पिझ्झा फॅन क्लब

Submitted by वर्षा_म on 30 August, 2010 - 00:35

इडलीच्या धाग्यावर इतक्या छान टिप्स पाहुन मला हा धागा सुचला. चला सगळ्यांनी आपापले आवडते टॉपिंग लिहा. आणि रेसिपी माहित असेल तर योजाटा आणी इथे लिंक द्या Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वॉव मिनोती Happy हेच लिहायला मी आले होते. कालच केलेला. एक बॅग होल व्हीट डो, आणि एक बॅग गार्लिक आणि अर्ब्स वाली डो आणून. great minds think alike Proud ( सोय चीझ पण सेम ).

मी बरेच वेळा पिझ्झा घरी करते, अगदी स्क्र्.अच पासून.
माझ्या मुलांना खूप आवडत असल्यामुळे महिन्यातून दोनदा तरी होतोच. शिवाय घरी केल्यामुळे त्यात अर्धी कणीक घालून जरा हेल्दी करता येतो.

मी बरेच वेळा पिझ्झा घरी करते, अगदी स्क्र्.अच पासून.
माझ्या मुलांना खूप आवडत असल्यामुळे महिन्यातून दोनदा तरी होतोच. शिवाय घरी केल्यामुळे त्यात अर्धी कणीक घालून जरा हेल्दी करता येतो.

वर जे कुणी स्वत: केलेल्या पिझ्झा बद्दल लिहीले आहे, त्यांनी कृती योजाटा.

माझे आवडते टॉपिंग पायनॅपल =हॅलापिनो.

आतापर्यंत खाल्लेला बेस्ट पिझा बर्केली मध्ये चीजबोर्ड म्हणून एक पिझा प्लेस आहे तिथला. तिथे बसिल पेस्टो, सिलांट्रो पेस्टो आणी कॉर्न पिझा बेस्ट. तसंच तिथे बटाटा घालूनही एक प्रकार करतात. गंमत म्हणजे तिथे रोज एकच प्रकारचा वेज पिझा बनवतात. हो त्यांच्या लीस्ट्मधला कोणतातरी एक. फक्त वेजी. त्यांचा एक छोटा बॅडही आहे. गरम गरम स्लाइस घेउन समोरच्या रस्त्यावरच्या डिवायडर वर असलेल्या हिरवळीवर बसून खाणे म्हणजे अहाहा.. मिस द पिझा & मिस दोज डेज...

शाकाहारी लोकांना एक विशेष सुचना! अमेरिकेत आणि इतर पाश्च्यात देशात जे चीझ वापरले जाते त्यामध्ये रेनेट नावाचा पदार्थ असतो. हा पदार्थ गाईच्या वासराच्या पोटाला कापून काढलेला असतो. तुम्हाला जर चीझ खायचेच आहे तर अमूल चे खा. आम्ही परदेशात १० वर्षे राहलो आणि नेहमी वेगन पिझ्झा बेस आणून (एमीज किचेन ) त्यावर अमूल चीझ टाकून एन्जोय करतो. आमची मुले कधीच शाळेतला किंवा पिझ्झा हट चा पिझ्झा खाण्याचा हट्ट करीत नाही कारण त्यांना वासराचे प्राण वाचवणे जास्त महत्वाचे वाटते!

आणि अजून इक महत्वाची गोष्ट, अमेरिकेत शुद्ध शाकाहारी म्हणून वास्तव्य करणं खूप सोप्पं आहे. फक्त थोडं डोकं वापरण्याची आवशक्यता आहे. फ़क़्त हे ठरवायचं कि हे डोकं आपण कुणाचे प्राण घेण्यासाठी वापरायच कि वाचवण्या साठी!

अधिक माहिती साठी कृपया en.wikipedia.org/wiki/Rennet साईट ला भेट द्या.

hbduniya,
माहितीबद्दल धन्यवाद. मी पूर्ण शाकाहारी असल्याने माझ्यासाठी महत्वाचे असे सांगितलेत. त्याबद्दल अधिक माहिती घेता अमूलबरोबरच आणखी काही चीज बनवणार्‍या फॅक्टर्‍या रेनेट न घालता चीज बनवतात. सार्जेंन्टो, सॉरेन्टो, कॅबट, लँड ऑफ लेक इ. कंपन्यांची काही वगळता चिजे नैसर्गीक आहेत.

मागच्या १०-२० वर्षांपासुन chymosin, pepsin, lipase etc. हे recombinant DNA technology चा आधार घेवुन बनवितात त्यामुळे रेनेटसाठी कुण्या वासराचा जीव जात नाही...

aai ne last weekendla Pizza kela hota..mast jamal hota ..ani best mhnaje tine pizza base pan gharich banvla..next time photo taken ...

तव्यावर भाजतांना बेस दोन्ही साईडने भाजायचा का ? वरची साईड खाली केली की सगळं चीज आणि टॉपिंग्ज तव्याला चिकटतात. आणि नाही केली तर वरून बेस कच्चा राहिल्याचा फिल येतो.

चैत्रगन्धा, आधीच्या पानावरची ( १) अरुन्धतीची पोस्ट वाच, त्यात तिने लिहीले आहे याबद्दल. तरी मी लिहीते की खालचा भाग भाजला गेला की चीज वितळायला लागते, मग गॅस बन्द करुन झाकण ठेवायचे. वरचे आपोआप शिजते.

मी घरी करते तो पिझ्झा फारच साधा असतो.

पिझ्झा बेसला घरात जो टोमाटो सॉस उपलब्ध असेल तो लावते प्लेन अथवा हॉट and सोअर.

कांदा, उकडलेला बटाटा, सिमला मिरची, टोमाटो, काकडी, गाजर ह्यांची कोशिंबीर करते म्हणजे त्यात आले, लसूण, मिरची ठेचा. लाल तिखट, मीठ, हिंग, जिरं, चाट मसाला, ओवा, मिरपूड, कोथिंबीर हे सर्व मिक्स करते. ते सॉस लावल्यावर वरती ही कोशिंबीर मग भरपूर चीज. चेंज म्हणून तुकडे पण घालते आले- लसूण- मिरचीचे, तसं पण आवडते आमच्याकडे ठेच्याऐवजी.

कन्वेक्शन मध्ये करताना खालचा पिझा बेस उलटा करून थोडा मावे मध्ये काही मिनिट्स करून घेते कारण खालचा भाग कच्चा राहतो आमच्याकडे मग सर्व घालून दोन मिनिटे मावेवर करते मग ८ ते १० मिनिटे १५० वर ठेवते. अंदाज घेते लागलं तर अजून ठेवते.

पण मला जास्त तव्यावरचा आवडतो थोडे बटर लावते मी नॉन-स्टिकला पण आणि मंद gas वर झाकण घालून करते. तो जास्त छान होतो. खाली खरपूस झालं कि बंद करते. नवऱ्याला थोडे कच्चेच आवडते वरचे सलाड. हल्ली दोन तीन वर्षे घरी केलाच नाहीये. पण पूर्वी खुपदा केलाय.

>>कांदा, उकडलेला बटाटा, सिमला मिरची, टोमाटो, काकडी, गाजर ह्यांची कोशिंबीर करते म्हणजे त्यात आले, लसूण, मिरची ठेचा. लाल तिखट, मीठ, हिंग, जिरं, चाट मसाला, ओवा, मिरपूड, कोथिंबीर हे सर्व मिक्स करते. ते सॉस लावल्यावर वरती ही कोशिंबीर मग भरपूर चीज. चेंज म्हणून तुकडे पण घालते आले- लसूण- मिरचीचे, तसं पण आवडते आमच्याकडे ठेच्याऐवजी.>>
बापरे, ही कोशिंबीर पिझ्झावर? पाणी सुटत नाही?

हिंग, ओवा, मिरपूड आणि चाट मसालापण? आणि बटाटा? आणि काकडी? ही एकदम फ्यूजन रेसिपी आहे. Happy

हॉट and सोअर सॉस असेल तर कोशिंबीर हेच सर्व घटक घालून पण अगदी कमी तिखट करते. प्लेन असेल तर ठेचा किंचित जास्त घालते. (करायचे, जास्त योग्य शब्द. हल्ली केलाच नाहीये घरी).

हा बेससकट घरी केलेला पिझ्झा:
Pizza1.jpg

हा बेस विकतचा वापरून केलेला पनीर पिझ्झा:
PaneerPizza.jpg

हा पण बेस विकतचा वापरून केलेला पावभाजी पिझ्झा:
PaavbhajiPizza.jpg

ओके थँक्स रश्मी .. मी वाचली होती अकुची पोस्ट. पण पांढरा बेस असेल तर त्याला बाहेरच्यासारखा कलर येत नाही आणि त्यामुळे मुलंपण खात नाहीत. म्हणून वरून भाजायचा का असं विचारायच होतं .
ब्राऊन कलरचा बेस असेल तर मग नाही येत इतका प्रॉब्लेम.

कांदा, टोमॅटो, सिमला मिर्ची (बारीक उभे कापलेले), मटार पाण्यात उकडुन घेतलेले, फरसबी एक्दम बारीक कापुन, पनीर खिसुन किंवा बारीक चिरुन.. हे सगळं थोड्या तेलात थोडाच वेळ परतायचं.. टोमॅटो नाही परतायचे. त्यात मीठ, चाट मसाला, सोया सॉस, अन टोमॅटो सॉस चवीप्रमाणे.. पिझ्झा बेस ला बटर लावुन नॉन्स्टिक तव्यावर मंद आचेवर ठेवायचं.. वरतुन बटर अन पिझ्झा सॉस लावायचा.. थोडं चीज खिसुन टाकायचं.. भाज्यांचा जाडसर थर द्यायचा.. वरतुन परत भरपुर चीज.. चिली फ्लेक्स अन मिक्स्ड हर्ब्स भुरभुरायचे..वरतुन झाकन ठेवायचं ३-४ मिन... १०-१२ मिनीट मधे मस्त कडक होतो बेस..

व्हीट बेस जास्त टेस्टी लागतो मैद्याच्या बेस पेक्षा

बस्के मँगो तंदूरी साठी प्लस १००. बिचारे सीपीकेवाले व्हेज, व्हिगन असे व्हर्जन पण द्यायचे. एल.ए मध्ये एकसे एक पिझ्झा मिळतात - पिझ्झा मोझ्झा मस्त आहे.

Pages