पिझ्झा फॅन क्लब

Submitted by वर्षा_म on 30 August, 2010 - 00:35

इडलीच्या धाग्यावर इतक्या छान टिप्स पाहुन मला हा धागा सुचला. चला सगळ्यांनी आपापले आवडते टॉपिंग लिहा. आणि रेसिपी माहित असेल तर योजाटा आणी इथे लिंक द्या Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी करते ब्रेड स्लाईस वाला पिझ्झा...मस्त लागतो...पिझ्झा सॉस विकत आणते...चीज व टॉपिन्ग्ज्स हवे तसे...
कामावरुन आल्यावर खायला काही नसेल तर हे भारी...

म्हणजे साधा ब्रेड स्लाईस तव्या वर भाजुन त्यावर किसलेले चीज व टॉपिन्ग्ज्स टाकुन वगैरे>> रश्मी, वो तो टोस्ट सँडविच हो गया ना..

मस्त लागतं तेही! एकदम खमंग खुसखुशीत. आमच्याघरी तेच जास्त आवडतं सगळ्यांना.

हो मन्जूडी. पण घरात नेमके मोझेरेल्ला चीज आणुन ठेवलय नवर्‍याने, ते कधी कामी येणार्?:स्मित: पुना बेकरीतुन पिझ्झा बेस आणला असता, पण मुलीला दररोज दिला तरी ती जेवण सोडुन ते खाईल्,म्हणून ब्रेडसाठी विचारले. तिच्या जेवणाच्या कटकटीने मला वैताग आलाय.:अरेरे:

व्हीट ब्रेड आण... बटर चोपडून तव्यावर भाज. मस्त खमंग होतात. मी त्यात सि.मिरची कांदा टोमॅटो मक्याचे दाणे अशी टोमॅटो/ पास्ता सॉस पावभाजी मसाला घालून भाजी करते ती स्टफ करून टोस्ट करते.

अरे मस्त! ब्रेड आणते, बाकी सारे घरात आहे. थॅन्क्स!:स्मित:

ह, आणी मला खुशी"ज या कम्पनीची गार्लिक ब्रेडसाठी वापरतात, ती चटणी/ कोरडी पावडर पण मिळालीय, ती पण छान लागते या साध्या ब्रेडना. चीज किसुन किन्वा बटरमध्ये मिक्स करुन ती ब्रेडला लावायची, मस्त झणझणीत लागते, कारण चिली फ्लेक्स पण आहेत त्यात.

हा मी मागच्या आठवड्यात केलेला... बेस गव्हाच्या पिठाचा केलेला... सिमला मिर्ची आणि
स्वीटकॉर्न टॉपिन्ग्ज्स व चीज.... माझा पहिलाच प्रयत्न Happy
IMG-20151219-WA0000.jpg

Pages