शब्दार्थ

Submitted by admin on 3 June, 2008 - 19:11

एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.

या आधिचे संभाषण या दुव्यावर सापडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जे च्युत करता येत नाही ते. अच्च्युत नाम असेच आहे ना? त्यावरूनचे विशेषण वाटते. (ज्ञानदीप मोमेंट असेल तर शहाणे करून सोडा.)

<अच्च्युत्य म्हणजे काय, ते शोधतोय> हेच लिहिणार होतो. टण्यांनी अर्थ विचारला नाही म्हणजे तो माहीत असावा किंवा ....

सीमंतिनी : दोन च

सीमंतिनी,

ते 'अच्युत'

'अच्च्युत्य' म्हणजे काय, हे बहुतेक फक्त आपले मान्नीय मंत्री श्री. मुनगंटीवारच सांगू शकतील. Happy

शब्द असेल तर शब्दार्थ विचारणार!

चिन्हांकितः इंग्रजी स्टार्ड वा अंडरलाइन्ड या शब्दाचे मराठी रूप का? मुंगटीवारांचे प्रातिभ दिसतेय! Happy

चिन्हांकित हा शब्द असलेले अर्थसंकल्पाच्या भाषणातले हे वाक्य : (पान १२, शेवटच्या दोन ओळी)

"या सर्व कामांसाठी नियोजन विभागाअंतर्गत अवितरित नियतव्ययापैकी ५० कोटी रुपये नियतव्यय चिन्हांकित केला आहे."

असाच निधी अनेकदा चिन्हांकित केलेला दिसतोय.

चिन्हांकित हा शब्द असलेले अर्थसंकल्पाच्या भाषणातले हे वाक्य
>>
या चिन्हांकित शब्दाची लोकसत्ताने अग्रलेखात यथेच्छ टिंगल केली आहे पण मुनगंटीवाराना खरे तर 'इअरमार्क्ड 'असे म्हणायचे होते . त्या त्या योजनेकरता तेवढा निधी राखून ठेवला आहे , निश्चित केला आहे -- इअरमार्क्ड केला आहे-- चिन्हांकित केला आहे असे त्याना म्हणायचे होते. तो शासकीय स्लँग आहे. राहता राहिले अच्चुत्य शब्दाचे... तर त्यांच्या त्या उच्चारांची टिंगल 'वेदांचा तो अर्थ आम्हासिचि ठावा, येरांनी वहावा भार माथा" या सेक्टर मधून येणे तसे अनैसर्गिक नाहीच ना.....

तराणे / तराणा म्हणजे काय
मराठी गाण्यात शब्द ऐकला आहे>>

जाई शास्त्रिय संगीतामधे तराणा हा गाण्याचा प्रकार आहे. त्याला शब्द नसतात. जसे की: नादीर तन न तन.. नादीर तन न न.. नादीर तननन! दिर दिर दिर तुम दिर दानी.. तुम दिर दिर दिर दानी ...

आता तू नाव काढले आहेस तर लताबाईंचा हा एक तराणा ऐकच!!! प्लीजच Happy

https://www.youtube.com/watch?v=ddwdk7YelI0

इन्ग्लिश मध्ये 'कांगारू शब्द' असा एक मजेदार प्रकार आहे. म्हणजे एका मोठ्या शब्दात साधारण त्याच अर्थाचा एक छोटा शब्द दडलेला असतो. उदा. curtail मध्ये cutआहे. असे कांगारू शब्द बनवताना एक अट असते. मोट्या शब्दातून अक्षरे घेताना सर्व अक्षरे सलग घेता येत नाहीत. उदा. enjoy मधून joy नाही चालत.
........
जरा विचार केला की मराटीत असा प्रयोग जमेल का?
....दोन उदा. सुचलीतः
१. 'महानगरपालीका' पासून 'महापालीका'
२. 'तळागाळातील' पासून ' तळातील'.
ज्यांना अजून जमतील त्यांनी जरूर लिहा...

कुमार१,

समानार्थी --> समार्थी
कवटाळणे --> कवळणे
जल्पणे --> जपणे = जप करणे

आ.न.,
-गा.पै.

अमोरसमोर हा शब्द बोली भाषेत असावा. विशीष्ठ प्रसंगी वर्णनत्मक असा वापरतात. एखाद्या प्रसंगाचे वर्णन करताना जास्त नाट्यमयता उभी करायची असेल तर. उद. दोन्ही पहिलवान अमोरासमोर उभे ठाकले.
जस आपण वाघ-बीघ असा शब्द वापरतो तसे.

चुभुदेघे

हैदोसच शब्द माहीत होता पण उगमाचा विचार करता हौद ओस पडेपर्यंत हुल्लडबाजी करणे असला काहीतरी तिरपागडा विचार केला *(कैच्याकैच :फिदी:)!!

मोराचा पिसारा - पंख फैलाए असंच म्हणतात बहुदा!

विकीपेडिया मध्ये तर पिसार्‍याला पंख फैलाना असाच शब्दप्रयोग केला आहे. व पूर्वी हिंदी निबंधातही वापर केल्याचे स्मरते. http://hi.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B0

हैदोस, हा शब्द अरबी / फारसी मधून आलाय. मुहर्रमच्या वेळेस जो मोठ्याने शोक छालतो त्याला हैदूस म्हणतात.

Pages