घना ये रे घना
न्हाऊ घाल माझ्या मना
माशाला का?
माशाला का?
ते घन नसून प्रदूषण आहे का?
ते घन नसून प्रदूषण आहे का? पाण्यातल्या प्रदूषणाने मासा रडतोय?
नाही गजानन. ते पाण्याने
नाही गजानन. ते पाण्याने भरलेले घनच आहेत
गडद निळे गडद निळे जलद भरुनी
गडद निळे गडद निळे जलद भरुनी आले ?
आम्ही कोळ्याची पोरं हाय हो
आम्ही कोळ्याची पोरं हाय हो
माशांना विसरू नका
माशांना विसरू नका
वादल वारं सुटलं गो वार्यानं
वादल वारं सुटलं गो
वार्यानं तुफान उठलं गो
भिरभिर वार्यात पावसाच्या धारात
सजनानं होरीला पाण्यात लोटलं गं
(आता साजन होरील्या पान्यात लोटून यवरा मोटा म्हावरा धरूचा नाय, पण रवांदे. :फिदी:)
किती वेगेवेगळ्या कविता
किती वेगेवेगळ्या कविता कळताहेत इकडे
मजा येत्ये
(आता साजन होरील्या पान्यात
(आता साजन होरील्या पान्यात लोटून यवरा मोटा म्हावरा धरूचा नाय, पण रवांदे. फिदीफिदी)
आता कोळीगीतांपर्यंत पोहचलाय
आता कोळीगीतांपर्यंत पोहचलाय तर तुम्हाला थोडा विचार करायला पुढची खूण

हे काहीतरी भन्नाट लॉजिक
हे काहीतरी भन्नाट लॉजिक लावलेले दिसतेय
मासा की माशा मासा ना माशा
मासा की माशा
मासा ना
माशा म्हणजे फ्लाईज 
मासा आणि ढग भरुन आलेले ह्यांचा संबंध लावायचा आहे.
ह्यापैकी कुठली एक आहे का
१) ती गेली तेंव्हा रिमझिम पाऊस निनादत होता.
२) आता ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळ
नभ मेघांनी आक्रमिले?
नभ मेघांनी आक्रमिले?
हे चित्र थंडी, गारवा, असं
हे चित्र थंडी, गारवा, असं सांगतंय का?
बी, मासे- माशांना. आणि कविता
बी, मासे- माशांना.
आणि कविता शोधा अजून
गजानन.. बरोब्बर
गजानन.. बरोब्बर
नभ, मासे, थंडी कोळीगीत
नभ, मासे, थंडी
कोळीगीत :विचारकरणारीबाहुली:
गडद निळे गडद निळे जलद भरूनि
गडद निळे गडद निळे जलद भरूनि आले
शीतल तनु चपलचरण अनिलगण निधाले
Pages