शब्दार्थ

Submitted by admin on 3 June, 2008 - 19:11

एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.

या आधिचे संभाषण या दुव्यावर सापडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मराठीत /संस्कृतात अस्व जोडशब्द फार पूर्वीपासून प्रचलित आहेत.
सामासिक शब्द आणि संधी या स्वरूपात.
आणि त्यांची शेकडो रम्य उदाहरणेही आहेत.

परिसर्गाचा अर्थ इतका कन्विन्सिंग वाटत नाहीये, जरा विचित्रच वाटतोय.

(बाकी ब्लेन्ड करताना मराठीत भलतेच अर्थ होऊ नयेत. एकाने विद्या आणि कार्तिक आईवडिलांचे नाव म्हणून मुलाचे नाव 'विकार' ठेवले तसे!)

रॉहू, फेसबूकवर एक पोस्ट वाचली त्यात intolerance हा शब्द ठीक असला तरी त्याच्या विरुद्ध परिस्थितीला tolerant म्हणणे तितकेसे योग्य नाही कारण tolerate करणे ह्यामध्ये एक लादले गेल्याची भावना आहे जी खरी नाही असे वाचले. हे वाचल्यावर आपण मराठीत हा जो सहिष्णू शब्द वापरतो त्याचा देखील नक्की अर्थ काय असा मला प्रश्न पडला.

वर्धिष्णु : नेहेमी वाढत जाणारा.
सहिष्णु : नेहेमी सहन करणारा.

रॉहू यांनी म्हटल्या प्रमाणे 'सहन करणे' यात नाईलाजाचीच भावना जास्त आहे.

**
सहिष्णु (p. 838) [ sahiṣṇu ] a (S) corruptly सहिष्ण a Patient, enduring, capable of suffering or bearing: also forbearing, meek, long-suffering &c.

इति मोल्सवर्थ. णु र्‍हस्व आहे.

सर्कीट ला मराठी शब्द काय?
खरंतर सीसीटीव्ही ला पर्यायी मराठी शब्द शोधतोय...

शाळेत विद्युतमंडल असं शिकल्याचं आठवतं. चुभूद्याघ्या. Happy
सीसीटीव्ही - विचाराधीन. (हे भाषांतर नव्हे, मी विचार करते आहे. :P)
बंदिस्त मंडलयुक्त दूरचित्र असं एक सापडलं.

अरे हा हा... घाईघाईत बंदिस्त मंडलयुक्त दूरचित्र शब्दसमूहाकडे लक्ष नाही गेलं.
धन्यवाद!

सिंडे, बायडीपण हेच म्हणाली होती! रादर ती मला म्हणाली असावी Wink

तो " बंदिस्त मंडलयुक्त दूरचित्र" फारच शब्दशः अनुवाद वाटतो पण. बन्दिस्त आणि मंडल दोन्ही शब्दांची गरज नाहीये भावानुवादासाठी. "आंतरचित्रदर्शक " "दूरचित्रदर्शक" असा किंवा तत्सम काहीतरी अर्थ कळणारा शब्द हवा.

बटिक म्हणजे काय?

पादशाही म्हणजे कोणती सत्ता? बादशाही आणि पादशाही या वेगवेगळ्या सत्ता होत्या का? ( हे कुठे विचारावं ते कळलं नाही म्हणून इथेच विचारलं.)

मुग्धा, हो पादशाही हा पुस्तकातला बहुतेक टायपो असावा. कारण हा शब्द एकाच ठिकाणी वापरलाय त्यानंतरच्या संदर्भात पातशाही हाच शब्द आहे. पातशाही कधी ऐकलेला नसल्याने बादशाहीला यमक म्हणून मला पादशाही शब्दच बरोबर वाटला. (पादशाही वाचताना पण मला प्रचंड हसू येतंय. Proud )

पण बादशहा वरून बादशाही असेल तर पातशाहीचा संदर्भ काय?

पुरंदरे शशांक. धन्यवाद.

पादशाही बरोबर आहे.
'हिंदु पदपादशाही' अशा नावाचे पुस्तकही आहे बहुतेक.
पादशाही म्हणजे हुकुमत/ राज्य अश्या अर्थाचा शब्द असावा बहुतेक.

साती +१ पादशाहा मूळ फारसी ,अर्थ बादशहा, मुसलमान राजा. पादशाही = बादशहाचा अंमल हा एक अर्थ. बादशहाने दिलेली, बादशहास शोभेशी हे आइतर अर्थ. पातशाही शब्दकोशात नाही.

साती तै, भरत मयेकर, मी सद्ध्या राऊ वाचतेय. त्याबद्दलच विचारतेय. या पुस्तकात फक्त १ वा २ ठिकाणीच पादशाही असा शब्द वापरलाय व इतर बरेच ठिकाणी पातशहा वा पातशाही असाच शब्द आहे. पुस्तकात इतक्या मोठया प्रमाणावर टायपो असावा का? असा प्रश्न पडलाय आता.

'शेंदाड' = एक फळ
शेंदाडशिपाई = शूरत्वाच्या पोकळ बढाया मारणारा.

२ प्रश्न :
१) हे फळ नक्की कसे असते ?
२) या फळाचा व शिपायाचा काय संबंध ?

चिबुड म्हणजे मार्शमॅलन. खरबूज म्हणजे मस्क मेलन. आणि शेंदाड हे एक चिबडासारखे पाणचट फळ असते. मराठवाड्यात त्याला शेंदाड म्हणतात असे मिपावर नुकतेच वाचले.
शिवाय मुंबईत 'छिबडा' म्हणून एक प्रकारच्या काकड्या विकायला असतात. त्यांचे 'छिबडा' हे नाव गुजराती असावे.

बी व हीरा धन्स.
मग हे फळ आतून पोकळ समजायचे का ? त्यावरून शेंदाडशिपाई चा अर्थ लावायचा का ?

हे फळ पोकळ नसते कुमार१. शेंदाडे हे फळ पातळ त्वचा व मऊ गर असलेले असते. जराशा धक्क्याने ते फुटते. शेंदाडासारखा शिपाई म्हणजे ज्याला रट्टे खाण्याची ताकद नाही असा. यामुळे या शब्दाचा अर्थ पुढे भित्रा माणूस असा झाला.

शर्विल चा अर्थ काय? माबो वर कृष्णाचे एक नाव असे दिले आहे. पण संधी विग्रह किंवा खरोखर संस्कृत नाव आहे असा काही श्लोक कोणी सांगू शकेल का?

शर्विल करणारा तो शार्विलक (चोर) असा विग्रह केला तर शर्विलचा अर्थ चोरी असाही होऊ शकतो. पण शार्विलक हा संस्कृतोद्भव शब्द असल्याने असाच विग्रह असेल असे नाही.

Pages