मदतपुस्तिका

Submitted by admin on 24 March, 2008 - 17:54

मायबोलीवर लेखन कसे करावे, येथील विविध सुविधा कशा वापराव्यात यासंबंधीची माहिती, व सभासदांकडून वारंवार विचारल्या जाणार्‍या प्रश्नांची उत्तरे या मदतपुस्तिकेत मिळतील. तुम्हांला अपेक्षित असलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही, तर कृपया आपला प्रश्न नवीन प्रतिसादाची सोय वापरुन विचारावा, ही विनंती.

मला आजच्या साप्ताहिक सकाळ मध्ये आलेल्या येका लेखाची लिंक द्यायची आहे . ती कशी देता येयील ? हे लेखन माझ्या पतीचे आहे'

मी दिलेला प्रतिसाद मला उडवायचा आहे… प्रयत्न केला नाही. कुपया माझा प्रतिसाद काढून टाका.

मी दिलेला प्रतिसाद मला उडवायचा आहे… प्रयत्न केला पण नाही जमले . कुपया माझा प्रतिसाद काढून टाका.

आम्ही गावातील तरुणानी गावाच्या विकासा साठी एक 'विकास मंच' सुरु केला असुन सदर मंच च्या मदतीसाठी मायबोली आव्हान करायचे आहे. करु शकतो का? म्हणजे मायबोली टीम ला या प्रकारात आक्षेप असतो का? मला परवानगी हवी? टाकु का?

Proud
मी ही हेच म्हणणार होतो. हे म्हणजे असे झाले की मी मित्राचा फोन नंबर विसरलो तर तो म्हणतो अरे मग फोन करुन विचारायचा नाही का?
नवा पासवर्ड ठेवताना जुना पन द्यावा लागतो का?

नवा पासवर्ड ठेवताना जुना पन द्यावा लागतो का?
>>
नाही जी

<<<< जुना पासवर्ड द्यावा लागत असेल अशी मी आशा करतो. अन्यथा मायबोलीच्या सिक्युरिटीमध्ये मोठीच त्रुटी आहे असे म्हणता येईल.

आत्ता जे कमेंट्स करत आहेत म्हणजेच लोकं लॉग्ड इन आहेत ते आपल्या सदस्यत्वामधे जाऊन पासवर्ड बदलू शकतात. तेंव्हा जुन्या पासव्र्डची गरज नाही असं वाटतंय.

अन्यथा मायबोलीच्या सिक्युरिटीमध्ये मोठीच त्रुटी आहे असे म्हणता येईल.
>> ती तर मुळामधे एसएसएल न वापरणे या सगळ्यात महत्वाच्या गोष्टीत आहे.

मला इतर कोणी लॉग इन झालेले कसे दिसत नाहीत आणि ग्रुप मध्ये कसे जॉईन व्हायचे?
इथे खरडफळा नावाचे गप्पा मारण्यासाठी व्यासपीठ आहे काय?

माबोवर सध्यातरी कोण कोण ऑनलाईन आहे हे दिसत नाही
त्या ग्रुप वर क्लिक करा आणि सामील व्हा वर क्लिक करा

ठराविक संख्येपेक्षा जास्त प्रतिसाद आले तर आधीचे प्रतिसाद आपोआप डिलीट होतात यालाच धागा वाहणे असे म्हणतात.
ठराविक संख्या बहुतेक २५ किंवा ३० असेल.

रस्त्याच्या कडे कडेने जाणे.
इंग्रजी मध्ये ज्याला आपण "By the way" म्हणतो त्याचे मराठी संक्षिप्त रुप.

मी आज प्रथमच आपल्या ग्रुपचा सदस्य झालो आहे, तशी माझी पुर्ती ओळख नाही, पण जर मला एखादा लेख किंवा माहिती लिहायची असेल तर कुठे लिहिता येईल? त्यासाठी काही मुल्य द्यावे लागेल कां? आणि समजा मुल्य असेल तर ते कसे द्यायचे? ह्याबाबतीत मला कृपया मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती.... प्रसाद बोरकर

प्रसादबोरकर,
मातबोलीवर स्वागत. Happy

मायबोलीवर लिहिण्यासाठी कोणतेही शुल्क नाही.

लेखनासंबंधी प्रश्नांची उत्तरं http://www.maayboli.com/node/16630 इथे मिळतील.

अधरा , नमस्कार !
मायबोलीवर स्वागत आहे.

मायबोलीच्या विवीध भागांची माहिती एकदा नजरेखालून घाला. तिथे बखरीचा पत्ता सापडेल, तारखेनुसार जुने साहित्य वाचण्यासाठी.

१. गुलमोहर - मायबोलीकरांनी लिहिलेले साहित्य [कथा, कविता, ललित लेख, विनोदी लेख, विविध कला (प्रकाशचित्रे, चित्रकला, हस्तकला)] इथे पहायला मिळेल.
२. गुलमोहर - याच लिंकवरती जो मेन्यू येतो तो असा दिसतो.
त्यात : मायबोली विशेषमध्ये तुम्हाला जुने दिवाळी अंक ,गणेशोत्सवाच्या लिंक्स सापडतील.
लेखमालिका यात जुन्या लेखमालिका सापडतील.

त्यात दुसर्‍या मेन्यूत तुम्हाला अजून साहित्य विषयाच्या लिंक्स सापडतील.

इथे टंकलेली लेखनासंबंधीची माहिती वाचा.

नमस्कार.
२८ मी २०१६ रोजीची माझी 'गावाकडची सांज ...एक रम्य आठवण' ही पोस्ट आणि त्याच बरोबर १५ जून २०१६ रोजीची माझी 'गावाकडची माणसं' ह्या दोन्ही पोस्ट डिलीट कराव्यात, त्यावर अद्याप कुणाचेही प्रतिसाद आलेले नाहीत, पोस्ट अनवधानाने दोन वेळा टंकली गेली आहे...आपणास तसदी दिल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो.

नमस्कार, मी नुकताच मायबोलीचा सभासद झालो आहे. मायबोली वापरताना मला पुढील प्रकारची अडचण येत आहे.
मी मायबोली माझ्या मोबाईलवर वापरत आहे. मी 'नवीन लेखन' ह्यावर टिचकी मारल्यावर 'मायबोलीवर नवीन' हे पान उघडते. पण त्या शेजारील 'माझ्यासाठी नवीन' आणि 'ग्रुपमध्ये नवीन' ह्या पर्यायावर टिचकी मारल्यावर फक्त ५ सेकंदाकरिता ते पान उघडते आणि ते जाऊन त्या ठिकाणी फक्त छोट्या जाहिरातीचा लोगो दिसत रहातो. ज्यात लिहिलेले असते- घराचे इंटिरियर करायचे? बॅक केल्यावर पुन्हा 'मायबोलीवर नवीन' पान दिसू लागते. मला 'माझ्यासाठी नवीन' आणि 'ग्रुपमध्ये नवीन' पान पहाता येत नाहीये. ज्यामुळे माझी फारच अडचण होत आहे.
मी दुसऱ्या दोन मोबाईलवर आणि एका टॅबवर मायबोली वापरून पाहिली पण त्यातही तसेच होत आहे. पण लॅपटॉपवर आणि कॉम्प्युटरवर मायबोली वापरताना असला प्रकार होत नाही. सगळे काही व्यवस्थित दिसते.
मला जाणीव आहे की मोबाईलवर काही साईट्स व्यवस्थित दिसत नाहीत. पण माझ्या मोबाईलवर मायबोलीच्या ९९ गोष्टी बरोबर दिसताहेत, मग ही एकच गोष्ट बरोबर का चालत नाहीए?
मला नेहमी कॉम्पुटर किंवा लॅपटॉप वापरायला मिळणे शक्य होत नाही.
कृपया मदत करावी.

मदत हवी आहे-
सई यांचा 'अंध मुलांन साठी लेखनिक पाहिजेत'... अश्या आशयाचा धागा सापडत नाहिये...कोणि मदत करेल का? कृपया कराच.

Pages