Submitted by admin on 3 June, 2008 - 19:11
एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.
सुशेगात = मजेत
सुशेगात = मजेत
शर्व म्हणजे संहार करणारा
शर्व म्हणजे संहार करणारा (शृणाती इति शर्वः ) म्हणून शंकराच्या ८ रूपांपैकी एक शर्व आहे. त्यामुळे शर्विल हे शंकराचे नाव पटू शकते पण कृष्णाचा असा कुठलाच संदर्भ नाही!
sosegado - हा स्पॅनिश /
sosegado - हा स्पॅनिश / पॉर्तुगीझ भाषांमधला शब्द आहे calm, serene, tranquil असा अर्थ आहे दोन्ही भाषांमधे .
गोव्याच्या कोकणीत त्याचं सुशेगात असं रुपांतर झालं. सर्व काही ठीक, मजेत चालंलय अशा अर्थाने वापरतात
सुशेगाद म्हणजे निवांत!
सुशेगाद म्हणजे निवांत! आरामात.
भाकरी हे एकवचन आणि त्याचे
भाकरी हे एकवचन आणि त्याचे भाकर्या हे अनेकवचन?
की
भाकर हे एकवचन आणि त्याचे भाकरी हे अनेकवचन?
आमच्याकडे एकवचन भाकरी.
आमच्याकडे एकवचन भाकरी. अनेकवचन पण भाकरी क्वचित भाकर्या.
आमच्याकडे पण भाकरी एकवचनी
आमच्याकडे पण भाकरी एकवचनी वापरतो पण अनेकवचनी भाकर्या असाच शब्द वापरलेला ऐकला आहे.
आणि एकवचनात ते भाकरच असतंय.
पण आजच एका मैत्रिणीशी यावरुन वाद झाला. तिच्यामते भाकरी हेच बरोबर आणि भाकर्या हा शब्दच काहीही आहे.
निधी, यावर याच धाग्यावर आधी
निधी, यावर याच धाग्यावर आधी चर्चा झालेली आहे.
http://www.maayboli.com/node/2229?page=17
हे एकवचन/अनेकवचन ४थीत
हे एकवचन/अनेकवचन ४थीत असतानापासून डोक्यात आहे. आमचे दगा काळू पाटील नावाचे एक गुरुजी होते. ४थीच्या स्कॉलरशिपची शिकवणी ते घेत असत. शिकवणी = गावातल्या हुशार मुलामुलींना एकत्र पकडून शिकवणे. पैसे घेउन वगैरे नव्हे, तर हौसेखातर. (हो, तेव्हापासूनच स्कॉलर आहे बर्का मी
अन गुरुजींनी माझ्यासारखे अनेक स्कॉलर्स घडवलेत :कानाच्या पाळीला हात लावणारी भावली: )
तर त्यांनी सांगितले होते, ते हे असे :
अभिजनांत भाकरी केली. = बहुजनांत १ भाकर केली.
भाकरी/भाकर्या केल्या = भाकरी केल्या.
फरक बोली भाषेचा आहे.
धन्यवाद भरत मयेकर आणि दीमा.
धन्यवाद भरत मयेकर आणि दीमा.
हे वाचल्यावर मन आणि डोक शांत झालं.
नोकरीचे अनेकवचन नोकर्या होते
नोकरीचे अनेकवचन नोकर्या होते तसे ईकारान्त स्त्रीलिंगी सर्वनामाचे अनेक्वचन याकारान्त होणे स्वाभाविक आहे. भाकरी = भाकर्या. , सुरई = सुरया.
बोलीभाषेत मूळ शब्दच भाकर असेल तर अकारान्त स्त्रीलिंगी सर्वनामाचे अनेकवच ईकारान्त होते तेही नेहमीच नाही..
विहीर= विहिरी
विजार =विजारी. सफर = सफरी, गोष्ट = गोष्टी
बंदूक चे प्रमाण भाषेत बंदुका तर बोलीभाषेत बंदुकी
पण चिंच =चिन्चा
वाट= वाटा होते (पण वात= वाती होते.)
बट, जट,
यावरून निश्चित काय सूत्र काढता येईल?
आता कोठे धावे मन हा
आता कोठे धावे मन हा तुकारामाचा अभंग आहे त्यातले काही शब्द अवघड आहेत.
प्रेमरसे बैसली मिठी
आवडी लाठी मुखाशी
ह्यात आवडी लाठी मुखाशी म्हणजे काय?
अजून एक
तुका म्हणे आम्हा जोगे
विठ्ठला घोगे खरे माप
घोगे म्हणजे काय? विठ्ठला घोगे खरे माप म्हणजे काय?
अभंगांचा असा शब्दांवरुनच अर्थ
अभंगांचा असा शब्दांवरुनच अर्थ ओळखणे कठीण असते.
खालील दुव्यावर तुम्हाला या अभंगाचा (आणि इतर काही अभंगांचा) अर्थ वाचता येईल.
http://tukaramasteachings.blogspot.in/2014/03/post-11th-mar-14.html
" वर्हाड निघालंय लंडनला "
" वर्हाड निघालंय लंडनला " मधे काशीनाथाचं लंटन ला लग्न लागतं, तेव्हा त्या वर्हाडातली एक आजी रडत रडत म्हणते की.. " आज मथी आसती ईईईई.... तर, काशीनाथाचं एवढं वैभव पाहून तिच्या डोळ्याचं पारणं नसतं का रं फिटलं"..
ह्यातला 'मथी' ह्या शब्दाचा अर्थ काय ? अनेक वेळा पाहून, ऐकूनही अर्थ लागला नाही.
मित, मथी हे एका स्त्रिचे नाव
मित, मथी हे एका स्त्रिचे नाव आहे इथे. बहुतेक मिथालाचे मथी, किंवा मैथीलीचे मथी असे झाले असावे.
तशी शक्यता कमी वाटते बी. कारण
तशी शक्यता कमी वाटते बी. कारण ह्या आजीचा उल्लेख करण्याआधी लक्ष्मणराव म्हणतात.. " तेवढ्यात एका आजीला आठवण येते तिच्या मथीची.." आणि मग हा वरचा संवाद. त्यामुळे काहीच कळत नाही, की मथी हे त्या आजीच्या कोणा गेलेल्या नातेवाईकाचे, लाडक्या जनावराचे नाव आहे की अजून काही ...
सुरुवातीला तो शब्द मला पती वाटला होता..
मीही 'मथी', 'मथुबाई' हे
मीही 'मथी', 'मथुबाई' हे स्त्रीचे नाव म्हणून ऐकले आहे.
पूर्वी मथुरा हे नाव असायचे.
पूर्वी मथुरा हे नाव असायचे. प्रसिद्ध क्षेत्रांची नावे मुलींना ठेवीत असत. काशी, मथुरा, अवंतिका, द्वारका अशी नावे असत. नद्यांचीही असत. गंगा, यमुना तर असतच पण कृष्णा, गोदावरी, नर्मदा, कावेरी, भीमा, वारणा, तुंगभद्रा सुद्धा असत. मी वारूताई असे नाव ऐकले आहे पण हा कशाचा अपभ्रंश ते नक्की ठाऊक नाही. वारणाचा असू शकेल? किंवा वाराणसीचा? वाराणसीच योग्य वाटते.
मथी = मथुरा हे बरोबर.
मथी = मथुरा हे बरोबर.
आणि हे कशाचे अपभ्रंश / लाडकी
आणि हे कशाचे अपभ्रंश / लाडकी रूपं असतात - तानुबाई, बनुबाई, आनुबाई, गोजाबाई
बाळूताई असंसुद्धा नाव आहे.
बाळूताई असंसुद्धा नाव आहे. बाळूताई खरे = मालतीबाई बेडेकर
वारूताई असे नाव ऐकले आहे >>
वारूताई असे नाव ऐकले आहे >> नॉर्थ कॅनरा, साउथ कॅनरा या कर्नाटकातल्या भागात वारिजाक्ष किंवा वारिजाक्षी ही नावं सुद्धा ऐकली आहेत . अर्थात त्यांची लाडकी / घरगुती नावं वाज्जी, वाज्ज्यक्का किंवा वाज्जू व्हायची .
अभिजनांत भाकरी केली. =
अभिजनांत भाकरी केली. = बहुजनांत १ भाकर केली.
भाकरी/भाकर्या केल्या = भाकरी केल्या. >>
शुद्ध लेखन अन मराठी व्याकरण याबाबत अतिशय आग्रही असलेल्या मनोगतावर भाकर्या असं लिहिलेलं आहे पाककृती विभागात ( सुपे, सॅलडे असं ही लिहिलंय )
मित, अरे नंतरचे वाक्य पहा ना
मित, अरे नंतरचे वाक्य पहा ना कसे आहे ते - "काशीनाथाचं एवढं वैभव पाहून तिच्या डोळ्याचं पारणं नसतं का रं फिटलं".
आता इथे काशीनाथच वैभव हे कुणी पाहिलच तर ती एक स्त्रि असेल. पुरुष नाही. कारण, "तिच्या डोळ्याचं पारणं.." असं लिहिलं आहे.
ह्यावरुन मथी हे एका स्त्रिच लाडक रुप आहे हे नक्की.
ओके. इतके दिवस मथी वर
ओके. इतके दिवस मथी वर काथ्याकूट करुन मती गुंग झाली होती
तानुबाई - तनुजा किंवा तान्ही
तानुबाई - तनुजा किंवा तान्ही या अर्थाने तानुबाई
बनुबाई - बानु
आनुबाई - अनुसया,अनुजा
गोजाबाई -गोजिरी,गोदावरी
वारुबाई - नागपंचमी ला जन्म वा वारुळा ला पुजली म्हणून जन्मली म्हणून वारु बाई, दृष्ट लागू नये जगावी म्हणून ठेवलेले विचित्र नाव.
अर्थात त्यांची लाडकी / घरगुती
अर्थात त्यांची लाडकी / घरगुती नावं वाज्जी, वाज्ज्यक्का किंवा वाज्जू व्हायची .>>> आमच्या घरात जुन्या नातेवाईकांच्यात वच्छाक्कात्त्या होत्या. त्याम्चं खरं नाव सोनिया आहे हे बापजन्मांत कुणाला समजलं नसतं. त्यांच्या जावेचं नाव इंदिरा/ इंद्रा होतं. (या दोघीही जणी १९५० च्या सुमाराला निजधामाला गेल्या होत्या! त्यामुळे घराणेशाहीचा आरोप कुणी करू नये)
अनुसयाचं घरातलं रूप : आनशीनक्का
बाकी तारी, शांती, पद्दी, यांची रूपं यथावकास्थ पद्दाक्का, तारक्का, शांतक्का, अशी व्हायची.
पूर्वी काही विचित्र नावे
पूर्वी काही विचित्र नावे उभयलिंगी असत. भिकूताई-भि़कूदादा, धोंडीताई-धोंडोपंत , छबूताई-छबूनाना, बाळीआत्या-बाळकोबा, कोंडीमावशी-कोंडूनाना वगैरे. गुंडोपंत, दगडूराव या शब्दांचे स्त्रीरूप मात्र आढळले नाही. बाकी सर्जेराव, सारजाकाकू, जनाबाई-जानोजीराव, सखूताई-सखोजीराव/सखारामतात्या अशी नावे असत.
आणखी एक लकब म्हणजे स्त्रीलिंगी शब्दाचे हाक मारताना (संबोधन) जे रूप होईल त्यालाच आज्जी, आत्या, वहिनी ही नाती जोडायची. म्हणजे यश्वदेकाकू, वत्सलेआत्या, द्वारकेमामी वगैरे. पुरुषांमध्ये दत्तोपंत, धोंडोपंत, कान्होजीराव असे 'ओ'कार होत. गुला, बुला ही बायकांची नावे त्यांच्यामागे दोन पिढ्यांनंतरही ऐकायला मिळाली.
विज्ञानदास, ओके. बहुतेकदा,
विज्ञानदास, ओके.
बहुतेकदा, कागदोपत्रीही (शिधापत्रक, मतदारयादी) आनुबाई, बनुबाई, अशीच नावे लावलेली असतात.
गुंडोपंत, दगडूराव या शब्दांचे स्त्रीरूप मात्र आढळले नाही. <<< असतात. माझ्या माहितीत "दगडी" नावाच्या दोन महिला आहेत.
जुन्या काळात मुले बरीच होत
जुन्या काळात मुले बरीच होत त्यात बरीचशी दगावत अजारपणामुळे वा इतर काही कारणाने. अशी लागोपाठ मुले दगावली तर एखाद्या देवाला नवस बोलुन मुलाचे नांव विचित्र ठेवले जायचे दगड्या, धोंड्या, म्हातारबा इत्यादी...
माझा एक म्हातारबा नावाचा मित्र होता. त्याचे नांव असेच नवसाने ठेवलेले..
Pages