पास्ता

Submitted by टयुलिप on 8 February, 2016 - 10:46
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पास्ता
फ्लॉवर बारीक चिरून
ढोबळी मिरची (लाल / हिरवी) बारीक उभी चिरून
मटार दाणे
गाजर उभे / गोल चिरून
५-६ टोमॅटो
टोमॅटो सॉस
१ मध्यम कांदा
कोथिंबीर
मीठ
२ चमचे लाल तिखट
१ चमचा हळद

क्रमवार पाककृती: 

१. पास्ता पाकिटावर दिलेल्या सूचनेनुसार पाण्यात उकळून घ्यावा,
२. टोमॅटो सॉस साठीपाणी उकळत ठेवावे. उकळल्यावर त्यात टोमॅटो टाकावेत.
३. पास्ता आणि टोमॅटो शिजेपर्यंतसगळ्या भाज्या बारीक चिरून घ्याव्यात.
1.jpg
४. टोमॅटो १० मिनिटानंतर गार पाण्यात टाकावेत. त्याची साल काढून घ्यावेत, आणि मिक्सरमधे प्युरे करावी.
५. पास्ता उकळल्यानंतर चाळनीमधे काढून घ्यावा.
3.jpg
६. कढईमधे तेल टाकून , जिरे मोहरी आणि थोडे हिंग टाकावे.
७. आता कांदा परतून घ्यावा.
८. मग सगळ्या भाज्या टाकव्यात.
९. एक वाफ काढून शिजवून घ्याव्यात.
4.jpg
१०. त्यात पास्ता टाकावा.
5.jpg
११. वरुन घरी केलेली प्युरे आणि सॉस टाकावा. हळद , लाल तिखट, मीठ टाकावे. आणि हलवुन घ्यावे.
6.jpg
१२. कोथिंबीर टाकून गरमा गरम पस्ता वाढावा.
8.jpg

वाढणी/प्रमाण: 
३ जणांसाठी पुरेन
अधिक टिपा: 

विकतचा सॉस खूप आवडत नाही , म्हणून घरची प्युरे आणि सॉस एकत्र केलाय.
भाज्या जेवढ्या बारीक, तेवढा शिजायला वेळ कमी लागेन.
चीज़ आवडत नाही, म्हणून टाकले नाही.
घरात असतीन त्या बहुतेक भाज्या यात वापरता येतीन.
फोटो आहेत, पण अपलोड करणे जमेना. म्हणून सध्या पाककृतीच.

तळटिप: ती ट्युलिप मी नाही Happy

माहितीचा स्रोत: 
इंटरनेट आणि माझे काही वेरीयेशन्स
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जेव्हा ट्युलिप(ही) रेसिपीज् द्यायला लागते .. Happy

भारतीयीकरण केलेला पास्ता रेसिपी सोपी दिसत आहे ..

>> ३ जणांसाठी पुरेन

हे पास्त्याचे स्वगत असेल का? Happy

१. लेखात प्रकाशचित्रांचा समावेश कसा करावा?

२. पाककृती लेखनात प्रकाशचित्रांचा समावेश कसा करावा

या दोन पानांचे वाचन करा. I hope that will help. फोटोशिवाय मजा नाही पाकृला. Happy

*

३ जणांसाठी पुरेन
हे पास्त्याचे स्वगत असेल का?
<<

नव्हे.
आमचा एक (आडनावाने) गुज्जू, पण (३ पिढ्या महाराष्ट्रात जन्मलेला) शुद्ध मराठी बोलणारा मित्र अशा प्रकारची बोली बोलतो. (पुरेल च्या ल ऐवजी न वापरणे)

धन्यवाद दीमा .. अशा प्रकारच्या बोली बद्दल माहित नव्हतं ..

आणि ह्या ट्युलिप ला "ती" ट्युलिप समजल्यामुळे अशी बोली अपेक्षीत नव्हती .. Happy

मस्त आहे. कलरफुल.

मी पण पास्ता करताना मोहरी, जिरं, हिंग फोडणी करून भाज्या टाकते :D. फक्त फोडणीत हळद नाही टाकत. चीज मात्र आवडतं आमच्याकडे त्यामुळे ते भरपूर टाकते. मिरपूड, ओवापण टाकते.

आभार लोकहो!! खुद्द डेविड रोक्कोने(तोच तो जो भारतात येऊन इटालियन रेसिपीस करतो आणि इटलीत जाउन भारतीय) सुद्धा पास्त्यामधे हळद टाकलेली मी बघितली आहे.तेव्ह त्याच्याही सहकार्‍याने तोंड फिरवलेले :-p
हा पास्ता घरी खूप आवडला.
मला एक सांगा, या पूर्ण पाककृतीमधे पास्त्याला काही भारतीय रीप्लेस्मेंट असु शकते का?

गोड रसदार गाजरं >> आजकाल आमच्या इथे ही गाजरं खूप दिसतात.

मला एक सांगा, या पूर्ण पाककृतीमधे पास्त्याला काही भारतीय रीप्लेस्मेंट असु शकते का?
<<
डाळफळं / वरणफळं नामक प्रकार ऐकलाय का? तो बेसिकली डाळीत शिजवलेला पास्ताच आहे.

साबुदाणा खिचडीमधे श्रेडेड चिकन टा़कण्याएवढंच फोडणी मधे पास्ता बनवणं सीनफुल वाटतं आहे मला. पण इतर खुप पदार्थांना भारतीय चव देतो आपण, तसंच हे ही भारतीय मसाले वापरुन छान लागेल. मायनस फोडणी, पण इतर रेडी मसाले ( गरम मसाला, किचन किंग इ इ) अ‍ॅड करुन करायला हवा एकदा पास्ता. .

डाळफळं / वरणफळं नामक प्रकार ऐकलाय का? तो बेसिकली डाळीत शिजवलेला पास्ताच आहे.>>वरणफळं वाटल होत.पण मी कधी वरणफळात सगळ्या भाज्या नाही टाकत.
धन्यवाद अनु ,जाई
मनिमाऊ: एकदा करून पहा.

पास्त्याचं भारतीयीकरण छान वाटतंय Happy

आता प्रथेप्रमाणे थोडी भंकस : पास्ता कांदा बटाटा रस्सा, पास्तापोहे, पास्ता भरीत, पास्ता दोसा, उंधियो पास्ता, पास्ता रबडी वगैरे ट्राय करून बघा म्हणावं त्या डेव्हिड रोक्कोंना Proud

ट्युलिप, हलके घ्या Happy

ट्युलिप, हलके घ्या स्मित>> नक्कीच
पास्ता कांदा बटाटा रस्सा>> :-)) त्याआधी त्याला मी ही सगळी नावा १० वेळा ना अडखळता उच्चारायला सांगेन :-p

Pages