पिझ्झा फॅन क्लब

Submitted by वर्षा_म on 30 August, 2010 - 00:35

इडलीच्या धाग्यावर इतक्या छान टिप्स पाहुन मला हा धागा सुचला. चला सगळ्यांनी आपापले आवडते टॉपिंग लिहा. आणि रेसिपी माहित असेल तर योजाटा आणी इथे लिंक द्या Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझे आवडते
१] पनीर सिमला मिर्ची
२] स्वीटकॉर्न
३] फक्त टोमॅटो आणि कांदा

मला एव्हडेच येतात Sad

मला फारसा नाही आवडत. पण लेकिंना भयानक आवडतो. काही घरगुती पिझ्झा रेसिपीज असतील तर द्याल का पाकृ. (छोटी लेक ३.५वर्षाची आहे तिला खाता येतील अशा)

मी फॅन आहे पण कॅलरीज चा विचार करून बरेचदा मोह टाळते Proud
तरीही माझे आवडते टॉपिंग्स काँबिनेशन : पायनॅपल हलापिनो
कॅलिफोर्निया पिझ्झा किचन चा रोस्टेड गार्लिक चिकन पिझ्झा, थाय चिकन पिझ्झा :).
भारतातले पिझ्झा हट चे फ्लेवर्स पण छान आहेत.

पेस्टो चिकन पिझा,
हवायन पिझ्झा(तेच ते अननस,चिकन वगैरे, तिखट मिरची),
ईटालियन स्पाईसी चिकन सॉसेज पिझ्झा with गो चीज,
नुसता मश्रूम्स व आर्टीचोक पिझ्झा.
last but not the least मोझारेला बेसील पिझ्झा,

बाकी मला कुठलेच सहसा आवडत नाहीत तसे.
मी सगळे वरचे टॉपींग्ज घरी केलेत. कधी कधी पिटा ब्रेड वर हे टॉपीग्ज पसरवून १०-१५ मिनीटे बेक करून खल्ले, कशाला पिझ्झा बेस एकटीसाठी बनवा. Happy

alfredo sauce + spinach + red chilli flakes

bell pepper + onion + panner + olives + cheese

माझं एकदम गावठी टॉपिंग असतं Proud
कांदा, भोपळी मिरची, टॉमेटो, थोड्या तेलावर परतून त्यात तिखट मीठ घालते. मस्त लागतं.

.

मी पिझ्झा पहिल्यांदा खाल्ला पुण्यात , १९८८ -८९ साली . तेव्हाचा पिझ्झा म्हणजे जाड बेस , त्यावर सिमला मिरची , गाजर , कांदा ह्यांची भाजी , वरून टोमॅटो केचप आणि भुरभुरवलेलं चीज . हाच खरा पिझ्झा असा समज अनेक वर्षं टिकला .
आता पिझ्झा आवडतो तो फक्त प्युअर ईटालियनच . म्हणजे बेस अगदी पातळ आणि बर्‍यापैकी कडक . पिझ्झा हटचा पिझ्झा मला तितकासा आवडत नाही , बेस खाऊनच जास्त पोट भरतं . त्यामुळे ईटालियन टॉपिंगवाला पिझ्झा आता मला आवडतो . त्यातली आवडती टॉपिंग्स .
१. फ्रेश रॉकेट लीव्हज ( जर्मनमध्ये रुकोला म्हणतात ) , हॅम ( सगळी हॅम्स छान लागत नाहीत , ठराविक ईटालियन किंवा जर्मन हॅमच असायला हवं ) , टोमॅटो आणि मोझारेला चीज .
२. क्वात्रो फोर्माग्गी - ४ प्रकारचे चीज टॉपिंग म्हणून वापरले जातात ( मोझारेला , गोर्गोंझोला ई . आपल्या आवडीचे घ्यायचे )
३. झुकिनी , सिमला मिर्ची , ई भाज्या ग्रील करून घ्यायच्या , टोमॅटो सॉस ( सनड्राईड टोमॅटोजचा ) मोझारेलाचे छोटे तुकडे करून , बाल्सामिक व्हिनेगार क्रीम , ताजी मिरपूड . अहाहा . स्वर्गीय सुख .

वर्षा, काय गं हे इमोशनल अत्याचार!! Wink ..... पिझ्झा म्हणजे माझा वीक पॉईन्ट!! Happy

आधी मी बाहेरच खायचे पिझ्झा.... त्यात ब्लॅक ऑलिव्ह्ज, पायनॅपल, टोमॅटो, एक्स्ट्रॉ मोझारेल्ला चीझ, कांदा, पनीर ही टॉपिंग्ज विशेष आवडती! नुसता चीझी पिझ्झाही खूप आवडतो. पॅन पिझ्झा, पातळ क्रस्ट असलेला पिझ्झा, पिझ्झा व्रॅप पण आवडतात. आणि त्याबरोबर झणझणीत मस्टर्ड, रेड चिली फ्लेक्स, मिरपूड.... यम्म्म्मी! Happy

आणि तरीही सध्या का कोण जाणे, बाहेरचा पिझ्झा नको वाटतो. त्यापेक्षा घरी तयार पिझ्झा बेस आणून त्यावर हवी ती टॉपिंग्ज घालून खाण्यात जास्त मजा येते.

पिझ्झा बेस आणुन घरी मायक्रोवेवमधे किती वेळ आणि टेंपरेचर्वर ठेवायचे??

मी नुकतंच घरी केलेला प्रयोग-
पेस्टो + टोमॅटो केचप + sriracha sauce ( थाई हॉट सॉस) हे मिक्स करून पिझ्झा बेसवर स्प्रेड करायच आणि वरून सिमला मिरची+रेड ऑनिअन + ऑलिव्ज+ italian 4 cheese blend. मस्त चट्पटीत पिझ्झा होतो.

माझा अतिआवडता :
( आणि वेजी पण ) Happy --
पापा जोन्स , थीन क्रस्ट , गार्डन फ्रेश
लो चीज / नो चीज ( कॅलरी लक्षात घेउन Happy ) , एक्ट्रा सॉस
टॉपिंग्स - पायनॅपल , हलापिनो , ऑलिव , सिमला मिरची, ऑनियन , टॉमॅटो

पिझ्झा बेस घरी आणून माक्रोवेव्ह मध्ये ठेवायच्या ऐवजी आपल्या नेहमीच्या तव्यावर ठेवा आणि वरुन झाकण घाला.. एक नंबर होतो पिझ्झा... ओव्हन फ्रेश, माँजिनिज किंवा पूना बेकरीचा पिझ्झा बेस मस्त मिळतो..

टॉपिंग्ज मध्ये सगळ्यात आवडते म्हणजे पनीर भुर्जी.. घरी केलेली पनीर भुर्जी आणि वरुन झकास कांदा लसूण मसाला... आणि बरोबर थोडेसे चीझ.. यम्मीऽऽऽऽ

मी कायम नॉनस्टिक पॅन/ तव्यावर पिझ्झा करते. गॅस मंद आचेवर ठेवायचा आणि पिझ्झ्यावरचे चीझ थोडे वितळू लागले की थोड्या वेळाने गॅस बंद करून पॅन/ तव्यावर झाकण ठेवायचे. त्या धगीत उरलेला पिझ्झा आपोआप भाजला जातो व चीझही हवे तसे वितळते! Happy
पिझ्झा बेस विकतचा आणायचा असेल तर पुण्यात एम्पायर बेकरी (कॅम्प) चा मस्त पिझ्झा बेस विकत मिळतो. उपनगरांमधील दुकानांत/ बेकर्‍यांतही सहज उपलब्ध होतो तो. नाहीतर मग मॉन्जिनीज वगैरे आहेतच!

पिझ्झा बेस बाजारातुन आणुन मी घरीच पिझ्झा बनवतो. टॉपिग्जः टोमॅटो सॉस, कोल्हापुरी ठेचा, लसुन गर्लिक पेस्ट, सिमला मिर्च, टोमॅटो स्लाईस, कांदा, आणि पिझ्झा चिज...pizza_smiley.gif

गोवर्धनचे पिझ्झा चीजही खूप छान आहे.पूना बेकरीत आधी ऑर्डर दिली तर कणकेचा पिझ्झा बेस व बर्गर बन सुद्धा मिळतात. आदल्या दिवशी कमीत कमी १२ ची ऑर्डर द्यावी लागते. ते मैद्यापेक्षा पौष्टिक असतात. लहान मुलांना द्यायला बरे..
अर्ध चेडर + अर्ध मोझ्झरेला हे पिझ्झा चीझचे पर्फेक्ट कॉम्बिनेशन आहे.
तरला दलाल यांचा पिझ्झा सॉस चांगला होतो.

मलापण वरिजिनल इतालियानो पिझा आवडतो. बिस्किटासारखा कुरकुरीत पातळ बेस. वर बेसिल, टोमॅटो आणि चीज. क्वचित मिक्स्ड इतालियन हर्ब्ज.

कॅलिफोर्निया पिझ्झा किचन चा चिपोतले चिकन पिझ्झा मस्त असतो ..

बाकी चांगला बेस, चांगलं सॉस, चांगलं चीज आणि मी खाऊ शकेन असं कुठलंही topping घालून चांगला बेक केलेला पिझ्झा कधीही प्रियच! Happy

पिझ्झा फॅन वगैरे नाही पण टोक्योतला पिझ्झा हटचा वेजिटेरियन आवडता होता. तो ही पायनॅपल- हालापिनो टॉपिंगवाला.

कॅलिफोर्निया पिझ्झा किचन चा टोस्टाडा पण छान असतो.
कॅनमपिझ्झाचा(canampizza ) पनीरबटर मसाला पण इंडीयन टॉपिंग्स मुळे खुप छान लागतो.

मी पण घरी पिझ्झा केला तर तव्यावरच बेक करायचे. पुण्याला ओझोन मध्ये खुप छोटे छोटे पिझ्झा बेस मिळतात (पुरी एवढे) लहान मुलांच्या पार्टी साठी खुप छान वाटतात.
पुण्यात अजुन कुठे एवढे लहान पिझ्झा बेस मिळतात का?

कॅलिफॉर्निया पिझ्झा किचनचे इतके नाव निघतंय त्यामुळे राहवत नाहीये.. Sad
तिथे मँगो तंदूरी चिकन पिझ्झा मिळायचा, पूर्वी.. आहाहा.. काय अ-फ-ला-तू-न होता तो !! इतकी युनिक टेस्ट दुसर्‍या कुठल्याही टॉपिंगला आली नाही... (आता मिळायचा बंद झाला तो.. Sad Angry )
तिथला थाई चिकन पिझ्झाही बेस्ट! दाण्याचा कूट जबरी लागतो त्यात..

मी आजकाल घरीच करते पिझ्झा. सद्ध्यातरी पिझ्झाबेस आणून स्वतःच्या मनानी टॉपिंग्स करणे चालू आहे.. पुढे मागे पिझ्झाबेसही घरी करायचाय.. मस्त आपल्या मनाप्रमाणे होतो पिझ्झा. व चिझ वगैरे प्रमाणातच खाल्ले जाते..

हा मी केलेला पिझ्झा..
pizza1.jpgpizza2.jpg

ट्रेडर जोज मधे पिझ्झा डो मिळतो. तो आणून मस्त पिझ्झा करता येतो. मी तिथुनच सोया चीझ आणते मग घरि केलेला पेस्तो आणि काहि भाज्या असा अप्रतिम पिझ्झा होतो.

मला पिझ्झा खूप आवडतो असे नाही पण शाकाहारी लोकांना त्यातल्या त्यात चटकन मिळणारा पर्याय म्हणून बर्‍याचदा इथे खाल्ला जातो.
माझ्यासाठी सगळ्यात आवडते पिझ्झा म्हणजे माझी इटालीयन रूमी करायची तो पिझ्झा - टॉपींग - कांदा बटाटा... एकदम जबरदस्त. तसा पिझ्झा मला कुठेच मिळाला नाही, इटलीत पण नाही.
खर तर अमेरीकेत बटाटा किती लोकप्रिय आहे, मला अजून कळलेले नाही बटाटा का नाही आणला कोणी पिझ्झा टॉपींग मध्ये.
विकतच्या पिझ्झा मध्ये मला पिझ्झा हटचा अननस + कांदा + हेलोपिनो + ब्लॅक ओलीव्ह घातलेला आवडतो.
आणि Uno चा मेडीटेरीयन पिझ्झा छान आहे. Zpizza चा मोरक्कन पिझ्झा एकदम जबरी. पाइन नट्स, वांग्याचे काप, फेटा चीज, कॅरामिल्ड ओनियन.. यम्मी. पिझ्झा कुठलाही असो थिन क्रस्ट मात्र नक्की हवा.

शिकागो ऊनो मधला "फार्मर्स मार्केट पिज्जा". काही ठराविक पिज्जेरिया मधले, एगप्लांट पार्म पिज्जा!

Pages