शब्दार्थ

Submitted by admin on 3 June, 2008 - 19:11

एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.

या आधिचे संभाषण या दुव्यावर सापडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

'मालवणी' की सिंधूदुर्ग जिल्ह्यात बोलली जाणारी भाषा आहे.. (राजापूर, देवगड, कुडाळ, सावंतवाडी, माल्वण ).
कोकण पट्ट्यात बोलल्या जाणार्‍या सगळ्याच भाषाना कोकणी म्हटले जाते.
अगदी उत्तर रत्नागिरी पासून गोवा , कारवार पर्यंत...
. त्यामुळे गोंयची कोकणी, कारवारी कोकणी इत्यादी नावाने त्या भाषाना संबोधले जाते.
..
सर्वसाधारण परिभाषा हवी असेल तर गोवेकर बोलतात ती कोकणी, आणि सिंधूदुर्गकर बोलतात ती मालवणी ..

संशोधक कोंकणी भाषा
या धाग्यावर कोंकणी भाषा आणि मालवणीशी साधर्म्य / फरक तसेच इतरही मनोरंजक माहिती लिहीली आहे.

नक्की वाचा आणि आपल्या टीम गोवाला शाबासकीही द्या.

शुगोलताई, सातीताई,गोष्टीगावाचे धन्यवाद.
लिंक बघतो.

जेंव्हा एखाद्या कृतीत "खंड पडणे" असा शब्दप्रयोग केला जातो तेंव्हा ती क्रिया तात्पुरती थांबणे आणि पुन्हा सुरू होणे हे अपेक्षित असते का? की कायमस्वरूपी थांबण्याला पण "खंड पडणे" असे म्हणता येईल?

कुमार, अवसायन म्हणजे लिक्विडेशन.
हिंदीत जास्त वापरतात.
रसायन म्हणजे लिक्विड पासून आलाय का कुणास ठाऊक!

साती....

गेल्या तीनचार वर्षात कोल्हापूर जिल्ह्यात अनेक पतसंस्था अक्षरश: बुडाल्या (खातेदारांची तर कर्मकहाणीच आहे) तर शासनाच्या सहकार खात्याने त्या त्या पतसंस्थांच्या मॅनेजमेन्ट बोर्डची बरखास्ती करून तिथे खात्याचा अधिकारी नेमला....त्याचे पदनाम आहे "अवसायक". ह्याने कर्जदारांच्या याद्या करून पोलिस आणि खाते यांच्या सहकार्याने कर्जवसुली करून जी काही रक्कम जमा होईल ती ठेवीदारांना टक्केवारीच्या हिशोबात देणे अपेक्षित असते.

अलिकडे आणि खरे तर मायबोलीवर बरेच जण पोटभर एवजी भरपेट हा शब्द जास्त वापरतात. भरपेट हा शब्द मी जेंव्हा शाळेत आणि महाविद्यालयात मराठी विषय शिकत होतो तेंव्हा मराठीच्या पुस्तकांमधे एकदाही आला नाही. ह्याखेरीज, आजवर जी काही मराठी पुस्तके वाचलीत त्यातही भरपेट हा शब्द मी वाचलेला नाही.

प्रश्नः भरपेट मराठी शब्द अलिकडेच आपल्या भाषेत शिरला आहे का?

बी जी, आपल्या मराठीत काय काय शिरले आहे याची यादी करायला बसले तर दुसरीच एखादी क्रिओल भाषा तयार होईल Happy

मला हे अवसायक , अवसायन म्हटले की कोणाचे तरी किण्वा त्या संस्थेचे चालवण्याचे अवसान गळाल्यासारखे वाटते.किंवा अवसान घात झाल्यासारखे वाटते Happy

अशोककाका, 'अवसायक' शब्द मजेशीर वाटला.

बी, हल्ली मराठीत बरेच हिंदी शब्द घुसलेत.
आणि बॉर्डरवरचे लोक तर अगदी मिश्र भाषाच बोलतात.
त्यांच्या बोलण्यात भरपेट/खालीपेट अगदी वारंवार येतं.

आता मी जिथे रहाते तिथे आम्ही मराठी/कानडी /तेलगू आणि हिंदी मिश्र भाषा बोलतो.
इतकी मिश्र की आमची मराठी पुण्यातल्या, कानडी बंगळूरूतल्या, तेलगू हैद्राबादेतल्या आणि हिंदी दिल्लीच्या लोकांना अनोळखी वाटेल.

आणि एखाद्या भाषेत बोलताना दुसर्‍या भाषेतले शब्द सर्रास वापरयो आम्ही.
म्हणजे ही गोळी चावून खा म्हणायला मी सरळ 'चबासबेकु' म्हणते.
Wink
लोक मला नक्की कुठली गांवढळ कन्नड बोलते म्हणत असतील.

साती, तुझ ठिक आहे कारण तू महाराष्ट्राबाहेर राहतेस. पण खुद्द पुण्यातील लोकसुद्धा हल्ली भरपेट हाच शब्द वापरतात. शिवाय हल्ली अमुक पदार्थ 'पोटभरीचा' आहे हे सुद्धा मला ऐकायला जरा वेगळाच वाटतो.

बी...

~ कोल्हापूरातील मटणरस्सा पार्टीत हमखास "भरपेट" शब्दाचे प्रयोजन केले जाते. रस्सामंडळ असेही या प्रकारच्या गटजेवणाला नाव आहे. यातील प्रमुख जो असतो तो मटण वाढून झाल्यावर समस्तांना सूचना करतो, "हं, हून जाऊ दे आत्ता....पावण्यांनो भरपेट हाणायचं बरं का !" ~ इथे पोटभर खावा असले काही अभिप्रेत नसते, भूकेपेक्षाही दोन घास जास्त खाणे म्हणजेच भरपेट....

"हाणा.." च्या प्रयोजनात देखील खाण्यापेक्षा मटणावर तुटून पडा असाच संदेश जातो.

धन्यवाद अशोकमामा. कोल्हापुरच्या बाबतीत मला 'उभारणे' शब्दाविषयी माहिती होते भरपेट बद्दल नाही. पण, नवल ह्याचे जास्त वाटते की पुण्यातील लोक हा शब्द वापरतात. माझा असा अनुभव आहे की पुण्यातील लोक कितीही किचकट शब्द असो पण त्याला मराठी रुप देतात.

'मतिमंद' हा शब्द रूढ आहे. पण, काहींच्या मते तो बरोबर नसून 'मंदमती' हा योग्य आहे. ज्याप्रमाणे 'मंदगती' तसेच ' मंदमती.

पिवळ्या रंगाला निळाशार रंगाप्रमाणे पिवळाशार म्हणणे चुक की बरोबर? पिवळट, पिवळाजर्द, पिवळसर, पिवळाफटक, फिकट पिवळा अशी विशेषणे ऐकली आहे पण पिवळाशार नाही. आज फेसबुकर एका स्त्रिने पिवळाशार रंग असा उल्लेख केला आणि मला तो चुकीचा वाटला.

Pages