ज्युनियर के जी अभ्यासक्रम.

Submitted by साती on 1 October, 2013 - 07:04

नर्सरीच्या अभ्यासक्रमाबद्दल सांगोपांग चर्चा इथे वाचली.
ज्युनियर आणि सिनीयर के जी च्या अभ्यासक्रमाबद्दल इथे चर्चा करूया.
आमच्या मुलाच्या शाळेत कन्नड, हिंदी मूळाक्षरे, इंग्रजी कॅपिटल , स्मॉल , करसिव रायटिंग , दोन ते पाच पाढे , एक ते शंभर आकडे एवढे सगळे लिहीणे ज्युनियर केजीत अपेक्षित आहे.
हे फारच जास्तं आहे असे आमचे मत आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो.घरी खाली बसून टिपॉय वर आणि शाळेत बेंचवर बसून.
बर्‍याच मोठ्या सी बी एस ई शाळांचा 'आम्ही शाळेत करवतो, तुम्ही पण घरी इतका अभ्यास मुलांकडून करवून घ्या' वाला पवित्रा असतोच. आय सी एस ई मध्ये होमवर्क अगदी कमी पण रिडींग अभ्यास भरपूर आहे.

तुमची मुलं टेबल-खुर्ची वर बसुन लिहितात का? >>> हो
छोट्या खुर्च्या आहेत शाळेत.

सी बी एस ई शाळा असली तरी अजुनपर्यंत तरी - 'आम्ही शाळेत करवतो, तुम्ही पण घरी इतका अभ्यास मुलांकडून करवून घ्या' - हा अनुभव आलेला नाही.

माझ्या मुलीच्या पुतणीच्या आणि सोसायटीतल्या पब्लिक च्या सी बी एस ई शाळांचा अनुभव सांगतेय Happy
सगळे एका सुरात होमवर्क बद्दल रडत असतात. मुलगी आधीच्या शाळेत असती तर आतापर्यंत 'दर एक दिवसा आड होमवर्क' ही अवस्था नक्की आली असती.
होमवर्क असायलाही हरकत नाही, पण पानभर एक कर्सिव्ह अक्षर गिरवणे किंवा पॅटर्न(एक १० लूप वाली साखळी इ.इ) ही पकाव कामे करायला आपल्याला या वयातही कंटाळा येईल.नंबर चे होमवर्क एकदम आवडीने केले जातात.
जमेची गोष्ट अशी की शाळेत मीटिंग मध्ये सांगितले जाते की मुलांना होमवर्क करण्यात अडचण येत असल्यास फोर्स करु नका. आम्हाला सांगा आम्ही समजावतो. (पण होमवर्क कमी होत नाही Happy )

हो, सी बी एस ई असली तरी प्रत्येक शाळेच काहीतरी वेगळे असणारच.

ही पकाव कामे करायला आपल्याला या वयातही कंटाळा येईल. >>> खरे आहे.

एक कर्सिव्ह अक्षर गिरवणे >>
कर्सिव्ह पद्धत आता नाहिये ना? मुंबईत मुलीच्या प्रिन्सीपॉलनी सांगितले होते की शिक्षकांना कळत नाहि मुले कर्सिव्ह मध्ये काय लिहितात ते.... म्हणुन कर्सिव्ह बंद झालेय.

Hi maza pilu ata Sr. KG la ahe,

Jr. kg cha syllabus -

1-50 numbers writing and oral

Rhymes in rhyme book

A-Z writing small and big both, writing and oral, A for Apple etc.

EVS - Birds, insects, vehicles, body parts, flowers etc.

A-Z phonetics

आता शाळा नीट चालू झाल्यावर कर्सिव्ह आणि लूपिंग पॅटर्न च्या अभ्यासाचा रेटा कमी झाला आहे.
आठवड्यातून एकदा गणित (मिडल नंबर्/नेक्स्ट नंबर्/लास्ट नंबर याच्यापैकी एक सिरीज असेल त्याप्रमाणे पुढे लिहायचा असतो) आणि एकदा शुक्रवारी २ आकडे ४ ओळीभर लिहीणे इतका होमवर्क असतो. तो आवडता आहे. पटकन होतो.

आम्ही सुनिधीला एलकेजी रीपीट करायला लावली. प्रिन्सिपॉल म्हणाली की तिला सीकेजी झेपेल उगाच वर्ष वाया जाईल, तरीही आम्ही तिला दोन वर्षं एलकेजीमध्येच बसवलं.

सीकेजीला आता कर्सिव ए बी सी संपवून तीन चार अक्षरांचे शब्द वाचणे आणि लिहिणे चालू आहे. गणीतामध्ये नंबर लिहून झाले. आता बोटावर मोजून अ‍ॅडिशन चालू आहेत. बीफोर आफ्टर नंबर्स लिहा पण करवून घेतले आहे.

ईव्हीएसमध्ये भरपूर गोष्टी शिकवल्या आहेत पण लिखाणामध्ये केवळ मायसेल्फ (नाव, पत्ता आईवडलांचे नाव आणि शाळेचे नाव) इतकंच लिहिता आलं पाहिजे. बाकी, चित्रं ओळखून त्याची माहिती तोंडी द्या वगैरेच जास्त आहे.

तमिळमध्ये काहीतरी बाराखडीसदृश लिखाण चालू आहे. मला वाचता येत नाही. मिस म्हणाली मी नीट लिहून घेईन. तमिळचा होमवर्क तिनं घरी नाही केला तरी चालेल. और क्या चाहिये.

याव्यतिरीक्त शाळा सध्या पाठांतर बरंच करवून घेत आहे त्यामध्ये गाणी गोष्टी आणि श्लोक भरपूर आहेत. दुसार्‍या टर्मपासून सारे गम आणि काहीतरी वाजवायला पण शिकवणार होते पण दोन महिने पुरामुळे शाळा बंद असल्याने ते पुढच्या वर्षी शिकवणार म्हणाले.

मस्त आहे धागा, सगळ्याच प्रतिक्रिया वाचल्या नाहीत. पण ठिक आहे.

माझी दोन्ही मुलं ज्या शाळेत जातात तिच्याबद्दल लिहू तितकं कमी आहे. ते नंतर कधीतरी.

पहिलीत येईपर्यंत आमच्या मुलाला हे कर्सिव, अक्शरं गिरवणे, आकडे पाठांतर काहीच नव्हतं. त्याचवेळेस त्याच्या वयाची इंग्रजी शाळेत जाणरी घोकंपट्टीने बरंच काय काय बोलायची, म्हणायची. चारचौघांत जमलं की मराठी शाळेत शिकवतात म्हणून लोक विचित्र नजरेने बघतात हे अनुभवलं. पण मनात म्हणायचो, अपने भी दिन आयेंगे छोटे, अच्छा खासा हिल जायेगा.

पहिलीत आल्यावर मग मागच्या तीन वर्षात जे काही नैसर्गिकरित्या शिकवलं गेलं त्याचा जबरदस्त परिणाम दिसू लागला. आज दुसर्‍या वर्गाचं अर्धं वर्ष संपलंय आणि दिवाळीच्या सुट्टीत त्याने स्वतःच्या मनाने स्वतःच्या शब्दांत पाच पाच ओळींच्या तीन स्वतंत्र कथुल्या लिहून काढल्या तेही त्याच्याशी संयुक्तिक अशा इलस्ट्रेशनसह. त्याला चित्रकलेत आणि लिहीण्यात खूप रस आहे. गणितात गती आहे. मात्र रिपिटीटीव क्लरिकल कामांचा त्याला कंटाळा आहे. Happy

आम्ही दोघे कधीही अभ्यासाचा दबाव आणत नाही. गरज पडत नाही. शाळेतही शिक्षिका फार ताण देत नाहीत. हसतखेळत शिक्षण आहे.

आज दुसर्‍या वर्गाचं अर्धं वर्ष संपलंय आणि दिवाळीच्या सुट्टीत त्याने स्वतःच्या मनाने स्वतःच्या शब्दांत पाच पाच ओळींच्या तीन स्वतंत्र कथुल्या लिहून काढल्या तेही त्याच्याशी संयुक्तिक अशा इलस्ट्रेशनसह >> छान.

बऱ्याच वर्षांनी हा धागा वर आला, मजा वाटली.
करसिव्ह छोट्या शाळांमध्ये शिकवतात, आणि मोठ्या शाळेत गेल्यावर आताच्या करसिव्ह नको नियमाप्रमाणे परत सरळ लिपीत पोहचतात.

आम्ही आता 'सगळ्या क्लास ने आर्ट स्कीप केलं, तों काही अभ्यासाचा विषय नाही, म्हणून मी पण असाईनमेंट दिली नाही आणि सी मिळाला' या संत पदाला पोहचलो आहोत.

रमा यंदा jr kg ला जात आहे १५ एप्रिल ला शाळा सुरु होईल>> अरे वा! नवीन क्लास, नवीन टीचर म्हणून एकदम excited असेल!
आता खरंतर शाळेशी संबंध राहिलेला नाही, पण सगळे प्रतिसाद वाचून पुन्हा जुने दिवस आठवले.
कर्सिव की प्रिंट हा गोंधळ अजूनही सुरूच आहे. आमच्याकडे दरवर्षी सुरूवातीला, मी कर्सिव मध्ये लिहू की प्रिंट मध्ये, असा परिसंवाद होत असे. त्याचा शेवट, कशातही लिही पण लिही, असा असे. Happy

रमा यंदा jr kg ला जात आहे १५ एप्रिल ला शाळा सुरु होईल >>> अरे वा...शाळेत जायच्या आधी शक्य असेल तर तिला एकदा शाळा दाखवून आणा. शाळेत तुला नवे मित्र-मैत्रिणी मिळणार वगैरे गप्पा मारा. तिला सोबत घेऊन पाण्याची बाटली, डबा वगैरे घ्या. म्हणजे शाळा हा काहीतरी इंटरेस्टिंग प्रकार आहे असे वाटते. थोडी फर्स्ट डे अँक्झायटी कमी होते.

>>>>>अरे वा...शाळेत जायच्या आधी शक्य असेल तर तिला एकदा शाळा दाखवून आणा. शाळेत तुला नवे मित्र-मैत्रिणी मिळणार वगैरे गप्पा मारा. तिला सोबत घेऊन पाण्याची बाटली, डबा वगैरे घ्या. म्हणजे शाळा हा काहीतरी इंटरेस्टिंग प्रकार आहे असे वाटते. थोडी फर्स्ट डे अँक्झायटी कमी होते.
किती गोड आयडिया आहे.

Small capital all letters, sight words, basic sentence forming reading speaking हे घेतात शाळेत.
गणितात one to twdnty लिहिता म्हणता आलं पाहिजे, टेन पर्यंत spelling आहेत.
One *१असं.
हिंदी वर्णमाला अं आहा पर्यंत आहे. Read write
बाकी art and craft घेत असतात.
नुकतंच maths चं प्रदर्शन होतं शाळेत त्यात project दिलेला topic काय तर empty full demo करायचं होतं.
हसत खेळत शिक्षण सुरुये.
.
मराठी घरी शिकवतोय

कर्सिव्ह शिकवणे तर इकडच्या शाळांमधेहि बंद केले आहे. सगळे जण फोनवर लिहिणार. व्याकरणाचा बट्ट्याबोळ. तिसरीपासुन तर प्रत्येकाच्या हातात एक आय-पॅड असते नि त्यात अ‍ॅप्स असतात. शिकवायची गरज नाही - विचार करायची गरज नाही - कुणाचे बरोबर आले तर तो लकी, नाहीतर अनलकी!

१ ते १० स्पेलिंग आमच्या पोट्ट्याला पाहिलीत कदाचित दुसरीतही येत नसावीत. Lol जेके फारच लहान आहे.
तो तिसरीत गेला आणि कुठलही स्पेलिंग लिहू लागला. काही अपवाद सोडून सगळं आपोआप बरोबर लिहू लागला. मला लहानपणी स्पेलिंग पाठ करण्याचे आणि तरीही हजार चुकाच करण्याचे दिवस आठवले. याने एकही स्पेलिंग कधी पाठ केलेलं नाही.
आयपॅड कारण असेल तर इट इज वर्किंग. Wink

स्पेलिंग करायला सांग. चुकलं तरी त्याला बरोबर न करता उच्चारा प्रमाणे करायला सांग. शब्दाचं स्पेलिंग न सांगता त्या उच्छाराच स्पेलिंग सांग.

Small capital all letters, sight words, basic sentence forming reading speaking हे घेतात शाळेत.
गणितात one to twdnty लिहिता म्हणता आलं पाहिजे, टेन पर्यंत spelling आहेत.
One *१असं.
हिंदी वर्णमाला अं आहा पर्यंत आहे. Read write

>>
किल्ली, बापरे. हा ज्युनिअर की सिनिअर केजीचा सिलॅबस? अर्थात दोन्हीसाठीहो जास्तच आहे.
कुठली शाळा?

जुनिअर चा वाचून जास्त वाटतोय पण शाळा निवांत आहे. ऍक्टिव्हिटी मधून शिकवते.
ताण नाही, hw आठवड्यातून एक किंवा दोन वेळा देतात.
पुस्तक वह्या शाळेतच असतात रमाच्या नावाचा कप्पा आहे.
प्रियदर्शनी स्कूल

Pages