पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१

Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर

या ठिकाणी
आणि या ठिकाणी

अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

किट्टु तांदळाची उकड काढुन घेतो तशीच नाचणीची उकड काढुन मी सरळ पोळपाटावर लाटुन करते नाचणीच्या भाकरी. आणि किपवार्ममधे थेवायच्या मग छान माऊसुत होतात नी हव्या तितक्या पातळ लाटता येतात. उन्हाळ्यात तर बरेचदा करते मी मात्र चवीला तांदळाचीच भाकरी मला जास्त आवडते.

अरे रागी डोसा मस्तच..

नाचणीचे पीठात अर्धी वाटी दही घालायचं आवडीप्रमाणे मीठ, मिर्ची, आलं, लसूण, जीरं कुणि कुणी ओलं खोबरं पण घेतं.. हे सगळं मिक्सर मध्ये वाटून घेउन नाचणीच्या पीठात मिक्स करायचं आणि डोसे करायचे. अगदीच काळसर किंवा चॉकलेटी दिसले तर इथेही तु तांदळाची पीठी मिक्स करू शकतेस. मस्त डोसे होतात. Happy

खवा घरी कसा तयार करायचा?
microwave मध्ये करता येतो का?

नाचणीची उकड काढून त्याचे गोळे करतात आणि ते परत पाण्यात उकळतात, कि झाले रागी मुद्दी.
या सगळ्यापेक्षा आपली आंबील आहेच कि, त्यावर भरपूर चर्चा झाली आहे, जून्या मायबोलीवर. नाचणीचे पिठ व थोडेसे बेसन ताकात भिजवून, त्यात आले, हिरवी मिरची, हिंग वाटून घालायचे, आणि त्यात इनो सॉल्ट घालून ढोकळा, करायचा. हा प्रकारही छान लागतो.

धन्यवाद Happy
डोसे करुन पाहिले मस्तच झाले...
मुद्दी नाही आवड्ली..
लवकरच ढोकळे करुन पाहीन..

@ ashu

Milkmaid (Sweetened or without sugar Condensed Milk) वापरुन microwave मधे खवा छान होतो. ३०-४०% power वर ५-७ मिनिट लागतात फक्त मधुनमधुन हलवत रहा म्हणजे करपणार/ ऊतु जाणार नाही.

जॅम टार्ट?
नाहीतर दोन स्पॉन्ज केक च्या लेयर मधे तो जॅम लावायचा. वरून सर्व क्रीम ने झाकून टाकायचे. वर पायनापल स्लाइस व चेरीज ची सजावट.
पॅनकेक वर घालून. ( नायजेला सार्खे. ) इतर फळे घालून.

मी जुन्या हितगुजवर यो. जा. डिशवॉशरसंबंधी प्रश्न विचारलाय. प्लीज लवकर सांगाल का? हाताने भांडी धुवुन अगदी कंटाळा आलाय.

इडली साठी जे पीठ भिजवतो, त्यापासुन पांढरा ढोकळा बनवता येतो.
त्यामध्ये आले+लसुण+हिरव्या मिरचिची पेस्ट टाकायची.
वाफवताना ईनो टाकुन करायचा. मस्त हलका होतो.
उडिदाच्या डाळी एवजी मुगाची /हरबर्याची डाळ वापरुन पण मस्त होतो.

धन्यवाद दीपु . पण मारवाडी लोक करतात तसा .त्याचे पीठ वेगळे असते का ? ईडलीच्या पीठाच्या ढोकळ्याला ईडलीचीच चव वाटणार नाही ना ?

मला अचारी बैंगन ची रेसिपी कोणी देऊ शकेल का?किंवा भरली वांगी सोडून वांग्याच्या बाकी काही पाकक्रुती?शक्यतो रस नसलेल्या.

veellap,
हा धागा फक्त पाककृती विचारण्या संबंधी आहे, कृपया "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरुन कृती लिहा, या बा.फ. वर पाककृती बद्दल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे, कृती लिहीणे अपेक्षित नाही.

वांग्याच्या पाककृती (कोरड्या) :
वांगं बटाटा फ्राय भाजी
वांगं मुगवड्या फ्राय भाजी
वांग-पालक भाजी
मेथी-वांगं
दही वांग (वांग्याच्या तळलेल्या पातळ फोडी+ कैरी लोणचं मसाला+दही)
एग्प्लांट पार्मजाँ
बाबा गनूश
तसंच वांग्याचा lasagna, casseroles वगैरे करता येईल.

वांग-पालक भाजी
मेथी-वांगं
दही वांग (वांग्याच्या तळलेल्या पातळ फोडी+ कैरी लोणचं मसाला+दही)
छान वाटत आहेत्.मेथी आत्ता लावली आहे.ती उगवेपर्यन्त वांग-पालक भाजी वर समाधान मनून घेइन.रेसिपी लिहा ना प्लीज.आणि एग्प्लांट पार्मजाँ ची पण.बाबा गनूश आवडते पण इकडे चांगला पीटा मिळत नाही बर्‍याचदा...

मेथी-वांगं, पालक-वांगं आणि एग्प्लांट पार्मजाँ ची कृती टाकेन पुढल्या आठवड्यात. तोवर इतर कुणाला जमलं तर त्यांनी टाकावी. (मी रुमाल टाकलेला नाही. :P)

मृण्मयी आणि दिनेशदा दोघांनाही धन्यवाद.दिनेशदा अचारी बैंगन पण पहा ना प्लीज.मी नेट वरून पहून १-२ दा केले पण मनासारखे नाही जमले.एकदा पुण्याजवळच्या एका वीकेण्ड रिसोर्ट मधे खाल्ले होते.खूप छान चव होती.चक्क बेडेकर लोणच्याचा मसाला घालावा असे पण होते एका रेसिपी मधे पण माहित नाही.पुण्यात एफ सी रोड वरच्या हॉर्न ओके प्लीज मधे अचारी पनीर टिक्का खाल्ला होता तो पण जवळपासची चव आणि खूप छान होता.

पाकिस्तानी मसाल्यात, शान कंपनीचा आचारी मसाला मिळतो. साधारण आपल्या लोणच्याच्या मसाल्यासारखाच असतो तो, पण त्यात पदार्थ शिजवायचा असतो. तो मसाला वापरुन, असे पदार्थ करता येतात.
वांग्याचे बंपर पिक आलेय बहुदा. मीपण आज वांगी पोहे केलेत, काळा मसाला घालून. खात खातच लिहितोय.

इकडे पाकिस्तानी दुकानात मिळते का पहाते तो मसाला.
>>वांग्याचे बंपर पिक आलेय बहुदा>>....
हो फक्त घरी नाही.जपान मधे.जपान मधे हा वांग्याचा सिझन आहे.इतकी सुंदर तुकतुकीत वांगी मिळत आहेत की रोज घ्यावी वाटतात.पण नवर्‍याला भरली वांगी,वांगी-बटाटा रस्सा हे काही आवडत नाही आणि मला दुसरे काही करता येत नाही Sad
वांगी पोहे माझा वीक पॉईंट आहे.

इथेच सायोने भरीताचे बरेच प्रकार संकलित केले होते. त्यातला रोज एक करता येईल स्वतःपुरता Happy

दावणगिरी डोशाची रेसिपी सांगा ना कोणी....
नेहमीच्या डोश्यासारखे पीठ असते का प्रमाण काही वेगळे आहे???????

नेहमीच्या डोश्याप्रमाणेच पीठ करायचे. फक्त दावणगेरे डोशे बेन्ने डोशा म्हणून फेमस आअहेत. बेन्ने म्हणजे लोणी. डोसे काढताना तेला ऐवजी लोणी लाऊन काढायचे. कॅलरीज डायटींग ई. ई. सगळं विसरून Wink मग झक्कास लागतात हे लोण्यावरचे खमंग डोसे. Happy

Couscous.......... हे नेमके काय असते ? त्याचा उपयोग कसा करायचा ? मुख्य पदार्थ म्हणून की उपपदार्थ म्हणून ?

Pages