ज्युनियर के जी अभ्यासक्रम.

Submitted by साती on 1 October, 2013 - 07:04

नर्सरीच्या अभ्यासक्रमाबद्दल सांगोपांग चर्चा इथे वाचली.
ज्युनियर आणि सिनीयर के जी च्या अभ्यासक्रमाबद्दल इथे चर्चा करूया.
आमच्या मुलाच्या शाळेत कन्नड, हिंदी मूळाक्षरे, इंग्रजी कॅपिटल , स्मॉल , करसिव रायटिंग , दोन ते पाच पाढे , एक ते शंभर आकडे एवढे सगळे लिहीणे ज्युनियर केजीत अपेक्षित आहे.
हे फारच जास्तं आहे असे आमचे मत आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझा लेक पण jr. KG ला आहे. पहिल्या २ महिन्यात small letters झाली पण . आणि आता cursive सुरु आहे. ४-५
अक्षरं झालीही .
नवरा convent चा ,म्हणतो 'आम्हालाही असाच अभ्यास होता'.

मला वाटतं हा लिखाणाचा अभ्यास 'state board' मध्ये जास्त असावा.

मैत्रिणीची लेक IGCSE ला आहे Jr. KG. त्याना अजून सरळ रेशा , आडव्या रेशा .
पण ती सध्या ' water cycle , water pollution and methods of filteration' शिकतेय.

स्वस्ति, आमचं सीबीएसई आहे.
किमान एक- दिड तास लिहायचं होमवर्क असतं.
आमच्यात करसिव नोव्हे पासून सुरू होणार.

आमचे लक भारी 69.gif मला किंवा माझ्या मुलांना कुणालाच CBSE ICSE असल्या भीषण प्रकारांची गरज पडली नाही.

आजकाल स्पर्धेच्या नावाखाली शिक्षणाची वाट लावणे सुरू आहे.

आमच्या पोरीचा अभ्यासक्रम पाहून हसतीलच मग तिकडचे शाळावाले. फॉनिक्सनी वाचायला ती फार लवकर शिकली. वय वर्षं साडेतीनला ती थ्री लेटर वर्ड्स आरामात वाचत होती. आता सव्वाचारची आहे आणी कठीण शब्द वाचायचा प्रयत्न चालू असतो. बरेचदा वाचताही येतात. कर्सीव रायटींग शिकवतात शाळेत. पण तिला अजून लिहायची आवड फार नाहीये. पण तिच्या कलाने घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नंबर्स बेसिक ओळखता येतात. छोटे छोटे अ‍ॅडिशन्स करता येतात. पण ह्या सगळ्या रूटीन बरोबरच तिला प्रॅक्टिकल लाईफ लेसन्स दिले जातात.

मग ह्यात खिडक्या पुसणे, जमीन मॉप करणे, कपडे वाळत घालणे, फूड प्रेप जसे संत्र्याचा ज्यूस काढणे, फळे चिरणे, जेवणासाठी टेबल सेट करणे, डिशेस धुणे, टेबल मॅनर्स, वर्गाच्या बागेत सिझन प्रमाणे बिया पेरणे, पाणी घालणे, वीड्स काढणे, ईत्यादी बर्याच गोष्टी शिकवल्या जातात.

मग ह्यात खिडक्या पुसणे, जमीन मॉप करणे, कपडे वाळत घालणे, फूड प्रेप जसे संत्र्याचा ज्यूस काढणे, फळे चिरणे, जेवणासाठी टेबल सेट करणे, डिशेस धुणे, टेबल मॅनर्स, वर्गाच्या बागेत सिझन प्रमाणे बिया पेरणे, पाणी घालणे, वीड्स काढणे, ईत्यादी बर्याच गोष्टी शिकवल्या जातात.

मस्तं.
आमच्या लहानपणी बालवाडीत हे सगळे शिकवत.
म्हणजे टेबल सेट करणं नसेल पण त्याच्या सरखं दुसरं काही.

आत्ता मुलाच्या शाळेत यातलं काही नाहीच. Sad

इतके सगळे वाचुन विचार करतोय

पोरांना महापालिकेच्या शाळेत भरती करु... किमान ५ वी पर्यंत तरी आराम मिळेल Wink

बापरे, एवढा अभ्यास!!

माझा मुलगा इथे प्रीस्कूला जातो, तिथे इंग्रजी छोटी/मोठी अक्षरे लिहिणे, रंगवणे, पेपर प्रोजक्ट (जर S असेल तर त्याच्याशी संबधित गोष्टी बनवणे). हे सर्व २ तासात बाकी खेळणे, झोपणे, पोहणे, संगीत शि़कवणे आहे. मस्त एन्जॉय करतो तो. मध्येच फिल्ड ट्रीप असते, पोनी राईड असते.
होमवर्क ही असतो, तो केलाच पाहिजे अशी काही सक्ती नाही.

अवांतरः मी स्वतः शाळेत पहिलीत गेले, वयाच्या सहाव्या वर्षी. मुलाला (वय ४ वर्षे) जेवढे आता येते, तेवढे मला माझ्या वयाच्या ४थ्या वर्षी. अजिबात येत नव्हते. त्यामुळे त्याला जे काही येते ते खूप आहे असे माझे मत.

हे सगळ सीबीएसई icse शाळ्याञ्च्या वेडातुन वाढलेल आहे

माझा घरातला छोटा सदस्य स्टेट बोर्डाच्या शाळेत आहे
त्याला आरामात हे वरच काही नसून वाचता येत
त्याच वेळेला दुसर्या नातेवाईकाच्या मुलाला मात्र अजुन वाचनाची समस्या आहे

दोघेही दूसरी इयत्ता

मला प्रायमरी शाळेत असताना रस्ता क्रॉस करणे शिकवले होते. सगळा वर्ग शाळे बाहेरच्या रस्त्यावर नेऊन, आधी उजवी कडे, मग डावीकडे पहा, मग वाहन येत नाही याचा अंदाज घेऊन रस्ता क्रॉस करा, असे शिकवलेले अजूनही आठवते.

भारतात रस्त्याच्या डाव्या बाजूने गाड्या चालतात सबब कुठूनही क्रॉस केलात तरी आधी उजवीकडे पहा. तिथून वाहन येणारच. ते नसेल, तर अर्धा रस्ता क्रॉस केल्यावर पलिकडचे तुमच्या डावीकडून येणारे, त्याचा अंदाज घ्या असे लॉजिक होते. हे लॉजिक तेव्हा समजले नव्हते, पण ते उजवी डावी बघणे हे मात्र पक्के ठसलेय डोक्यात. आजकालचे जेवॉकर्स पाहिलेत की हे आजकाल का शिकवत नाहीत? असा प्रश्न पडतोच पडतो.

मला किंवा माझ्या मुलांना कुणालाच CBSE ICSE असल्या भीषण प्रकारांची गरज पडली नाही>> महाराष्ट्रात असते तर मुलीला मराठी माध्यमात घालायला आवडला असतं मला. पण बाहेर ते शक्य होत नाही. त्यामुळे सी बी एस ई ला सध्या तरी पर्याय नाही. मुळात सी बी एस ई बोर्डाचा केजी अभ्यासक्रम काय असतो? शाळेप्रमाणे तो बदलतो कसा ते कुणी सांगेल का प्लीज?

CBSE ICSE असल्या भीषण प्रकारांची >> हे प्रकार भीषण नाहीत असे मला वाटते.
ICSE शाळात प्रायमरी शिक्षण जास्त सोपे असते मात्र प्रोजेक्ट वगैरे बरेच असते.
CBSE मधे पहिली दुसरीचा अभ्यास कठीण वाटला नाही. कुठल्या पब्लिकेशनची पुस्तके घ्यायची हे शाळा ठरवतात. ऑक्सफर्डची म्हणुन जी पुस्तके आहेत ती थोडी कठीण वाटली. पण मुळातच आपण आपल्या लहानपणी जशी पुस्तके पाहिली आहेत तशी यातली कुठलीच पुस्तके नाहीत. ती जास्त करुन वर्कबुक्स आहेत. सुंदर रंगीत चित्र, पझल्स असे बरेच काही त्यात असते.
एसएससी बोर्ड अभ्यासक्रमात जास्त गोंधळ घालते. मात्र आता एसेस्सीच्या काही शाळा फार छान झाल्यात. त्यांनी कालाप्रमाणे आपला अभ्यासक्रमही हसत खेळत प्रकारचा केलाय. ( ठाण्याच्या शाळा )
मराठी शाळात अभ्यास नाही म्हणु नका. आत्ता कामवालीची मुलगी शिशुवर्गात गेली. त्यांना लिखाण आहे, परिक्षा आहेत. Uhoh

लवकर अभ्यास सुरु करण्यात बोर्डापेक्षा बरेचसे पालक जास्त जबाबदार आहेत असे मला वाटते. पहिलीत अभ्यास जास्त नाही अशी शाळा असेल तर पाल्क तक्रार करतात, होमवर्क का नाही विचारतात. सि.के. मधे टेबल्स करुन घेतले नाही तर पुन्हा तक्रार वगैरे वगैरे. बर्‍याच पालकांना आपल्या मुलाने पाचवीत जाईपर्यंत बारावी पर्यंतचा अभ्यास करुन टाकाला तर बरं असे वाटते की काय अशी शंका येईपर्यंत पालक मुलांना आणि शाळांना वेठीस धरतात. कमी अभ्यासाच्या शाळेत 'काहीच शिकवत नाहीत' असे म्हणुन शाळा बदलतात. त्यामुळे मग शाळाही 'आपणच बेस्ट' या नादात अभ्यास वाढवत जातात. या प्रत्यक्ष ऐकलेल्या आणि अनुभवलेल्या गोष्टी आहेत.

संपादन -
अजुन एक प्रॉब्लेम एरिया म्हणजे शिक्षणाची भाषा. हे सगळे शिक्षण इंग्रजीमधुन होतं. आणि घरी बहुतेकवेळा आपण मराठी / लोकल भाषा बोलतो. What is station? हा प्रश्न कठीण वाटतो कारण त्यासाठी आधी इंग्रजीचे शब्द शिकणं जरुरी असतं. हेच मराठीत स्टेशन म्हणजे काय विचारले तर कठीण वाटणार नाही.
मातृभाषेतुन शिक्षण याकरता जरुरी आहे असे वाटते.
--

नर्सरी, ज्यु.के, सि.के चा मात्र अनुभव नाही. माझी मुलगी ज्यु./सि. के. शिकली नाही. डायरेक्ट पहिलीत ( सिबिएससि) घातलेय भारतात येऊन. त्याआधी डेकेअर आणि आठवड्यातुन दोन दिवस इंग्लिश प्ले स्कूल होते. पहिलीत कुठलीच गोष्टं कठीण गेली नाही. हिंदी ही पूर्ण नविन भाषा होती तीला पण नशिबाने प्रॉब्लेम आला नाही ( काहींना येऊ शकतो)
पहिलीत होमवर्क नव्हते. आता टेबल्स आणि कॉपीरायटींग एकदिवसाआड एक असते. दुसरीत येऊन कर्सिव शिकवलेय. ( आधी तीला येत नव्हते) सहज जमले.

या अनुभवावरुन मला असं वाटतं की जसे काही पालक अगदी एक दिड वर्षाच्या मुलाला पॉटी ट्रेनिंग करायला लागतात. तितक्यात मुलांची तयारी नसते. मग रडारड, गोंधळ, उपद्व्याप इत्यादी होते. बरेच दिवस लागतात. तर काही पालक उशिरा म्हणजे दोन , अडीच नंतर सुरु करतात आणि अगदी महिनाभरात मुलं पॉटी ट्रेन्ड होतात. तसंच काहीसं लिखाणाचं. ३/४ वर्षी लिहायचा फोर्स केला की मुलं वैतागतात. तितका पेशन्स नसतो. मग अभ्यास करत नाहीत म्हणुन पालक टेन्शन घेतात वगैरे. या वयात इतर मोटर स्किल्स, वाचनाची आवड लावायची त्यावेळात मुलं आणि पालक लिहायचं टेन्शन घेत फ्रस्ट्रेट होत रहातात. उशीराच लिहायला शिकायला घेतलं तर मुलं पटकन शिकतात असे वाटते. शिवाय फ्रस्ट्रेशन कमी.

माझी मुलगी सिनीयर केजी ला आहे. तीला पण ५ पर्यंत पाढे, डीक्टेशन साठी what, where, thankyou अशे मोठे शब्द आणि प्रश्न उत्तर सुद्धा आहेत. poem, story, plus minus हे पण आहेतच्.ओरल साठी तर what is a railwaystation/hospital? असे प्रश्न आहेत.
मुलांच्या वयाच्या मानाने खुपच होतो हा अभ्यास.

सावली, पालकांबद्दल लिहीलेले अगदी अगदी. माझेही हेच अनुभव आहेत. भारतातच नव्हे तर अमेरिकेतही (अर्थात भारतीय पालकांचे). :). एक ओळखीचे अमेरिकन कपल चुकून या स्कूल डिस्ट्रीक्ट मधे आले आहेत ते आता पुढ्च्या वर्षी भारतीय पालकांना घाबरुन दुसरीकडे मूव होणार म्हणत आहेत. Wink
अमेरिकेत वाचनावर खूप जास्त भर आहे लहान मुलांना, व भारतात लिखाणावर. काही पालकांना मात्र मुलाला सगळेच यावे असे वाटत असते.

बाकी भारतात चांगल्या, कमी अभ्यासाच्या, हसत-खेळत टाईप शाळा आहेतच, सर्व मोठ्या शहरांत तर नक्कीच आहेत, अगदी भरपूर, पण जर जुन्याच टाईप च्या शाळांमध्ये मुलांना घातले असेल तर मात्र कठीण आहे.

लवकर अभ्यास सुरु करण्यात बोर्डापेक्षा बरेचसे पालक जास्त जबाबदार आहेत असे मला वाटते..
<<
अमुक प्लेग्रूपमधे घातले नसेल तर आमच्या शाळेत्ल्या केजीत घेत नाही असे सांगणार्‍या शाळा आहेत.

रच्याकने.
केजीचा फुल्फॉर्म व अर्थ किती लोकांना ठाऊक असतो? (रात्रपाळीच्या लोकांनी उत्तरे देऊ नयेत)

माझी मुलगी पोदार ला लो.के. ला आहे. १ ते ५० अंक , करसिव अक्शरं आहेत. करसिव असलं तरी खुप सोप्पं आहे. कठीण वळणांची अक्शरं नाहि आहेत.काहि चित्र वापरुन वाक्य तयार करुन मुलांना दाखवली जातात. असे कागद घरि ही देतात. आपलीच मुलं ती वाक्य न चुकता म्हणुन दाखव्तात. खुप नवल वाटते. काही शब्द ३-४ अक्शरि, त्यांना रोज दाखव्तात. काही दिवसांनी मुले हे शब्दहि ओळखु लागतात. या दोन्हि पद्धती प्रचलित आहेत.
शिक्षक खुप चांगले आहेत. मुलांवर कोणतीही सक्ती केली जात नाहि. हिंदीची नुसती तोंडओळख आहे. एकंदर सईची प्रगती पाहता मी शाळेवर खुप खुष आहे.

आणि एकः एक दिवशी १ अंक किंवा १ अक्षर. तेच क्लासवर्क आणि होमवर्क, नाहि तर मुलांच गोंधळ उडतो.
आणि भरपुर ईंग्रजी आणि हिंदी कविता. शाळा ज्या पद्धतीने मुलांकडुन करुन घेते ते मला जास्त आवदलं.
नोटः सुरुवातिला मलाही या अभ्यसक्रमाचं टेंशन आलं होतं. पण मुलीची प्रगती पाहुन दुर झालं.

हुश्श! सुटले बाई.( हे आमच्या काळी असलं काही न्हवतं.) Proud

सिरियस नोट, इथे अमेरीकेत सुरुवातीला काही विशेष अभ्यास नसतो ह्या वयात..(किंबहुना काहीच नसतो म्हटले तरी चालेल... पण नंतरच्या इयत्तेत तो कायच्याकाय होतो.)

पण आता तर इतका अभ्यास इतक्या लहान वयात? पः(

देवा.. इतका अभ्यास?
मुलांना आठवीतच पीयच्डी करायला लावणार का काय आता?

माझी जाऊ शिकवण्या घेते... ज्युनिअर केजीचं एक बाळ घेऊन माता आली होती.. क्ल्हई करता का विचारायला. हिने इतक्या लहान वयात नाही आणि इतक्यात कुठेच "नेऊन घालू नका" असंही सुचवल्यावर...
मग सिनिअर केजीलातरी घ्याल का?...

सहावी-सातवीपर्यंत मुलांबरोबर तुम्हीच खूप वेळ घालवा, तुमची भाषा (बाई पंजाबी होती) त्याला येऊदे. खेळ, एखादं वाद्य-बिद्यं शिकूदे...
उपड्या घड्यात पाणी गेलं अस्तं एव्हाना इतकं समजावलं तिला.
नंतर कळलं की, ते बाळ दुसर्‍या क्लासला जाऊ लागलं Sad

काय हे...

किमान एक- दिड तास लिहायचं होमवर्क असतं.>>> अरे देवा!!!!!!!!!!!!!

हात दुखत असतील की.

माझा पोरगा युकेजीत असताना सरळ त्याचा मिसला "माय हॅन्ड पेनिन्ग" म्हणुन काहीच न लिहिता शांत बसायचा.
मग मिस त्याच्या हाताला पकडून त्याला मदत करायच्या लिहायला.
त्यानी आम्हाला सांगितलेलं हे सर्व.
आम्ही अवाक कारण पोरगा घरी सर्व लिखाण आरामात करायचा. Lol
पुढच्या वेळी भेटीला त्याच्या घरातल्या वह्या घेवुन गेलो.

बाकी चित्रकला, नीटनेटकेपणा, अक्षराचं सुंदर वळण ह्यावर पोरगा माझ्यावरच गेल्याने त्याला त्या विषयी काही सांगायचं म्हणजे मलाच कानकोन्ड होतं Proud आणि मी त्याच्या मिसच्या ह्या सर्व सजेशन्स ऐकुन सोडुन देतो.

वाचतोय पण लिहायच धाडसच होत नाहिय ( कारण दोन्ही मुलं शाळेत जात नाहित आणि भविष्यात कधी जातील असे वाटत नाही).
एक शंका: कर्सिव शिकवलं तरी परीक्षेत ते वापरु देत नाहित असं मला एकांकडुन समजले होते ते खरं आहे का?

सावली,
लवकर अभ्यास करणे, हे आजच्या काळात गरजेचे झालेय.
अगदी तान्ही बाळे सुद्धा, मान सावरणे, रांगणे, बसणे .. हे टप्पे आता लवकर पार पाडताना दिसतात.
जर त्यांची क्षमता असेल, आणि ती प्रत्येक बाळाची वेगवेगळी असते, तर त्यांच्या आकलनशक्तीनुसार त्यांना
शिक्षण मिळाले पाहिजे.

वाचतोय पण लिहायच धाडसच होत नाहिय ( कारण दोन्ही मुलं शाळेत जात नाहित आणि भविष्यात कधी जातील असे वाटत नाही).

होम लर्निंग करताय का?
तसे असेल तर अनुभव वाचायला आवडतील.

लवकर अभ्यास करणे, हे आजच्या काळात गरजेचे झालेय.
अगदी तान्ही बाळे सुद्धा, मान सावरणे, रांगणे, बसणे .. हे टप्पे आता लवकर पार पाडताना दिसतात.
जर त्यांची क्षमता असेल, आणि ती प्रत्येक बाळाची वेगवेगळी असते, तर त्यांच्या आकलनशक्तीनुसार त्यांना
शिक्षण मिळाले पाहिजे. >>>>>>>>>>> दिनेश +१
पण म्हणुनच रेसचे घोडे दौडवणे, हे पालकांचे उद्योग झाले आहेत. आकलनशक्तीचा विचार, आणि बालकाला वाटणारा आनंद हे कोणी लक्षात घेतच नाही. उगाच रेस आहे म्हणुन उद्यासाठी आजच ढोरमेहनत घेणे चुकीचे वाटते.
मी स्वतः जेव्हा १०-११-१२ केंद्रिय विद्यालयाला केवळ ३ महिने शिकवलं (आणि कोणताही ग्रूहपाथ न देता), तरी मुलं मजेने physics शिकली, पण तिथे जॉईन व्हायच्या आधी तोच विषय त्यांच्या नावडीचा होता, कारण अति-गृहपाठ. Sad

सध्या माझी मुलं ३+ शाळेत जात आहे. (ते त्याला कोरियनमध्ये काहीतरी म्हणतात). ते तिकडे काहीतरी शिकतात. ते संध्याकाळी आनंदात असतात, हेच माझं समाधान. बाकी काही शिको न शिको.... तशी ती माय-बापावर गेली नाहीत, त्यामुळे शिकतच असावी. Happy

निवांत, सुखी आहात... Happy

पुण्यातील विखे पाटील शाळेबद्दल कुणाला काही माहित आहे का. चांगाली शाळा आहे असे ऐकले अहे.

साती, त्याबद्दल डिटेलवार लिहणार आहेच. पण इथे अस्थानी होइल. बाय द वे इथलं कर्सिव बद्दल लिहलेलं बघुन मगच्या आठवड्यात दोन्ही मुलांना एका सरांकडुन ट्रेनिंग दिले. मुलगा तयार झाला. मुलगी अजुन करतेय.

Pages